There are many Stotras in this blog of many Gods. Stotra is a blog for the people who have faith in God. If your are reading a devi stotra then for having more devi storas please click on Title.It's a link. If you recite any of the stotras you like, then results will be good and make your life happy and prosperous.I myself have experienced it and there are many people like me.The stotra is to be recited with full concentration daily.
Shri Ram Kruta Shambu Stuti is in Sanskrit. It is a very beautiful stotra of God Shiva. On 20th February 2012 being Mahashivratri, I am uploading this stotra for the devotees of God Shiva.
1) I bow to purana-purusha God Shiva. His power has neither end nor limit hence I bow to God Shiva who knows everything and he has knowledge of everything. I bow to Prabhu Rudra who has no death. I bow to Sharva (God Shiva) who can destroy anything.
2) I bow to non-destroyable Param-dev (God Siva). I bow to guru of all people; Umapati (God Siva). I bow to God Shiva who is destroyer of poverty. I bow to Maheshwar (God Siva) who is destroyer of diseases.
3) I bow to God Shiva who does well to people and whose form or roopa is beyond our thinking. I bow to Bhagwan Bhav (God Shiva) who is just like a seed of creation of the universe. I bow to Paramatmaa (God Siva) who is protector of the Universe. I bow to Rudra (God Siva) who is destroyer of the universe.
4) I bow to God Shiva who is loved by Parvati. I bow to God Shiva who is always in kshar and akshar roopa. I bow to Bhagwan Trilochan (God Shiva) whose roopa is chinmay and which is beyond comparison.
5) I bow to God Shiva who is full of mercy. I bow to Bhagwan Bhootanaath (God Siva) who creates fear for life on earth (Sansar). I bow to Maheshwar (God Siva) who fulfills the desires of devotees. I bow to God Somanath (God Siva) who is husband (Swami) of Bhagwati Uma.
6) I bow to Trilochan (God Siva) whose three eyes are three Vedas. I bow to Sadashiva (God Siva) who is different from the form of three murti. I bow to holy God Shiva. I bow to Parmatma (God Siva) who is different from Sat (Good) and Asat (Bad). I bow to Bhagwan Har (God Siva) who destroys sins of his devotees.
7) I bow to Bhagwan Shankar who takes different form for the well of the universe. I bow to the proctor of the life on the earth (Sansar) and who is creator of Good (Sat) and Bad (Asat). I bow to God Vishwanath.
8) I bow to Yadneshwar (God Siva) who is havya (offerings of the Yadnya) and kavya roopa. I bow to God Shiva who do well and giver of desired things to his devotees. I bow to God Shiva who is donor of everything.
9) I bow to Bhagwan Somanath who is always care taker of his devotees. I bow to victorious Umanath (God Siva). I bow to Swami of Nandi (God Siva) and who is loved by god Ganesh.
10) I bow to Bhagwan Chandrashekhar (God Siva) who is destroyer of unhappiness and sorrow from the life on the earth. I bow to Maheshwar who is right to praise and who has held holy Ganga on his head. I bow to husband of Uma who is most excellent among gods.
11) God Brahma, God Indra and other gods and demons also worship the feet of God Shiva. I bow to him. I bow to Bhagwan (God Siva) who has held third eye on his forehead to see what Goddess Parvati says.
12) Panchamrut, Sandal wood paste, holy lamps, dhoop, various types of flowers, Mantras and food are used for worshiping God Som (God Siva), I bow to him.
Thus here completes this Shri RamKruta Shambu Stuti which is from Brahma Purana.
श्रीरामकृत शम्भुस्तुतिः
श्री राम उवाच
नमामि शम्भुं पुरुषं पुराणं नमामि सर्वज्ञमपारभावम् I
नमामि रुद्रम् प्रभुमक्षयं तं नमामि शर्वं शिरसा नमामि II १ II
नमामि देवं परमव्ययं तमुमापतिं लोकगुरुं नमामि I
नमामि दारिद्र्यविदारणं तं नमामि रोगापहरं नमामि II २ II
नमामि कल्याणमचिन्त्यरूपं नमामि विश्र्वोद्भवबीजरूपम् I
नमामि विश्र्वस्थितिकारणं तं नमामि संहारकरं नमामि II ३ II
नमामि गौरीप्रियमव्ययं तं नमामि नित्यं क्षरमक्षरं तम् I
नमामि चिद्रूपममेयभावं त्रिलोचनं तं शिरसा नमामि II ४ II
नमामि कारुण्यकरं भवस्य भयंकरं वाSपि सदा नमामि I
नमामि दातारमभीप्सितानां नमामि सोमेशमुमेशमादौ II ५ II
नमामि वेदत्रयलोचनं तं नमामि मूर्तित्रयवर्जितं तम् I
नमामि पुण्यं सदसद्व्यतीतं नमामि तं पापहरं नमामि II ६ II
नमामि विश्र्वस्य हिते रतं तं नमामि रूपाणि बहूनि धत्ते I
यो विश्र्वगोप्ता सदसत्प्रणेता नमामि तं विश्र्वपतिं नमामि II ७ II
यज्ञेश्र्वरं सम्प्रति हव्यकव्यं तथागतिं लोकसदाशिवो यः I
आराधितो यश्र्च ददाति सर्वं नमामि दानप्रियमिष्टदेवम् II ८ II
नमामि सोमेश्र्वरमस्वतन्त्रमुमापतिं तं विजयं नमामि I
नमामि विघ्नेश्र्वरनन्दिनाथं पुत्रप्रियं तं शिरसा नमामि II ९ II
नमामि देवं भवदुःखशोकविनाशनं चन्द्रधरं नमामि I
नमामि गङ्गाधरमीशमीड्यमुमाधवं देववरं नमामि II १० II
नमाम्यजादीशपुरन्दरादिसुरासुरैर्चितपादपद्मम् I
नमामि देवीमुखवादनानामीक्षार्थमक्षित्रितयं य ऐच्छत् II ११ II
पञ्चामृतैर्गन्धसुधूपदीपैर्विचित्रपुष्पैर्विविधैश्र्च मन्त्रैः I
अन्नप्रकारैः सकलोपचारैः सम्पूजितं सोममहं नमामि II १२ II
II इति श्री ब्रह्मपुराणे श्रीरामकृता शम्भुस्तुतिः सम्पूर्णा II
श्रीरामकृत शम्भुस्तुतिः
मराठी अर्थ:
श्रीराम म्हणाले
१) मी पुराणपुरूष श्री शम्भुना नमस्कार करतो. ज्यांच्या असीम सत्तेला
पार वा अंत नाही त्या सर्वज्ञ शिवाला मी नमस्कार करतो. अविनाशी
प्रभु रुद्राला मी नमस्कार करतो. सर्वाचा संहार करणार्या शर्वाला मी
मस्तक लवून नमस्कार करतो.
