Sunday, September 27, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 3 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तिसरा (३) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 3 
Shree Navanath Bhaktisar adhyay 3 is in Marathi. Here I am trying to give a very short description of this adhyay. Machchhindra was on a Tirthyatra meaning he was visiting holy places. He visited Jaganathpuri on the east sea shore and proceeded to setubandha to visit Rameshwaram temple. He bathed in the Swetakunda. He saw Maruti who was making cave for leaving while rain was pouring in tremendously. He was surprised and laughed at the madness and asked why he had not done this while there was no rain season. Maruti was very much angry and asked him who was he and what his name was. Machchhindranath told name and also told that people use to call him Jati. Maruti asked him to prove his powers and show him that he was fit for calling him Jati. So they started a battle. Maruti started throwing big mountains and Machchhindra also used his Mantras to prevent and finally him made Maruti powerless and made him to stand with a big mountain over his head. Maruti was in a very bad condition he was not able to move neither able to throw the mountain which was on his and lifted for throwing it on Machchhindra. This was because Machchhindra used VataakarshanMantra. Since Maruti was son of Vayudevata who filled with sorrow and told Maruti to stop the battle as Machchhindra is Vasu putra and incarnation of Kavi Narayan. Then Mchchhindra also pleased with Maruti and Vayudevata as they assured him that they will be helpful to him in his endeavor. Then there was a very big conversation between him and Maruti. Finally Maruti made Machchhindra agree to go the Female kingdom as it was a job assigned to him for his this birth. All this is described in this Adhyay 3 in deep. In the next adhyay there is a description of the war in between Machchhindra and AshtaBhaivrav, Chamudas who were the guards on the gate of Female Kingdom.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तिसरा (३) भाग ३/१
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी पंढरीशा । रुक्मिणीवरा आदिपुरुषा ।
पुंडलिकवरदा पुंडरीकाक्षा । सर्वसाक्षी जाणता तूं ॥ १ ॥ 
हे जगत्पालका जगन्नायका । ब्रम्हांडावरी यादवकुळटिळका ।
आतां भक्तिसारीं दीपिका । ग्रंथार्थदृष्टी मिरवावी ॥ २ ॥ 
मागिले अध्यायीं सिद्धसाधन । श्रीमच्छिंद्र नाथा आलें वडोन ।
उपरांतिक भस्मदान । सरस्वतीतें तेणे केलें ॥ ३ ॥
केलें परी दैवहत । तिनें टाकिंले गोमहींत ।
परी फार ठकली अदैववंत । अतिहीन प्रारब्धीं ॥ ४  ॥
