Sunday, September 20, 2015

Shri Navanath Bhaktisar Adhyay 2 Part 2/1श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दुसरा (२) भाग २/१


Shri Navanath Bhaktisar Adhyay 2 
Shri Navanath Bhaktisar Adhyay 2 is in Marathi. I am trying to describe in short for the benefit of the devotees who don't know Marathi. God Shiva and God Dattatreya were walking in the forest of Bhagirathi, saw Machchhindra performing rigorous tapas. Machchhindra's body was completed dried. His legs and hands were become like a dried branch of a tree. Skin was fixed to the bones. Eyes were dried and became like camphor. There was a sound of chanting the mantra was the only sign of life remaining in the Machchhindra's body. Both gods were surprised knowing that in Kaliyuga Machchhindra was doing these hard rigorous tapas. God Datta approached Machchhindra and asked him why he was performing hard tapas. Then he blessed Machchhindra with mantra-diksha. Machchhindra received the super most knowledge. Everywhere he experienced oneness. God datta took him to God Shiva who realized that God Kavi Narayan had taken a birth as Machchhindra. Then God Shiva asked Datta to impart all the necessary knowledge to Machchhindra so that he can establish Nath-Sampradaya in this Kaliyuga. After getting all the knowledge from Guru Dattatreya, Machchhindra proceeded for TirthYatra. He also got blessings from Goddess Amba and all other gods so that they would be helpful to him for writing Shabari Vidya in Kavitva (poetry form). On his way to tirthyatra, he came to village Chandragiri in Bengal. He went to a goud Brahmin Sarvopdayal's house for bhiksha. Saraswati wife of the Brahmin served him bhiksha. She told him that they were unhappy since they don't have a child. Machchhindra took out vibhuti from his bag and chanted a God Surya mantra and asked god to enter into the vibhuti. Then he gave the vibhuti to Saraswati and asked to eat it in the night. He further told her that she would have a very brilliant childlike God Surya. Machchhindra also told her that he would came back after 12 years to give Mantra-Diksha to the child. Then he went away. Saraswati shared the fact with other ladies. They advised her not to believe in such things. Hence Saraswati had thrown the mantra vibhuti in the shade where cows used to live. This is a very short story of this Adhyay 2.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दुसरा (२) भाग२/१
