Friday, August 16, 2013

Ahalyakrutam Ram Stotram अहल्याकृतं रामस्तोत्रम्


Ahalyakrutam Ram Stotram 
Ahalyakruta Ram Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of Ahalya. This stotra is from Adhyatam Ramayana and is in Balkand. This stotra is arisen from Uma-Maheshwar discussion. Goutam rushi cursed Ahlya and because of the cursing she became a stone. However on her request she was told that; she would become to life on God Ram’s foot touch to that stone. As such God Ram when touched that stone by his foot; Ahlya appeared from that stone. Falshruti (what you will get after reciting stotra with devotion) In this stotra it is said that whosoever recites this stotra with devotion will become free from all sins his had committed. Those who with devotion and filling God Ram in his heart, recites this stotra for having a son will become a father of a son. Lady who is bare (issue less) after reciting this stotra for a year would also become a mother. After reciting this stotra daily the devotee would receive Mukti (become free from bondage of death-life).
अहल्याकृतं रामस्तोत्रम् 

श्रीगणेशाय नमः ॥ 
 अहल्योवाच ॥ 
अहो कृतार्थाऽस्मि जगन्निवास ते पादाब्जसंलग्नरजःकणादहम् । 
स्पृशामि यत्पद्मजशंकरादिभि र्विमृग्यते रंधितमानसैः सदा ॥ १ ॥ 
अहो विचित्रं तव राम चेष्टितं मनुष्यभावेन विमोहितं जगत् । 
चलस्यजग्रं चरणादिवर्जितः संपूर्ण आनंदमयोऽतिमायिकः ॥ २ ॥ 
यत्पादपंकजपरागपवित्रगात्रा भागीरथी भवविरिचिमुखान्पुनाति । 
साक्षात्स एव मम दृग्विषयो यदाऽऽस्ते किं वर्ण्यते मम पुराकृतभागधेयम् ॥ ३ ॥ 
मर्त्यावतारे मनुजाकृतिं हरि रामाभिधेयं रमणीयदेहिनम् । 
धनुर्धरं पद्मविशाललोचनं भजामि नित्यं न परान्भजिष्ये ॥ ४ ॥ 
यत्पादपंकजरजः श्रुतिभिर्विमृग्यं यन्नाभिषंकजभवः कमलासनश्र्च । 
यन्नामसाररसिको भगवान्पुरारिस्तं रामचंद्रमनिशं ह्रदि भावयामि ॥ ५ ॥ 
यस्यावतारचरितानि विरिचिलोके गायंति नारदमुखा भवपद्मजायाः । 
आनंदजाश्रुपरिषिक्तकुचाग्रसीमा वागीश्र्वरी च तमहं शरणं प्रपद्ये ॥ ६ ॥ 
सोऽयं परात्मा पुरुषः पुराण एषः स्वयंज्योतिरनंत आद्यः । 
मायातनुं लोकविमोहनीयां धत्ते परानुग्रह एष रामः ॥ ७ ॥ 
अयं हि विश्र्वोद्भवसंयमानाम् ऐकः स्वमायागुणबिंबितो यः । 
विरिचिविष्ण्वीश्र्वरनामभेदान् धत्ते स्वतंत्रः परिपूर्णं आत्मा ॥ ८ ॥ 
नमोऽस्तु ते राम तवांघ्रिपंकजं श्रिया धृतं वक्षसि लालितं प्रियात् । 
आक्रांतमेकेन जगत्र्त्रयं पुरा ध्येयं मुनींद्रैरभिमानवर्जितैः ॥ ९ ॥ 
जगतामादिभूतस्त्वं जगत्वं जगदाश्रयः । 
सर्वभुतेष्वसंयुक्त एको भाति भवान्परः ॥ १० ॥ 
ॐकारवाच्यस्त्वं राम वाचामविषयः पुमान् । 
वाच्यवाचकभेदेन भवानेव जगन्मयः ॥ ११ ॥ 
कार्यकारणकर्तृत्व फलसाधनभेदतः । 
एको विभासि राम त्वं मायया बहुरुपया ॥ १२ ॥ 
त्वन्मायामोहितधियस्त्वां न जानंति तत्वतः । 
मानुषं त्वाऽभिमन्यन्ते मायिनं परमेश्र्वरम् ॥ १३ ॥ 
आकाशवत्त्वं सर्वत्र बहिरंतर्गतोऽमलः । 
असंगो ह्यचलो नित्यः शुद्धो बुद्धः सदव्ययः ॥ १४ ॥ 
योषिन्मूढाहमज्ञा ते तत्त्वं जाने कथं विभो । 
तस्मात्ते शतशो राम नमस्कुर्यामनन्यधीः ॥ १५ ॥ 
देव मे यत्रकुत्रापि स्थिताया अपि सर्वदा । 
त्वत्पादकमले सक्ता भक्तिरेव सदाऽस्तु मे ॥ १६ ॥ 
नमस्ते पुरुषाध्यक्ष नमस्ते भक्तवत्सल । 
नमस्तेऽस्तु ह्रषीकेश नारायण नमोऽस्तु ते ॥ १७ ॥ 
भवभयहरमेकं भानुकोटिप्रकाशं करधृतशरचापं कालमेघावभासम् । 
कनकरुचिरवस्रं रत्नवत्कुंडलाढ्यं कमलविशदनेत्रं सानुजं राममीडे ॥ १८ ॥ स्तुत्वैवं पुरुषं साक्षाद्राघवं पुरतः स्थितम् । 
परिक्रम्य प्रणम्याशु सानुज्ञाता ययौ पतिम् ॥ १९ ॥ 
अहल्यया कृतं स्तोत्रं यः पठेद्भक्तिसंयुतः । 
स मुच्यतेऽखिलैः पापैः परं ब्रह्माधिगच्छति ॥ २० ॥ 
पुत्राद्यर्थे पठेद्भक्त्या रामं ह्रदि निधाय च । 
संवत्सरेण लभते वंध्या अपि सुपुत्रकम् ॥ २१ ॥ 
सर्वान्कामानवाप्नोति रामचंद्रप्रसादतः ॥ २२ ॥ 
ब्रह्मघ्नो गुरुतल्पगोऽपि पुरुषः स्तेयी सुरापोऽपि वा 
मातृभ्रातृविहिंसकोऽपि सततं भोगैकबद्धादरः । 
नित्यं स्तोत्रमिदं जपन् रघुपतिं भक्त्या ह्रदिस्थं स्मरन् 
ध्यायन् मुक्तिमुपैति किं पुनरसो स्वाचारयुक्तो नरः ॥ २३ ॥ 
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्र्वरसंवादे बालकांडांतर्गतम् अहल्याविरचितं रामचंद्रस्तोत्रं संपूर्णम् ॥
हे राम स्तोत्र अहल्याने केले आहे. 
अध्यात्मरामायणांतील बालकांडामधिल उमा-महेश्र्वर संवादामध्ये हे आले आहे. 
फलश्रुतीः 
अहल्येने केलेले हे स्तोत्र भक्तीभावाने म्हटले असता सर्व पापांपासून मुक्तता होते आणि अंती ब्रह्मलोक प्राप्त होतो. पुत्रप्राप्तीसाठी रामाचे ह्रदयांत ध्यान करुन हा पाठ केला असता वंध्येलासुद्धा वर्षाने पुत्र प्राप्त होतो. या स्तोत्राच्या पाठाने सर्व कामनांची पूर्तता होते.
Ahalyakrutam Ram Stotram 
 अहल्याकृतं रामस्तोत्रम्


