There are many Stotras in this blog of many Gods. Stotra is a blog for the people who have faith in God. If your are reading a devi stotra then for having more devi storas please click on Title.It's a link. If you recite any of the stotras you like, then results will be good and make your life happy and prosperous.I myself have experienced it and there are many people like me.The stotra is to be recited with full concentration daily.
Kahani Gopadmanchi कहाणी गोपद्मांची It ia a Vrata many ladies perform in the month of Shrava. कहाणी गोपद्मांची
ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसलेल्या आहेत. ताशे, मर्फे वाजत आहेत, उर्वशी, रंभा नाचत आहेत. तोच तंबोर्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेर्या फुटल्या. असं झाल्यावर सभेत हुकुम सुटला, करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, गांवात कोणी वाणवशावाचून असेल , त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्याला तार लावा, कीर्तन चालू करा. रंभा, उर्वशी नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीसपिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस पूर्ण करावा. याप्रमाणे पांच वर्षे करावे. उद्यापनाचेवेळी कुवारणीस जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा. दुसर्या वर्षी चुडा भरावा. तिसर्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा. चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी. पांचव्या वर्षी चोळी-परकर नेसवून आपल्या वशाच उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण सभेत पूर्वीच्या ठिकाणी येऊन बसले. नंतर लगेचच सुभद्रेने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केलं. सभेंत बात उठली की, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे, असे समजल्यावरुन दूत तिकडे जाऊन पाहतात तो सुभद्रेने वाणवसा वसलेला आहे. दूतांना परत येता येतां गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करुन निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोर्याच्या तारा जोडल्या, मृदंगाच्या भेर्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसें या योगाच्या व्रताने सुभद्रेवरचे संकट टळले तसं तुमचं आमचं टळो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Kahani Jivatichi Shukrawarchi कहाणी जिवतीची शुक्रवारची This is the story of Jivatichi or Fridaychi.
कहाणी शुक्रवारची जिवतीची ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपात नगर होत. तिथ एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय कराव? एका सुइणीला बोलावण धाडल. अगं अगं सुइणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणुन दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुइणीने गोष्ट कबूल केली. ती तपास करु लागली. गावांत एक गरीब ब्राह्मण बाई रहात होती. ती ब्राह्मण बाई गर्भार होती. सुईेण तिच्या घरी गेली. बाई बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाच पोट दुखु लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली राणीसाहेब आपल्या नगरांत एका ब्राह्मणाची बायको गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणे सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या वाड्यापासून तो त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे भुयार कतावं. आपल्याला दिवस गेल्याची अफवा पसरावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला. जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळे लागल्याच राणीने डंभ केले. पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण बाईचही पोट दुखू लागलं. सुइणीला बोलावून आणलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा. मी येते म्हणून सुइणीने सांगितले. ती धावत धावत राणीकडे आली. राणीला पोट दुखण्याच सोंग करायला सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली.मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने राणीकडे पाठविला आणि एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधिला. आणि त्या ब्राह्मण बाईपुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. त्या बाईने नशिबाला बोल लावला. मनामध्ये दुःखी झाली.सुईण निघुन राजवाड्यावर गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करुन म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझ बाळ असेल, तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवा खालून जाणें वर्ज्य केले. तांदळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागूं लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती ब्राह्मण स्री न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर पडली. हा मोहीत झाला व रात्री तिची भेट घ्ययची म्हणून निश्र्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय-वासरु बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती गाय म्हणाली. जो आपल्या आईकडे जायला भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भिईल काय? हे ऐकून राजा मागे फिरला. घरी जाऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलें झाली. पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असतं. राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेंत पसरलं आहे? जिवतीने उत्तर दिले, अगं अगं माझे ते नवसाचे बाळ निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई-बाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी व जिवती आपपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा. अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा जगला व वाढू लागला. पुढे राजाने काशीला गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले घरी जा, सार्या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण काय ते समजेल. राजाच्या मनाला मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. मोठ्या थाटांने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मण बाईला मोठ संकट पडल. राजाला निरोप धाडला. मला जिवतीच व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजाने कबूल केले. जिथं तांदूळाचं धूण होतं ते सारवून त्यावरुन ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. पुढे पानं वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढायला घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्र्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेमाचे भरते येऊन पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दूधाच्या धारा फुटल्या. त्या ह्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तूपाची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली, त्याची समजूत करु लागली. तो म्हणाला, असें होण्याचे कारण काय? तिने सांगितले की, ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व खरी खरी हकिगत त्याला सांगितली. पुढे भोजन समारंभ संपन्न झाला.