श्रीगणेशाय नमः । 
जयजयाजी मूळपीठवासिनी । पुंडलिकाच्या गोंधळालागोनी ।
भक्तवरदे भवानी । उभी अससी माये तूं ॥ १ ॥
संत गोंधळीं विचश्रण । कंठीं मिरवितां तुळसीभूषण ।
तेचि माळा सुलक्षण । जगामाजी मिरविसी ॥ २ ॥
घालिती तुझा प्रेमगोंधळ । कामक्रोधांचे देती बळ ।
गीतसंगीत सबळ । गुण गाती माये तुझे ॥ ३ ॥
असो ऐशा गोंधळप्रकरणीं । संतुष्ट होसी माय भवानी ।
तरी या ग्रंथगोंधळीं येऊनी । साह्य करी जननीये ॥ ४ ॥
मागिल्या अध्यायीं रसाळ कथन । गणादि सकळांचे केलें नमन ।
उपरी मच्छिंद्राचें जनन । यथाविधी कथियेलें ॥ ५ ॥
आतां पुढे श्रवणार्थी । बैसले आहेत महाश्रोती ।
तयांची कामना भगवती । पूर्ण करावया येई कां ॥ ६ ॥
तरी श्रोतीं सिंहावलोकनीं कथन । श्रीदत्तदेव आणि उमारमण ।
भागीरथीविपिनाकारण । पहात पहात चालिले ॥ ७ ॥
जैसे फलानिमित्त पक्षी । फिरत राहती वृक्षोवृक्षी ।
त्याचि न्याये उभयपक्षी । गमन करिती तीरातें ॥ ८ ॥
सहज चालती विपिनवाटी । तो मच्छिंद्र देखिला त्यांनीं दृष्टीं ।
बाळतनू पाठपोटीं । अस्थि त्वचा उरल्या पैं ॥ ९ ॥
जटा पिंगट नखें जळमट । कंटकारी पादांगुष्ठ ।
कार्पासमय झाली दृष्ट । त्वचा लिपटली अस्थींसी ॥ १० ॥
सर्वांगें शिरा टळटळाट । दिसती अवनीं नामपाठ ।
ध्वनिमात्र शब्द उठे । चलनवलन नयनांचें ॥ ११ ॥
ऐसा पाहूनि तपोजेठी । विस्मयो करिती आपुले पोटीं ।
म्हणती ऐसा कलीपाठीं । तपी नेणों कोणीच ॥ १२ ॥  
अहो विश्र्वामित्रप्रकरणी । दिसतो तपी हा मुगुटमणी ।
तपार्थ कामना अंतःकरणीं । करणी कोण यातें उदेली ॥ १३ ॥
मग दत्तासि म्हणे आदिनाथ । मी स्थिरता राहतों महीं येथ ।
तुम्हीं जाऊनि कामनेतें । विचारावें तयातें ॥ १४ ॥
कवणा अर्थी कैसा भाव । उचंबळला कामार्णव ।
तरी लिप्सेचा समूळ ठाव । काय तोही पहावा ॥ १५ ॥
येऊनि त्यापरी अत्रिनंदन । शिवानंदसूक्तिक सुढाळ रत्न ।
श्रवणपुटीं स्वीकारुन । तयापासीं पातला ॥ १६ ॥
उभा राहोनि समोर दृष्टी । म्हणे महाराजा तपोजेठी ।
कवण कामना उदेली पोटीं । तें वरदवरातें मिरवावें ॥ १७ ॥
ऐसें वरदाचे वागवट । मच्छिंद्र श्रवण करितां झगट ।
नम्रभाव धरुनि प्रकट । तयालागीं बोलत ॥ १८ ॥
कर्णी शब्द पडतां सुखस्थिती । दृष्टी काढोनियां वरती ।
पाहता झाला दत्ताप्रती । महाराज योगी तो ॥ १९ ॥
भ्रूसंकेतें करोनि नमन । दाविता झाला निजनम्रपण ।
जो कीं ईश्र्वरी आराधन । प्राप्तीलागी ऊदेला ॥ २० ॥
बोले महाराजा कृपासरिता । तुम्ही कोण तें सांगावें आतां ।
