Saturday, December 10, 2011

Guruchatria Adhyay 14 श्री गुरुचरित्र अध्याय १४ वा

ShriPad ShriVallabha and Shri Nrusinha Sarawati

Guruchatria Adhyay 14 

Guruchatria Adhyay 14 is in Marathi. This Adhyay describes how Guru Nrusinha Sarswati helped his disciple Sayandeo from a dreadful condition. Sayandeo had been called by the king. The king is very cruel. Whenever the king calls any person, people knew that that person would be killed. As such Sayandeo was going to meet his death. Hence he approached his Guru Nrusinha Saraswati and requested him to bless his family and Guru-Bhakti will continue in his family even after his death. He also told Guru that he (Sayandeo) is going to meet his death as he has been called by the king. Guru Nrusinha Saraswati assured him that king will not kill him. On the contrary king will honor him and give him many gifts. Further he assured him that he himself (Guru Nrusinha Saraswati) will wait there, till he (Sayandeo) returns back after visiting King. Sayandeo went to the palace where he had been called by the king. King was very furious and angry. He went inside to bring the weapon to kill Sayandeo. But after going in the room king fell asleep and dreamed that some body is beating him. He woke up and found himself paining very badly as such he came back to Sayandeo and asked to forgive him. He (king) gave Sayandeo money, clothes and many valuables. As such everything went as Guru Nrusinha Saraswati had told Sayandeo. This Adhyay 14 is always read by the devotees for removing any dreadful difficulty. Many have been successfully tackled dreadful difficulty in their life and found happiness and peace by reading this Adhyay to a specified number of times. 

श्रीगुरुचरित्र अध्याय १४ 
श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I
नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I
प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II 
जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I 
पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I 
पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II 
ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I 
गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II 
ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I 
तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II 
गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I 
पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II 
तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I 
भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II 
ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I 
माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II 
जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तींचा अवतारू I 
अविद्यामाया दिससी नरु I वेदां अगोचर तुझी महिमा II ९ II 
विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I 
धरिला वेष तूं मानुषी I भक्तजन तारावया II १० II 
तुझी महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I 
मागेन एक आता तुम्हांसी I तें कृपा करणे गुरुमूर्ति II ११ II 
माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I 
इहे सौख्य पुत्रपौत्री I उपरी द्यावी सद्गति II १२ II 
ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I 
सेवा करितो द्वारयवनी I महाशूरक्रुर असे II १३ II 
प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी I घात करितो जीवेसी I 
याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे मज आजि II १४ II 
जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I 
भेटी जाहली तुमचे चरण I मरण कैचे आपणासी II १५ II 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभयंकर आपुले हाती I 
विप्रमस्तकी ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II १६ II 
भय सांडूनि तुवां जावे I क्रुर यवना भेटावे I 
संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांपाशी II १७ II 
जंववरी तू परतोनि येसी I असो आम्ही भरंवसी I 
तुवां आलिया संतोषी I जाऊ आम्हीं येथोनि II १८ II 
निजभक्त आमुचा तू होसी I पारंपर-वंशोवंशी I 
अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II १९ II 
तुझे वंशपारंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I 
अखंड लक्ष्मी तयां घरी I निरोगी होती शतायुषी II २० II 
ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I 
जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II २१ II 
कालांतक यम जैसा I यवन दुष्ट परियेसा I 
ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II २२ II 
विमुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपत I 
विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरूसी ध्यातसे II २३ II 
कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I 
श्रीगुरूकृपा होय ज्यासी I काय करील क्रुर दुष्ट II २४ II 
गरुडाचिया पिलीयांसी I सर्प तो कवणेपरी ग्रासी I 
तैसे तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II २५ II 
कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I 
श्रीगुरुकृपा होय ज्यासी I कलिकाळाचे भय नाही II २६ II 
ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I 
काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II २७ II 
ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन असे तो काय I 
श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे मुख्य भय नाही II २८ II 
ऐसेपरी तो यवन I अन्तःपुरांत जाऊन I 
सुषुप्ति केली भ्रमित होऊन I शरीरस्मरण त्यासी नाही II २९ II 
हृदयज्वाळा होय त्यासी I जागृत होवोनि परियेसी I 
प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II ३० II 
स्मरण असे नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I 
छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II ३१ II 
स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I 
लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II ३२ II 
येथे पाचारिले कवणी I जावे त्वरित परतोनि I 
वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप दे तो तये वेळी II ३३ II 
संतोषोनि द्विजवर I आला ग्रामा वेगवत्र I 
गंगातीरी असे वासर I श्रीगुरुचे चरणदर्शना II ३४ II 
देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी तो भावेसी I
स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II ३५ II 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I 
दक्षिण देशा जाऊ म्हणती I स्थान-स्थान तीर्थयात्रे II ३६ II 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I 
न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II ३७ II 
तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I 
संसारसागर तारका I तूंचि देखा कृपासिंधु II ३८ II 
उद्धरावया सगरांसी I गंगा आणिली भूमीसी I 
तैसे स्वामी आम्हासी I दर्शन दिधले आपुले II ३९ II 
भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सोडणे काय नीति I 
सवे येऊ निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II ४० II 
येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I 
संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II ४१ II 
कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I 
पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II ४२ II 
आम्ही तुमचे गांवासमीपत I वास करू हे निश्चित I 
कलत्र पुत्र इष्ट भ्रात I मिळोनी भेटा तुम्ही आम्हां II ४३ II 
न करा चिंता असाल सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I 
म्हणोनि हस्त ठेविती मस्तके I भाक देती तये वेळी II ४४ II 
ऐसेपरी संतोषोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I 
जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र II ४५ II 
समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I 
प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II ४६ II 
नामधारक विनवी सिद्धासी I काय कारण गुप्त व्हावयासी I 
होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II ४७ II 
गंगाधराचा नंदनु I सांगे गुरुचरित्र कामधेनु I 
सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामकरणीस II ४८ II 
पुढील कथेचा विस्तारू I सांगता विचित्र अपारु I 
मन करूनि एकाग्रु I ऐका श्रोते सकळिक हो II ४९ II
इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II

