Thursday, June 30, 2016

Shri Dattatreya Mala Mantra श्री दत्तात्रेय माला-मंत्र


Shri Dattatreya Mala Mantra 
Shri Dattatreya Mala Mantra is in Sanskrit. It is very pious and it fulfils all desires of the devotee and removes all troubles, difficulties from the life of devotee. It is to be recited at 21 times a day continuously for 21 days.
श्री दत्तात्रेय माला-मंत्र
श्रीगणेशाय नमः ।
ध्यानं
काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमंडलू पद्मकरेन सेखम् ।
चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
श्रीदत्तं खेचरीमुद्रामुद्रितं योगिसदगुरुम् ।
सिद्धासनस्थं ध्यायेऽर्भावरसदकरं हरि ।
इति ध्यानं
वंदे श्रीसद् गुरुं दत्तमाधीशं साक्षिणं शिवं । 
तत्तुष्ट्यै लिख्यते मालामंत्रोऽयं पातु मां हरिः ॥
अथ श्रीदत्तमालामंत्रः प्रारम्भः ।  
पार्वत्त्युवाच 
मालामंत्र मम ब्रुहि प्रियायस्मादहं तंव ।
ईश्र्वर उवाच 
श्रृणु देवी प्रवक्ष्यामि मालामंत्रमनुत्तमम् ।
ॐ अस्य श्री दत्तात्रेय मालामंत्रस्य । सदाशिव ऋषिः ।
अनुष्टुपछंदः । दत्तात्रेयो देवता । द्रां बीजं ।
द्रीं शक्तीः । द्रुं कीलकं । द्रैं कवचं ।
(मम अज्ञान निवृत्तिद्वारा ज्ञान वैराग्य चतुर्विध
पुरुषार्थ सहित अभीष्ठ कामना सिद्धयर्थे) 
श्रीदत्तात्रेयावधूतप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
मालामंत्र
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय । स्मरणमात्र संतुष्टाय ।
महाभय निवारणाय । महाज्ञानप्रदाय । 
चिदानंदात्मने बालोन्मत्तपिशाच्चवेषाय ।
महायोगिने अवधूताय । अनसूयानंदवर्धनाय । 
अत्रिपुत्राय । सर्वकामप्रदाय । ॐ भवबंधविमोचनाय ।
आं असाध्यसाधनाय । र्‍हीं सर्वभूतिदाय ।
क्रौं  असाध्यकर्षणाय । ऐं वाक्प्रदाय । 
क्लीं जगत्रयवशीकरणाय । सौः सर्वमनः क्षोभणाय ।
श्रीं महासंपत्प्रदाय । ग्लौं भूमंडलाधिपत्यप्रदाय ।
द्रां चिरंजीविनेवषड् वशीकुरु वशीकुरु ।
वौषडाकर्षयाकर्षय । हुं विद्वेषय विद्वेषय ।
फट् उच्चाटयोच्चाटय । ठः ठः स्तंभय स्तंभय ।
खें खें मारय मारय । नमः सम्पन्नय सम्पन्नय ।
स्वाहा पोषय पोषय । परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंधि छिंधि ।
ग्रहान्निवारय निवारय । व्याधीन् विनाशय विनाशय ।
दुःखं हरहर । दारिद्र्यं विद्रावय विद्रावय ।
देहं पोषय पोषय । चित्तं तोषय तोषय ।
सर्व मंत्रस्वरुपाय । सर्व यंत्रस्वरुपाय ।
सर्व तंत्रस्वरुपाय । सर्व पल्लव स्वरुपाय ।
ॐ नमो महासिद्धाय स्वाहा । 
॥ इति श्रीईश्र्वरपार्वतीसंवादे श्रीदत्तमालामंत्र संपूर्णं ॥
प्रार्थना व क्षमायाचना
विधिहीनमहीनं वायत्किंचिदुपपादितम् ।
क्रियामंत्रविहीनंवा तत्सर्वं क्षन्तुमर्हसि ॥ १ ॥
अज्ञानाद्देव देवेश यदस्माभिरनुष्ठितम् ।
कर्मणा मनसा वाचा तत्सर्वं क्षन्तुमर्हसि ॥ २ ॥
यस्य स्मृत्वा च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु ।
न्यूनं संपूर्णतां यातु सद्योवंदे तमच्युतम् ॥ ३ ॥
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनंच यदभवेत् ।
तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्र्वर ॥ ४ ॥
विसर्ग बिंदू मात्राणी पदपादाक्षराणिच ।
न्यूनं चातिरिक्तानी क्षमस्व परमेश्र्वर ॥ ५ ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्र्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥ ६ ॥
अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयम् इति मां मत्वा क्षमस्व परमेश्र्वर ॥ ७ ॥
मालामंत्र जप अनुष्टान पद्धत
शुभवारी शुभनक्षत्री लवकर स्नान आदिकर्मे आचमन व प्राणायाम करुन संध्या अगर गायत्री मंत्र जमेल तेवढा करुन घरांतील मोठ्या माणसांना नमस्कार करावा.
देवतावन्दन
हातांमध्ये अक्षता घेऊन दोनही हात एकत्र जोडून देवतेकडे दृष्टी लावून एकचित्त व्हावे. खालीलप्रमाणे प्रार्थना करावी.
श्रीमन्महागणपेतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः ।
ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः ।
शचीपुरंदराभ्यां नमः । लक्ष्मीनारायणाभ्यां नमः । उमामहेश्र्वराभ्यां नमः ।
श्रीसरस्वत्यै नमः । मातापितृभ्यां नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