द्वादश वर्षे काननीं लोटतां । मानव नातळे दृष्टीसी ॥ २१ ॥
तरी त्वच्चित्त सदैव भवानी । प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धें धरणीं ।
तरी प्रसादनग अभ्युत्थानीं । स्थापूनि जाईं महाराजा ॥ २२ ॥
ऐसें तयाचें वागुत्तर । ऐकोनि तोषला अनसूयाकुमर ।
म्हणे वा रे नामोच्चार । दत्त ऐसें मज म्हणती ॥ २३ ॥
जो व्याघ्रपदीं ऋषिजन्म । अत्रि ऐसें तया नाम ।
तयाचा सुत मी दासोत्तम । महीलागीं आधारलों ॥ २४ ॥
तरी असो ऐसी गोष्टी । कवण कामना तुझ्या पोटीं ।
उदेली जे तपोजेठी । शब्दसंपुटीं मिरवीं कां ॥ २५ ॥
येरु म्हणे वरदोस्तु । कामना वरी एक भगवंतु ।
ऐसें वदता झाला अतीतु । पदावरी लोटला ॥ २६ ॥
जैसी सासुर्‍या बाळा असतां । अवचट दृष्टी पडे माता ।
हंबरडोनि धांवोनि येतां । ग्रीवे मिठी घालीतसे ॥ २७ ॥
किंवा अवचट वत्सा भेटतां गाय । मग प्रेम लोटी चित्त सदैव ।
तेणेंपरी मच्छिंद्र मोहें । पदावरी लोटला तो ॥ २८ ॥
द्वादश वर्षे तपाचे श्रम । ते आजि फळले मानूनि उत्तम । 
सांडोनि सकळ आपुला नेम । पदावरी लोटला तो ॥ २९ ॥
परी तपश्रमाचे बहुत क्लेश । हृदयीं गहिंवरले दुःखलेश ।
नेत्रींचे झरे विशेष । पदावरी लोटला तो ॥ ३० ॥
तेणें झालें पादक्षालन । पुढती बोले करी रुदन ।
हे महाराजा तूं भगवान । महीमाजी मिरविशी ॥ ३१ ॥
रुद्र विष्णु विरिंची सदय । त्रिवर्गरुपी देह ऐक्यमय ।
ऐसें असोनि सर्वमय । साक्षी महीं अससी तूं ॥ ३२ ॥
तरी येऊनि सर्वज्ञमूर्ती । असोनि माझा विसर चित्तीं ।
पडलासे किमर्थ अर्थी । अपराध गळीं सेवोनियां ॥ ३३ ॥
ऐसें म्हणोनि वारंवार । ग्लानींत करी नमस्कार ।
क्लेशनगींचे चक्षुद्वार । सरितालोट लोटवी ॥ ३४ ॥
तरी तो अत्यंत शांत दाता । म्हणे बा हे न करी चिंता ।
प्रारब्धमंदराचळाची सरिता । ओघ ओघील आतांचि ॥ ३५ ॥
मगवरदहस्ते स्पर्शोनि मौळी । कर्णी ओपीत मंत्रावळी ।
तेणें अज्ञानदशाकाजळी । फिटोनि गेली तत्काळ ॥ ३६ ॥
जैसे माहात्म्य भारती । उदयदृष्टी करितां गभस्ती ।
मग अंधकाराची व्याप्ती । फिटोनि जाय तत्काळ ॥ ३७ ॥
तेवी दत्त वरदघन । वोळतां गेले सकळ अज्ञान ।
मग चराचर सकळ जीवन । जैसे हेलावले दृष्टीसी ॥ ३८ ॥
नाठवे कांहीं दुजेपण । झालें ऐक्य ब्रह्मसनातन ।
जैसे उदधीं सरिता जीवन । जीवना जीवनसम दिसे ॥ ३९ ॥
ऐसी झालिया जीवनसम दृष्टी । आत्रेय धरिता झाला पोटीं ।
म्हणे बा रे योगी धूर्जटी । इंदिरावर कोठे तो सांग ॥ ४० ॥
येरु म्हणे जी ताता । ईश्र्वरावांचोनि नसे वार्ता ।
जळीं स्थळीं काष्ठीं महीं पर्वता । ईश्र्वर नांदे सर्वस्वीं ॥ ४१ ॥
ऐसे ऐकोनि वागुत्तर । ग्रीवा तुकवी अत्रिकुमर ।
मग सच्छिष्याचा धरोनि कर । चालता झाला महाराज तो ॥ ४२ ॥ 
सहज चालतां चाले नेटीं । आले आदिनाथ प्रेमदृष्टीं । 