२) अविनाशी परमदेवाला मी नमस्कार करतो. लोकगुरू उमापतीला
मी नमस्कार करतो. दारिद्र्यतेला नष्ट करणार्या शिवाला मी नमस्कार
करतो. रोगांचा नाश करणार्या महेश्र्वराला मी नमस्कार करतो.
३) ज्यांचे रूप हा चिंतनाचा विषय नाही त्या कल्याणमय शिवाना मी
नमस्कार करतो. विश्र्वाच्या उत्पत्तीचे बीजरूप असलेल्या भगवान
भवाला मी नमस्कार करतो. जगाचे पालन करणार्या परमात्म्याला
मी नमस्कार करतो. संहारकारी रुद्राला मी नमस्कार करतो.
४) पार्वतीला प्रिय असणार्या अविनाशी प्रभुना मी नमस्कार करतो.
नित्य क्षर-अक्षर स्वरूप असलेल्या शंकराला मी नमस्कार करतो.
ज्यांचे स्वरूप चिन्मय व अप्रमेय आहे त्या भगवान त्रिलोचनाला
मी नमस्कार करतो.
५) करुणा करणार्या भगवान शिवाना मी नमस्कार करतो. संसारांत
भय निर्माण करणार्या भगवान भूतनाथाला मी नमस्कार करतो.
भक्तांच्या मनीषा पूर्ण करणार्या महेश्र्वराला मी नमस्कार करतो.
देवी उमेचे स्वामी श्रीसोमनाथाना मी नमस्कार करतो.
६) तीन वेद ज्यांचे तीन डोळे आहेत त्या त्रिलोचनाना मी नमस्कार
करतो. त्रिविध मूर्तीने रहित अशा सदाशिवाला मी नमस्कार करतो.
पुण्यमय शिवाला मी नमस्कार करतो. सत्-असत् या पासून वेगळे
असलेल्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. भक्तांच्या पापाना
नष्ट करणार्या भगवान हराला मी नमस्कार करतो.
७) जे नेहमी विश्र्वाच्या हिताचा विचार करतात, जे अनेकविध रूपे
धारण करतात त्या भगवान शंकरांना मी नमस्कार करतो. जे संसाराचे
रक्षक आहेत आणि सत्-असत् चे निर्माते आहेत त्या विश्र्वपतीना मी
नमस्कार करतो.
८) हव्य-कव्य स्वरूप यज्ञेश्र्वराला मी नमस्कार करतो. सर्व लोकांचे
नेहमी कल्याण करणारे जे भगवान शिव ते त्यांची आराधना केल्यावर
उत्तम गती आणि अभिष्ट गोष्टी देतात त्या दानप्रिय इष्टदेवाला मी
नमस्कार करतो.
९) भगवान सोमनाथाला मी नमस्कार करतो. जे स्वतंत्र न राहता भक्तांच्या
आधीन राहातात त्या विजयी उमानाथाला मी नमस्कार करतो. विघ्नराज
गणेश आणि नंदीचे स्वामी व पुत्राना प्रिय असणारे भगवान शिवाना मी
मस्तक लवून नमस्कार करतो.
१०) संसारांतील दुःख आणि शोक यांचा नाश करणारे भगवान चंद्रशेखर
याना मी नमस्कार करतो.जे स्तुती करण्यास योग्य आहेत आणि ज्यांनी
मस्तकावर गंगेला धारण केले आहे त्या महेश्र्वराना मी नमस्कार करतो.
देवांमध्ये श्रेष्ठ अशा उमापतीना मी नमस्कार करतो.
११) ब्रह्मा आणि ईश्वर, इंद्र आदी देव आणि असुर ज्यांच्या चरण कमलांची
पूजा करतात त्या भगवानाला मी नमस्कार करतो. ज्यांनी पार्वतीच्या मुखांतून
निघणार्या वचनांवर दृष्टी ठेवण्यासाठीच जणू तीन नेत्र धारण केले आहेत अशा
भगवानाना मी नमस्कार करतो.
१२) पंचामृत, चंदन, उत्तम धूप, दीप, निरनिराळी फुले, विविध मंत्र आणि नेवेद्य
आदी उपचारांनी पुजीलेल्या भगवान सोमाला मी नमस्कार करतो.
अशा प्रकारे ही श्रीरामाने केलेली शंभू महादेवांची स्तुती संपूर्ण झाली.
