Monday, May 23, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 11 विश्र्वरुपदर्शन योग अध्याय ११


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 11 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 11 is in Sanskrit. Name of this Adhyay is VishvarupDarshan Yoga. God Shrikrishna is has given powerful eyes to Arjuna so that he can see the VishvarupDarshan of God Shrikrishna. Arjuna is describing it for our benefit as this VishvarupDarshan is very rare to see.
विश्र्वरुपदर्शन योग अध्याय ११
अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १ ॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २ ॥
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्र्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रुपमैश्र्वरं पुरुषोत्तम ॥ ३ ॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्र्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ४ ॥
श्रीभगवानुवाच 
पश्य मे पार्थ रुपाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५ ॥
पश्यादित्यान्वसून् रुद्रानश्र्विनौ मरुतस्तथा । 
बहून्यदृष्टपूर्वाणी पश्याश्र्चर्याणि भारत ॥ ६ ॥
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि ॥ ७ ॥
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्र्वरम् ॥ ८ ॥
सञ्जय उवाच 
एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्र्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रुपमैश्र्वरम् ॥ ९ ॥
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्  ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १० ॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्र्वतोमुखम् ॥ ११ ॥
दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता । 
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२ ॥
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥ १३ ॥
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥ १४ ॥
अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे 
सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ-
मृषींश्र्च सर्वानुरगांश्र्च दिव्यान् ॥ १५ ॥     
अनेकबाहुदरवक्त्रनेत्रं-
पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरुपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं-
पश्यामि विश्र्वेश्र्वर विश्र्वरुप ॥ १६ ॥
किरीटिनं गदिनं चक्रिणं च 
तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता-
द्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७ ॥
त्वमक्षरं परमं वेदितव्यं-
त्वमस्य विश्र्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्र्वतधर्मगोप्ता 
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८ ॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्य-
मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं-
स्वतेजसा विश्र्वमिदं तपन्तम् ॥ १९ ॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि 
व्याप्तं त्वयैकेन दिशश्र्च सर्वाः ।
दृष्ट्वाद्भुतं रुपमुग्रं तवेदं-
लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २० ॥
अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति 
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः 
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१ ॥
रुद्रादित्या वसवो ये च साध्या-
विश्र्वेऽश्र्विनौ मरुतश्र्चोष्मपाश्र्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा-
वीक्षते त्वां विस्मिताश्र्चैव सर्वे ॥ २२ ॥
रुपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं-
महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं-
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥ २३ ॥
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं-
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा 
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४ ॥
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि 
दृष्टैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म 
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५ ॥
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः 
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ 
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६ ॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति 
दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु 
सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७ ॥
यथा नदिनां बहवोऽम्बुवेगाः 
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा-
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८ ॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा-
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका-
स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९ ॥
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ता-
ल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं-
भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३० ॥
आख्याहि मे को भवानुग्ररुपो-
नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं-
न हि प्रजानानि तव प्रवृत्तिम् ॥ ३१ ॥         
श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो-
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे 
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२ ॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व 
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव 
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३ ॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च 
कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा-
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४ ॥
सञ्जय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य 
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं-
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५ ॥
अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या 
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति 
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः ॥ ३६ ॥
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् 
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास 
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७ ॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराण-
स्त्वमस्य विश्र्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम 
त्वया ततं विश्र्वमनन्तरुप ॥ ३८ ॥
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः 
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्र्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्त्रकृत्वः
पुनश्र्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९ ॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते 
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं-
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं-
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं- 
मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१ ॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं-
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२ ॥
पितासि लोकस्य चराचरस्य 
त्वमस्य पूजश्र्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो-
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥ ४३ ॥
तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं-
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ४४ ॥
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देवरुपं-
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५ ॥
किरीटीनं गदिनं चक्रहस्त-
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रुपेण चतुर्भुजेन 
सहस्त्रबाहो भव विश्र्वमूर्ते ॥ ४६ ॥
श्रीभगवानुवाच
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं-
रुपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्र्वमनन्तमाद्यं-
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७ ॥
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानै-
र्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवंरुपः शक्य अहं नृलोके 
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८ ॥
मा ते व्यथा मा च विमूढभावो-
दृष्ट्वा रुपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं-
तदेव मे रुपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥            
सञ्जय उवाच
इत्युर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा 
स्वकं रुपं दर्शयामास भूयः ।
आश्र्वासयामास च भीतमेनं-
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेदं मानुषं रुपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥ ५१ ॥
श्रीभगवानुवाच
सुदुर्दर्शमिदं रुपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रुपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥ ५२ ॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ५४ ॥
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः ।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्र्वरुपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥  
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 11 विश्र्वरुपदर्शन योग अध्याय ११