परात्पर गुरुभ्यो नमः । एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः । अविघ्नमस्तु ।  
संकल्प
नंतर खालील प्रमाणे संकल्प करावा.
संकल्पाचा श्र्लोक:
श्री परमेश्र्वर प्रीत्यर्थं श्री दत्तात्रेय प्रसादेन मम (अमुक) संकट 
निवारणार्थं समस्त मंगल प्रार्प्त्थं शांत्यर्थं, पुष्यष्ट्यर्थं चष्ट्यर्थं 
अद्य प्रभृति एकविशंति दिन पर्यंत प्रत्यहं एकविशाति श्री दत्तमाला
मंत्रस्य यथाज्ञानतः जपमहं करिष्ये ।
आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं (स्मरणं) करिष्ये ।
रोज एकवीसवेळा असे एकवीस दिवसपर्यंत अनुष्ठान करावे. (अमुक) 
जेथे लिहीले आहे तेथे आपल्यावरील संकटाचा उच्चार करावा. श्री गणपति पूजन अथवा स्मरण करुन, श्री दत्तात्रेयांच्या फोटोस हार अर्पण करुन व नमस्कार करावा.
करन्यास
ॐ द्रां अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः ( दोन्ही अंगठे व हृदय यांना स्पर्श करणे )
ॐ द्रीं तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा ( तर्जनी व शीर्ष यांना स्पर्श करणे )
ॐ द्रूं मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट् ( मध्यमा व शिखा यांना स्पर्श करणे )
ॐ द्रैं अनामिभ्यां नमः कवचाय हुं ( अनामिका व कवच ) 
ॐ द्रौं कनिष्ठाकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट् ( दोन्ही डोळे व भ्रूमध्ये यांना स्पर्श करणे )
ॐ द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् ( दोन्ही तळवे व त्यांचा पृष्ठभाग यांना स्पर्श करुन टाळी वाजविणे )
वेदोक्त मंत्राने न्यासः 
ॐ यं वै सू्र्यमिलस्य भौमोऽत्रि ऋषिः , अनुष्टुप् छन्दः ।
श्रीदत्तात्रेयो देवता, श्रीदत्तात्रेयप्रीत्यर्थे न्यासे जपे च विनियोगः ।
मंत्र: 
ॐ यं वै सूर्यस्वर्भानुस्तमसाविध्यदासुरः ।
अत्रयस्तमन्वविंदन्नपात्रे अशक्नुवन् ॥
न्यासः 
ॐ यं वै सूर्य --अंगुष्ठाभ्यां नमः --हृदयाय नमः  ( दोन्ही अंगठे व हृदय यांना स्पर्श करणे )
ॐ स्वभानुस्तमसा --तर्जनीभ्यां नमः --शिरसे स्वाहा  ( तर्जनी व शीर्ष यांना स्पर्श करणे )
ॐ अविध्यदासुरः ---मध्यमाभ्यां नमः ---शिखायै वषट् ( मध्यमा व शिखा यांना स्पर्श करणे )
ॐ अत्रस्त ---अनामिकाभ्यां नमः ---कवचाय हुं--( अनामिका व कवच ) 
ॐ अन्वविंदन्महि-- कनिष्ठाकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट् ( दोन्ही डोळे व भ्रूमध्ये यांना स्पर्श करणे )
ॐ अत्रे अशक्नुवन्-- करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् ( दोन्ही तळवे व त्यांचा पृष्ठभाग यांना स्पर्श करुन टाळी वाजविणे )
यानंतर कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. नंतर विष्णु स्मरण करुन सर्व साहित्यावर पाण्याने प्रोक्षण करुन शुद्धी करुन घ्यावी.
ध्यान 
व्याख्यानमुद्रा करसरसिजे दक्षिणे संदधाने ।
जानु मरुतः करसररुहो दत्तवामोन्नतां सः ।
ध्यानाभ्यासात् सुखपरवशादर्घमामीलिताक्षो ।
दत्तात्रेयोभसित धवल पातु मां कृत्तिवासाः ॥ १ ॥
नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यः नमः परेभ्यो परपादुकाभ्यः ।
श्रीगुरु परमगुरु परमेष्ठीगुरु सद् गुरुपादुकाभ्योनमः ॥ २ ॥
मालाकमंडलुरधः करपद्मयुग्मे ।
मध्यस्थ पाणियुगले डमरुत्रिशुले ।
यस्यस्त उर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।
वंदे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं ॥ ३ ॥   
दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानन्ददायक ।
दिगंबरनमुने बाल पिशाच्च ज्ञानसागर ॥ ४ ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्र्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ५ ॥
नंतर कवच पाठ
नंतर मानसपूजा 
ध्यानानंतर मानसपूजा करावी.
ॐ लं पृथिव्यात्मकं श्रीदत्तगुरवे नमः गंधं परिकल्पयामि नमः ।
ॐ हं आकाशात्मकं श्रीदत्तगुरवे नमः पुष्पं परिकल्पयामि नमः ।
ॐ यं वाव्यात्मकं श्रीदत्तगुरवे नमः धूपं परिकल्पयामि नमः ।
ॐ रं अग्न्यात्मकं श्रीदत्तगुरवे नमः दीपं परिकल्पयामि नमः ।
ॐ वं अमृतात्मकं श्रीदत्तगुरवे नमः नैवेद्यं परिकल्पयामि नमः ।
ॐ सं सर्वात्मकं श्रीदत्तगुरवे नमः फलतांबूल दक्षणा मंत्रपुष्पं परिकल्पयामि नमः ।