Radha Nam Mahatmya Stotram is in Sanskrit and it is from BrahmaVaivart Purana ShriKrishna JanmaKhanda. “Refo” in the name “Radha” makes us free from sins of many births. It also gives us moksha thus makes us free from further births and deaths. “Aakar’ in the name of “Radha” removes the pains arising before birth and after birth from diseases and death. “Dhakar’ in the name “Radha” makes us free the loss of life. “Aakar” in the name “Radha” makes us free from the bindings of the life. There is no doubt that when we hear, recite or remember the name “Radha” all the above sorrows are removed from our life. “Refo” in the name “Radha” gives us devotion of God ShriKrishna to concentrate our mind at the feet of the God ShriKrishna. “Aakar’ in the name of “Radha” connects us with God ShriKrishna who is ever happy and desired by everybody and who is siddhi-swaroop. “Dhakar’ in the name “Radha” gives us the pleasure of to be in the company of God Hari for a very long period, as prosperous, as knowledgeable as him and makes one with him. “Aakar’ in the name of “Radha” gives us yoga-shakti, donor and lustrous like God ShriKrishna and yoga-mati to remember God ShriKrishna forever. There is no doubt that when we hear, recite or remember the name “Radha” all our sin, greediness, diseases, sorrow, death and fear of YamaRaja are removed from our life.
श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र
रेफो हि कोटी जन्माघं कर्मभोगं शुभाशुभम् I
आकारो गर्भवासं च मृत्युं च रोगमुत्सृजेत् I
धकार आयुषो हानिमाकारो भवबन्धनम् I
श्रवणस्मरणोक्तिभ्यः प्रणश्यति न संशयः I
रेफ़ो हि निश्चलां भक्तिं दास्यं कृष्णपदाम्बुजे II
सर्वेप्सितं सदानन्दं सर्वसिद्धौघमीश्वरम् I
धकारः सहवासं च तत्तुल्यकालमेव च I
ददाति सार्ष्टिसारूप्यं तत्त्वज्ञानं हरेः समम् I
आकरस्तेजसां राशिं दानशक्तिं हरौ यथा I
योगशक्तिं योगमतिं सर्वकालं हरिस्मृतिम् I
श्रुत्युक्तिस्मरणाद्योगान्मोहजालं च किल्बिषम् I
रोगशोक मृत्युयमा वेपन्ते नात्र संशयः I
II इति श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र संपूर्णं II
श्री राधा नाम महात्म्य स्तोत्राचा
मराठी अर्थ:
राधा या शब्दाची व्युत्पत्ति देवाना, असुराना आणि मुनिना अभीष्ट, सर्वांत उत्कृष्ट व मोक्षदायिनी आहे. राधा नावांतील 'रेफ' कोटी जन्मांचे पाप आणि शुभाशुभ कर्मभोगांपासून मुक्त करणारा आहे. 'आकार' हा गर्भवासांतील दुःख, मृत्यु आणि रोग दूर करणारा आहे. 'धकार' आयुष्याची हानी निवारण करणारा व 'आकार' हा संसार बंधनाचे निवारण करणारा आहे. राधा नावाचे श्रवण, स्मरण आणि कीर्तन केल्यावर वरील सर्व दोषांचा नाश होतो, हे निःसंशय आहे. राधा नावांतील 'रेफ' श्रीकृष्णाच्या पदारविन्दात अविचल भक्ती आणि दास्य प्रदान करणारा आहे. 'आकार' सर्ववाञ्छित, सदानन्दस्वरूप, संपूर्ण सिद्धसमुदायरूप म्हणजेच ईश्वराची प्राप्ती करून देतो. 'धकार' श्रीहरी बरोबर त्यांच्याच सारखे अनंत काळ सहवासाचे सुख, तसेच ऐश्वर्य, सारुप्य व तत्त्वज्ञान देणारा आहे. 'आकार' हा श्रीहरी प्रमाणे तेजोराशी, दानशक्ति, योगशक्ति व योगमति तसेच नेहमी श्रीहरीच्या स्मरणाची आठवण करून देणारा आहे. श्रीराधा नावाचे श्रवण, स्मरण आणि कीर्तन या तिन्हीचा सुयोग मोहजाल, पाप, रोग, शोक, मृत्यु आणि यमराज यांचा थरकाप उडवितो यांत काही संशय नाही. अशा रीतीने श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र संपूर्ण झाले.
हे स्तोत्र ब्रह्मवैवर्त पुराणांतील श्री कृष्णजन्मखंडातील अध्याय १३ मधील श्लोक १०५ ते १११ मध्ये आले आहे.
Gurucharitra Adhyay 13 is very pious. It is in Marathi. This Adhyay describes the blessings of Shri Guru (Shri Nrusinha Saraswati) to his devotee vipra who was suffering from stomachache. He was going to end his life since he could not eat anything because of paining in his stomach. Shri Guru called him and asked him why he was fade up with his life. The vipra told Shri Guru about paining in his stomach after eating anything. As such vipra has no hopes for living. Shri Guru assured him that his (vipra's) paining has stopped and now he can eat anything. Shri Guru asked him to come to Saiyandeo's house for bhiksha and eat there along with him. The vipra followed everything told by Shri Guru and was very much happy. He came to know that his disease has cured and he can eat anything because of the blessings by Shri Guru. Thus this Adhyay if chanted with concentration, devotion and faith; is a remedy and medicine to remove any disease and obtaining good and sound health.
