Shri GopalDwadashaNam Stotram

ShriRamcharitmans Part 56
दोहा—मंत्र परम लघु जासु बस बिधि हरि हर सुर
सर्ब ।
महामत्त गजराज कहुँ बस कर अंकुस खर्ब ॥ २५६ ॥
ब्रह्मदेव, विष्णू, शिव व सर्व देव ज्याच्या अधीन
असतात, तो मंत्र अत्यंत छोटा असतो. महान मस्तवाल गजराजाला छोटासा अंकुर ताब्यात
ठेवतो. ॥ २५६ ॥
काम कुसुम धनु सायक लीन्हे । सकल भुवन अपने
बस कीन्हे ॥
देबि तजिअ संसउ अस जानी । भंजब धनुष राम सुनु
रानी ॥
कामदेवाने फुलांच्याच धनुष्यबाणाने सर्व लोकांना
वश करुन ठेवले आहे. हे देवी, हे जाणून संशय सोडून द्या. हे राणी, सांगते ते ऐका.
श्रीरामचंद्र धनुष्य नक्कीच मोडतील. ‘ ॥ १ ॥
सखी बचन सुनि भै परतीती । मिटा बिषादु बढ़ी
अति प्रीती ॥
तब रामहि बिलोकि बैदेही । सभय हृदयँ बिनवति
जेहि तेही ॥
सखीचे वचन ऐकून राणीला विश्र्वास वाटू लागला.
तिचा विषाद मावळला आणि श्रीरामांविषयी तिच्या मनातील प्रेम अधिकच वाढले. त्याचवेळी
श्रीरामांना पाहून सीता बावरलेल्या मनाने ज्या त्या देवांची विनवणी करु लागली. ॥ २
॥
मनहीं मन मनाव अकुलानी । होहु प्रसन्न महेस
भवानी ॥
करहु सफल आपनि सेवाकाई । करि हितु हरहु चाप
गरुआई ॥
ती व्याकूळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की, ‘
हे महेश-भवानी. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे, तिचे फळ मला
द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. ॥ ३ ॥
गननायक बरदायक देवा । आजु लगें कीन्हिउँ तुअ
सेवा ॥
बार बार बिनती सुनि मोरी । करहु चाप गुरुता
अति थोरी ॥
हे गणनायका, वरदायी गणेशदेवा, मी आजच्या या
दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा
जडपणा खूपच कमी करुन टाका. ‘ ॥ ४ ॥
दोहा—देखि देखि रघुबीर तन सुर मनाव धरि धीर ।
भरे बिलोचन प्रेम जल पुलकावली सरीर ॥ २५७ ॥
श्रीरघुनाथांच्याकडे पाहात-पाहात सीता धीर धरुन
देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते, आणि शरीर
रोमांचित झाले होते. ॥ २५७ ॥
नीकें निरखि नयन भरि सोभा । पितु पनु सुमिरि
बहुरि मनु छोभा ॥
अहह तात दारुनि हठ ठानी । समुझत नहिं कछु
लाभु न हानी ॥
डोळे भरुन श्रीरामांचे लावण्य पाहाताना
पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. ती मनात म्हणू लागली, ‘ अहो,
माझ्या वडिलांनी मोठा कठीण पण ठेवला आहे. त्यांना त्यातील लाभ-हानी काही समझेनाशी
झाली आहे. ॥ १ ॥
सचिव सभय सिख देइ न कोई । बुध समाज बड़ अनुचित
होई ॥
कहँ धनु कुलिसहु चाहि कठोरा । कहँ स्यामल
मृदुगात किसोरा ॥
मंत्री घाबरत असल्यामुळे कुणी त्यांना सल्लाही
देत नाही. पंडितांच्या सभेमध्ये हे जे घडत आहे, ते अयोग्य आहे. कुठे वज्रापेक्षाही
कठोर धनुष्य आणि कुठे हे कोमल शरीराचे किशोर श्यामसुंदर ! ॥ २ ॥