प्रतिमापूजन
यानंतर श्रीदत्तमूर्ती, पादुका किंवा श्रीदत्तयंत्र यांची षोडशोपचाार/पंचोपचार पूजा करावी.
माला प्रार्थना व मालावंदन
आगच्छ वरदे देवि सावित्रि भव संन्निधौ ।
गृहाण मानसीं पूजां यथार्थपरिभाविताम् ॥ १ ॥
मां माले महामाये सर्वशक्तिस्वरुपिणि ।
चतुर्वर्गः त्वयिन्यस्ततस्मान्मे सिद्धिदा भव ॥ २ ॥
अविघ्नं कुरु मे देवि गुहृ्णामि दक्षिणेकरे ।
जपकाले च सिद्ध्यर्थं प्रसीद परमेश्र्वरि ॥ ३ ॥
ॐ र्‍हीं सिद्ध्यै नमः  म्हणून माला वंदन करावे.
नंतर ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः । या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
यानंतर व्हिडोओतींल मालामंत्र ऐकावा.
नंतर रोजचा २१ वेळेचा जप सुरु करावा. तत्पूर्वी एकआसन दत्तगुरुंसाठी मांडावे. आसनस्थ होण्याची त्यांना विनंति करावी. आसनावर गंध, फूल, अक्षता, तुळसीपत्र व्हावे. आता मालामंत्राचा २१ वेळा जप करावा. 
जप पूर्ण झाल्यावर " ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः " या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 
' ॐ र्‍हीं सिद्ध्यै नमः " म्हणून  जपाच्या मालेला वंदन करावे. 
त्वं माले सर्व देवानां प्रीतिदाशुभदा भव ।
शिवं कुरुष्व मे भद्रे याशोवीर्यं च सर्वदा ॥ १ ॥
गुह्याति गुह्यगोप्त्रित्वं गृहाणास्मत् कृतंजपम् ।
सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादान्मयिस्थिरा ॥ २ ॥
नंतर आधी सांगितल्याप्रमाणे मानसपूजा , 
नंतर दत्तात्रेयांची पंचमोपचार/षोडशोपचार पूजा करावी.
उत्तरन्यास
ॐ द्रां अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः ( दोन्ही अंगठे व हृदय यांना स्पर्श करणे )
ॐ द्रीं तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा ( तर्जनी व शीर्ष यांना स्पर्श करणे )
ॐ द्रूं मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट् ( मध्यमा व शिखा यांना स्पर्श करणे )
ॐ द्रैं अनामिभ्यां नमः कवचाय हुं ( अनामिका व कवच ) 
ॐ द्रौं कनिष्ठाकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट् ( दोन्ही डोळे व भ्रूमध्ये यांना स्पर्श करणे )
ॐ द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् ( दोन्ही तळवे व त्यांचा पृष्ठभाग यांना स्पर्श करुन टाळी वाजविणे )
आता दशदिशांना वंदन करावे.
ॐ प्राच्यै दिशे इंद्राय नमः । ॐ आग्नेयै दिशे अग्नये नमः ।
ॐ दक्षिण दिशे यमाय नमः । ॐ नैर्ऋत्यै दिशे निर्ऋतये नमः ।
ॐ प्रतीच्यै दिशे वरुणाय नमः । ॐ वायव्यै दिशे वायवे नमः ।
ॐ उदिच्यै दिशे सोमाय नमः । ॐ ईशान्यै दिशे ईश्र्वराय नमः ।
ॐ उर्ध्वायै दिशे ब्रह्मणे नमः । ॐ अधरायै दिशे अनंताय नमः । 
यानंतर
प्रार्थना व क्षमायाचना  (व्हिडीओतं आहे.)
विधिहीनमहीनं वायत्किंचिदुपपादितम् ।
क्रियामंत्रविहीनंवा तत्सर्वं क्षन्तुमर्हसि ॥ १ ॥
अज्ञानाद्देव देवेश यदस्माभिरनुष्ठितम् ।
कर्मणा मनसा वाचा तत्सर्वं क्षन्तुमर्हसि ॥ २ ॥
यस्य स्मृत्वा च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु ।
न्यूनं संपूर्णतां यातु सद्योवंदे तमच्युतम् ॥ ३ ॥
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनंच यदभवेत् ।
तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्र्वर ॥ ४ ॥
विसर्ग बिंदू मात्राणी पदपादाक्षराणिच ।
न्यूनं चातिरिक्तानी क्षमस्व परमेश्र्वर ॥ ५ ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्र्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥ ६ ॥
अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयम् इति मां मत्वा क्षमस्व परमेश्र्वर ॥ ७ ॥   
रोजचा जप पुरा होई पर्यंत बोलु नये अगर आसन सोडू नये. २१ दिवसपर्यंत शुचिता पाळावी. 
रोजची जपसंख्या पूर्ण झाल्यावर 
अनेन कर्मणा भगवान श्री दत्तात्रेय प्रीयंताम म्हणून ताम्हणांत पाणी सोडावे. नंतर श्री दत्तात्रेयांच्या फोटोस नमस्कार करुन उठावे.
ज्यांच्या पत्रिकेंत राहु प्रथम, द्वितीय, चतुर्थ, पंचम, सप्तम, नवम, दशम अगर एकादश स्थानी असेल त्यांनी संकटकाळी वरील अनुष्ठान श्रद्धेने नक्की करावे. संकट दूर होते. 
Shri Dattatreya Mala Mantra 
श्री दत्तात्रेय माला-मंत्र