श्रीगुरुचरित्र अध्याय (१३) तेरावा
रोगनिवृती
श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्रीगुरुभ्यो नमः II
नामधारक शिष्यराणा I लागे सिद्धाचिया चरणां I
करसंपुट जोडूनि जाणा I विनवीतसे परियेसा II १ II
जय जया सिद्ध मुनी I तूं तारक या भवार्णीं I
सांगितलें ज्ञान प्रकाशोनि I स्थिर जाहलें मन माझें II २ II
गुरुचरित्रकथामृत I सेवितां तृष्णा अधिक होत I
शमन करणार समर्थ I तूंचि एक कृपानिधि II ३ II
गुरुचरित्र कामधेनु I सांगितलें तुम्हीं विस्तारोनु I
तृप्त नव्हे माझें मनु I आणखी अपेक्षा होतसे II ४ II
क्षुधेंकरूनि पीडिलें ढोर I जैसें पावे तृणबिढार I
त्यातें होय मनोहर I न वचे तेथोनि परतोनि II ५ II
एखादा न देखे तक्र स्वप्नीं I त्यासी मिळे क्षीरबरणी I
नोहे मन त्याचे धणी I केवीं सोडी तो ठाव II ६ II
तैसा आपण स्वल्पज्ञानी I नेणत होतों गुरु-निर्वाणी I
अविद्यामाया वेष्टोनि I कष्टत होतों स्वामिया II ७ II
अज्ञानतिमिररजनीसी I ज्योतिस्वरूप तूंचि होसी I
प्रकाश केलें गा आम्हांसी I निजस्वरूप श्रीगुरूचें II ८ II
तुवां केले उपकारासी I उत्तीर्ण काय होऊं सरसी I
कल्पवृक्ष दिल्हेयासी I प्रत्युपकार काय द्यावा II ९ II
एखादा देता चिंतामणी I त्यासी उकार काय धरणीं I
नाहीं दिधलें न ऐकों कानीं I कृपामूर्ति सिद्धराया II १० II
ऐशा तुझिया उपकारासी I उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं I
म्हणोनि लागतसे चरणांसी I एकोभावेंकरोनियां II ११ II
स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ I अधिक झाला मज स्वार्थ I
उपजला मनीं परमार्थ I गुरुसी भजावें निरंतर II १२ II
प्रयागी असतां गुरुमूर्ति I माधवसरस्वतीस दीक्षा देती I
पुढें काय वर्तली स्थिति I आम्हांप्रती विस्तारावें II १३ II
ऐकोनि शिष्याचें वचन I सिद्धमुनि संतोषोन I
मस्तकीं हस्त ठेवून I आश्वासिती तया वेळीं II १४ II
धन्य धन्य शिष्या सगुण I तुज लाधले श्रीगुरुचरण I
संसार तारक भवार्ण I तूंचि एक परियेसा II १५ II
तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय I म्हणोनि पुससी भक्तिभावें I
संतोष होतो आनंदमय I तुझ्या प्रश्नेंकरूनियां II १६ II
सांगेन ऐक एकचित्तें I चरित्र गुरुचें विख्यातें I
उपदेश देऊनि माधवातें I होते क्वचीत्काळ तेथेंचि II १७ II
असतां तेथें वर्तमानीं I प्रख्यात झाली महिमा सगुणी I
शिष्य झाले अपार मुनि I मुख्य माधवसरस्वती II १८ II
तया शिष्यांची नामें सांगतां I विस्तार होईल बहु कथा I
प्रख्यात असतीं नामें सात I सांगेन ऐक एकचित्तें II १९ II
बाळसरस्वती कृष्णसरस्वती I उपेंद्र-माधवसरस्वती I
पांचवा असे आणीक यति I सदानंदसरस्वती देखा II २० II
ज्ञानज्योतिसरस्वती एक I सातवा सिद्ध आपण ऐक I
अपार होते शिष्य आणिक I एकाहूनि एक श्रेष्ठ पैं II २१ II
त्या शिष्यांसमवेत I श्रीगुरू निघाले दक्षिणपंथ I
समस्त क्षेत्रें पावन करित I आले पुन्हा कारंजनगरासी II २२ II
भेटी झाली जनकजननी I येवोनि लागताति चरणीं I
चतुर्वर्ग भ्राते भगिनी I समस्त भेटिती स्वामिया II २३ II
देखोनियां श्रीगुरुमूर्तीसी I नगरलोक अत्यंत हर्षी I
आले समस्त भेटीसी I पूजा करिती परोपरी II २४ II
घरोघरीं श्रीगुरूसी I पाचारिती भिक्षेसी I
जाहले रूपें बहुवसी I घरोघरीं पूजा घेती II २५ II
समस्त लोक विस्मय करिती I अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं I
वेषधारी दिसतो यति I परमपुरुष होय जाणा II २६ II
यातें नर जे म्हणती I तें जाती नरकाप्रती I
कार्याकारण अवतार होती I ब्रह्माविष्णुमहेश्वर II २७ II
जननीजनक येणें रीतीं I पूजा करिती भावभक्तीं I
श्रीगुरू झाले श्रीपादयति I जातिस्मृति जननीसी II २८ II
देखोनी जननी तये वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I
सत्यसंकल्प चंद्रमौळी I प्रदोषपूजा आली फळा II २९ II
पतीस सांगे तया वेळीं I पूर्वजन्माचें चरित्र सकळीं I
विश्ववंद्द्य पुत्र प्रबळी I व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां II ३० II
याचि श्रीपाद-ईश्वराचें I पूजन केलें मनोवाचें I
प्रसिद्ध झालें जन्म आमुचें I साफल्य केलें परियेसा II ३१ II
म्हणोनि नमिती दोघेजणीं I विनविताति कर जोडूनि I
उद्धारावें या भवार्णी I जगन्नाथा यतिराया II ३२ II
श्रीगुरू म्हणती तयांसी I एखादे काळी परियेसीं I