बिधि केहि भॉंति धरौं उर धीरा । सिरस सुमन कन
बेधिअ हीरा ॥
सकल सभा कै मति भै भोरी । अब मोहि संभुचाप
गति तोरी ॥
हे विधात्या, मी मनात धीर कसा धरु ? शिरीषाच्या
फुलातील केशराने कुठे हिरा छेदता येईल काय ? सर्व सभेची बुद्धी बावचळली आहे म्हणून
हे शिव-धनुष्या, आता मला तुझाच एक आधार आहे. ॥ ३ ॥
निज जड़ता लोगन्ह पर डारी । होहि हरुअ
रघुपतिहि निहारी ॥
अति परिताप सीय मन माहिं । लव निमेष जुग सय
सम जाहीं ॥
हे धनुष्या ! तू आपला जडपणा लोकांच्यावर टाकून व
श्रीरामांचे सुकुमार शरीर पाहून हलका हो. ‘ अशा प्रकारे सीतेच्या मनाला मोठी व्यथा
लागून राहिली होती. निमेषाचा एक अंश सुद्धा तिला युगासारखा वाटत होता. ॥ ४ ॥
दोहा—प्रभुहि चितइ पुनि चितव महि राजत लोचन
लोल ।
खेलत मनसिज मीन जुग जनु बिधु मंडल डोल ॥ २५८
॥
प्रभु श्रीरामचंद्रांना पाहून नंतर पृथ्वीकडे
पाहाणार्या सीतेचे चंचल नयन असे शोभत होते की, जणू चंद्रमंडलरुपी जलपूर्ण कलशात
कामदेवाच्या दोन मासोळ्या खेळत आहेत. ॥ २५८ ॥
गिरा अलिनि मुख पंकज रोकी । प्रगट न लाज निसा
अवलोकी ॥
लोचन जलु रह लोचन कोना । जैसें परम कृपन कर
सोना ॥
सीतेच्या वाणीरुपी भ्रमरीला तिच्या मुखरुपी
कमळाने कोंडून ठेवले होते. लज्जारुपी रात्र पाहून ती प्रकट होत नव्हती.
ज्याप्रमाणे एखाद्या कंजूष कोपर्यातच सोने गाडून ठेवतो त्याप्रमाणे तिच्या
नेत्रांतील पाणी कोपर्यातच थबकले होते. ॥ १ ॥
सकुची ब्याकुलता बड़ि जानी । धरि धीरज प्रतीति
उर आनी ॥
तन मन बचन मोर पनु साचा । रघुपति पद सरोज
चितु राचा ॥
आपली व्याकुळता पाहून सीता लाजली आणि धीर धरुन
तिने मनात विश्र्वास बाळगला की, ‘ जर तन, मन आणि वचन यांनी माझा पण खरा असेल आणि
श्रीरघुनाथांच्या चरणकमळी माझे चित्त खरोखरच अनुरुक्त असेल, ॥ २ ॥
तौ भगवानु सकल उर बासी । करिहि मोहि रघुबर कै
दासी ॥
जेहि कें जेहि पर सत्य सनेहू । सो तेहि मिलइ
न कछु संदेहू ॥
तर सर्वांच्या हृदयात निवास करणारे भगवंत मला
रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांची दासी नक्कीच बनवतील, ज्याचे ज्याच्यावर खरे प्रेम
असते, त्याला तो मिळतोच, यात काही शंका नाही.’ ॥ ३ ॥
प्रभु तन चितइ प्रेम तन ठाना । कृपानिधान राम
सबु जाना ॥
सियहि बिलोकि तकेउ धनु कैसें । चितव गरुरु
लघु ब्यालहि जैसें ॥
प्रभु श्रीरामांना पाहून सीतेच्या शरीराने
प्रेमाचा निश्र्चय केला. कृपानिधान श्रीरामांनी हे ओळखले. त्यांनी सीतेकडे पाहून
धनुष्याकडे असे बघितले की, गरुड जसा छोट्या सापाकडे पाहतो. ॥ ४ ॥
दोहा—लखन लखेउ रघुबंसमनि ताकेउ हर कोदंडु ।
पुलकि गात बोले बचन चरन चापि ब्रह्मांडु ॥
२५९ ॥
इकडे जेव्हा लक्ष्मणाने पाहिले की, रघुकुलरत्न
श्रीरामांनी शिव-धनुष्याकडे दृष्टी टाकली आहे, तेव्हा त्याचे शरीर शहारले त्याने