Custom Search

Monday, June 27, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 17 श्रद्धात्रयविभाग योग अध्याय १७


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 17 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 17 is in Sanskrit. Name of this adhyay is ShraddhaTrayaVibhag Yoga. Here in this Adhyay 17 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, How people behave when they are having Sattvika, Rajasik and Tamasik qualities. How such people worship, eat and act in each guna quality in detail it is told to Arjuna by God ShriKrishna.
श्रद्धात्रयविभाग योग अध्याय १७
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १ ॥
श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां श्रृणु ॥ २ ॥
सत्त्वानुरुपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३ ॥
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्र्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४ ॥
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५ ॥
कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तः शरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्र्चयान् ॥ ६ ॥
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं श्रुणु ॥ ७ ॥
आयुःसत्त्वबलारोग्य-
सुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या-
आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८ ॥
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरुक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९ ॥
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १० ॥
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११ ॥
अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञ विद्धि राजसम् ॥ १२ ॥
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३ ॥
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४ ॥
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५ ॥
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६ ॥
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७ ॥
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥ १८ ॥
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९ ॥
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २० ॥
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१ ॥
अदेशेकाले यद्दानमपात्रेभ्यश्र्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२ ॥
ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्र्च यज्ञाश्र्च विहिताः पुरा ॥ २३ ॥
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४ ॥
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्र्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५ ॥
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६ ॥
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७ ॥
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥       
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेनेयुक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्त्विक, राजस की तामस ?
श्रीभगवान म्हणाले
२) मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारची असते. ती तूं माझ्याकडून ऐक.
३) हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरुप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे. (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरुप असते.)
४) सात्त्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची तसेच जी इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात.   
५-६) जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. जे शरीराच्या रुपांत असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणांत राहणार्‍या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तूं जाण.
७) भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते, आणि तसेच यज्ञ, तप, आणि दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक.
८) आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात. 
९) कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात.
१०) जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गन्ध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते.
११) जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करुन फळाची इच्छा न करणार्‍या पुरुषांकडून केला जातो, तो सात्त्विक यज्ञ होय.
१२) परन्तु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज.
१३) शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणार्‍या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. 
१४) देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते.
१५) जे दुसर्‍याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठन आणि परमेश्र्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते.
१६) मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवतचिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.
१७) फळाची इच्छा न करणार्‍या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या आधी सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात.
१८) जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसर्‍या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे.
१९) जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसर्‍यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.
२०) " दान देणेच कर्तव्य आहे " या भावनेने जे दान देश, काल, आणि पात्र मिळाली असता उपकार न करणार्‍याला दिले जाते, ते दान सात्त्विक म्हटले गेले आहे.
२१) परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.
२२) जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.
२३) ॐ,तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण,वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.
२४) म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणार्‍या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी ' ॐ ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच आरंभ होत असतो.
२५) ' तत् ' या नावाने संबोधिल्या जाणार्‍या परमात्म्याचेच हे सर्व आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणार्‍या पुरुषांकडून केल्या जातात. 
२६) ' सत् ' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था ! उत्तम कर्मातही ' सत् ' शब्द योजला जातो. 
२७) तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्र्चयाने ' सत् ' असे म्हटले जाते.
२८) हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व ' असत् ' म्ह्टले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात.               

अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' श्रद्धात्रयविभाग योग ' ह्या नांवाचा सतरावा अध्याय संपूर्ण झाला.  
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 17 
श्रद्धात्रयविभाग योग अध्याय १७