नंतर त्याने आपल्या खर्या आई-बापास आपल्या वाड्याशेजारी वाडा बांधून दिला व त्यांच्यासह राज्य करुं लागला. जशी जिवती त्या ब्राह्मण स्रीस प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Kahani Budha-Bruhaspatichi This is the kahani of Budhawar and Gurwar.
कहाणी बुधबृहस्पतीची ऐका बुधबृहस्पतीनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होत. तिथ एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला येत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत, म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितले असते तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वांत धाकटी सून शहाणी होती.तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही,ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पती वारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी, अतिथीचा सत्कार करावा. म्हणजे ईच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करुं लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडल. ब्राह्मण जेवीत आहेत. मी चांदीच्या भांड्यांतून तूप वाढीत आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थत्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचे नाही. म्हणून तेथिल लोकांनी काय केलें? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत ती हत्तीण माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटवली. हत्तिणीन त्या बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळीनीं त्याला हाकलून दिलें. परत हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे दोनदा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानेआपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ते अन्न अन्न करुन देशोधडीला लागल्याची बातमी कळली.
मग राजाने काय केले? मोठ्या तलावाचं काम सुरु केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुधबृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीगत त्याला सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्ता केली. राजानं ही गोष्ट मनांत ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीच भांड देऊन तूप वाढावयास सांगितले. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिले. त्यांचा सन्मान केला. मुलंबाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुधबृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हाआम्हावर करोत, ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Kahani MangalaGouraichi कहाणी मंगळागौरीची This is the story of Goddess MangalaGouri. कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी.निपुत्रिका च्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई, ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली.बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही, असा शाप दिला.तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला.बुवा म्हणाले, आपल्या नवर्याला सांग, निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्र परिधान कर, रानात जा. जिथं घोडा अडेल, तिथं खण. देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.असं बोलून बोवा चालता झाला.तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडित आचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्त आहे.मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदारं आहे गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहे. पोटी पुत्र नाही.म्हणून दुःखी आहे.देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही.मी प्रसन्न झाले आहे. तर तुला देते.अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे.त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देविन सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा,तिथं एक गणपति आहे, त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे.गणपतीच्या दोंदावर पाय दे. एक फळ घे.घरी जाऊन बायकोला खाऊ घाल.म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला,झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला.तो आपला मोटेत आंबा एकच आहे. असं चार-पाच वेळा झालं.गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे.फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली.दिवसा मासानं गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी मुलगा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली.दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली.काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं.मामाभाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं,तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकिंचं भांडण लागलं.एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड आहे ! काय रांड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली. माझी आई मंगळागौरीचे व्रत करिते आमच्या कुळावंशामध्ये कोणीही रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. .हे भाषण मामानी ऐकलं.त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचा लगीन करावं. म्हणजे हा दीर्घायुषी होईल.. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होत. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा परागंदा झाला. मुलीचे आई-बापांना काळजी पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करुन वेळ साजरी करु. म्हणून धर्मशाळा पाहू लागले. तर मामाभाचे दृष्टीस पडले.मामापासून भाच्याला नेलं. गोरज मुहूर्तावर लग्न लावल. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघ झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येिल, त्याला पिण्याकरता दूध ठेव.एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. आंगच्या चोळीनं कर्याचा तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळान तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला.लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली.पहाटेस उठून ताट घेऊन बिर्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलें. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडवांत आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडेल? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवूं लागले. इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्यांच युद्ध झालं. यमदूत पळून गेले. ममगळागौर तिथेच अदृश्य झाली. तसा भाचा जागा झाला. आपल्या मामास सांगू लागला. मला असं असं स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठिक झालं. तुझ्यावरच संकट टळलं. उद्या आपण घरी जाऊ.
परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करुं लागले. दासींनी येऊन सांगितलें, इथं अन्नछत्र आहे. तिथं जेवायला जा. ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितले. यांना पालखी पाठविली. आदरातिथ्यांन घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्यास ओळखलं. नवर्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांच ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं मला मंगळागौरीच व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासरमाहेरची घरचीदारची सर्व माणसे एकत्र आली. आणि त्या व्रताचे उद्यापन केले. मंगळागौर त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा, ही धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Kahani Somawarchi कहाणी सोमवारची साधी This is story of Monday
कहाणी सोमवारची साधी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई, स्नान करी शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचं एक बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ ? मी येऊ ? असा ध्वनी उठे. हा मागं पाही तो तिथे कोणी नाही या भीतीने वाढू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही अपेष्टा नाही, स्नान करून येतेवेळेस मला कोणी मी येऊ ? मी येऊ ? असं म्हणतं. मागं पाहतो, तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिऊ नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण. तुझ्या मागून येऊ दे
मग शिष्यांन काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला, मी येऊ असा ध्वनी झाला ये असा जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे.त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला शंकराचे पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला. अगं अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं, पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असच झालं. असं चारी सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं दोघेजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आणली? मनात भिऊन गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल. पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्ध घटकेचे माहेर दे. तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला. कोणी म्हणे माझा जावई आला. कोणी म्हणे माझी नणंद आली. कुणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पहारा करत आहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू-सासर्यांची आज्ञा घेतली. घरी परतली, अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयतां परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत.प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवर्यांना विचारलं इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली जेवली ताटं ढकलून दिली.रत्नाने भरली सोन्याची झाली. ती मला देवाने दिली आपण विचारू लागला, तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्ध घटकेचे माहेर मागितलं. त्याने तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पावो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...