ब्रह्मांडाला आपल्या चरणांनी दाबून म्हटले, ॥ २५९ ॥
दिसिकुंजरहु कमठ अहि कोला । धरहु धरनि धरि
धीर न डोला ॥
रामु चहहिं संकर धनु तोरा । होहु सजग सुनि
आयसु मोरा ॥
‘ हे दिग्गजांनो, हे कच्छपा, हे शेषा, हे
वराहा ! तुम्ही धैर्याने पृथ्वीला धरुन ठेवा. कारण ती डळमळू नये. श्रीरामचंद्र
शिवांचे धनुष्य मोडू पाहात आहेत. माझ आज्ञा समजून सर्वजण सावध राहा. ‘ ॥ १ ॥
चाप समीप रामु जब आए । नर नारिन्ह सुर सुकृत मनाए
॥
सब कर संसउ अरु अग्यानू । मंद महीपन्ह कर अभिमानू
॥
श्रीरामचंद्र जेव्हा धनुष्याजवळ आले, तेव्हा
सर्व स्त्री-पुरुषांनी देवांची व आपल्या पुण्यांची विनवणी केली. सर्वांचा संशय आणि
अज्ञान, नीच राजांचा अभिमान, ॥ २ ॥
भृगुपति केरि गरब गरुआई । सुर मुनिबरन्ह केरि
कदराई ॥
सिय कर सोचु जनक पछितावा । रानिन्ह कर दारुन दुख
दावा ॥
परशुरामाचा प्रचंड गर्व, देव व मुनींची
व्याकुळता ( भय ), सीतेची चिंता, जनकांचा पश्र्चात्ताप आणि राण्यांच्या दारुण
दुःखाचा दावानल, ॥ ३ ३
संभुचाप बड़ बोहितु पाई । चढ़े जाइ सब संगु बनाई ॥
राम बाहुबल सिंधु अपारु । चहत पारु नहिं कोउ
कड़हारु ॥
हे सर्व शिवांचे धनुष्यरुपी मोठे जहाज
मिळाल्याने समूह बनवून, त्यावर आरुढ झाले. हे सर्व श्रीरामांच्या भुजांच्या बलरुपी
अपार समुद्रापलीकडे जाऊ इच्छितात. परंतु कोणी नावाडी नाही. ॥ ४ ॥
ShriRamcharitmans Part 55
दोहा—कहि न सकत रघुबीर डर लगे बचन जनु बान ।
नाइ राम पद कमल सिरु बोले गिरा प्रमान ॥ २५२ ॥
श्रीरघुवीरांच्या भीतीमुळे तो काही बोलू शकला
नव्हता, परंतु जनक राजांचे बोलणे त्याला बाणाप्रमाणे टोचू लागले. जेव्हा राहावले
नाही तेव्हा श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर मस्तक लववून त्याने स्पष्टपणे म्हटले,
॥ २५२ ॥
रघुबंसिन्ह महुँ जहँ कोउ होई । तेहिं समाज अस
कहइ न कोई ॥
कही जनक जसि अनुचित बानी । बिद्यमान
रघुकुलमनि जानी ॥
‘ जेथे रघुवंशीयांपैकी कोणीही असतो, त्या सभेत
जनकांनी रघुकुलशिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत, असे
अनुचित कोणी बोलत नसते. ॥ १ ॥
सुनहु भानुकुल पंकज भानू । कहउँ सुभाउ न कछु
अभिमानू ॥
जौं तुम्हारि अनुसासन पावौं । कंदुक इव
ब्रह्मांड उठावौं ॥
हे सूर्यकुलरुपी ( कमलासाठी ) सूर्य असणार्या
श्रीरामा ! ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की, जर तुमची आज्ञा असेल
तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरीन. ॥ २ ॥
काचे घट जिमि डारौं फोरी । सकउँ मेरु मूलक
जिमि तोरी ॥
तव प्रताप महिमा भगवाना । को बापुरो पिनाक
पुराना ॥
आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकीन. मी
सुमेरु पर्वताला मुळीप्रमाणे उघडून टाकू शकतो. हे भगवन ! तुमच्या प्रतापाच्या