Custom Search

Saturday, June 25, 2016

Hanumallangoolastra Stotram हनुमल्लांगूलास्त्रस्तोत्रम्


Hanumallangoolastra Stotram 
Hanumallangoolastra Stotram is in Sanskrit. This Haunman stotra is very powerful. It is said that devotees all troubles are removed by chanting it every day
हनुमल्लांगूलास्त्रस्तोत्रम्
श्रीगणेशाय नमः
हनुमन्नञ्जनीसूतो महाबलपराक्रम ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १ ॥
मर्कटाधिप मार्तण्डमण्डलग्रासकारक ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ २ ॥
अक्षक्षपण पिङ्गाक्ष दितिजासुक्षयंकर ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ३ ॥
रुद्रावतारसंसारदुःखभारापहारक ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ४ ॥ 
श्रीरामचरणाम्भोजमधुपायितमानस ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ५ ॥
वालिप्रमथनक्लान्तसुग्रीवोन्मोचनप्रभो ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ६ ॥
सीताविरहवारीशभग्नसीतेशतारक ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ७ ॥
रक्षोराजप्रतापाग्निदहृमानजगद्वन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ८ ॥
ग्रस्ताशेषजगत्स्वास्थ्यं राक्षसाम्भोधिमन्दर ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ९ ॥
पुच्छगुच्छस्फुरद्वीर जगद्दग्धारिपत्तन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १० ॥
जगन्मनोदुरुल्लङ्घ्यापारावार विलङ्घन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ ११ ॥
स्मृतमात्रसमस्तेष्टपूरक प्रणतप्रिय ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १२ ॥
रात्रिंचरतमोरात्रिकृन्तनैकविकर्तन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १३ ॥
जानक्या जानकीजानेःप्रेमपात्र परंतप ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १४ ॥
भीमादिकमहाभीमवीरावेशावतारक ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १५ ॥
वैदेहीविरहक्लान्तरामरोषैकविग्रह ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १६ ॥
वज्राङ्गनखदंष्ट्रेश वज्रिवज्रावगुण्ठन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १७ ॥
अखर्वगर्वगन्धर्वपर्वतोद्भेदनस्वर ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १८ ॥
लक्ष्मणप्राणसंत्राण त्राततीक्ष्णकरान्वय ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ १९ ॥
रामादिविप्रयोगार्त भरताद्यार्तिनाशन ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ २० ॥
द्रोणाचलसमुत्क्षेपसमुत्क्षिप्तारिवैभव ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ २१ ॥ 
सीताशीर्वादसंपन्न समस्तावयवाक्षत ।
लोलल्लांगूलपातेव ममारातीन्निपातय ॥ २२ ॥
इत्येवमश्वत्थतलोपविष्टः शत्रुञ्जयं नाम पठेत्स्वयं ।
स शीघ्रमेवास्तसमस्तशत्रुः प्रमोदते मारुतजप्रसादात् ॥ २३ ॥
॥ इति श्रीहनुमल्लांगुलास्त्रस्तोत्रं संपूर्णम् ॥
Hanumallangoolastra Stotram हनुमल्लांगूलास्त्रस्तोत्रम्


Custom Search

Thursday, June 23, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 is in Sanskrit. Name of this adhyay is Vibhuti Yoga. Here in this Adhyay 16 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, many of Good virtues and Bad virtues. The good virtue described in this adhyay takes sadhak to Moksha Whereas the bad leads into downfall.
दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६
श्रीभगवानुवाच
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्र्च यज्ञश्र्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १ ॥
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ २  ॥
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३ ॥
दम्भो दर्पोऽभिमानश्र्च क्रोध पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ॥ ४ ॥
दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५ ॥
द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन्दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥ ६ ॥
प्रवृतिं च निवृतिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७ ॥
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्र्वरम् ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ ८ ॥
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९ ॥
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १० ॥
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्र्चिताः ॥ ११ ॥
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२ ॥
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३ ॥
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्र्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७ ॥
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्त्रमशुभानासुरीष्वेव  योनिषु ॥ १९ ॥      
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २० ॥
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ २१ ॥
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २२ ॥
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३ ॥
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४ ॥  
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम  षोडशोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥  
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१-३) निर्भया, पूर्ण सात्त्विक वृत्ति, ज्ञान व कर्मयोग या दोहोविषयीं तत्परता, दान, इंद्रियनिग्रह, यज्ञ, स्वधर्माप्रमाणे आचार, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणें, त्याग, शांति, मनांत दुष्टबुद्धि न बाळगणें, प्राणिमात्राविषयीं दया, निर्लोभता, नम्रता, जनलज्जा (वाईट कृत्यांची), स्वैर व्यापार सुटणें, तेजस्विता, क्षमा, धृति, शुचिर्भुतपणा, कोणाचाही द्रोह न करणे, अभिमान नसणें असे हे सद्गुण, हे अर्जुना, दैवी संपत्ति घेऊन जन्मलेल्या पुरुषास प्राप्त होतात.
४) हे अर्जुना, आसुरी संपत्ति घेऊन जन्मलेल्यांच्या अंगीं, दांभिकपणा, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा, आणि अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात.
५) दैवी सद्गुण मोक्षप्राप्तीला आणि आसुरी दुर्गुण बंधनाला कारण होतात असें मानलें आहे. हे अर्जुना, तूं दैवी संपत्तीसाठी जन्मलेला आहेस म्हणून हा शोक सोडून दे. 
६) हे अर्जुना, ह्या लोकीं दैवी आणि आसुरीअसे दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात. त्यांतल्या दैवी प्रकाराचें वर्णन मीं पूर्वी विस्ताराने सांगितले, आतां आसुरी प्रकाराचें वर्णन मजकडून ऐक. 
७) आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ति म्हणजे काय करावें व निवृत्ति म्हणजे काय करुं नये हें समजत नाही. त्यांच्या ठिकाणीं शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य हीं नसतात.
८) आसुरी स्वभावाचे लोक म्हणतात, की जग असत्य, निराधार, ईश्र्वररहित, एकमेकांपासूनही न निर्माण झालेलें (म्हणून) मनुष्याच्या विषयोपभोगाकरितां उत्पन्न झालेलें आहे. त्याखेरीज त्याचा दुसरा हेतु काय असणार?
९) अशा प्रकारच्या विचारसरणीचा आश्रय करुन हे नष्टात्मे अल्प बुद्धि, क्रूरकर्मी, घातकी व जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात. 
१०) कधीच पुर्‍या न होणार्‍या कामवासनेचा आश्रय करुन दांभिकता, अहंमन्यता व उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचारविचार स्वीकारलेले ते आसुरी लोक, मोहामुळें भलतेच वेडेपणाचे बेत मनांत योजून घाणेरडीं कामें पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात.
११-१२) तसेंच (कामोपभोगाची) अपरिमित चिंता आमरणान्त वाहणारे, कामेच्छा तृप्त करणें हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगांत प्राप्तव्य काय ते हेंच अशी ठाम समजूत झालेले, शेकडों आशांच्या पाशांनीं बद्ध झालेले, कामक्रोधाधीन झालेले, असे ते आसुरी लोक आपल्या कामोपभोगाकरितां अन्यायाच्या मार्गांनी द्रव्यसंचय करण्याची हांव धरतात.    
१३) आज मीं हें मिळविलें, (उद्यां) माझा तो मनोरथ प्राप्त करुन घेईन, इतके द्रव्य मजजवळ आहेच, पुनः तेंही माझें होईल.
१४-१६) हा शत्रु मी आज लोळविला, दुसरे शत्रु देखील ठार करीन. मी सत्ताधीश, मीं सुखें भोगणारा, मीच सिद्ध, बलाढ्य व सुखी, मी श्रीमंत व कुलवंत आहें, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, मी दानें देईन, मी चैन करीन अशा अज्ञानांत मोहित झालेले, नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले, मोहाच्या जाळ्यांत पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगांत लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकांत पडतात.
१७) स्वतःची बढाई मारणारे, गर्वाने ताठरलेले, संपत्ति व मान यांनीं मदोन्मत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणानें शास्त्रविधी सोडून केवळ नांवाचे यज्ञ करतात.
१८) अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषयवासना, आणि कोपाविष्टपणा ह्या दुर्गुणांनीं भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहांत वास करणार्‍या माझा (परमेश्र्वराचा) द्वेष करणारे व निंदक असे होतात.
१९) त्या ईश्र्वरद्रोही, क्रूरकर्म्या घातकी नराधमांना संसारांतील आसुरी म्हणजे पापयोनींत मी नेहमीं टाकून देतो.
२०) हे कुंतीपुत्रा, याप्रमाणें जन्मोजन्मीं आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक माझी प्राप्ती कधींच न होतां अखेर अधोगतीला जातात.
२१) काम, क्रोध व लोभ असें हें तीन प्रकारचें नरकाचें द्वार असून तें आत्मविघातक आहे म्हणून या तीहींचा त्याग करावा. 
२२) हे अर्जुना, या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण तेंच आचरतो व त्यामुळें तो श्रेष्ठ गतीला जातो.
२३) जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो, त्याला सिद्धि, सुख किंवा उत्तम गति हीं प्राप्त होत नाहींत. 
२४) म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामीं तुला शास्त्र हेंच आधारभूत प्रमाण मानलें पाहिजे. शास्त्रामध्यें काय विहित आहे तें जाणून कर्म करणें तुला या लोकीं योग्य आहे.
अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' दैवासुरसंपद्विभाग योग ' ह्या नांवाचा सोळावा अध्याय संपूर्ण झाला.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६


