Monday, July 20, 2015

ShriBhagirathaKrut Ganga Stuti श्रीभगीरथकृत गंगास्तुति


ShriBhagirathaKrut Ganga Stuti 
ShriBhagirathaKrut Ganga Stuti is in Sanskrit. It is from Devi Bhagawatam. It has artisan in the conversation between Devarshi Narad and God Narayan. Sons of King Sagar were dead because of cursing of Kapil Muni. Only son Anasuman was with him. The dead Sagar sons’ supposed to receive mukti if their ashes would touch by Ganga. Anshuman made vary rigorous tapas for one lakh years to please Ganga for bringing her on the earth. However Anshuman was unable to do so. Hence after his death, his son Bhagirath continued the Tapas and finally he brought Ganga down from Swarga lok to Pruthavi lok. By the touch of Ganga Kings agar’s sons received Mukti and went to Vaikuntha. Since Ganga is brought on earth by Bhagirath; Ganga is called as Bhagirathi. His efforts to complete his task were beyond the description and hence when anybody requires vary hard efforts to achieve his goal is called Bagirath Prayatna.
श्रीभगीरथकृत गंगास्तुति
नारद उवाच 
श्रोतुमिच्छामि देवेश लक्ष्मीकान्त जगत्पते ।
विष्णोर्विष्णुपदीस्तोत्रं पापघ्नं पुण्यकारकम् ॥ 
श्रीनारायण ऊवाच 
श्रृणु नारद वक्ष्यामि पापघ्नं पुण्यकारकम् ।
शिवसंगीतसम्मुग्धश्रीकृष्णाङ्गसमुद्भवाम् ।
राधाङ्गद्रवसंयुक्ता तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १ ॥
यज्जन्म सृष्टेरादौ च गोलोके रासमण्डले ।
संनिधाने शंकरस्य तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ २ ॥ 
गोपैर्गोपीभिराकीर्णे शुभे राधामहोत्सवे ।
कार्तिकीपूर्णिमायां च तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ३ ॥
कोटियोजनविस्तीर्णा दैर्घ्ये लक्षगुणा ततः ।
समावृता या गोलोकं तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ४ ॥
षष्टिलक्षयोजना या ततो दैर्घ्ये चतुर्गुणा ।
समावृता या वैकुण्ठे तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ५ ॥
त्रिंशल्लक्षयोजना या दैर्घ्ये पञ्चगुणा ततः । 
आवृता ब्रह्मलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ६ ॥  
त्रिंशल्लक्षयोजना या दैर्घ्ये चतुर्गुणा ततः ।
आवृता शिवलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ७ ॥
लक्षयोजनविस्तीर्णा दैर्घ्ये सप्तगुणा ततः ।
आवृता ध्रुवलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ८ ॥
लक्षयोजनविस्तीर्णा दैर्घ्ये पञ्चगुणा ततः ।
आवृता चन्द्रलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ९ ॥
षष्टिसहस्त्रयोजना या दैर्घ्ये दशगुणा ततः ।
आवृता सूर्यलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १० ॥
लक्षयोजनविस्तीर्णा दैर्घ्ये पञ्चगुणा ततः ।
आवृता तपोलोके तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ ११ ॥
सहस्त्रयोजनायामा दैर्घ्ये दशगुणा ततः ।
आवृता जनलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १२ ॥
दशलक्षयोजना या दैर्घ्ये पञ्चगुणा ततः ।
आवृता महलोके या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १३ ॥
सहस्त्रयोजनायामा दैर्घ्ये शतगुणा ततः ।