घर पुसत लाभ आला । तो निर्दैवपणें पदीं लोटिला ।
कीं पुढें मांदुस येतां वहिला । अंध होय आवडीनें ॥ ५ ॥
कीं अवचट लाधला चिंतामणी । तो आवडी गोवी गोफणी ।
कीं खडा म्हणोनि देतो झोकोनी । कृषिशेतीं टाकीतसे  ॥ ६ ॥
कीं अवचट लाधतां पीयूषवट । विष म्हणोनि करी वीट ।
तेवीं विप्रजाया अदैवें पाठ । नाडलीसे सर्वस्वें ॥ ९ ॥
किंवा बाण ढाळितां खेळींमेळीं । निधान लावला हस्तकमळीं ।
तो गार म्हणोनि सांडिला जळीं । महाडोहीं निर्दैवे ॥ १० ॥
कीं सहज आतुडे हातीं परिस । खापर म्हणोनि टाकितसे त्यास ।
कीं घरा आला राजहंस । वायस म्हणोनि दवडिला ॥ ११ ॥
कीं हार देऊं देव उदित । परी त्यासी भासलें परम भूत ।
तन्न्यायें विप्रकांतेस । घडोनि आलें महाराजा ॥ १२ ॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ । पूर्वसमुद्रीं जगन्नाथ । 
करोनि सेतुबंधा येत । रामेश्र्वरदर्शनीं ॥ १३ ॥
तो श्वेतीं येऊनि करी स्नान । अवचट देखिला वायुनंदन ।
क्लेशशरीरा जरा व्यापून । सान शरीरीं बैसला ॥ १४ ॥
तया संधींत मेघ वर्षाव । करिता झाला सहजस्वभाव ।
दरडी उरकोनि गुहा यास्तव । करिता झाला मारुती ॥ १५ ॥
वरुनि वर्षाव पर्जन्य करीत । येरु इकडे दरडी उकरीत ।
तें पाहोनि मच्छिंद्रनाथ । विस्मयातें पावले ॥ १६ ॥
पावला परी हटकोनि बोलत । म्हणे मर्कटा तूं मूर्ख बहुत । 
आतां करिसी सदन निश्र्चित । स्वशरीर रक्षावया ॥ १७ ॥
पर्जन्य वर्षे विशाळधार । यांत कधीं करसील घर ।
जैंसे तस्करीं लुटलियावर । दीपा तेल भरीतसे । १८ ॥
कीं बाईल गेलिया झोपा केला । तैसा न्याय घडोनि आला ।
कीं स्वसदनातें पावक लागला । कूप खणी विझवावया ॥ १९ ॥
कीं ग्रीवे पडतां काळफांस । मग वाचिता होय अमरस्तोत्रास ।
कीं परम पीडितां तृषार्तास । कूप खणूं म्हणतसे ॥ २० ॥
कीं हृदयीं पेटला जठरानळ । कामधेनूतें इच्छिती फळ ।
किंवा मेघ ओसरल्या बीजें रसाळ । महीलागीं पेरीतसे ॥ २१ ॥
तन्न्यायें पर्जन्यकाळ । सदन करिसी उतावीळ ।
तस्मात् मूर्ख मर्कट वाचाळ । मिरवूं आलासी पुढारां ॥ २२ ॥
ऐसें ऐकोनि वायुनंदन । म्हणे चतुर आहेस कोण ।
येरु म्हणे जती पूर्ण । मच्छिंद्र ऐसें मज म्हणती ॥ २३ ॥
येरु म्हणे तूतें जती । कोणे अर्थी लोक म्हणती । 
नाथ म्हणे प्रतापशक्ती । आहे म्हणोनि वदतात ॥ २४ ॥
यावरी बोले वायुसुत । आम्ही आयिकतों जती हनुमंत ।
तुम्ही नूतन जती महींत । एकाएकीं उदेलां ॥ २५ ॥
तरीं आतां असो कैसें । मी मारुतीच्या शेजारास ।
भावें राहोनि एक वेळेस । वरिलें आहे महाराजा ॥ २६ ॥
तेही कला सहस्त्रांशीं । मातें लाधली महापरेशी । 
ते तुज दावितों या समयासी । तयापासाव जे प्राप्त झाली ॥ २७ ॥           
तरी त्या कळेचें निवारण । करोनि दावीं मजकारण ।
नातरी जती ऐसें नाम । सोडोनियां जाई कां ॥ २८ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । कोणती कळा ती दावीं मातें ।
तिचें निवारण श्रीगुरुनाथ । करी जाण निश्र्चयें ॥ २९ ॥
जैसा श्रीराम असतां शयनीं । पाहे मारुती वृक्षावरोनी ।
नाना पर्वत टाकी उचलोनी । रामशरीरा योजोनियां ॥ ३० ॥
परी रामें न सोडितां शयन । सज्ज करुनि चापबाण । 