Custom Search

Wednesday, June 22, 2016

PanchaShloki Ganesh Puran पंचश्र्लोकि गणेशपुराण


PanchaShloki Ganesh Puran 
PanchaShloki Ganesh Puran is in Sanskrit. It is in short a Ganesh Puran with mentioning the demons killed by God Ganesh.
पंचश्र्लोकि गणेशपुराण 
श्रीविघ्नेशपुराणसारमुदितं व्यासाय धात्रा पुरात् ।
तत्खण्डं प्रथमं महागणपतेश्चोपासनाख्यं यथा ।
संहर्तुं त्रिपुरं शिवेन गणपस्यादौ कृतं पूजनम् ।
कर्तुं सृष्टिमिमां स्तुतः स विधिना व्यासेन बुध्याप्तये ॥ १ ॥
संकष्ट्याश्च विनायकस्य च भवो स्थानस्य तीर्थस्य वै ।
दूर्वाणां महिमेति भक्तिचरितं तत्पार्थिवस्यार्चनम् ।
तेभ्यो यैर्यदभीप्सितं गणपतिः तत्तत्प्रतुष्टो ददौ । 
ताः सर्वा न समर्थ एव कथितुं ब्रह्मा कुतो मानवः ॥ २ ॥
क्रीडाकाण्डमथो वदेत्कृतयुगे श्वेतच्छविः काश्यपः ।
सिंह्वाङ्कः सविनायको दशभुजो भूत्वाथ काशीं ययौ ।
हत्वा तत्र नरान्तकं तदनुजं देवान्तकं दानवम् ।
त्रेतायां शिवनन्दनो दशभुजो जातो मयूरध्वजः ॥ ३ ॥
हत्वा तं कमलासुरं च सगणं  सिन्धु महादैत्यपम् ।
पश्चात् सिद्धिमतीसुतेकनलजस्तस्मै च ज्ञानं ददौ ।
द्वापारे तु गजाननो युगभुजो गौरीसुतः सिन्दुरम् ।
संमर्द्य स्वकरेण तं निजमुखे चाखुध्वजो लिप्तवान् ॥ ४ ॥
गीताया उपदेश एव हि कृतो राज्ञे वरेण्याय वै ।
तुष्टायाथ च धूम्रकेतुरभिधो विप्रः सधर्मर्धिकत् ।
अश्वांको द्विभुजो सितो गणपतिम्लेच्छान्तकः स्वर्णदः ।
क्रीडाकाण्डमिदं गणस्य हरिणा प्रोक्तं विधात्रे पुरा ॥ ५ ॥
एतश्लोकसुपंचकं प्रतिदिनं भक्त्या पठेद्यः पुमान ।
निर्वाणं परमं व्रजेन्स सकलान् भुक्त्वा सुभोगानपि ॥ ६ ॥
॥ इति पंचश्लोकि गणेशपुराण संपूर्णम् ॥
PanchaShloki Ganesh Puran 
पंचश्र्लोकि गणेशपुराण 