Custom Search

Sunday, May 22, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 2 सांख्ययोग अध्याय २ रा


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 2 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 2 is in Sanskrit. Name of this Adhyay is Sankhya yoga. God Shrikrishna is telling to Arjuna why to fight through Sankhya Yoga.


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा (२) साङ्ख्ययोग
 सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलक्षेणम् ।
विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १ ॥
१) संजय म्हणाला अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणार्‍या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले,
Sanjay said,
1) To him this overcome with pity and grieving with eyes filled with tears and agitated, Madhusudan spoke these words,
श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥
२) श्रीभगवान म्हणाले हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरिलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही.

ShriBhagwan said

 2) Whence, O Arjuna, has this weakness, not entertained 
by honourable men (Aryans), nor conducive to (the attainment of) 
heaven, and leading to ill-fame, come on you at this crisis?

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २/३ ॥

३) म्हणून हे पार्था! षंढपणा पत्करु नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा! अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा.

3) Yield not to unmanliness, O Partha! It is not worthy of you; shaking off this mean faint-heartedness, arise O scorcher of foes.

अर्जुनउवाच                                                   कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।

इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २/४ ॥

४) अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना! युद्धात मी भीष्मपितामहांच्या 

आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना! हे दोघेही पूज्य आहेत.

4) how, O Madhusudana, shall I battle/fight with arrows against 
Bhishma and Drona, who are worthy of respect, O slayer of enemies?

गुरुनहत्वा हि महानुभावान्

श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।

हत्वार्थकामांस्तु गुरुनिहैव

भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ २/५ ॥

५) म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगांत भिक्षा 

मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारुनही या लोकांतरक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच ना भोगावयाचे !

5) without killing the noble-minded elders, even to live on alms in 

the world would be much better. But by killing these elders, I shall be enjoying even here pleasures like wealth and fulfilment of desires, drenched with (their) blood.

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो

यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।

यानेव हत्वा न जिजीविषाम-

स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २/६ ॥

६) युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हांला काय श्रेष्ठ 

आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हांला जिंकतील, हेही आम्हांला माहीत नाही. आणि ज्यांना मारुन आम्हांला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत.           

6) and we don’t know which would be the better course for us. 
Whether we should conquer them or they should conquer us. Those very persons, killing whom we should not desire to live, viz., the sons of Dhritarashtra, are gathered in front.  

कार्पण्यदोषोपहतस्वभावः

पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।

यच्छ्रेयः स्यान्निश्र्चितं ब्रूहि तन्मे

शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ २/७ ॥

७) करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे 

व धर्मा-अधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारणतुमचा शिष्य आहे. 

म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा.

7) with my natural traits overcome by (a sense of) helplessness and 
sin, and my mind perplexed regarding (my) duty, I ask you to tell me that which is definitely good for me. I am your disciple; teach me who have taken refuge in you.

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्

यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।

अवाप्य भूमावसपत्नमृद्धं

राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ २/८ ॥

८) कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धन-धान्यसमृद्ध राज्य मिळाले 

किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल, असा उपाय मला दिसत नाही.

8) I do not indeed see that which would remove this grief of mine 
that is utterly drying up my senses, even if I were to attain in this world a kingdom without rivals and prosperous, and even lordship over the gods.   

सञ्जय उवाच

एवमुक्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।

न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २/९ ॥

९) संजय म्हणाला, हे राजा ! निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने 
अन्तर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून ‘ मी युद्ध करणार नाही ‘ असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला.

9) Sanjay said, having thus spoken to Hrisikesha , Arjuna (Gudakesha) the harasser of foes, said to Govinda, ‘ I shall not fight ‘ and kept quiet.