Custom Search

Tuesday, August 13, 2013

GuruCharitra Adhyay 11 श्रीगुरुचरित्र अध्याय अकरावा (११)


GuruCharitra Adhyay 11 
Gurucharitra Adhyay 11 is in Marathi. It is a story of birth of 2nd incarnation of Gurudevdatta which is Narsinha Saraswati. Datta’s first incarnation is ShripadShriVallabh and second is Narsinha Saraswati. ShripadShriVallabh had told Ambika to perform the ShaniPradosha Vrata if Ambika wants to become a mother of a son like Guru Shripad Yati then after performing the ShaniPradosha Vrata by the blessings of God Shiva her wish will be fulfilled. This we have seen in Adhyay 8. Ambika performed ShaniPradosha Vrata so that she could have a son like Guru ShripdShriVallabha in her next birth. Now in this Adhyay 11 Ambika had taken birth as Amba-Bhavani. Her husband is Madhav. Both husband and wife were performing Prabodha-Pooja. They become mother and father of a god like son who uttered “Om” immediately after his birth. After Mounji-Bandhan son Narhari told his mother and father that he could not stay with them and lead a normal life they expected him to live. He was an incarnation of God Datta. His birth was for certain specific purpose and to live a life as Sanyasi. He blessed them and they will have four more sons. These sons will take care of you in your old age. Thus this is a short gist of this Adhyay.