Custom Search

Monday, June 20, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 विभूतियोग अध्याय १०


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 is in Sanskrit. Name of this adhyay is Vibhuti Yoga. Here in this Adhyay 10 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, many of his main vibhuties. Finally he also told him that there is not a single thing in which he is not present.
विभूतियोग अध्याय १०
श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्र्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४ ॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भवसमन्विताः ॥ ८ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥
अर्जुन उवाच
परं ब्रहं परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२ ॥ 
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५ ॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८ ॥
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्र्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१ ॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः । 
इन्द्रियाणां मनश्र्चास्मि भूतानामस्मि चेतनाः ॥ २२ ॥
रुद्राणां शङ्करश्र्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्र्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३ ॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥
अश्र्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६ ॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७ ॥      
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९ ॥
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥
मृत्युः सर्वहरश्र्चाहमुद्भवश्र्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६ ॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८ ॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ ४१ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम  दशमोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) हे पराक्रमी अर्जुना, पुनः आणखी एक माझें श्रेयस्कर भाषण ऐक. माझा उपदेश ऐकून संतोष पावणार्‍या तुला तें मी तुझ्या हितासाठीं सांगत आहे.
२) माझा जन्म केव्हां झाला हे देव आणि महर्षीही जाणत नाहींत कारण मीच त्या देवांचें आणि महर्षींचे सर्वप्रकारें आदिकारण आहें. 
३) जो मला (मी) जन्मरहित, अनादि व सर्व लोकांचा महेश्र्वर असें जाणतो, तो मनुष्यांमध्यें मोहरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो.
४-५) बुद्धि, ज्ञान,जागरुकता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, शांति, सुख, दुःख, उत्पत्ति, लय, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपयश इत्यादि निरनिराळ्या प्रकारचे प्राण्यांचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात.
६) सात महर्षि, तसेच पूर्वीचे चार मनु, ज्यांपासून या लोकांमध्ये ही प्रजा उत्पन्न झाली, ते माझेच मानस, म्हणजे मनानें निर्माण केलेले भाव होत.
७) जो पुरुष माझी ही विभूति म्हणजे विस्तार आणि योगशक्ति खरोखरच जाणतो,  त्याला स्थिर कर्मयोग प्राप्त होतो, ह्यांत संशय नाहीं.
८) मी सर्वांचे उत्पत्तिस्थान असून, माझ्यामुळेंच सर्व जग कार्यांत प्रवृत्त होतें असें जाणून शहाणे पुरुष मला भावानें भजतात.
९) तें माझ्या ठिकाणीं चित्त लावून व माझ्या ठिकाणीं प्राण अर्पण करुन, परस्परांना मजविषयीं बोध करीत, माझ्या गुणलिलांचे कीर्तन करीत, त्यांतच नेहमीं संतोष व आनंद पावतात.
१०) अशा नेहमीं युक्त म्हणजे समाधानानें राहून प्रेमपूर्वक भजन करणार्‍या भक्तांना ज्यायोगें ते मला प्राप्त होतील, असा समत्वबुद्धियोग मी देतों.
११) त्या भक्तांवर कृपा करण्यासाठींच त्यांच्या हृदयांत शिरुन मी तेजस्वी ज्ञानरुप दिव्यानें त्यांचा अज्ञानजन्य अंधकार नाहींसा करतों.
अर्जुन म्हणाला 
१२-१३) श्रीकृष्णा, तूं परब्रह्म, श्रेष्ठस्थान व परम पवित्र वस्तु आहेस. तुला अविनाशी दिव्य पुरुष, देवाधिदेव, जनमरहित व व्यापक असें प्राचीन ऋषि देवर्षि नारद, असित, देवल व व्यास हे म्हणतात आणि तूं स्वतःही मला तेंच सांग त आहेस.    
१४) हे केशवा, तूं जें सांगतोस तें मी सत्य मानितो. हे भगवंता, देवांना आणि दानवांना तुझें मूळ कळलेलें नाही.
१५) हे भूतभावना, भूतेशा, देवाधिदेवा जगत्पते, हे पुरुषोत्तमा ! तूं स्वतःच आपण आपल्याला जाणतोस.
१६) ज्या विभूतींनीं तूं ह्या जगांत भरुन राहिला आहेस, त्या सर्व दिव्य विभूति तूंच मला सांग. 