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २/१० ॥     

१०) हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज ! अन्तर्यामी भगवान श्रीकृष्णदोन्ही सैन्यांच्या मध्यभा गी शोक करणार्‍या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करुन असे म्हणाले,

10) O descendant of (king) Bharata (Dhrutarastra), to him who was 
sorrowing between the two armies, Hrishikesha spoke these words, as if smiling.

श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्र्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २/११ ॥

११) श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना ! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परन्तु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.

11) Bhagwan Said, Arjuna ! you have been sorrowing for those who should not be grieved for, and (yet) you are talking like learned people. The learned grieve neither for the dead nor for the living people.

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २/१२

१२) मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही.

12) It is not indeed that I did not exist at any time, nor  you, nor these kings; nor that we all shall not exist hereafter.  

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २/१३ ॥

१३) ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरांत बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.

13) Even as the embodied self attains in this body childhood, youth, and old age, so does it attain another body; the wise man does not get deluded at this.

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २/१४ ॥
१४) हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात. म्हणून अनित्य आहेत. तेव्हां हे भारता ! ते तू सहन कर.
14) O son, of Kunti, sense-contacts (with objects) result in heat and cold, pleasure and pain. They are subject to coming and going and are transient; (therefore), O descendant of Bharata (Arjuna), (just) endure them.
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २/१५ ॥
१५) कारण हे श्रेष्ठ पुरुषा ! सुख-दुःख समान मानणार्‍या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.
15) O best of men, that wise person whom these not afflict, who is Equanimeous in pleasure and pain, is fit for immortality.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २/१६ ॥
१६) असत् वस्तूला  अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरुप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.
16) The unreal has no existence, and the real has has no non-existence; the conclusion about both these has been seen by the knowers of truth.  