मच्छिंद्र मूर्धकमळघाटी । पदावरी वाहातसे ॥ ४३ ॥
शिवें पाहूनि मंददेहीं । म्हणे हा पूर्वी नारायण कवी ।
मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं । धरिला हृदयीं तत्काळ ॥ ४४ ॥
मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं । दत्तासी म्हणे पंचमूर्धनी ।
या शिष्यांते अभ्यासोनि । सकळ सिद्धी मिरवीं कां ॥ ४५ ॥
जें वेदकारणाचें निजसार । जें सर्वोपकाराचें गुहागर । 
सकळ सिद्धींचे अर्थमाहेर । निवेदीं तूं महाराजा ॥ ४६ ॥
जारणमारण उच्चाटन । शापादपि निवारण ।
शरादपि अस्त्रादिनिबर्हण । ममत्रशक्ती त्या वरत्या ॥ ४७ ॥
जो जैसा कर्मविजे पाठ । होती दैवतें वरती भेट ।
वंशवरद वाक्पट । मस्तकीं स्थापोनि जाताती ॥ ४८ ॥
वरुण आदित्य सोमस्वामी । भौमशक्रादि यमदमी ।
शिवशक्ति कामतरणी । वर देऊनि उठविले ॥ ४९ ॥
विष्णु विरिंची कृपाकृती । वरदबीजे देऊनि शक्ति ।
ते मंत्रअस्त्रे अपारगती । हृदयामाजी हेलावला ॥ ५० ॥
असो सद्विद्येचा मंदराचळ । उभवोनियां अत्रिबाळ । 
क्षणमात्र वेंचूनि केला सबळ । सिद्धतरणी जेउता ॥ ५१ ॥
नागबकादि वातास्त्र । नगनागादि महावज्र ।
पावक जलधी अस्त्र पवित्र । सांगोपांग तो झाला ॥ ५२ ॥
ऐसें सांगोनि सांगोपांग । जाता झाला योगमार्ग ।
परी संप्रदाय योजूनि योग । कानफाडी मिरवला ॥ ५३ ॥
पुढील भविष्य जाणोन । सांप्रदाय केला निर्माण ।
षड्रुप जोगीदर्शन । कानफाडी मिरवले ॥ ५४ ॥
नाथ ऐसे देऊनि नाम । शिंगी शैली देऊनि भूषण ।
ऐसें परिकरोनि प्रमाण । अत्रिनंदन पैं गेला ॥ ५५ ॥  
यापरी तो मच्छिंद्रनाथ । नमोनि निघाला आदिनाथ ।
महीवरी नाना तीर्थे । शोध करीत चालिला ॥ ५६ ॥
तो भ्रमण करितां सप्तश्रृंगीं । येता झाला महायोगी ।
अंबिका वंदोनि मनोमार्गी । सप्रेम स्थितीं गौरविली ॥ ५७ ॥
करीत वैखरीं अंबास्तवन । तों आलें कल्पनें मन ।
कीं कांहीं तरी कवित्वसाधन । लोकांमाजी मिरवावें ॥ ५८ ॥
कवित्व तरी करावें ऐसें ।  कीं उपयोगीं पडे सर्व जगास । 
मग योजोनियां शाबरीविद्येस । मनामाजी ठसविली ॥ ५९ ॥
यापरी अनेक कल्पना करीत । कीं शाबरीविद्येचें करावें कवित ।
परी वरदगुंतीं वश्य दैवत । केउते रीतीं होतील ॥ ६० ॥
मग अंबेपासी अनुष्ठान । करिता झाला सप्तदिन ।
वेदबीजाचें अभिषिंचन । अंबेलागी करीतसे ॥ ६१ ॥
तेणें जागृत महिषमर्दिनी । होऊनि बोले तयालागोनी ।
बा रे कवण कामना मनीं । वेधली तें मज सांग ॥ ६२ ॥
येरु म्हणे वो जगज्जननी । शाबरी विद्येचें कवित्व कामनीं ।
वेधक परी वरालागोनी । उपाय कांही मज सांग ॥ ६३ ॥
उपरी बोले चंडिका भवानी । पूर्णता पावशी सकळ कामनीं ।
मग त्या सिद्धाचा हात धरोनी । मार्तंडपर्वतीं पैं नेला ॥ ६४ ॥
तेथें नागवृक्ष अचिंत्य थोर । तरु नोहे तो सिद्धीचे माहेर ।