१७) हे योगेश्र्वरा, मी कशा रीतीनें निरंतर चिंतन करीत तुला जाणावें बरें ? आणि कोणकोणत्या पदार्थांमध्यें मीं तुझें चिंतन करावें ?
१८) हे जनार्दना, तुझी विभूति व योग विस्तारानें सांग, कारण तुझें अमृतासारखें भाषण ऐकत असतां माझी तृप्ति होत नाहीं.
श्रीभगवान म्हणाले
१९) हे कुरुश्रेष्ठा, ठीक आहे तुला मी आपल्या मुख्य मुख्य दिव्य विभुति सांगतो. कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंतच नाही.
२०) हे गुडाकेशा, सर्व भूतांच्या अंतरीं असणारा आत्मा मी आहें. सर्व भूतांचा आदि, मध्य व अंतही मीच आहे.
२१) अदितीच्या द्वादशपुत्रांमध्ये म्हणजे आदित्यांमध्ये विष्णु मी, तेजस्व्यांमध्ये किरणशाली सूर्य मी, सात किंवा एकूणचाळीस मरुतांत मरीचि मी व नक्षत्रांत चंद्रमा मी आहे.
२२) तीन वेदांमध्ये सामवेद मी, स्वर्गीय देवांमध्ये इंद्र मी, इंद्रियांतील मन मी व प्राण्यांमधील चैतन्य मी आहे.
२३) एकादश रुद्रांमध्ये शंकर मी, यक्षराक्षसांमध्येकुबेर मी, वसूंमध्ये अग्नि मी आणि पर्वतांमध्ये मेरु मीच आहे.
२४) हे अर्जुना, पुरोहितांमध्यें मुख्य जो बृहस्पति तो मी, सेनापतींमध्यें कार्तिकस्वामी मी व जलाशयांमध्यें समुद्र मीच आहे.
२५) महर्षींमध्यें भृगु मी, वाणीमध्ये एकाक्षर ॐ मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्यें जपयज्ञ व स्थावरांमध्यें हिमालय मी आहे.
२६) सर्व वृक्षांमध्यें पिंपळ वृक्ष मी, देवर्षींमध्यें नारद मी, गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी व सिद्ध लोकांत कपिल मुनि मी आहे.
२७) अश्र्वांमध्यें अमृतमंथनाचे वेळीं उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नांवाचा अश्र्व मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत व मनुष्यांमध्यें राजा मी आहे. 
२८) शस्त्रांमध्ये इंद्राचे वज्र, व गाईमध्यें कामधेनु मी आहे. प्रजोत्पत्ति करणारा काम व सर्पामध्यें वासुकि सर्प मी आहे.
२९) नागांमध्यें अनंत (शेष) मी व जलचरांमध्ये वरुण मी आहे. पितृगणांमध्यें अर्यमा, व निग्रह करणार्‍यांत यमधर्म मी आहे.
३०) दैत्यांमध्यें प्रल्हाद मी व ग्रासणार्‍यांत काळ मी आहे. पशूंमध्यें सिंह मी आहे. व पक्ष्यांमध्यें गरुड मी आहे.
३१) वेगवानांत वायु मी व शस्त्र धारण करणार्‍यांत राम मी आहे. जलचर प्राण्यांत मी मगर आहें. व नद्यांमध्ये गंगा (भागीरथी) नदी मी आहे. 
३२) हे अर्जुना, सृष्टीचा आदि, अंत व मध्य मी असून सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. तसेंच वाद करणारांचा ( तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा) वाद मी आहे.
३३) वर्णमालेंतले अ हें अक्षर मी आहे. शब्दाच्या समासांत द्वंद्वसमास मी आहे. अक्षय काल मी आहे. व चारही बाजूंनी मुखें असणारा धाता म्हणजे ब्रह्मदेव मी आहे. 
३४) सर्वांचा नाश करणारा मृत्यु मी असून पुढें उत्पन्न होणार्‍या वस्तूंचा उगमही मीच आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तूमध्यें कीर्ति, श्री, वाणी, स्मृति, मेधा, धृति व क्षमा मी आहे. 
३५) गावयाच्या वैदिक स्तोत्रांत बृहत्साम स्तोत्र मी व छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. मासांमध्यें मार्गशीर्ष व ऋतूंमध्यें वसंत मी आहे. 
३६) कपटाचरण करणार्‍यांचा जुगार मी असून तेजस्वी वस्तूंमधिल तेज मी आहे. (विजयी पुरुषांचा) जय मी आहे. निश्र्चय मी आहे. सात्त्विकांचा सत्त्वगुण मी आहे.
३७) यादवांमध्यें वासुदेव मी व पाडंवांमध्ये धनंजय मी आहे. मुनींमध्यें व्यास व कवींमध्यें शुक्राचार्य मी आहे.
३८) शासन करणारांचे साधन जो दंड तो मी आहे. जयाची इच्छा करणारांमध्ये नीति म्हणजे मसलत मी आहे. गुह्यापैकीं मौनही मी आहे, आणि ज्ञानी लोकांचे ज्ञानही मीच आहे. 
३९) अर्जुना, ह्याशिवाय आणखी सर्व पदार्थांचे बीज तें मीच; मी ज्यात नसेन अशी वस्तूच चराचर सृष्टींत अस्तित्वांत नाही.
४०) हे अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार दिग्दर्शनार्थ मीं तुला सांगितला. 
४१) जो जो पदार्थ, वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे, तो तो माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाला आहे असे समज.
४२) हे अर्जुना, तुला हा पसारा जाणून काय करावयाचें आहें ? थोडक्यांत सांगतों कीं, हे संपूर्ण विश्र्व, मी एका अंशानें व्यापून धारण करुन राहिलो आहे. 
अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' विभूति योग ' ह्या नांवाचा दहावा अध्याय संपूर्ण झाला. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 विभूतियोग अध्याय १०



Custom Search