पुत्र होय संन्यासी I उद्धरील कुळें बेचाळीस II ३३ II
त्यासी शाश्वत ब्रह्मलोक I अचळ पद असे देख I
त्याचे कुळीं उपजतां आणिक I त्यासीही ब्रह्मपद परियेसा II ३४ II
यमाचे दुःखें भयाभीत I नोहे त्याचे पितृसंततींत I
पूर्वज जरी नरकीं असत I त्यांसी शाश्वत ब्रह्मपद II ३५ II
याकारणें आम्हीं देखा I घेतला आश्रम विशेखा I
तुम्हां नाही यमाची शंका I ब्रह्मपद असे सत्य II ३६ II
ऐसें सांगोनि तयांसी I आश्वासीतसे बहुवसी I
तुमचे पुत्र शतायुषी I अष्ट ऐश्वर्ये नांदती II ३७ II
त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही I पहाल सुखें तुमचे नयनी I
पावाल क्षेम काशीभुवनी I अंतःकाळी परियेसा II ३८ II
मुक्तिस्थान काशीपुर I प्रख्यात असे वेदशास्त्र I
न करा मनी चिंता मात्र I म्हणोनि सांगती तये वेळी II ३९ II
त्यांची कन्या असे एक I नाम तिचें 'रत्नाई ' विशेष I
श्रीगुरूसी नमूनि ऐक I विनवीतसे परियेसा II ४० II
विनवीतसे परोपरी I स्वामी मातें तारीं तारीं I
बुडोनि जात्यें भावसागरीं I संसारमाया वेष्टोनियां II ४१ II
संसार-तापत्रयासी I आपण भीतसें परियेसीं I
निर्लिप्त करी गा आम्हांसी I आपण तपासी जाईन II ४२ II
ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरू निरोपिताति आपण I
स्त्रियांसी पतिसेवाचरण I तेंचि तप परियेसा II ४३ II
येणें या भवार्णवासी I कडे पडती परियेसीं I
जैसा भाव असे ज्यासी I तैसें होईल परियेसा II ४४ II
उतरावया पैल पार I स्त्रियांसी असे तो भ्रतार I
मनें करोनि निर्धार I भजा पुरुष शिवसमानी II ४५ II
त्यासी होय उद्धार गति I वेदपुराणें वाखाणिती I
अंतःकरणीं न करी खंती I तूंतें गति होईल जाण II ४६ II
ऐकोनि श्रीगुरूचें वचन I विनवीतसे कर जोडून I
श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान I विनवीतसें अवधारीं II ४७ II
तूं जाणसी भविष्यभूत I कैसें मातें उपदेशीत I
माझें प्रालब्ध कवणगत I विस्तारावें मजप्रति II ४८ II
श्रीगुरू म्हणती तियेसी I तुझी वासना असे तपासी I
संचित पाप असे तुजसी I भोगणें असे परियेसा II ४९ II
पूर्वजन्मीं तूं परियेसी I चरणीं लाथिलें धेनूसी I
शेजारी स्त्रीपुरुषांसी I विरोधें लाविला कलह जाणा II ५० II
तया दोषास्तव देखा I तूंतें बाधा असे अनेका I
गायत्रीसी लाथिलें ऐका I तूं सर्वांगीं कुष्टी होसील II ५१ II
विरोध केला स्त्रीपुरुषांसी I तुझा पुरुष होईल तापसी I
तूंतें त्यजील भरंवसीं I अर्जित तुझें ऐसें असे II ५२ II
ऐकोनि दुःख करी बहुत I श्रीगुरुचरणीं असे लोळत I
मज उद्धरावें गुरुनाथा त्वरित I म्हणोनि चरणीं लागली II ५३ II
श्रीगुरु म्हणती ऐक बाळे I क्वचित्काळ असाल भले I
अपरवयसा होतांचि काळें I पति तुझा यति होये II ५४ II
तदनंतर तुझा देह I कुष्टी होईल अवेव I
भोगूनि स्वदेही वय I मग होईल तुझ गति II ५५ II
नासतां तुझा देह जाण I भेटी होईल आमुचे चरण I
तुझें पाप होईल दहन I सांगेन क्षेत्र ऐक पां II ५६ II
भीमातीर दक्षिण देशीं I असे तीर्थ पापविनाशी I
तेथें जाय तूं भरंवसीं I अवस्था तुज घडलियावरी II ५७ II
या भूमंडळीं विख्यात I तीर्थ असे अति समर्थ I
गंधर्वपुर असे ख्यात I अमरजासंगम प्रसिद्ध जाण II ५८ II
ऐसें सांगोनि तियेसी I श्रीगुरु निघाले दक्षिण देशीं I
त्र्यंबक-क्षेत्रासी I आले, गौतमी-उद्भव जेथें II ५९ II
शिष्यांसहित गुरुमूर्ति I आले नासिकक्षेत्राप्रती I
तीर्थमहिमा असे ख्याति I पुराणांतरीं परियेसा II ६० II
तीर्थमहिमा सांगता I विस्तार होईल बहु कथा I
संक्षेपमार्गे तुज आतां I सांगतसें परियेसीं II ६१ II
त्या गौतमीची महिमा I सांगतां अपार असे आम्हां I
बहिरार्णव-उदक उगमा I ब्रह्मांडाव्यतिरिक्त II ६२ II
जटामुकुटीं तीर्थेश्वर I धरिली होती प्रीतिकर I
मिळोनी समस्त ऋषीश्वर I उपाय केला परियेसा II ६३ II
ब्रह्मऋषि गौतम देखा I तपस्वी असे विशेषा I
व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका I अनुष्ठानस्थानाजवळी II ६४ II
पूर्वी मुनी सकळी I नित्य पेरूनि पिकविती साळी I
ऐसे त्यांचे मंत्र बळी I महापुण्यपुरुष असती II ६५ II
समस्त ऋषि मिळोनि I विचार करिती आपुले मनीं I
ऋषिगौतम महामुनी I सर्वेश्वराचा मुख्य दास II ६६ II
त्यासी घालितां सांकडें I गंगा आणील आपुलें चाडें I
समस्तां आम्हां पुण्य घडे I गंगास्नानें भूमंडळी II ६७ II
