Wednesday, March 18, 2015

Rognivaran Sukta रोगनिवारण-सूक्त


Rognivaran Sukta 
RogNivaran Sukta is a Vaidik Sukta. It is in Sanskrit. Any Vaidik Sukta means the Vaidik Mantras. Hence the Suktas are very holy and possess the power to give, that is described in the Sukta. Rognivaran Sukta is from Atharv-Ved 4th Kanda number 13. So also Rugved Dashama Mandal number 137 Sukta is called as Rognivaran Sukta.This is in Anushtup Chanda in Atharv-Ved. Rushi of this sukta is Shantati. Devata is Chandrama and Vishvedava. First Mantra Rushi is Bharadwaja. Second Mantra Rushi is Kashyap; Third Mantra Rushi is Goutam; Fourth Mantra Rushi is Atri; Fifth Mantra Rushi is Vishwamitra; Sixth Mantra Rushi is Jamdagni; Seventh Mantra Rushi is Vashishtha and devata is Vishvedeva. Anybody reciting this Sukta becomes free from diseases and receives a sound health. This Sukta is a prayer made by Rushies for having a better health and become free from any disease.
रोगनिवारण-सूक्त
उत देवा अवहितं देवा उन्नयथा पुनः ।
उतागश्र्चकुषं देवा देवा जीवयथा पुनः ॥ १ ॥
द्वाविमौ वातौ वात आ सिन्धोरा परावतः ।
दक्षं ते अन्य आवातु व्यन्यो वातु यद्रपः ॥ २ ॥
आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रपः ।
त्वं हि विश्र्वभेषज देवानां दूत ईयसे ॥ ३ ॥
त्रायन्तामिमं देवास्त्रायन्तां मरुतां गणाः ।
त्रायन्तां विश्र्वा भूतानि यथायमरपा असत् ॥ ४ ॥
आ त्वागमं शंतातिभिरथो अरिष्टतातिभिः ।
दक्षं त उग्रमाभारिषं परा यक्ष्मं सुवामि ते ॥ ५ ॥
अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरः ।
अयं मे विक्ष्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः ॥ ६ ॥
हस्ताभ्यां दशशाखाभ्यां जिह्वा वाचः पुरोगवी ।
अनामयिन्तुभ्यां हस्ताभ्यां ताभ्यां त्वाभि मृशामसि ॥ ७ ॥
॥ इति रोगनिवारण  सूक्त ॥
रोगनिवारण-सूक्त मराठी अर्थ:
१) देवांनो ! अहो देवांनो आपण अवनत (अधोगतीला) गेलेल्यांना आपण परत वर उठवा. देवांनो आपण पाप केलेल्यांनासुद्धा (जिवंत) करुन परत उन्नतीच्या मार्गावर न्या.
२) दोन प्रकारचे वायु आहेत. एक वायु समुद्रावरुन येणारा आणि दुसरा दूर जमिनीवरुन येणारा. एक वायु तुमच्याकडे बल घेऊन येऊ दे. दुसरा वायु जे दोष ( रोग, अस्वास्थ्य) आहेत ते दूर (नाहिसे) करु दे.
३)  हे वायु येथे औषधि घेऊन या. जो दोष(रोग) आहे तो नाहीसा करा. हे वायु तू देवांचा दूत होऊन वाहणारा व सर्व औषधिंचे भंडार जवळ असणारा आहेस..
४) हे देवांनो या रोग्याची रक्षा करा. हे मरुत् गणानों रक्षण करा. सर्व प्राणी रक्षण करोत. ज्यामुळे हा रोगी रोगरहित होवो.
५) आपल्याजवळ शान्ति देणार्‍या आणि अविनाशी करणार्‍या साधनांना (वस्तुनां) घेऊन आलो आहे. तुला पूर्णपणे बलवान करतो आणि तुला रोगमुक्त करतो.
६) माझा हा हात भाग्यवान आहे. तो भाग्यशाली आहे. तो सर्व औषधिंनी संपन्न आहे. त्या हाताचा स्पर्श शुभ करणारा आहे. 
७) दहा शाखा (बोटे) माझ्या दोन्ही हातांबरोबर वाणीला प्रेरित करणारी माझी जीभसुद्धा आहे, त्या निरोगी करणार्‍या दोन्ही हातांनी आम्ही तुला रोगमुक्त करण्यासाठी स्पर्श करतो.

Rognivaran Sukta 
रोगनिवारण-सूक्त


Custom Search

No comments:

Post a Comment