सकळ पर्वतांकारण । निवारण करी तो ॥ ३१ ॥
तन्न्यायें श्रीगुरुराज । सकळ अर्थी पुरवील चोज ।
सकळ ब्रह्मांडांचे ओझे । नखाग्रीं धरील तो ॥ ३२ ॥
तेथें तुझी मर्कट कथा । किती असे दावी आतां ।
फार करिसील पाषंडता । झोकसील कवळीनें ॥ ३३ ॥
तरी आतां कां करिसी उशीर । मर्कटा दावीं चमत्कार ।
ऐसें ऐकतां वायुकुमर । पूर्ण चित्तीं क्षोभला ॥ ३४ ॥
उड्डाण करोनि जाय एकांता । तेथें धरी भीमरुपता ।
न कळतां त्यातें सात पर्वतां । उचलोनिया फेकिले ॥ ३५ ॥
नभमंडपी ढगासमान । पर्वत येतसे पंथी गगन ।
तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन । स्थिर स्थिर म्हणतसे ॥ ३६ ॥
वातप्रेरक मंत्रशक्ति । वाटेंत कोंदली पर्वतीं । 
तो येरीकडे आणिक मारुती । दुसरा पर्वत फेकितसे ॥ ३७ ॥
तो दुसरा म्हणतां तिसरा येत । चवथा पांचवा शतानुशत ।
मग एकचि मंत्रे करोनि वात । ठायींचे ठायीं रोधिला ॥ ३८ ॥   
जैसे कंदुक बाळ खेळती । मध्यें अटकतां परते पंथी ।
तन्न्याय झाला पर्वतीं । ठायींच्या ठायीं जाती ते ॥ ३९ ॥
येरीकडे वायुनंदन । पर्वत परतता दृष्टी पाहोन ।
पूर्ण क्षोभला जेवीं कृशान । महाप्रळयकाळींचा ॥ ४० ॥   
मग महापर्वत एक विस्तीर्ण । उचलोनि बाहुमस्तकीं अर्पून ।
फेकावां तो मच्छिंद्रनाथानें । निजदृष्टीने देखिला ॥ ४१ ॥
मग अब्धिउदक घेऊनि । वायुआकर्षणमंत्र म्हणोनी ।
सबळ झुगारोनि पाणी । वायुनंदन सिंचिला ॥ ४२ ॥
तेणें भरोनि शरीरीं वात । चलनवलन सर्व सांडीत ।
ऊर्ध्व झाले दोन्ही हात । मौळीं पर्वत राहिला ॥ ४३ ॥
मग ते जैसी स्तंभावरी । रचिली म्हणती द्वारकापुरी ।
तेवी मारुती शिरावरी । पर्वतातें मिरवीतसे ॥ ४४ ॥
खाली टाकावया न चले बळ । जेवीं विरला हस्त विकळ ।
पदीं चालावयाही बळ । कांही एक न चाले ॥ ४५ ॥
तें पाहोनियां दीन बाळ । हृदयीं कवळी तात अनिळ ।
मग प्रत्यक्ष होऊनि रसाळ । सोडीं सोडीं बाळातें ॥ ४६ ॥
तैं अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ । पुन्हा प्रेरिला मंत्रवात ।
मग मौळींचा उतरोनि पर्वत । ठायींचे ठायीं ठेवीतसे ॥ ४७ ॥
मग चलनवलन वातशक्ती । संगीत झाली देहस्थिती ।
मग समीप येऊनि नाथाप्रती । धन्य धन्य म्हणतसे ॥ ४८ ॥
यावरी बोलता झाला अनिळ । बा मारुती तुझे न चले बळ ।
तुज मज अतिनिर्बळ । बांधोनि केलें सिद्धानें ॥ ४९ ॥
जेणें तुझिया बापा बांधिलें । त्यासी तुझें भय काय आलें ।
त्याचें आचरण तैसें झालें । भक्तिशक्ति अघटित ॥ ५० ॥
म्हणसी सिद्धाची मंत्रस्थिती । अघटित असे वदतां उक्ती ।
तरी माझी भक्ति गुरुची शक्ती । ईश्र्वरी वाचा म्हणतात ॥ ५१ ॥
येतुल्या पांच शक्ती क्रियावंतासि । सकळ देवता होती दासी ।
ऐसें ऐकोनि अंजनीसुतासी । परम आनंद मिरवला ॥ ५२ ॥
याउपरांतिक मच्छिंद्रनाथ । मारुत मारुती यांच्या चरणीं लागत ।
म्हणे येथोनि तुमचें सख्य उचित । मजवरती असो कां ॥ ५३ ॥
मग प्रसन्न चित्तीं समीर मारुती । म्हणती बारे सत्कार्यार्थीं । 
आम्ही वेंचोनि आपुली शक्ती । सुखसंपत्ती तुज देऊं ॥ ५४ ॥
जैसे दानवांच्या काजा । कविमहाराज उशना वर्ते वोजा ।
तेवीं त्वत्कार्यार्थ भोजा । शक्ती आपुली वेचूं आम्ही ॥ ५५ ॥