(श्लोक) या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम् I
सा गतिः सर्व जंतूनां गौतमीतीरवासिनाम् II ६८ II
(टीका) ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी I कोटिवर्षे तपस्वियांसी I
जे गति होय परियेसीं I ते स्नानमात्रें गौतमीच्या II ६९ II
याकारणें गौतमीसी I आणावें यत्नें भूमंडळासी I
सांकडें घालितां गौतमासी I आणितां गंगा आम्हां लाभ II ७० II
म्हणोनि रचिली माव एक I दुर्वेची गाय सवत्सक I
करोनि पाठविली ऐक I गौतमाचे व्रीहिभक्षणासी II ७१ II
ऋषि होता अनुष्ठानीं I देखिलें धेनूसी नयनीं I
निवारावया त्तक्षणी I दर्भ पवित्र सोडिलें II ७२ II
तेचि कुश जाहलें शस्त्र I धेनूसी लागलें जैसे वज्रास्त्र I
पंचत्व पावली त्वरित I घडली हत्या गौतमासी II ७३ II
मिळोनी समस्त ऋषिजन I प्रायश्चित्त देती जाण I
गंगा भूमंडळीं आण I याविणें तुम्हां नाहीं शुद्धि II ७४ II
याकारणें गौतमऋषीं I तप केलें सहस्र वर्षी I
प्रसन्न झाला व्योमकेशी I वर माग म्हणितलें II ७५ II
गौतम म्हणे सर्वेश्वरा I तुवां देशील मज वरा I
उद्धरावया सचराचरा I द्यावी गंगा भूमंडळासी II ७६ II
गौतमाचे विंनतीसी I निरोप दिधला गंगेसी I
घेवोनि आला भूमंडळासी I पापक्षालनार्थ मनुष्यांचे II ७७ II
ऐसी गंगाभागीरथी I कवणा वर्णावया सामर्थ्य I
याचि कारणें श्रीगुरुनाथ I आले ऐक नामधारका II ७८ II
ऐसी गौतमीतटाकयात्रा I श्रीगुरू आपण आचरीत I
पुढें मागुती लोकानुग्रहार्थ I आपण हिंडे परियेसा II ७९ II
तटाकयात्रा करितां देख I आले श्रीगुरू मंजरिका I
तेथें होता मुनि एक I विख्यात 'माधवारण्य' II ८० II
सदा मानसपूजा त्यासी I नरसिंहमूर्ति परियेसीं I
देखता झाला श्रीगुरूसी I मानसमूर्ति जैसी देखे II ८१ II
विस्मित होऊनि मानसीं I नमिता झाला श्रीगुरूमूर्तीसी I
स्तोत्र करी बहुवसी I अतिभक्तीकरूनियां II ८२ II
(श्लोक) यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्, अधिष्ठितं देवनदीसमीपे I
य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम् II ८३ II
(ओंव्या) येणेंपरी श्रीगुरूसी I विनवी माधवारण्य हर्षी I
श्रीगुरू म्हणती संतोषीं I तया माधवारण्यासी II ८४ II
अत्यंतमार्गस्थितिमार्गरूपं अत्यंत योगादधिकारतत्त्वम् I
मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शय ते II ८५ II
(ओंव्या) ऐसें श्रीगुरु तयासी I आश्वासोनि म्हणती हर्षी I
निजस्वरूप तयासी I दाविते झाले परियेसा II ८६ II
श्रीगुरूचें स्वरूप देखोनि I संतोषी झाला तो मुनि I
विनवीतसे कर जोडूनि I नानापरी स्तुति करी II ८७ II
जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तीचा अवतारू I
लोकां दिससी नरु I परमपुरुषा जगज्योति II ८८ II
तूं तारक विश्वासी I म्हणोनि भूमीं अवतरलासी I
कृतार्थ केलें आम्हांसी I दर्शन दिधलें चरण आपुले II ८९ II
ऐसेपरी श्रीगुरूसी I स्तुति करी तो तापसी I
संतोष होऊन अति हर्षी I आश्वासिती तया वेळीं II ९० II
म्हणती श्रीगुरू तयासी I सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी I
तुज सद्गती भरंवसीं I ब्रह्मलोक प्राप्त होय II ९१ II
नित्यपूजा तूं मानसीं I करिसी नृसिंहमूर्तीसी I
प्रत्यक्ष होईल परियेसीं I न करीं संशय मनांत II ९२ II
ऐसें सांगोनि तयासी I श्रीगुरू निघाले परियेसीं I
आले वासरब्रह्मेश्वरासी I गंगातीर महाक्षेत्र II ९३ II
तया गंगातटाकांत I श्रीगुरू समस्त शिष्यांसहित I
स्नान करितां गंगेंत I आला तेथें विप्र एक II ९४ II
कुक्षिव्यथा असे बहुत I तटाकीं असे लोळत I
उदर व्यथा अत्यंत I त्यजूं पाहे प्राण देखा II ९५ II
पोटव्यथा बहु त्यासी I नित्य करी तो उपवासासी I
भोजन केलिया दुःख ऐसी I प्राणांतिक होतसे II ९६ II
याकारणें द्विजवर I सदा करी फलाहार I
अन्नासी त्यासी असे वैर I जेवितां प्राण त्यजूं पाहे II ९७ II
पक्षमासां भोजन करी I व्यथा उठे त्याचे उदरीं I
ऐसा किती दिवसवरी I कष्टत होता तो द्विज II ९८ II
पूर्व दिवसीं तया ग्रामीं I आला सण महानवमी I
जेविला मिष्टान्न मनोधर्मी I मासें एक पारणें केलें II ९९ II
भोजन केलें अन्न बहुत I त्याणें पोट असे दुखत I
गंगातीरीं असे लोळत I प्राण त्वरित त्यजूं पाहे II १०० II
दुःख करी द्विज अपार I म्हणे गंगेंत त्यजीन शरीर I
नको आतां संसार I पापरूपें वर्तत II १०१ II