महिम्यापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय ? ॥ ३ ॥
नाथ जानि अस आयसु होऊ । कौतुकु करौं बिलोकिअ
सोऊ ॥
कमल नाल जिमि चाप चढ़ावौं । जोजन सत प्रमान लै
धावौं ॥
हे नाथ, असे मानून आज्ञा द्याल, तर गंमत करुन
दाखवितो. ती पाहा तर खरे. धनुष्याला कमळाच्या देठीप्रमाणे उचलून घेऊन शंभर योजने
धावत जाईन. ॥ ४ ॥
दोहा—तोरौं छत्रक दंड जिमि तव प्रताप बल नाथ
।
जौं न करौं प्रभु पद सपथ कर न धरौं धनु भाथ ॥
२५३ ॥
हे नाथ, आपल्या प्रतापाच्या बळावर मी हे धनुष्य
कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे मोडून टाकीन. जर मी असे केले नाही, तर प्रभूंच्या
चरणांची शपथ घेऊन सांगतो की, मग मी धनुष्य व भाता कधीही हाती धरणार नाही.’ ॥ २५३ ॥
लखन सकोप बचन जे बोले । डगमगानि महि दिग्गज
डोले ॥
सकल लोग सब भूप डेराने । सिय हियँ हरषु जनकु
सकुचाने ॥
लक्ष्मण रागाने ओरडताच पृथ्वी डळमळू लागली आणि
दिग्गज हादरले. सर्व लोक आणि राजे घाबरले. सीतेला आनंद झाला आणि जनक वरमले. ॥ १ ॥
गुर रघुपति सब मुनि मन माहीं । मुदित भए पुनि
पुनि पुलकाहीं ॥
सयनहिं रघुपति लखनु नेवारे । प्रेम समेत निकट
बैठारे ॥
गुरु विश्र्वामित्र, श्रीरघुनाथ व सर्व मुनी मनात
आनंदले आणि वारंवार रोमांचित झाले. श्रीरघुनाथांनी खूण करुन लक्ष्मणाला रोखले आणि
प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवून घेतले. ॥ २ ॥
बिस्वामित्र समय सुभ जानी । बोले अति स्नेहमय
बानी ॥
उठहु राम भंजहु भवचापा । मेटहु तात जनक
परितापा ॥
शुभ वेळ आल्याचे जाणून विश्र्वामित्र अत्यंत
प्रेमाने म्हणाले, ‘ हे रामा, ऊठ शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा ! जनकांची
चिंता दूर कर. ‘ ॥ ३ ॥
सुनि गुरु बचन चरन सिरु नावा । हरषु बिषादु न
कछु उर आवा ॥
ठाढ़े भए उठि सहज सुभाएँ । ठवनि जुबा मृगराजु
लजाएँ ॥
गुर-वचन ऐकून श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक
ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण
सिंहालाही लाजविल्यासारखे सहजपणे उभे राहिले. ॥ ४ ॥
दोहा—उदित उदयगिरि मंच पर रघुबर बालपतंग ।
बिकसे संत सरोज सब हरषे लोचन भृंग ॥ २५४ ॥
मंचरुपी उदयाचलावर रघुनाथरुपी बाल-सूर्य उगवताच सर्व
संतरुपी कमळे फुलून गेली आणि त्यांचे नेत्ररुपी भ्रमर आनंदित झाले. ॥ २५४ ॥
नृपन्ह केरि आसा निसि नासी । बचन नखत अवली न
प्रकासी ॥
मानी महिप कुमुद सकुचाने । कपटी भूप उलूक
लुकाने ॥
राजांची आशारुपी रात्र नाहीशी झाली. त्यांच्या
वचनरुपी तारांच्या समुदायाचे चमकणे बंद झाले. घमेंडी राजारुपी रात्रविकासी कमळे
कोमेजली आणि कपटी राजारुपी घुबडे लपून बसली. ॥ १ ॥
भए बिसोक कोक मुनि देवा । बरिसहिं सुमन
जनावहिं सेवा ॥