कीं सागरीं टिटवी अंड्यांकरिता । आपुल्या शक्ती झाल्या वेंचिता ।
तेवीं महाराजा त्वत्कार्यार्था । शक्ती आपुली वेंचूं की ॥ ५६ ॥
कीं विधीच्या संकटांत । विष्णु मत्स्यावतार घेत ।
तन्न्यायें त्वत्कार्यार्थ । शक्ती आपुली वेचूं कीं ॥ ५७ ॥
की अवश्य ऋषीचे शापपृष्ठीं । स्वयें विष्णु झाला कष्टी ।
तन्न्यायें तुजसाठी । शक्ती आपुली वेचूं कीं ॥ ५८ ॥
कीं रामाच्या उपयोगासी । कपि गेले सीताशुद्धीसी ।
तन्न्यायें तुजसी । शक्ती आपुली वेचूं कीं ॥ ५९ ॥ 
ऐसें वरदवाग्रत्न । ओपूनि प्रीतीं वायुनंदन ।
म्हणतो बा रे तीर्थागमन । जती नाम मिरवी कां ॥ ६० ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । जती नामें होईन विख्यात ।
परी एक कल्पना उदेली चित्तांत । त्या भ्रांतीते निवटीं कां ॥ ६१ ॥
येरु म्हणे कल्पना कोणती । उदेली कामना तुझे चित्तीं । 
नाथ म्हणे तूं सर्वज्ञमूर्ती । आयुष्यभविष्य जाणसी ॥ ६२ ॥
ऐसी सर्वज्ञा असोनि नीती । विवाद केला कां मजप्रती ।
आणि भेटी झाली नागाश्वत्थीं । तुझी माझी पूर्वींच ॥ ६३ ॥
तें शाबरी विद्येचें कवित्व । करवोनि वर दिधला त्यांत ।
ऐसें असोनि सखया माहीत । रळी व्यर्थ कां केली ॥ ६४ ॥
यावरी बोले वायुनंदन । बा तूं करितां श्र्वेतीं स्नान ।
तेव्हां तूतें ओळखोन । तुजपासीं मी आलो ॥ ६५ ॥
तूं कवि नारायणाचा अवतार । जननीं भेदिलें मच्छोदर ।
हे माहीत परी कल्पनेवर । चित्त कांहीं उदेलें ॥ ६६ ॥
कीं नागपत्रीं अश्र्वत्थासीं । वर ओपिला देवें तुजपासीं ।
परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी । पाहूं ऐसें वाटलें ॥ ६७ ॥
यावरी पुढें कार्य आणिक । पडलें तूतें अलोलिक ।
तेथें टिकाव धरणें कौतुक । म्हणोनि शोध शोधिला ॥ ६८ ॥
तरी बा आतां येथोनि गमन । स्त्रीराज्यासी करावें मज लक्षोन ।
तेथें नातळे पुरुषप्रवेश पूर्ण । परत्रभुवनीं तो पावे ॥ ६९ ॥
बा रे झालें तुझे दर्शन । तुजसीं आहे माझें कारण । 
मज मस्तकीचें ओझे उतरणें । तुझे हातें होईल ॥ ७० ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । कैसा झालासी ऋणी व्यक्त ।
सर्व कामातें वायुसुत । सांगोपांग निरोपी ॥ ७१ ॥
येरु म्हणे योगद्रुमा । रामाचें घडलें दास्य आम्हां ।
सिताशुद्धि पाहोनि उगमा । लंकापति मारविला ॥ ७२ ॥
तैं सीता घेऊनि अयोध्ये जातां । परी सीतेच्या कामना वेधली चित्ता । 
आहे दासत्व मारुती करिता । महीलागी हा एक ॥ ७३ ॥
तरी हा असो बा संपूर्ण संपन्न । कांता धन सुत एक सदन ।
जरी वितुळे सुख संसारीं साधन । कांतेमागें होतसे ॥ ७४ ॥
तरी या मारुतीसी कांता करोन । भोगवूं सर्वसुखसंपन्न । 
परी ब्रह्मचारी मम भाषण । मान्य करील कीं नाहीं ॥ ७५ ॥
तरी यातें वचनीं गोंवून । गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन ।
ऐसें सीतेनें कल्पोन । पाचारिलें आम्हांते ॥ ७६ ॥
जवळीं बैसवोनि स्नेहानें । स्वकरें मग मुख कुर्वाळोन ।
म्हणे बा मारुति तूं धन्य । तिहीं लोकीं अससी पै ॥ ७७ ॥
तरी बा माझें एक मागणें । देसील तरी उत्तम मानीन ।
यावरी तूंही नकार मजलागोन । देणार नाहीं सहसाही ॥ ७८ ॥