अन्न प्राण अन्न जीवन I कवण असेल अन्नावीण I
अन्न वैरी झालें जाण I मरण बरवें आतां मज II १०२ II
मनीं निर्धार करोनि I गंगाप्रवेश करीन म्हणोनि I
पोटीं पाषाण बांधोनि I गंगेमध्यें निघाला II १०३ II
मनीं स्मरे कर्पूरगौर I उपजलों आपण भूमिभार I
केले नाहीं परोपकार I अन्नदानादिक देखा II १०४ II
न करीं पुण्य इह जन्मांत I जन्मांतरी पूर्वी शत I
पुण्यफळ नसे दिसत I मग हे कष्ट भोगीतसें II १०५ II
ग्रास हरितले ब्राह्मणाचे I किंवा धेनु-कपिलेचे I
घात केले विश्वासियाचे I मग हे भोग भोगीतसें II १०६ II
अपूर्ती पूजा ईश्वराची I केली असेल निंदा गुरूची I
अवज्ञा केली मातापितयांची I मग हे भोगीतसें II १०७ II
अथवा पूर्वजन्मीं आपण I केलें असेल द्विजधिक्कारण I
अतिथी आलिया न घालीं अन्न I वैश्वदेवसमयासी II १०८ II
अथवा मारिलें वोवरांसी I अग्नि घातला रानासी I
वेगळें सांडूनि जनक-जननींसी I स्त्रियेसहित मी होतों II १०९ II
मातापिता त्यजोनियां I असों सुखें जेवूनियां I
पूर्वार्जवापासोनियां I मग हे कष्ट भोगीतसें II ११० II
ऐसीं पापें आठवीत I विप्र जातो गंगेंत I
तंव देखिलें श्रीगुरूनाथें I म्हणती बोलावा ब्राह्मणासी II १११ II
आणा आणा त्या ब्राह्मणासी I प्राण त्यजितो कां सुखेसीं I
आत्महत्या महादोषी I पुसों कवण कवणाचा II ११२ II
श्रीगुरूवचन ऐकोनि I गेले शिष्य धांवोनि I
द्विजवरातें काढोनि I आणिलें श्रीगुरूसन्मुख II ११३ II
अनाथासी कल्पतरू I दुःखिष्टासी कृपासागरू I
पुसतसे श्रीगुरू I तया दुःखिष्ट विप्रासी II ११४ II
श्रीगुरू म्हणती तयासी I प्राण कां गा त्यजूं पाहसी I
आत्महत्या महादोषी I काय वृतांत सांग आम्हां II ११५ II
विप्र म्हणे गा यतिराया I काय कराल पुसोनियां I
उपजोनि जन्म वायां I भूमिभार जाहलों असें II ११६ II
मास-पक्षां भोजन करितों I उदरव्यथेनें कष्टतों I
साहूं न शकें प्राण देतों I काय सांगू स्वामिया II ११७ II
आपणासी अन्न वैरी असतां I केवीं वांचावें गुरुनाथा I
शरीर सर्व अन्नगता I केवीं वांचूं जगद्गुरू II ११८ II
श्रीगुरू म्हणती ब्राह्मणासी I तुझी व्यथा गेली परियेसीं I
औषध असे आम्हांपासीं I क्षण एकें सांगों तुज II ११९ II
संशय न धरीं आतां मनीं I भिऊ नको अंतःकरणीं I
व्याधि गेली पळोनि I भोजन करीं धणीवरी II १२० II
श्रीगुरूवचन ऐकोनि I स्थिर झाला अंतःकरणीं I
माथा ठेवूनि श्रीगुरूचरणीं I नमन केलें तया वेळीं II १२१ II
इतुकिया अवसरीं I तया ग्रामींचा अधिकारी I
विप्र एक अवधारीं I आला गंगास्नानासी II १२२ II
तंव देखिलें श्रीगुरूसी I येऊनि लागला चरणांसी I
नमन केलें भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मे II १२३ II
आश्वासोनि तये वेळीं I पुसती श्रीगुरू स्तोममौळी I
कवण नाम कवण स्थळीं I वास म्हणती तयासी II १२४ II
ऐकोनि श्रीगुरूचें वचन I सांगतसे तो ब्राह्मण I
गोत्र आपलें कौडिण्य I आपस्तंब शाखेसीं II १२५ II
नाम मज 'सायंदेव' असे I वास-स्थळ आपलें 'कडगंची'स I
आलों असे उदरपूर्तीस I सेवा करितों यवनांची II १२६ II
अधिकारपणें या ग्रामीं I वसों संवत्सर ऐका स्वामी I
धन्य धन्य झालों आम्ही I तुमचे दर्शनमात्रेसीं II १२७ II
तूं तारक विश्वासी I दर्शन दिधलें आम्हांसी I
कृतार्थ झालों भरंवसी I जन्मांतरीचे दोष गेले II १२८ II
तुझा अनुग्रह होय ज्यासी I तरेल या भवार्णवासी I
अप्रयत्नें आम्हांसी I दर्शन दिधलें स्वामिया II १२९ II
( श्लोक ) गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरूस्तथा I
पापं तापं च दैन्यं च हरेत्श्रीगुरुदर्शनम् II १३० II
( टीका ) गंगा देखितांचि पापें जाती I चंद्रदर्शनें ताप नासती I
कल्पतरूची ऐसी गति I दैन्यावेगळा करी जाण II १३१ II
तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण I पाप-ताप-दैन्यहरण I
देखिले आजि तुमचे चरण I चतुर्वर्गफल पावलों II १३२ II
ऐशी स्तुति करूनि I पुनरपि लागला श्रीगुरूचरणीं I
जगद्गुरू आश्वासोनि I निरोप देती तया वेळीं II १३३ II
श्रीगुरु म्हणती तयासी I आमुचें वाक्य परियेसीं I
जठरव्यथा ब्राह्मणासी I प्राणत्याग करीतसे II १३४ II
उपशमन याचे व्याधीसी I सांगो औषध तुम्हांसी I
नेवोनि आपुले मंदिरासी I भोजन करवीं मिष्टान्न II १३५ II
अन्न जेवितां याची व्यथा I व्याधि न राहें सर्वथा I