श्रीगुरुचरित्र अध्याय अकरावा (११) 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । 
विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥ १ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । 
पूर्वी वृतांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्रियेची ॥ २ ॥ 
शनिप्रदोषीं सर्वेश्र्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । 
देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळी ॥ ३ ॥ 
झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । 
वाजसनीय शाखेसी । विप्रकुळी जन्मली ॥ ४ ॥ 
जातक वर्तले तियेसी । नाम ' अंबा-भवानी ' ऐसी । 
आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरी परियेसा ॥ ५ ॥ 
वर्धता मातापित्यागृही । वाढली कन्या अतिस्नेही । 
विवाह करिती महोत्साही । देती विप्रासी तेचि ग्रामी ॥ ६ ॥ 
शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया ' माधव ' जाण । 
त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतीकरुनि ॥ ७ ॥ 
तया माधवविप्राघरी । शुभाचारें होती नारी । 
वासना तिची पूर्वापरी । ईश्र्वरपूजा करीतसे ॥ ८ ॥ 
पूजा करी ईश्र्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसी । 
प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्सर ॥ ९ ॥ 
मंदवारी त्रयोदशीसी । पूजा करिती अतिविशेषी । 
तंव वत्सरें झाली षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥ १० ॥ 
मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । 
उत्तम डोहळे होती तियेसी । ब्रह्मज्ञान बोलतसे ॥ ११ ॥ 
करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । 
अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥ १२ ॥ 
ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । 
पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होती मातापिता ॥ १३ ॥ 
 जन्म होतांचि तो बाळक । ' ॐ 'कार शब्द म्हणतसे अलोलिक । 
पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥ १४ ॥ 
जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षणा दान । 
ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥ १५ ॥ 
सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषी । 
कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥ १६ ॥ 
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्र्वासी । 
याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥ १७ ॥ 
अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । 
नव निधि याच्या घरी । राहती ऐक द्विजोत्तमा ॥ १८ ॥ 
न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । 
 याचे दर्शनमात्रे पतित । पुनीत होतील परियेसी ॥ १९ ॥ 
होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरंवसी । 
संदेह न धरावा मानसी । म्हणोनि करिती नमस्कार ॥ २० ॥ 
म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । 
याचेनि महादैन्य हरे । भेणे नलगे कळिकाळा ॥ २१ ॥ 
तुमचे मनी जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । 
यातें करावें हो जतना । निधान आले तुमचे घरा ॥ २२ ॥ 
ऐसे जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । 
 जनक जननी संतोषोन । देती दान वस्राभरणे ॥ २३ ॥ 
सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । 
दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोवाळिती ॥ २४ ॥ 
व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिले म्हणत । 
उपजतां बाळ ' ॐ ' कार जपत । आश्र्चर्य म्हणती सकळ जन ॥ २५ ॥
नगरलोक इष्टमित्र । पहावया येती विचित्र । 
दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥ २६ ॥ 
मायामोहे जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि । 
आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥ २७ ॥ 
परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवी संचार । 
लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥ २८ ॥ 
वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । 
नामकरण पुरःसरी । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥ २९ ॥ 
' शालग्रामदेव ' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । 
नाम ' नरहरी ' ऐसे म्हणत । उच्चार केला धर्मकर्में ॥ ३० ॥ 
ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । 
माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥ ३१ ॥ 
पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडे बाळा । 
एखादी मिळवा कां अवळा । स्तनपान देववूं ॥ ३२ ॥ 
अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । 
ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥ ३३ ॥ 
स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । 
वस्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥ ३४ ॥ 
विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणी । 
नमन करिती बाळकाचरणी । माता होय खेळविती ॥ ३५ ॥ 
पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यदें गाय अति हर्षी । 
न राहे बाळक पाळणेसी । सदा खेळे महीवरी ॥ ३६ ॥ 
वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारी । 
वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥ ३७ ॥ 
माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । 
चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥ ३८ ॥ 
पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । 
उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळी ॥ ३९ ॥ 
सांगती जाण ज्योतिषी । आराधावे कुलदेवतेसी । 
 अर्कवारी अश्र्वत्थपर्णेसी । अन्न घालावे तीनी वेळां ॥ ४० ॥ 
एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावे बरव्या विवेके । 
बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥ ४१ ॥ 
हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । 
विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥ ४२ ॥ 
एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । 
श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥ ४३ ॥ 
कांही केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । 
पुत्रासी जाहली वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥ ४४ ॥ 
सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । 
पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केवीं करावें म्हणोनियां ॥ ४५ ॥ 
विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । 
उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊ नये ॥ ४६ ॥ 
मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । 
मुका असे हा निश्र्चितीं । कैसे दैव झालें आम्हां ॥ ४७ ॥ 
कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्र्वरगौरी आराधिले । 
त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥ ४८ ॥ 
ईश्र्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । 
न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंती शिवासी ॥ ४९ ॥ 
एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखो स्वप्नेसीं । 
वेष्टिलों होतो आम्ही आशी । आमुते रक्षील म्हणोनि ॥ ५० ॥ 
नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । 
काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥ ५१ ॥ 
ऐसे नानापरी देखा । जननी करी महादुःखा । 
जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥ ५२ ॥ 
घरांत जाऊनि तये वेळा । घेऊनि आला लोखंड सबळा । 
हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥ ५३ ॥ 
आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । 
बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥ ५४ ॥ 
गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । 
पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥ ५५ ॥ 