Kahani Sundaychi कहाणी आदित्यराणूबाईची This is the story of Sunday. कहाणी आदित्यराणूबाईची ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुले, दूर्वा आणावयास रानात जात असे रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उलशील मातशील घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदित्य वारी मौनाने उठावे. वस्तरासहित स्नान करावे.अग्रोदक पाणी आणावे. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ कराव.सहा सुतांचा तांतू करावा. त्यास सहा गाठी द्याव्या. पान फूल वाहावं. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास चाळावी, सहा मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण कराव. संपूर्णास काय करावे? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर दोन रुपये दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली.
तेव्हा राजाच्या राणीनं ब्राम्हणास बोलावू धाडलं. ब्राम्हण जातेवेळी भिवु लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू.
मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. बारा वर्षानी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकिन बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला.
तेथून निघाला व प्रधानाच्या घरी आला. मुलीं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा पाणी प्या. गूळ खात नाही पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे. ती तू अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकू, तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतली, तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावाने ती ऐकली.. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं आपल्या मुलींचा समाचार कसा आहे? जिन कहाणी ऐकली नाही, ती दारिद्र्याने पिडली,दुःखानं व्यापली.. राजा मुलखावर निघून गेला जिना कहाणी ऐकली होती, ती, भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे. ते तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदित्य वारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा; तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटक पांघरला आहे.तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदारान घेऊन आल्या.न्हावू माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला. होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! वाटेने आपला जाऊ लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला, आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलंं ? दैवे दिल कर्माने नेले, कर्माचे फळ पुढे उभे राहीलं.मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसर्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगंअग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली.बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं.
वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने काढून घेतले.पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखूं घातला.पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातला. नारळ पोखरून होना-मोहरानी भरून दिला. कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं.घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडून विहिरीत पडला.घरी गेला आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीने काय दिलं? आई ग मावशीने दिलं पण दैवान ते सर्व बुडालं.चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला.तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं.त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली.सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं,काय रे बाबा मावशीनं काय दिलं?आई ग मावशी न दिलं पण दैवान ते सर्व नेलं. पाचवे आदित्यवारी ती तळ्याच्या पाळी उभी राहिली.दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातली. पाटाव नेसायला दिलं.प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली.काय वसा करतेस तो मला सांग. बहिण म्हणाली अगं अगं चांडाळणी, पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजा बोलावूं धाडलं. मावशी मावशी तुला छत्र का आली, चामर आली, पायीक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली? चामर कोठली? पाईक कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावूं आला आहे.राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणी आहेर केले. वाटेनं जाऊं लागली. तो पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जात आहे.त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकाला ये.तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिली.व तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावाने त्याने ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची मोळी झाली.तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा?उत्तर उतशील मातशिल घेतला वसा टाकून देशील.उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही.तेव्हा वसा राणीनं सांगितला.
पुढं दुसर्या मजलेस गेली, स्वयंपाक केला.राजाला वाढलं, मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक माराली.आमच्या बाई ची कहाणी ऐक. तो आला.राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली.राणीनं कहाणी मनोभावें सांगितली माळ्याने कहाणी चित्त भावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पुढं तिसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही. काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा रानात गेलेला आहे. डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता. यामुळं चिंताक्रांत बसली होती.तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ. मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाहि वसा सांगितला.
पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही काही नाही. काणा डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होतात्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उलटा केला सहा मोत्ये होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेविली.तीन मोत्ये आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला…
पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंघाळ पाणी तापलं. षडरस पक्ववान जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला.ते म्हणाले अगं अगं कोणा पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं. तीन वळचणीखाली बसून आदित्य वारी केस विंचरले होते.डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये.
ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणाडोळा मासांचा गोळा इतक्याना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला.तसा तुम्हांआम्हां होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Kahani Ganapatichi Kahani Ganapati is in Marathi. These are the stories of Gods. Normally read in the month of
Sharavan. Such first story is of God Ganesh.