अविनाशि तुद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।

विनाशमव्ययस्यास्य न कश्र्चित्कर्तुमर्हति ॥ २/१७ ॥ 
१७) ज्याने हे सर्व जग-दिसणार्‍या सर्व वस्तू व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करु शकत नाही.
17) But know that by which all this is pervaded to be imperishable. No one can bring about the destruction of this immutable principle.
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ २/१८ ॥
१८) या नाशरहित, मोजता न येणार्‍या, नित्यस्वररुप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना ! तू युद्ध कर.
18) These bodies of the eternal, imperishable, immeasurable, embodied self are said to have an end; therefore, fight, O descendant of Bharata.
य एनं वेत्ति हन्तारं यश्र्चैन मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २/१९ ॥
१९) जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो “ हा (आत्मा) मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही.
19) He who thinks it (self) to be a slayer and he who thinks it is slain, both are ignorant (of the truth); it (self) neither slays nor is slain.
न जायते म्रियते वा कदाचित-
न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्र्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २/२० ॥
२०) हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.
20) It (self) is not born and it doesn’t die at any time. And it doesn’t again come into existence by being born. It (self) is birth less, constant, eternal and ancient; it is not slain when the body is slain. 
वेदविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २/२१ ॥
२१) हे पार्था ! जो पुरुष, “ हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे “ हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील
21) Whom, O Partha, can that person who knows this (self) to be imperishable, constant, birthless and immutable slay or cause to be slain, and how?
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २/२२ ॥
२२) ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो (धारण करतो), त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो. 
22) Just as a person gives up worn out clothes and puts on other new ones, even so does the embodied self-give up decrepit bodies and enter other new ones.
नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २/२३ ॥
२३) या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. आणि वारा वाळवू शकत नाही.
23) Weapons do not cut it, fire dose not burn it, water also does not moisten it, and wind does not dry it.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमकलेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २/२४ ॥
२४) कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.  
24) This (self) is indeed incapable of being cut, of being burnt, of being moistened and of being dried; it is eternal, all-pervading, stable, immovable, and primordial.   
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २/२५ ॥
२५) हा आत्मा अव्यक्त आहे. अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षांत घेऊन तू शोक करणे योग्य नाही.
25) This (self) is said to be unmanifest, unthinkable and unchangeable; therefore knowing it to be such, you ought not to grieve for.
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्येस मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २/२६ ॥
२६) परन्तु, जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत अससहील, तरीसुद्धा हे महाबाहो ! तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही.
26) If, however, you think that it (self) is perpetually born and perpetually dies, even then, O mighty-armed one, you ought not to grieve for it.
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २/२७ ॥
२७) कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्र्चित आहे. आणि मेलेल्याला जन्म निश्र्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयीही तू शोक करणे योग्य नाही.
27) For to one who is born, death is certain, and to one who dies, rebirth is certain. Therefore over this inevitable fact you ought not to grieve.
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २/२८ ॥
२८) हे अर्जुना ! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितींत शोक कसला करायचा ?
28) Beings, O descendant of Bharata, have the Unmanifest as their beginning, are manifest in the middle, and have their dissolution in the Unmanifest itself; so why lament for them?   
आश्र्चर्यवत्पश्यति कश्र्चिदेन-
माश्र्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्र्चर्यवच्चैनमन्यः श्रृणोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्र्चित् ॥ २/२९ ॥
२९) एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्र्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्र्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्र्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही
29) One sees this (self) as a wonder, so also another talks of this as a wonder, still another hears of this as a wonder, and some other, again, does not know this even after hearing, etc., about it. 
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २/३० ॥
३०) हे अर्जुना ! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.    
30) This embodied self in everyone’s body is eternally indestructible, O descendant of Bharata; therefore, you ought not to grieve for any creature.   
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २/३१ ॥
३१) तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरुन असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही.
31) And considering your duty also you ought not to falter, because there is no greater good-fortune for Kshatriya than a righteous battle.
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ २/३२ ॥
३२) हे पार्था ! आपआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.
32) And happy , O Partha, are the Kshatriyas who get such a battle, which has come of its own accord, and is an open gateway to heaven.  
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २/३३ ॥
३३) परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील.
33)  If, however, you do not fight this righteous battle, then failing in your duty and losing your reputation, you will incur sin.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २/३४ ॥
३४) तसेच सर्व लोक तुझी चिरकाल अपकीर्ति सांगत राहतील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ति मरणाहून दुःसह वाटते.
34) Besides, people will talk of your eternal infamy; and for one held in esteem infamy, is worse than death. 
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ २/३५ ॥
३५) शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला ‘भिऊन युद्धातून काढता पाय घेतला,’ असे मानतील.
35) (These) mighty warriors will think that you have retired from battle through fear. Having been highly esteemed by them, you will (now) fall into disgrace.
अवाच्यवादांश्र्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ २/३६ ॥
३६) तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निन्दा करीत तुला पुष्कळसे जको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे?
36) And your enemies will be saying many unmentionable things, decrying your prowess. What can be more painful than that?
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्र्चय ॥ २/३७ ॥