अमृतदृष्टीं पाहातां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमी । 
विश्र्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥ ५६ ॥ 
मग पुत्रातें आलिंगोनी । विनविताति जनकजननी । 
तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥ ५७ ॥ 
तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्ही नाही ऐकिलें । 
अज्ञान-मायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥ ५८ ॥ 
आमुचे मनींची वासना । तुवां पुरवावी नंदना । 
तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥ ५९ ॥ 
हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । 
कटी दावी मौजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥ ६० ॥ 
संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । 
मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥ ६१ ॥ 
मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । 
 व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥ ६२ ॥ 
केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं । 
मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥ ६३ ॥ 
चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । 
इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥ ६४ ॥ 
 नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । 
 आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥ ६५ ॥ 
नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । 
द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥ ६६ ॥ 
इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । 
 गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेपरी ॥ ६७ ॥ 
एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें । 
देकार देतील हिरण्य वस्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥ ६८ ॥ 
ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । 
मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥ ६९ ॥ 
चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । 
पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥ ७० ॥ 
मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त ।
सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥ ७१ ॥ 
भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकभावें । 
मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥ ७२ ॥ 
गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केले त्या बाळका । 
सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥ ७३ ॥ 
गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । 
बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥ ७४ ॥ 
गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊनि आली माता । 
वस्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥ ७५ ॥ 
पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । 
बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी । आचारधर्में वर्ततसे ॥ ७६ ॥ 
पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । 
' अग्निमीळेपुरोहितं ' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥ ७७ ॥ 
दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद ' इषेत्वा- '। 
लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥ ७८ ॥ 
तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । 
' अग्नआयाहि- ' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥ ७९ ॥ 
सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । 
 मुके बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥ ८० ॥ 
यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । 
म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥ ८१ ॥ 
इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । 
तुवां उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥ ८२ ॥ 
नव्हती बोल तुझें मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । 
निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थें आचरावया ॥ ८३ ॥ 
आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । 
 वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥ ८४ ॥ 
 ऐकोनि पुत्राचे वचन । दुःखे दाटली अतिगहन । 
बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥ ८५ ॥ 
निर्जीव होऊनि क्षणैक । करिती झाली महाशोक । 
पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥ ८६ ॥ 
आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । 
न बोलसी आम्हांसवे याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥ ८७ ॥ 
न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । 
ईश्र्वरपूजा आले फळ । म्हणोनि विश्र्वास केला आम्ही ॥ ८८ ॥ 
 ऐसें नानापरी देखा । पुत्रासी म्हणे ते बाळिका । 
 आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥ ८९ ॥ 
ऐकोनि मातेचे वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । 
नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणे तेंचि असे ॥ ९० ॥ 
तूंतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारी । 
तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसी ॥ ९१ ॥ 
तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार । 
म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जाहले जातिस्मरण ॥ ९२ ॥ 
पूर्वजन्मींचा वृतांत । स्मरता जाहली विस्मित । 
श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥ ९३ ॥ 
देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । 
श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥ ९४ ॥ 
ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करी वो गुप्ती । 
 आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥ ९५ ॥
 याचिकारणें आम्ही आतां । हिंडू समस्त तीर्थी । 
कारण असे पुढे बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥ ९६ ॥ 
येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । 
पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ९७ ॥ 
पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्हां जरी जाल । 
आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥ ९८ ॥ 
धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । 
धर्मशास्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥ ९९ ॥ 
ब्रह्मचर्य वर्षें बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । 
मुख्य असे, वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥ १०० ॥ 
मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । 
मग सन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्र येणेपरी ॥ १०१ ॥ 
ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । 
विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥ १०२ ॥ 
यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । 
येणेविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥ १०३ ॥ 
समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी । 
तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥ १०४ ॥ 
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरु सांगती त्तवज्ञान । 
ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥ १०५ ॥ 
गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । 
तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्र विस्तार ॥ १०६ ॥ 
पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । 
महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥ १०७ ॥
 इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