घेऊनि जावें आतां त्वरिता I क्षुधाक्रांत विप्र असे II १३६ II
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I
प्राणत्याग करितां भोजन I या ब्राह्मणासी होतसे II १३७ II
जेविला काल मासें एका I त्याणें प्राण जातो ऐका I
अन्न देतां आम्हांसी देखा I ब्रह्महत्या त्वरित घडेल II १३८ II
श्रीगुरू म्हणती सायंदेवासी I आम्ही औषधी देतों यासी I
अपूपान्न-माषेसीं I क्षीरमिश्रित परमान्न II १३९ II
अन्न जेवितां त्वरितेसीं I व्याधि जाईल परियेसीं I
संशय न धरीं तूं मानसीं I त्वरित न्यावें गृहासी II १४० II
अंगीकारोनि तया वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I
विनवीतसे करुणाबहाळी I यावें स्वामी भिक्षेसी II १४१ II
अंगीकारोनि श्रीगुरुनाथ I निरोप देती हो कां त्वरित I
सिद्ध म्हणे ऐक मात I नामधारक शिष्योत्तमा II १४२ II
आम्ही होतों तये वेळीं I समवेत शिष्य सकळीं I
जठरव्यथेचा विप्र जवळी I श्रीगुरू गेले भिक्षेसी II १४३ II
विचित्र झालें त्याचे घरी I पूजा केली परोपरी I
पतिव्रता त्याची नारी I 'जाखाई ' म्हणिजे परियेसा II १४४ II
पूजा करिती श्रीगुरूसी I षोडशोपचारे परियेसीं I
तेणेचि रीती आम्हांसी I शिष्यां सकळिकां वंदिलें II १४५ II
श्रीगुरूपूजा-विधान I विचित्र केलें अतिगहन I
मंडळ केलें रक्तवर्ण I एकेकासी पृथक्-पृथक् II १४६ II
पद्म रचूनि अष्टदळी I नानापरींचे रंगमाळी I
पंचवर्ण चित्रमाळी I रचिली तियें परियेसा II १४७ II
चित्रासन श्रीगुरूसी I तेणेंचिपरी सकळिकांसी I
मंडळार्चन विधीसी I करिती पुष्पगंधाक्षता II १४८ II
संकल्पोनि विधीसीं I नमन केलें अष्टांगेसीं I
माथा ठेवूनि चरणीं न्यासी I पाद सर्वही अष्टांगी II १४९ II
षोडशोपचार विधीसीं I पंचामृतादि परियेसीं I
रुद्रसूक्तमंत्रेसीं I चरण स्नापिले तये वेळीं II १५० II
श्रीगुरुचरणीं अतिहर्षी I पूजा करीत षोडशी I
तया विप्रा ज्ञान कैसी I चरणतीर्थ धरिता झाला II १५१ II
तया चरणतीर्थासी I पूजा करीत भक्तीसी I
गीतवाद्यें आनंदेसीं I करी आरती नीरांजन II १५२ II
अनुक्रमें श्रीगुरुपूजा I करिता झाला विधिवोजा I
पुनरपि षोडशोपचारें पूजा I करीतसे भक्तीनें II १५३ II
अक्षय वाणें आरती I श्रीगुरूसी ओंवाळिती I
मंत्रघोष अतिभक्तीं I पुष्पांजळी करिता झाला II १५४ II
अनेकपरी गायन करी I नमन करी प्रीतिकरीं I
पतिव्रता असे नारी I पूजा करिती उभयवर्ग II १५५ II
ऐसेपरी श्रीगुरूसी I पूजा केली परियेसीं I
तेणेंची विधीं शिष्यांसी I आम्हां समस्तांसी वंदिलें II १५६ II
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I वर देती अतिप्रीती I
तुझी संतती होईल ख्याति I गुरुभक्ति वंशोवंशी II १५७ II
तूं जाणसी गुरुचा वास I अभिवृद्धि होय वंशोवंश I
पुत्रपौत्री नांदाल हर्षी I गुरुभक्ति येणेंपरी II १५८ II
ऐसें बोलोनि द्विजासी I आशीर्वचन देती अतिहर्षी I
नमन करूनि श्रीगुरूसी I ठाय घातले तये वेळीं II १५९ II
नानापरींचे पक्कान्न I अपूपादी माषांन्न I
अष्टविध परमान्न I शर्करासहित निवेदिलें II १६० II
शाक पाक नानापरी I वाढताति सविस्तारीं I
भोजन करिती प्रीतीकरीं I श्रीगुरुमूर्ति परियेसा II १६१ II
जठरव्यथेच्या ब्राह्मणें I भोजन केलें परिपूर्ण I
व्याधि गेली तत्क्षण I श्रीगुरुचे कृपादृष्टीनें II १६२ II
परीस लागतां लोहासी I सुवर्ण होय परियेसीं I
दर्शन होतां श्रीगुरूसी I व्याधि कैंची सांग मज II १६३ II
उदय जाहलिया दिनकरासी I संहार होतो अंधकारासी I
श्रीगुरुकृपा होय ज्यासी I दैन्य कैंचे तया घरीं II १६४ II
ऐसेपरी श्रीगुरुनाथें I भोजन केलें शिष्यासहित I
आनंद झाला तेथें बहुत I विस्मय करिती सकळई जन II १६५ II
अभिनव करिती सकळ जन I द्विजासी वैरी होते अन्न I
औषध झालें तेंची अन्न I व्याधि गेली म्हणताति II १६६ II
सिद्ध म्हणे नामधारकास I श्रीगुरुकृपा होय ज्यास I
जन्मांतरीचे जाती दोष I व्याधि कैंची त्याचे देहीं II १६७ II
गंगाधराचा नंदन I सरस्वती सांगें विस्तारोनि I
गुरुचरित्र कामधेनु I ऐका श्रोते एकचित्तें II १६८ II
जे ऐकती भक्तीनें I व्याधि नसती त्यांचे भुवना I
अखिल सौख्य पावती जाणा I सत्यं सत्यं पुनः सत्यम् II १६९ II
II इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथानिरसनं
नाम त्रयादशोSध्यायः II
श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II