Saturday, January 3, 2015

Shri Shakambhari Dhyanam and Shakambhari Navaratra


Shri Shakambhari Dhyanam and Navaratra 
 Shri Shakambhari Dhyanam is in Sanskrit. Before reciting Stotra, Kavacha, Panchakam or Ashtakam of Shri Shakhambhari Devi, this is to be recited. Shakambhari Navaratra is celebrated every year in the Pousha month from shudha Ashatami to Pousha Pournima. We are celebrating it from 29th December 2014 t0 5th January 2015.
श्री शाकंभरी ध्यान
खड्गं घंटां त्रिशुलं लिपिविशदतरं बिभ्रतीं दक्षहस्तैः ।
पात्रं शीर्षं सुखेटं डमरुं कमनिशं वामहस्तैस्त्रिनेत्राम् ।
सिंहस्थां तारहारां गदामणि मुकुटां द्योतयंतीं प्रसन्नां ।

वन्दे पुर्णेंदुबिंबां प्रतिरुचिरमुखीं शंकरीं शंकरेष्टां ॥ 

शाकंभरीदेवी नवरात्र
शाकंभरीदेवीचे नवरात्र प्रत्येक वर्षी पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा असे साजरे करातात.
शाकंभरीदेवीची पौराणीक कथा
फार पूर्वींच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपःचर्या करुन ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होमहवन आदि सर्व बंद पडले. त्यामुळे पाऊसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदिसर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हां ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून 
भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तीची स्तोत्र, स्तुती, जपजाप्य ह्यांनी उपासना केली. तेव्हां भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तीने सर्वांसाठी शाक (भाज्या) फळे निर्माण केली. तीच्या कृपेने परत पाउस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. 
भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले. 
शाकंभरी ही अठरापगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे.ही देवी कुमारी आहे. कुमारींचे पूजन करणे ही ह्या नवरात्रांतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे.  
नवरात्रांत पाळल्या जाणार्‍या काही प्रथा.
देवीच्या मूर्तीची अगर प्रतिमेची रोज पूजा केली जाते. देवीला रोज वेणी वाहतात. तेलाचा दिवा नऊ दिवस सतत तेवत ठेवतात. आरती करतांना ती रिठ्याने करतात. काही भक्त नऊ दिवस एकच फळ अगर एकच पदार्थ खातात. कांही कुटुंबामध्ये नवरात्रांत नउ दिवस घन अन्न न खाता फक्त पाणी अगर फळांचे रस वगैरे घेउन तसा उपवास करतात. नवरात्रांतील 
चवथ्या दिवशी ५ कुमारिकांची पूजा करतात. गव्हाची ओटी भरतात हे महत्वाचे असते. कांही कुटुंबांत जोगवा मागतात. 
कुळाचार, कुळधर्म म्हणून सोळा सवाष्णी या नऊ दिवसांत जेवावयास बोलावतात. काही कुटुंबांत ब्राह्मण-सवाष्ण जेवावयास बोलावून वारी म्हणून त्यांच्या ताटांतील पोळी-भाजी आवर्जून मागून घेतात. पौर्णिमेस टॉमेटो व मसूर वगळून सर्व प्रकारच्या चौसष्ट भाज्या नैवेद्यांत असतात. पुरणाचे कडबू मुद्दाम नैवेद्यांत असतात. 
उपासना 
नवरात्रांत शाकंभरी देवीचे अष्टक, कवच, स्तवन यांचे पाठ करणे. सप्तशतीचे पाठ करणे.  
शाकंभरीचे देउळ बदामी, कर्नाटक राज्यांत आहे. या नवरात्रांत तेथे मोठा उत्सव असतो. हे देउळ दगडी असून देवीची मूर्तिसुद्धा दगडीच आहे. या ठिकाणी ठराविक वेळेपर्यंत भाविकांनी वाहिलेल्या सर्व साड्या देवीस नेसवतात. सकाळी सर्व प्रथम येणार्‍या कुमारिकेचे पूजन या देवळांत या नऊ दिवसांत केले 
जाते.
Shri Shakambhari Dhyanam and Shakambhari Navaratra 
    

Custom Search

No comments:

Post a Comment