Guruchatria Adhyay 14




Custom Search

57 comments:

  1. hi, saw Guru Cahritra Adhyay 13 and 14 that u have uploaded on Youtube. I'm female and wanted to know if there is any problem if I keep reading just these two adhyay's for health and other concerns. Kindly reply. Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. Basically maam gurucharitra adhay 14 is for the people who feel haunted and bout health prblms its absolutely fine to read

      Delete
  2. Mahika
    नमस्कार
    आपण अध्याय १३ आणि १४ बघितल्याबद्दल आणि त्यावरील प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
    १) प.पू. टेंबेस्वामी यांनी स्त्रियांनी श्रीगुरुचरित्र वाचू नये असे म्हंटले आहे. त्यांच्या मताचा आदर करून मी माझे खालील मत व्यक्त करत आहे.
    योग्यते पावित्र्य पाळून भक्तिभावाने स्त्रियांनी श्री गुरुचरीत्रांतील कांही अध्याय ऐकले अगर वाचले तरी हरकत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. यांतील १३ वा अध्याय हा रोग निवृतीकरीता आणि १४ वा अध्याय हा कोठच्याही प्रकारचे मोठे संकट नाहीसे व्हावे म्हणून महत्वाचे आहेत.
    मी दत्तात्रेयांची काही स्तोत्रे ह्या आणि Youtube च्या ब्लॉग वर ठेवली आहेत. त्यापैकी श्री दत्तात्रेय स्तोत्राची लिंक खालील प्रमाणे आहे.
    http://ioustotra.blogspot.com/2008/12/shri-dattatreya-stotra.हटमल

    ReplyDelete
    Replies
    1. काही पथ्य पाळावेत

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. नमस्कार,

    प्रथम अापल्याला अनेक धन्यवाद हा अध्याय ब्लॉगवर लिहिल्याबद्दल. तुम्ही लिहिले अाहे की "Many have been successfully tackled dreadful difficulty in their life and found happiness and peace by reading this Adhyay to a specified number of times." इच्छि फळ मिळावे म्हणून ह्या अध्यायाची पारायणसंख्या कशी ठरवावी याबद्दल माहिती देऊ शकाल का?

    अाभारी,
    निमिष.

