NagPanchami
We celebrate NagPanchami every year on Shravan (Name of the Month) Shukla Panchami (Fifth day of the month). This year we are celebrating this festival on 23rd July 2012. I am trying to describe how and why we celebrate this festival.
There was a very big Nag (serpent) named as Kaliya in the river Yamuna. Kaliya was very poisonous and with his furious breathing, he can kill cows and other domestic animals. Hence the farmers and people were very much afraid of Kaliya. Then went to God Krishna and told him about Kaliya. God Krishna killed Kaliya and made the people, farmers and animals happy. The day on which Kaliya was killed by God Krishna was Shravan Shukla Panchami. God Krishna had blessed Kaliya’s wife and family members that on this day people will worship Kaliya and the day will be called as NagPanchami. Hence on this day people worship Nag and celebrate NagPanchami.
There are nine famous Nagas (serpents); the names of them are 1) Anant 2) Vasuki 3) Shesh 4) Padmanabha 5) Kambal 6) Dhrutarashtra 7) Shankhapal 8) Takshak and 9) Kaliya. All these are remembered and we worship idols of Nagas on this day with Flowers, Milk, Chandan, Deep, Dhoop, Akshata, and Lahyas. Before pooja we say that we are performing this pooja to receive the blessings from the Nagas to us and all our family members and we are performing this pooja, with whatever money and material and knowledge we have, on this day of Shravan Shukla Panchami.
Finally after pooja we pray to Nag Devata that we have performed this pooja and request to bless us for fulfilling our desires and we along with all our family members become fearless from the poison of the serpents. And ask Nag Devata for forgiving us for whatever is not performed in the pooja because of lack of knowledge.
नागपंचमी
प्रत्येक वर्षी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी हा सण साजरा
करतात. या वर्षी श्रावण शुक्लपंचमी सोमवार, २३-७-२०१२ला येत
आहे. यासाठी नागपंचमी सण साजरा करण्याची प्रचलीत पद्धत
देण्याचा हा प्रयत्न.
यमुनेच्या डोहांतील कालिया नावाचा महाविषारी नाग नुसत्या
फुत्काराने गाई, गुरेढोरे यांना मारत असे त्याला श्रीकृष्णाने या
दिवशी मारले. श्रीकृष्णाने कालियाला आणि त्याच्या पत्नी व
मुलाबाळांना दिलेल्या वरामुळे या दिवशी लोक नागाची पूजा करतात.
काही ठिकाणी श्रीकृष्णाचीहि पूजा या दिवशी करतात.
नागाच्या मातीच्या प्रतिकृतीची किंवा देवपूजेच्या खोलींतील बाहेरच्या
भिंतीवर शेणाने सारवून पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची
प्रतिमा काढून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. पाटावरही
नवनागांच्या प्रतिमा काढून पूजा करण्याचीही पद्धत काही घराण्यांत
आढळते. याच बरोबर नागपत्नींनाही नमस्कार करावा.
पूजा झाल्यावर ज्या ठिकाणी नाग/सर्प असण्याचा संभव असतो अशा
वारुळाला गंध-फूल वाहून तेथे दुधाचा नैवेद्द ठेवतात.
पूजेचे साहित्यः हळद, कुंकू, गंध, अक्षता, आघाडा, फुटाणे, फूले,
दूर्वा, दूध, भाताच्या लाह्या, वस्त्र.
दिनविशेषः या दिवसाचे मुख्य पक्वान्न पुरणाची दिंडे हे आहे. या
दिवशी जमीन खणणे, पोळ्या भाजणे, तळणे, चुलीवर तवा ठेवणे,
विळीने चिरणे, भाजी चिरणे इत्यादी गोष्टी करत नाहीत.
नवनागांची नावे असलेला श्र्लोक खालील प्रमाणे आहे.
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम् ।
धृतराष्ट्रं शंखपालं तक्षकं कालियं तथा ॥
नागपूजेचा संकल्पः
मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वतः सर्पभयनिवृत्तिपूर्वकं
सर्पप्रसाद सिद्धिद्वारा श्रीपरमेश्र्वरप्रीत्यर्थं श्रावण
शुक्लपंचम्यां
यथामीलितोपचारद्रव्यैः नागपूजां करिष्ये ॥
ध्यानमंत्रः
ॐ आयंगौः पृश्र्निन्कमीदसदनमातरं पुरः ।
पितरं च प्रयन्त्स्वः ॥
नमो अस्तु सर्पेभ्यो ये के च पृथिवीमनुः ।
ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः ।
ये दो रोचने दिवो ये वा सूर्यस्य रश्मिषु ।
येषामप्सुषदुदः कृतं तेभ्यः सर्पेभ्यो नमः ।
या इषवो यातुधानानां ये वा वनस्पती ँरनु ।
ये वा वटेषु शेरते तेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥
नागदेवतेच्या पूजनानंतर करावयाची प्रार्थनाः
श्रावणे शुक्लपंचम्यां यत्कृतं नागपूजनम् ।
तेन तृप्यंतु मे नागा भवंतु सुखदाः सदा ॥ १ ॥
अज्ञानाज्ज्ञानतो वापि यन्मया पूजनं कृतम् ।
न्यूनातिरिक्तं तत्सर्वं भो नागाः क्षन्तुमर्हथ ॥ २ ॥
युष्मत् प्रसादात् सफला मम संतु मनोरथाः ।
सर्वदा मत्कुले माsस्तु भयं सर्वविषोद्भवम् ॥ ३ ॥
NagPanchami
नागपंचमी
Custom Search
No comments:
Post a Comment