गुर पद बंदि सहित अनुरागा । राम मुनिन्ह सन
आयसु मागा ॥
मुनी व देवरुपी चक्रवाकांचे दुःख सरले. ते
फुलांचा वर्षाव करीत सेवा करु लागले. प्रेमाने गुरुंच्या चरणांना वंदन करुन
श्रीरामचंद्रांनी मुनींची आज्ञा मागितली. ॥ २ ॥
सहजहिं चले सकल जग स्वामी । मत्त मंजु बर
कुंजर गामी ॥
चलत राम सब पुर नर नारी । पुलक पूरि तन भए
सुखारी ॥
संपूर्ण जगताचे स्वामी श्रीराम हे मस्त व श्रेष्ठ
हत्तीच्या डौलदार चालीने निघाले. श्रीराम निघताच नगरातील सर्व स्त्री-पुरुष
सुखावून गेले व रोमांचित झाले. ॥ ३ ॥
बंदि पितर सुर सुकृत सँभारे । जौं कछु पुन्य
प्रभाउ हमारे ॥
तौ सिवधनु मृनाल की नाईं । तोरहुँ रामु गनेस
गोसाईं ॥
त्यांनी पितर व देवांना वंदन करुन आपल्या
पुण्याईचे स्मरण केले. ते म्हणाले, ‘ जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल, तर हे
देवा गणेशा, श्रीराम हे शिव-धनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. ‘ ॥ ४ ॥
दोहा—रामहि प्रेम समेत लखि सखिन्ह समीप बोलाइ
।
सीता मातु सनेह बस बचन कहइ बिलखाइ ॥ २५५ ॥
सीतेची माता श्रीरामांना वात्सल्याने पाहून व
सख्यांना जवळ बोलावून प्रेमवश सद्गदित होऊन म्हणाली, ॥ २५५ ॥
सखि सब कौतुकु देखनिहारे । जेउ कहावत हितू
हमारे ॥
कोउ न बुझाइ कहइ गुर पाहीं । ए बालक असि हठ
भलि नाहीं ॥
‘ हे सखी, हे जे आमचे हितचिंतक म्हणवितात, ते
सर्व कौतुक पाहाणारे आहेत. यापैकी कोणीही गुरु विश्र्वामित्रांना समजावून का सांगत
नाहीत की, हे श्रीराम लहान आहेत. त्यांच्यासाठी असा आग्रह धरणे चांगले नव्हे. ॥ १
॥
रावन बान छुआ नहिं चापा । हारे सकल भूप करि
दापा ॥
सो धनु राजकुअँर कर देहीं । बाल मराल कि मंदर
लेहीं ॥
रावण व बाणासुर धनुष्याला स्पर्शसुद्धा करु शकले
नाहीत आणि सर्व घमेंडखोर राजांनी ज्याच्यापुढे हात टेकले, तेच हे धनुष्य या
सुकुमार राजकुमाराच्या हाती देत आहेत. हंसाचे पिल्लू कधी मंदराचल उचलू शकेल काय ?
॥ २ ॥
भूप सयानप सकल सिरानी । सखि बिधि गति कछु
जाति न जानी ॥
बोली चतुर सखी मृदु बानी । तेजवंत लघु गनिअ न
रानी ॥
ज्ञानी महाराजांचेही सर्व शहाणपण संपले आहे, असे
वाटते. हे सखी, विधात्याची गती काही समजत नाही.’ असे म्हणून राणी गप्प बसली.
तेव्हा एक चतुर सखी कोमल वाणीने म्हणाली, ‘ हे राणी, जो तेजस्वी असतो त्याला कधीही
लहान सनजू नये.’ ॥ ३ ॥
कहँ कुंभज कहँ सिंधु अपारा । सोषेउ सुजसु सकल
संसारा ॥
रबि मंडल देखत लघु लागा । उदयँ तासु तिभुवन
तम भागा ॥
कुठे घटातून उत्पन्न झालेले मुनी अगस्त्य आणि
कुठे अपार समुद्र. परंतु त्यांनी तो शोषून टाकला, त्यांची श्रेष्ठ कीर्ती
विश्र्वात पसरली आहे. सूर्यमंडल दिसायला लहान दिसते, परंतु त्याचा उदय होताच
तिन्ही लोकीचा अंधकार पळून जातो. ॥ ४ ॥