    ReplyDelete
  5. निमिष
    नमस्कार
    आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. या अध्यायाची पारायण संख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते कारण प्रत्येक व्यक्तीचे संचित, पूर्व कर्म वेगवेगळे असते. असे वैयक्तीक माझे मत आहे. त्यामुळे आपण येवढेच करावयाचे की, पूर्ण विश्र्वासाने या अध्यायाचे पारायण मनापासून श्रीगुरुनां आपली अडचण दूर करण्यासाठी गार्‍याणे घालून चालू ठेवणे. आपली अडचण श्रीगुरुंच्या कृपेने नक्की दूर होते. धन्यवाद आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. नमस्कार,

    तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

    निमिष.

    ReplyDelete
  7. Mala saddhya nokrit Bhayankar Sankatanna samore jave Lagat Aahe. Aapan Krupa Karun Margdarshan Karave. Maazya varil sankat dur Hoil ka? Parayan sankhyaa aani Parayan kartanche niyam sangaret.

    ReplyDelete
    Replies
    1. सकाळी अंघोळ झाल्यावर सध्या नियमित १वेळा असे सलग१०८ वेळा अध्याय १४ संपूर्ण गुरुचरित्र चां वाचणे

      गुण येणारच

      Delete
    2. Ekach divashi 108 vela ki 108 divas vachaycha

      Delete
  8. Mala mansik tras khup janvat aahe mazya chhativer dadpan aslyasarkhe vatate tyamule mala sarkhe urine la jave ase vatate tya mule mi kuthe baher janyache talte .mi baher gelyaver sarkhe ladies toilets kuthe aahe ka te shodhat aste plz mala sangal ka mi konta adhyay kadhi n kiti vela vachu plz sanga

    ReplyDelete
  9. Namaskar, mazhe lagna tharat nahi.. Ichhit var milat nahi .. Kahi upay suchawal ka..

    ReplyDelete
  10. Namaskar, mazhe lagna tharat nahi.. Ichhit var milat nahi .. Kahi upay suchawal ka..

    ReplyDelete
    Replies
    1. TIME WASTE KARNYA PEKSA TYA MADHU. JO VAR AAWDEL TYACHYASPBAT LAGN KARA NAHI TR JASA AAHE TS PN NAHI MILNAR

      Delete
  11. Adhyay 14 che nitya pathan karatana sudhha parayanache niyam palawet ka

    ReplyDelete
  12. Thanks for guidance and suggestions. I have read and witnessed the transformation from difficulties to opportunities in my professional life.

    ReplyDelete
    Replies
    1. Sir can you elaborate. I too am.seeking relief. Your process and success can be a good guide for me too.

      Delete
  13. Gurucharitra is a way to reach God.

    ReplyDelete
  14. I have found relief from worries and uncertainty in different conditions.thanks for the meaning explained as now I can concentrate more with shlokas .

    ReplyDelete
  15. Sadhya naukri nahi e khup prayatna karun hi nahi millat ahe khup tension ahe kahi

    ReplyDelete
  16. Sadhya mazya ghari khup tantanav vadhla ahe.nako tya vyakti ghari alya ahet.ani maza sansar viskatala ahe.tya tension ne mazi tabbet khupach kharab zhali ahe.ani maze married life pan disturb zhale ahe.but maza swami samrthavar vishwas ahe.mi guruchritra 14 adhyay vachat hote pan madhe kahi karnane stop zhala.ata vachen.mala margadarshan kara.mi khup depression madhe jat ahe

    ReplyDelete
  17. Mala chagli naukari midavi mahnun mi konta adhyah vachu.... khupya margdarshan karave....

    ReplyDelete
  18. Mala chagli naukari midavi yasathi konta adhyay vachu please suggest karave

    ReplyDelete
  19. Guruchatritra 14 adhyay roj kontya veli vachava pls reply sakali ki sandhyakali

    ReplyDelete
  20. गुरु चरित्राचा सारांश पाठवा.

    ReplyDelete
  21. Katja mukti sathi konta Adhya vachava. Geli 2 varsh me Adhya 14 vachto aahe ani tyane khup chagala farak padala aahe. Mala swami margadarshan karat aahet asa nehemi vatat.