३७) युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना ! तू युद्धाचा निश्र्चय करुन उभा रहा.
37) either, killed (in battle), you will attain heaven, or, being victorious, you will enjoy the earth. Therefore arise, O Son of Kunti, resolved to fight.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्यसि ॥ २/३८ ॥
३८) जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही.
38) Regarding pleasure and pain, gain and loss, victory and defeat, as alike, prepare yourself then for battle; you will not thus incur sin.  एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २/३९ ॥
३९) हे पार्था ! हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भांत सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचेबंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील.
39) The (requisite) mental attitude towards the self has just been taught to you, now hear about it in respect of the way of action (Karma-Yoga), being endowed with which (attitude), O Partha, you will get rid of the bondage of actions.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात् ॥ २/४० ॥
४०) या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरुप दोषही नाही. इतकेच नव्हेतर, या कर्मयोगरुप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरुप मोठ्या भयापासून रक्षण करते.
40) In this there is no waste of any undertaking or chance of incurring sin: even the least bit of this religion saves one from great danger.    
व्यवसात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्र्च बुद्दयोऽव्यवसायिनाम् ॥ २/४१ ॥
४१) हे अर्जुना ! या कर्मयोगात निश्र्चयात्मक बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात.
41) In this, descendant of Kuru, there is a single one pointed determination. The thoughts of the irresolute are many-branched and infinite.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्र्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २/४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलांच भोगैश्र्चर्यगतिं प्रति ॥ २/४३ ॥
भोगैश्र्चर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धीः समाधौ न विधीयते ॥ २/४४ ॥
४२-४४) हे अर्जुना, जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणार्‍या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जेसांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरुप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्र्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्तःकरण आकृष्ट करुन घेतले आहे, जे भोग व ऐश्र्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्र्चयी बुद्धी असत नाही.
42-44) The dull-witted, whose minds are full of desires, who regard heaven as their highest goal, who are enamored of the panegyric statements in the Vedas and assert that there is nothing else (higher than this), speak familiar flowery words about numerous kinds of rites (prescribed by the Vedas) producing birth, action and their results, as the means to enjoyment and power. Those who are attached to enjoyment and power, and whose minds are carried away by these (flowery words) do not attain one-pointed determination leading to concentration on the Lord.    
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ २/४५ ॥
४५) हे अर्जुना ! वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख दुःखादी द्वंद्वांनी रहित, नित्यवस्तू असणार्‍या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अन्तःकरणाला ताब्यात ठेवणारा हो.
45) The Vedas deal with subjects coming under the three Gunas. O Arjuna ! he above the three Gunas, free from the dualities, always established in goodness (Satva), regardless of acquisition or preservation, and self-possessed.
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २/४६ ॥
४६) सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणार्‍या ब्राह्मणास वेदांची गरज असते.
46) All the purpose that small reservoirs serve is served by a vast lake entirely filled with water. Similarly the purpose that all the Vedas serve is attained by a man of realization.   
 कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २/४७ ॥
४७) तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरु नकोस.
47) To work alone you have the right, but never claim its result. Let not the results of actions be not your motive, nor be attached to inaction.
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २/४८ ॥
४८) हे धनंजया ! तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे.  
48) Established in Yoga, O Dhanjaya, perform action, giving up attachment, and unconcerned as to success or failure: this equanimity is called Yoga.
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २/४९ ॥
४९) या समत्वरुप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यन्त तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया ! तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होत.
49) Far inferior  is work(prompted by desire) to work done through wisdom. O Dhanajaya. Take refuge in wisdom; those who are impelled by results are miserable.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युजस्व योगः कर्मसुकौशलम् ॥ २/५० ॥
५०) समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहींचाही याच जगांत त्याग करतो. अर्थात् त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरुप योगाला चिकटून राहा. हा समत्वरुप योगच कर्मांतील दक्षता आहे. म्हणजेच कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय आहे.  
50) Endowed with this wisdom, one gets rid of both good and evil (even) here ; therefore take to Yoga; Yoga is the skill in work.    
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त’यक्त्वा मनीविणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ २/५१ ॥
५१) कारण समबुद्धीनेयुक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणार्‍या फळाचा त्याग करुन जन्मरुप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात.
51) Endowed with wisdom, giving up the fruit resulting from action, attaining self-realization, and freed from the bondage of birth, verily, they go to that abode which is free from evil.
यदा ते मोहकलिलं बुद्धीर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २/५२ ॥
५२) जेव्हा तुझी बुद्धी मोहरुपी चिखलाला पूर्णपणे पार करुन जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व  ऐकण्यासारख्या इह-परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील.  
52) When your understanding will get beyond the maze of delusion, then you will have attained the indifference to what is to be heard and what is heard.    
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्र्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २/५३ ॥
५३) निरनिराळी वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हां परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हां तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल.
53) When your understanding (now) perplexed by hearing will rest in Samadhi (the Lord), unwavering and steady, then you shall attain Yoga.
अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ २/५४ ॥
५४) अर्जुनाने विचारले, हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, आणि कसा चालतो? 
Arjuna Said,
54) What is the definition, O Keshava (Krishna), of a man of steady wisdom, absorbed in contemplation? How does a man of steady wisdom talk, how does he sit and how does he walk?  