आवृता या च कैलासे  तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १४ ॥
शतयोजनविस्तीर्णा दैर्घ्ये दशगुणा ततः ।
मन्दाकिनी येन्द्रलोके तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १५ ॥
पाताले भोगवती चैव विस्तीर्णा दशयोजना ।
ततो दशगुणा दैर्घ्ये तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १६ ॥
क्रोशैकमात्राविस्तीर्णा ततः क्षीणा च कुत्रचित् ।
क्षितौ चालकनन्दा या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १७ ॥ 
सत्ये वा क्षीरवर्णा च त्रेतायामिन्दुसंनिभा ।
द्वापरे चन्दनाभा या तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १८ ॥
जलप्रभा कलौ या च नान्यत्र पृथिवीतले ।
स्वर्गे च नित्यं क्षीराभा तां गंङ्गां प्रणमाम्यहम् ॥ १९ ॥
यत्तोयकणिकास्पर्शे पापिनां ज्ञानसंभवा ।
ब्रह्महत्यादिकं पापं कोटिजन्मार्जितं दहेत् ॥ २० ॥
इत्येवं कथिता ब्रह्मन् गङ्गा पद्यैकविंशतिः ।
स्तोत्ररुपं च परमं पापघ्नं पुण्यजीवनम् ॥ २१ ॥
नित्यं यो हि पठेद्भक्त्त्या सम्पूज्य सुरेश्र्वरीम् ।
सोऽश्र्वमेधफलं नित्यं लभते नात्र संशयः ॥ २२ ॥
अपुत्रो लभते पुत्रं भार्याहीनो लभेत्स्त्रियम् ।
रोगात् प्रमुच्यते रोगी बन्धान्मुक्तो भवेद् ध्रुवम् ॥ २३ ॥
अस्पष्टकीर्तिः सुयशा मूर्खो भवति पण्डितः ।
यः पठेत् प्रातरुत्थाय गङ्गास्तोत्रमिदं शुभम् ॥ २४ ॥
शुभं भवेच्च दुःस्वप्ने गङ्गास्नानफलं लभेत् ।
स्तोत्रेणानेन गङ्गां च स्तुत्वा चैव भगीरथः ॥ २५ ॥
जगाम तां गृहीत्वा च यत्र नष्टाश्र्च सागराः ।
वैकुण्ठं ते ययुस्तूर्णं गङ्गायाः स्पर्शवायुना  ॥ २६ ॥
॥ इति श्रीदेवी भागवते श्रीभगीरथकृत गंगास्तुतिस्तोत्रम् संपूर्णं ॥
राजा भगीरथकृत गंगास्तुति मराठी अर्थ 
 देवर्षी नारद म्हणाले 
 हे देवेश ! हे लक्ष्मीकांत ! हे जगत्पते ! आता मी भगवान श्रीविष्णुंच्या चिरसंगिन विष्णुपदी गंगेच्या पापनाशक आणि पुण्यदायक स्तोत्र श्रवण करण्याची इच्छा करतो. 
भगवान नारायण म्हणाले 
 १) हे नारदा ! ऐक आता मी ते पापनाशक व पुण्यप्रद स्तोत्र सांगतो. जे भगवान शंकराच्या संगीताने मुग्ध, श्रीकृष्णाच्या अंगाने उत्पन्न व श्रीराधेच्या अंग द्रवाने संपन्न आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
२) सृष्टीच्या आरंभापासून गोलोकांतील रासमंडलांत जी आविर्भूत झाली आणि जी नेहमी भगवान शंकरांच्या सान्निध्यांत राहते. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
३) जी कार्तिक पौर्णिमेला गोप व गोपीनी भरलेल्या राधा महोत्सवाच्या शुभ प्रसंगी नेहमी विद्यमान असते. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
४) जी गोलोकांत करोडो योजन रुंद आणि त्यापेक्षा कित्येक लाखपटीने लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो.
५) जी वैकुंठांत तीनलाख योजन रुंद आणि त्यापेक्षा चारपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
६) जी ब्रह्मलोकांत तीन लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा पांचपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
७) जी शिवलोकांत तीन लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा चारपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
८) जी ध्रुवलोकांत एक लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा सातपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