    ReplyDelete
  22. Read with trust .Swami is there.

    ReplyDelete
  23. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    ReplyDelete
  24. Avdhut Chintan Shree Gurudev Datta.

    ReplyDelete
  25. Guru charitra 14 adhyayvadhyay suruvat keli aahe karan naukri n doosre problems aahet. Tar hya veli non veg nahi khaycha ka ? Sorry ha prashna vicharniya baddal, but chuk nako mhanun vicharla

    ReplyDelete
  26. श्रीगुरुचरित्राचे वाचन/पारायण करतांना शाकाहारच करावा. या काळांत तरी मांसाहार कृपया करुं नये. कोठल्याही धार्मिक/ग्रंथ/पोथीचे वाचन करतांना शाकाहरी असावे, हे उत्तम. खालिल लिंकवर अधिक माहिती मिळेल.
    http://ioustotra.blogspot.com/2011/12/shri-gurucharitra-mahatmya.html

    ReplyDelete
  27. Specific raashi vaalyaani guru charitra cha 14 va adhyay vaachu naaye asa kaahi aahe kaa ? Majhi raashi vrushabh aahe ,problems kami naahi hot,last 9 months me vaachatoy

    ReplyDelete
  28. आशिष लडे नमस्कार वृषभ राशी असणार्‍यांनी श्रीगुरुचरित्राचा १४ वा किंवा कोठचाही अध्याय वाचू नये असे मी ऐकलेले नाही.
    आपल्या अडचणी ९ महिने हा अध्याय वाचूनही कमी होत नाहीत याचे कारण आपल्या पूर्वजन्मांतील दोषांचे अजुन निराकरण/शुद्धिकरण झालेले नाही हे असू शकते. श्रीगुरुचरित्रांत व १४ व्या अध्यांयात शक्ती आहे त्यावर दृढविश्र्वास असणे गरजेचे आहे. आपले वाचन विनासंदेह चालू ठेवावे असे मला वाटते.

    ReplyDelete
  29. Last reply sathi khup aabhar,aankhi ek prashna,me divasaatun 2 vela gurucharitra,hanuman chalisa,aani ganpati strotra vaachato,ekda sakali aani dusra sandhyakaali.
    Tyaat paahilya number var me ganpati strotra,dusrya number var gurucharitra adhyay 14 va aani teesrya number var hanuman chalisa vaachato,he barobar aahe kaa ki kramvaari pude maage karu ,kripaya margadarshan karaave

    ReplyDelete
  30. श्री आशिष लडे नमस्कार आपण योग्य प्रकारे आपली उपासना करीत आहात. फक्त एक सुचवावेसे वाटते की श्रीहनुमान चालीसा वाचण्याआधी व वाचून झाल्यावर श्रीरामांच्या तेरा अक्षरी नावाचा ११ वेळा जप करावा. कारण श्रीहनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त आहे. त्याच्या उपासनेआधी श्रीरामांचे स्मरण केल्यास तो लवकर प्रसन्न होईल असे मला वाटते. धन्यवाद.

    ReplyDelete
  31. Kripaya 13 akshari naav kaay aahe saangu shakaal ja sir

    ReplyDelete
  32. Noukri sathi kounta adhyay mhanava noukricha khupch problem yet aahe gele 4 varsha zali

    ReplyDelete
  33. स्त्रियांनी गुरुचरित्र अध्याय १४ आणि १८ दर गुरुवरी वचला तर चलेल का?

    ReplyDelete
  34. अनुजा नमस्कार स्त्रियांनी गुरुचरित्र अध्याय १४ आणि १८ दर गुरुवरी वाचला तर माझे मत चालेल असे आहे.

    ReplyDelete
  35. माझं लहान बाळ असल्यामुळे रोज अध्याय वाचणे शक्य नाही.. मग दर गुरुवारी १ अध्याय वाचला तर चालेल का?

    ReplyDelete
  36. I must say this really helps. I started to read this addhyay 2 years back and today I am in much better position in life. It has help me fight all obstacles that came in my life. Shri Gurudev Datta.

    ReplyDelete
  37. I want to give upsc exam next year please tell which adhyay shall I read so that I will get successful in my exams ....... Please tell me.

    ReplyDelete