GuruCharitra Adhyay 11 
श्रीगुरुचरित्र अध्याय अकरावा (११)


Custom Search

Thursday, August 8, 2013

GuruCharitra Adhyay 10 गुरुचरित्र अध्याय १०

GuruCharitra Adhyay 10 

Gurucharitra Adhyay 10 is in Marathi. It is a story of a devotee of ShripadShrivallabha. His name was Vallbhesha who uses to visit Kuravpur every year. He was a trader. One year he decided to visit Kurvapur after his trading. He further decided to offer lunch to people at Kurvapur if gets a handsome return in his trading. He earns a lot and immediately he rushed to Kuravpur to act on his decision to offer lunch to all devotees in Kurvapur. On his he met with thieves who killed him and robbed all his money but Guru ShripadShriVallabh came to his help and he killed all the thieves and make Vallebhesha live again. Importance of GuruBhakti is described in this Adhyay 10 through the story of Vallbhesha.
गुरुचरित्र अध्याय १०

 श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण । 
कुरवपुरींचे महिमान । केवी जाहले म्हणतसे ॥ १ ॥ 
म्हणसी श्रीपाद नाही गेले । आणिक सांगसी अवतार झाले । 
विस्तार करोनियां सगळे । निरोपावे म्हणतसे ॥ २ ॥ 
सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । 
अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्र्वव्यापक परमात्मा ॥ ३ ॥ 
पुढें कार्याकारणासी । अवतार झाला परियेसीं । 
राहिला आपण गुप्तवेषीं । तया कुरवक्षेत्रांत ॥ ४ ॥ 
पाहें पा भार्गवराम देखा । अद्यापि स्थिर-जीविका । 
अवतार जाहला आपण अनेका । तयाचेनिपरी निश्र्चयावें ॥ ५ ॥ 
सर्वां ठायीं वसे आपण । मूर्ति एक नारायण । 
त्रिमूर्तीचे तीन गुण । उत्पत्ति-स्थिति-लयासी ॥ ६ ॥ 
भक्तजन तारावयासी । अवतार होती ह्रषीकेशी । 
शाप दिधला दुर्वासऋषीं । कारण असे तयाचे ॥ ७ ॥ 
त्रयमूर्तीचा अवतार । त्याचा कवणा कळे पार । 
निधान तीर्थ कुरवपुर । वास तेथे गुरुमूर्ति ॥ ८ ॥ 
जें जें चिंतिले भक्तजनीं । लाधती श्रीगुरुदर्शनी । 
श्रीगुरु राहती जया स्थानीं । कामधेनु असे जाणा ॥ ९ ॥ 
श्रीपादश्रीवल्लभस्थानमहिमा । वर्णावया मी किमात्मा । 
अपार असे सांगतां तुम्हां । एखादा सांगेन दृष्टांत ॥ १० ॥ 
तुज सांगावया । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण । 
सर्वथा न करी तो निर्वाण । पाहे वास भक्तांची ॥ ११ ॥ 
दृढ भक्ति असावी मनीं स्थिर । गंभीरपणे असावे धीर । 
तोचि उतरे पैलपार । इह सौख्य परलोक ॥ १२ ॥ 
याचि कारणें दृष्टांत तुज । सांगेन ऐक वर्तले सहज । 
काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया 'वल्लभेश' ॥ १३ ॥ 
सुशील द्विज आचारवंत । उदीममार्गे उदर भरीत । 
प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥ १४ ॥ 
असतां पुढे वर्तमानीं । वाणिज्या निघाला तो उदिमी । 
नवस केला अतिगहनीं । संतर्पावे ब्राह्माणांसी ॥ १५ ॥ 
उदीम आलिया फळासी । यात्रेसि येईन विशेषीं । 
सहस्र वर्ण-ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥ १६ ॥ 
निश्र्चय करोनियां मानसीं । निघाला तो द्विज उदीमासी । 
चरण ध्यातसे मानसीं । सदा श्रीपादश्रीवल्लभाचे ॥ १७ ॥ 
जे जे ठायीं जातां देखा । अनंत संतोष पावे निका । 
शतगुणें जाहला लाभ अधिका । परमानंदे परतला ॥ १८ ॥ 
लय लावूनि श्रीपादचरणीं । यात्रेसि निघाला तत्क्षणीं । 
करावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥ १९ ॥ 
द्रव्य घेऊनि द्विजवर । निघतां देखती तस्कर । 
कपटरुप होऊनि संगतीकर । तेही तस्कर निघाले ॥ २० ॥ 
दोनतीन दिवसवरी । तस्कर आले संगिकारी । 
एके दिवशी मार्गी रात्री । जात होते मार्गस्थ ॥ २१ ॥ 
तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जातो कुरवपुरासी । 
श्रीपादश्रीवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥ २२ ॥ 
बोलत मार्गेसीं । तस्करीं मारिलें द्विजासी । 
शिर छेदूनि परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥ २३ ॥ 
भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरीं । 
पावला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांगी ॥ २४ ॥ 
त्रिशूळ खड्ग येरे हातीं । उभा ठेला तस्करांपुढतीं । 
 वधिता झाला तस्करां त्वरिती । त्रिशूळेंकरुनि तयेवेळीं ॥ २५ ॥ 
समस्त तस्करांसि मारितां । एक येऊनि वुनविता । 
कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधि आपण असें ॥ २६ ॥ 
नेणे याते वधितील म्हणोन । आपण आलो संगी होऊन । 
तूं सर्वोत्तमा जाणसी खूण । विश्र्वांचे मनींची वासना ॥ २७ ॥ 
ऐकोनि तस्कराची विनंति । श्रीपाद त्यातें जवळी बोलाविती । 
हाती देऊनियां विभूति । प्रोक्षी म्हणती विप्रावरी ॥ २८ ॥ 
मान लावूनि तया वेळां । मंत्रोनि लाविती विभूति गळां । 
सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा एकचित्तें ॥ २९ ॥ 
इतुके वर्तता परियेसीं । उदय जाहला दिनकरासी । 
 श्रीपाद जाहले अदृश्येसी । राहिला तस्कर विप्राजवळी ॥ ३० ॥ 
विप्र पुसे तस्करासी । म्हणे तूं कां माते धरिलेसी । 
कवणे वधिले या मनुष्यांसी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥ ३१ ॥ 
तस्कर सांगे द्विजासी । जाहले अभिनव परियेसीं । 
आला होता एक तापसीं । वधिलें यांते त्रिशूळें ॥ ३२ ॥ 
मातें राखिले तुजनिमित्त । धरोनि बैसविले अतिप्रीत । 
विभूति मंत्रोनि तूंते लावीत । सजीव केला तुझा देह ॥ ३३ ॥ 
उभा होता आतां जवळी । अदृश्य जाहला तत्काळी । 
न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण राखिला ॥ ३४ ॥ 
होईल ईश्र्वर त्रिपुरारि । भस्मांगी होता जटाधारी । 
तूं भक्त होशील निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनियां ॥ ३५ ॥ 
ऐकोनि तस्कराचे वचन । विश्र्वासला तो ब्राह्मण । 
तस्करापाशील द्रव्य घेऊन । गेला यात्रे कुरवपुरा ॥ ३६ ॥ 
नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्र चारी । 
अनंतभक्ती प्रीतिकरीं । पूजा करी श्रीपादगुरुपादुकांची ॥ ३७ ॥ 
ऐसे अनेक भक्तजन । सेवा करिती श्रीपादस्थान । 
कुरवपुर प्रख्यात जाण । अपार महिमा परियेसा ॥ ३८ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरीं तूं मानसीं । 
श्रीपाद आहेति कुरवपुरासी । अदृश्य होऊनियां ॥ ३९ ॥ 
पुढे अवतार असे होणे । म्हणोनि गुप्त, न दिसे कवणा । 
अनंतरुप नारायण । परिपूर्ण असे सर्वां ठायीं ॥ ४० ॥ 
श्रीपादश्रीवल्लभमूर्ति । लौकिकी ऐक्य परमार्थी । 
झाला अवतार पुढे ख्याती । श्रीनरसिंहसरस्वती ॥ ४१ ॥ 
म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार । 
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ ४२ ॥ ॥ 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे कुरवपुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

GuruCharitra Adhyay 10 
 गुरुचरित्र अध्याय १०


Custom Search