९) जी चन्द्रलोकांत एक लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा पांचपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१०) जी सूर्यलोकांत साठहजार योजन रुंद आणि त्यापेक्षा दहापट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
११) जी तपोलोकांत एक लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा पांचपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१२) जी जनलोकांत एक हजार योजन रुंद आणि त्यापेक्षा दहापट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१३) जी महलोकांत दहा लाख योजन रुंद आणि त्यापेक्षा पांचपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१४) जी कैलासावर एक हजार योजन रुंद आणि त्यापेक्षा शंभरपट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१५) जी मंदाकिनी नांवाने इंद्रलोकांत शंभर योजन रुंद आणि त्यापेक्षा दहापट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१६) जी भोगवती नांवाने पाताळलोकांत दहा योजन रुंद आणि त्यापेक्षा दहापट लांब अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१७) जी अलकनंदा नांवाने पृथ्वीलोकांत दहा योजन रुंद आणि कांही ठिकाणी त्यापेक्षां कमी रुंद अशी पसरलेली आहे. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१८) जी सत्ययुगांत दुधाच्या वर्णासारखी, त्रेतायुगांत चंद्राच्या प्रभेसारखी आणि द्वापारांत चन्दनाच्या आभेसारखी असते. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
१९) जी कलियुगांत केवळ पृथ्वीवर पाण्यासारखीच आणि स्वर्गलोकांत नेहमी दुधाच्या आभेसारखी असते. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
२०) जीच्या स्पर्शानेच पापिलोकांचे करोडो जन्मांचे ब्रह्महत्येसहित सर्व पाप भस्म होते. त्या गंगेला मी नमस्कार करतो. 
२१) हे ब्रह्मन् ! अशा प्रकारे हे गंगेचे स्तुतीस्तोत्र सांगितले गेलेले आहे. हे श्रेष्ठ स्तोत्र पापांचा नाश करणारे आणि पुण्याची वृद्धि करणारे आहे. 
२२) जो भक्त गंगेची भक्तिपूर्वक पूजा करुन प्रत्येक दिवशी ह्या स्तोत्राचा पाठ करतो त्याला निःसंशय नेहमी अश्र्वमेध फलाची प्राप्ती होते. फलप्राप्ती 
२३ ते २४ १/२) या स्तोत्राच्या प्रभावाने पुत्रहीनास पुत्र प्राप्त होतो. स्त्रीहीनास स्त्रीची प्राप्ती होते. रोगी मनुष्य निरोगी होतो. बन्धनांत पडलेला बंधनांतून मुक्त होतो. कीर्तिरहित मनुष्य उत्कृष्ट यशाने यशस्वी होतो. मूर्ख मनुष्य बुद्धिमान विद्वान होतो. हे निःसंशय सत्य आहे. जो भक्त सकाळी लवकर उठून या स्तोत्राचा पाठ करतो त्याची दुःस्वप्नेसुद्धा सुस्वप्ने होऊन त्याचे मंगल होते व त्याला गंगास्नानाचे पुण्य लाभते. 
२५ ते २६) हे नारदा ! या स्तोत्राने गंगेची स्तुति करुन राजा भगिरथ गंगेला घेऊन, सगरराज्याच्या जळून भस्म झालेल्या पुत्रांच्या ठिकाणी घेऊन जाताच गंगेच्या स्पर्शाने पावन झालेल्या वायुच्या संपर्कांत येताच त्या सगरपुत्रांना मुक्ती मिळून ते वैकुंठलोकास गेले. ही गंगा पृथ्वीवर भगीरथाने आणली म्हणुन ती भागीरथी नांवाने प्रसिद्ध झाली. 
अशा रीतीने श्रीमद् देवीभागवतांत नवम स्कंधांतील श्र्लोक १६ १/२ ते ४३ १/२ असलेले हे भगीरथाने केलेले गंगास्तुती स्तोत्र संपूर्ण झाले.
ShriBhagirathaKrut Ganga Stuti 
श्रीभगीरथकृत गंगास्तुति


Custom Search

No comments:

Post a Comment