उदार वेंचिती आपुला प्राण । परी नकार न देती वाचेकरोन ।
शिबीरायानें कपोताकारणें । मांस दिधलें रती रती ॥ ७९ ॥
पाहें श्रियाळ उदारकीर्ती । बाळ दिधलें याचकाहातीं ।
तन्न्यायें त्याच पंक्तीं । तूंही अससी कपींद्रा ॥ ८० ॥
ऐसे ऐकतां जननीवचन । परम तोषला वायुनंदन ।
म्हणे माय वो कामना कोण । उदित करीं देऊन मी ॥ ८१ ॥
येरी म्हणे करतलभाष । देसी आपुल्या सद्भावास ।
तरी मम कामनेची हौस । दृश्य करीन तुज बा रे ॥ ८२ ॥
मग करीं कर वोपोनि शेवटीं । म्हणे मागाल ते कामना होटीं ।
ते मी देऊनि चित्तसंतुष्टी । मिरवीन जननीये ॥ ८३ ॥
येरी म्हणे मम कामना । तुवां आचरावें गृहस्थाश्रमा ।
कांता करोनि संसारउगमा । सर्व सुख भोगावें ॥ ८४ ॥
ऐसी ऐकतां वाग्वटी । सप्रेम खोंचला आपुल्या पोटीं ।
म्लानवदन चित्त हिंपुटी । परम संकटीं पडियेला ॥ ८५ ॥
मग न देतां मातेसी कांहीं उत्तर । येऊनि बैसला रामासमोर ।
परी चित्तवृत्ति कोमीत मुखचंद्र । श्रीरघूत्तमें पाहिला ॥ ८६ ॥
मग जवळी पाचारोनि हृदयीं । धरीत आली दयाळ आई ।
म्हणे बा रे तुझा व्यर्थ केवीं । मुखचंद्र वाळला ॥ ८७ ॥
मग प्रांजळीं सर्व कथन । श्रीरामातें निवेदून । 
नेत्रीं अश्रू म्लान वदन । मी करोनियां बसलो ॥ ८८ ॥
परी अंतःसाक्ष रघुकुळटिळक । म्हणे वायां न मानीं दुःख ।
स्त्रीराज्याच्या स्त्रिया सकळिक । कांता असती तुझ्याचि ॥ ८९ ॥
तरी बा याचें ऐक कथन । कृत त्रेत द्वापार कलि पूर्ण । 
या चोहों युगांतें म्हणती निपुण । चौकडी एक ही असे ॥ ९० ॥
तरी बा ऐशा चौकड्या किती । तीनशे शहाण्णव बोलती मिती । 
तूतें मातें चोहों चौकड्यांप्रती । जन्मा येणें आहेचि ॥ ९१ ॥
मी नव्याण्णवावा राम क्षितीं । तूंही नव्याण्णवावा मारुती ।
आणि लंकाधीश याच नीतीं । नव्याण्णवावा असे तो ॥ ९२ ॥
यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण । करील ऐसें बोलती वचन ।
परी चौदा अंकींचा आकडा मागोन । आंख नेला विधीनें तो ॥ ९३ ॥
मग उरला वरील एक चतुर्थ । तितुक्या चौकड्या राज्य करीत ।
परी सांगावया कारण त्यांत । आपण मारोनि येतसे ॥ ९४ ॥ 
मग आल्यावरी स्त्रीराज्यांत । जाणे लागे मारुती तूतें ।
तरी बा पाळी तुझी निश्चित । आली आहे ती भोगीं कां ॥ ९५ ॥
ऐसें म्हणतां श्रीराम वहिला । मग म्यां त्यांतें प्रश्र्न केला ।
की दृढ कासोटी आहे मजला । भेटी केवीं कामरती ॥ ९६ ॥
मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती । आजपासोनि असे मारुती ।
तयाच्या भुभुःकारें श्वाससंगतीं । गरोदर होती त्या स्त्रिया ॥ ९७ ॥
तरि तूं सकळ संशय सांडोन । शैल्यदेशीं करी गमन ।
तुझें ब्रह्मचारीपण । ढळत नाहीं महाराजा ॥ ९८ ॥
ऐशी वार्ता होतां निश्र्चितीं । मग म्यां स्वीकारिलें शैल्यदेशाप्रति ।
यावरी तेथेंही स्त्रिया नृपती । मेनका नामें विराजली ॥ ९९ ॥
तीतें पृथ्वीची देशवार्ता । ऐकिव झाली कीं पुरुषकांता ।

देशोदेशीं उभयतां । रमत आले स्वइच्छें ॥ १०० ॥     
Shree Navanath Bhaktisar adhyay 3 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तिसरा (३)



Custom Search

No comments:

Post a Comment