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २/५५ ॥
५५) श्रीभगवान म्हणाले- हे अर्जुना ! ज्या वेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.
55) Shri Bhagwan said, when a man gives up all desires of the mind, O Arjuna, and himself delights in his Self, then he is said to be a ‘a man of steady wisdom.
५६) दुःखेशह्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २/५६ ॥
५६) दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झालेले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.
56) He who is unperturbed in misery and free from desires amidst pleasures. Who is devoid of all attachments, fear and anger-that sage is said to be of steady wisdom.
यःसर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २/५७ ॥
५७) जो पुरुष सर्व बाबतींत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली.
57) He who is free from affection everywhere, and who getting whatever good or evil neither welcomes nor hates them has already wisdom.
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वदा ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २/५८ ॥
५८) कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इन्द्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरुन घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.     
58) And when he completely withdraws his senses from the sense-objects, as a tortoise its limbs (then) his wisdom is steady.     विषया विनिवरतन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्वा निवर्तते ॥ २/५९ ॥
५९) इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणार्‍या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयींची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.
59) From an abstemious embodied being (man) sense-objects fail off, but not the relish (from them); but even this relish of the man of steady wisdom ceases when that supreme Being is realized.
       यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्र्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः ॥ २/६० ॥
६०) हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात.
60) The turbulent senses, O son of Kunti, forcibly lead astray the mind of even the struggling wise person. 
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशो हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २/६१ ॥
६१) म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करुन, मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.
61) controlling all all these (senses), the self-controlled one should sit meditating on me. Verily, his wisdom is steady, whose senses are under control.
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २/६२ ॥
६२) विषयांचे चिन्तन करणार्‍या पुरुषाची त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो.
क्रोद्धाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २/६३ ॥
६३) रागामुळे अत्यंत मूढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.
62-63) For a person thinking of the sense-objects there grows an attachment for them; from attachment arises desire, from desire results anger, from anger results delusion, from delusion results confusion of memory, from confusion of memory frsults destruction of intelligence and from destruction of intelligence he perishes.   
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्र्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २/६४ ॥
६४) परन्तु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष-रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अन्तःकरणाची प्रसन्नता प्राप्त करुन घेतो.
64) But that person of controlled self who moves about amidst sense-objects with the senses governed by the self and from attachment and aversion, he attains serenity.
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २/६५ ॥
६५) अन्तःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते.
65) When this serenity is attained there results the destruction of all his misery. Verily, the wisdom of the senses-minded one gets steady soon.  
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ २/६६ ॥
६६) मन आणि इन्द्रिये न जिंकणार्‍या पुरुषाच्या ठिकाणी निश्र्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अन्तःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शान्ती मिळत नाही. मग शान्ति नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार.
66) For the uncontrolled person there is no knowledge, nor is there meditation for him; and for the unmeditative person there is no peace, and for one bereft of peace how can there be happiness?
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २/६७ ॥
६७) कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणार्‍या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणार्‍या इंद्रियांपैकी मन ज्या इन्द्रियाबरोबर राहते, ते एकच इन्द्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते.
67) Whichever of the wandering senses the mind follows; that one carries away his wisdom as the wind a ship on the sea.    
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २/६८ ॥
६८) म्हणून हे महाबाहो ! ज्याची इन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरुन धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते.
68) Therefore, O mighty-armed one, he whose senses are well controlled from their objects has steady wisdom.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २/६९ ॥
६९) सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानन्दाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात, ती परमात्मतत्त्व जाणणार्‍या मुनीला रात्रीसारखी असते.
69) That which to all creatures is night, is where the man of self-control is wide awake, and that in which (all) creatures are wide awake is night to the sage who sees.
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत’कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २/७० ॥
७०) ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शान्तीला प्राप्त होतो. भोगाची इच्छा करणारा नव्हे.
70) He attains peace into whom all sense-objects enter, even as rivers enter an ocean, which is unaffected though being ever filled, and not one who is desirous of enjoyments.
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्र्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २/७१ ॥
७१) जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करुन ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शान्ति मिळते.
71) That person who is giving up all sense-objects goes about unattached, devoid of the idea of ownership and free from egoism, he attains peace.
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २/७२ ॥
७२) हे अर्जुना ! ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे, ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही. आणि अन्तकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानन्द मिळवतो.
72) This is the Brahmi state, O Partha attaining it one is not (again) deluded; one who rests in it, even at the time of death, attains Nirvana in Mrahman.  
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे साऽख्ययोगोनाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥     
   ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 2
सांख्ययोग अध्याय २ रा 


Custom Search