दृश्यादृश्य केलें पर । महातरु नांदतसे ॥ ६५ ॥
तेथें करोनि बीजी हवन । तरु केला दृश्यमान । 
तो कनकवर्ण देदीप्यमान । निजदृष्टीं देखिला ॥ ६६ ॥
त्या तरुच्या शाखोपांतीं । नाना दैवतें विराजती ।
मग नामाभिधानें सकळ भगवती । देवतांची सांगे त्या ॥ ६७ ॥
तीं दैवतें धुरंधर बावन्न वीर । मूर्तिमंत असती तरुवर ।
नरसी काळिका महिषासुर । म्हंमदा झोटिंग वीरभद्र ॥ ६८ ॥
वेताळ मारुती अयोध्याधीश । श्रीकोदंडपाणी रामेश ।
सूर्य नामीं तेथ द्वादश । मूर्तिमंत नांदतसे ॥ ६९ ॥
पायरी जलदेवता असती नव । कुमारी धनदा नंदा नांव ।
विमळा मंगळा ज्ञानप्राप्तिव । लक्ष्मी आणि विख्याता ॥ ७० ॥
 यापरी चंडा मामुंडा । रंडा कुंडा महालंडा ।
अप्सरा जोगिनी शंडवितंडा । तरुभागीं विराजल्या ॥ ७१ ॥
काळव्याळ वीरभैरव । भस्मकेत सिद्धभैरव ।
रुद्र ईश्र्वरी गण भैरव । अष्टभैरव हे असती ॥ ७२ ॥
यापरी शस्त्रअस्त्रयामिना । दमि धूमि कुचित भामिना ।
सातवी ज्वाळा शुभानना । वृक्षावरी त्या असती ॥ ७३ ॥
यापरी शंखिनी डंखिणी यक्षिणी । त्या समुच्चयें असती बारा जणी ।
अष्टसिद्धी महाप्रकरणी । वृक्षावरी विराजल्या ॥ ७४ ॥
प्राप्ति प्राकाम्या अणिमा गरिमा । ईशित्व वशित्व प्रथिमा महिमा ।
एवंच अष्टसिद्धी नामा । तरुवरी विराजल्या ॥ ७५ ॥
अष्टसिद्धीसमवेत । बावन्न वीर सकळ दैवत । 
तया तरुच्या शाखा व्यक्त । करोनियां बैसले ॥ ७६ ॥
ऐसे दृष्टीं पाहिले सर्वही । तीं पहाती न बोलती कांहीं ।
यावरी अंबिका करी काई । निवे दोनी नाथातें ॥ ७७ ॥
बा रे ऋषमूकपर्वतस्थानीं । ब्रह्मगिरीच्या निकटवासनीं ।
अंजनपर्वत तयासी म्हणी । नदी काचित् आहे बा ॥ ७८ ॥
दक्षिणओघीं सरिता जात । ते कांठी महाकाळी दैवत । 
स्थानें असती जाण तेथ । भगवतीतें नमावें ॥ ७९ ॥
तेथोनि पुढें दक्षिणपंथीं । सरितापात्रें जावें निगुती ।
परी बा तेथें श्र्वेतकुंडें असती । तोयभरित महाराजा ॥ ८० ॥ 
तरी शुक्ल वेल कवळूनि हातीं । एक एक सोडावी कुंडाप्रती ।
ऐशीं कुंडे एकशतीं । हस्तिपदसमान आहेत ॥ ८१ ॥
परी तितुकें पूजन कोरडे वेलीं । सकळ सरल्या परत पाउलीं ।
पाहात यावें ती वल्ली । सकळ कुंडामाझारी ॥ ८२ ॥
जया कुंडांत सजीव वेल । दृष्टिगोचर बा होईल ।
तया कुंडीं स्नान वहिले । करोनि जीवन प्राशिजे ॥ ८३ ॥
तें जीवन प्राशितां निश्र्चित । मूर्च्छा येईल एक मुहूर्त ।
तै बारा नामीं जपावे आदित्य । मूर्च्छेमाजी असतां पै ॥ ८४ ॥
मग प्रत्यक्ष होईल तमांतक । मौळी घ्यावा तो हस्तक ।
पुढें काचकूपिका भरोनि उदक । येथें यावें महाराजा ॥ ८५ ॥
मग बारा नामीं करोनि सिंचनीं । तरु न्हाणावा तया जीवनीं । 
तेव्हां दैवतें प्रसन्न होऊनि । वरदान तूंतें देतील बा ॥ ८६ ॥
परी एक वेळां न घडे ऐसें । खेपा घालाव्या षण्मास ।
एक एक दैवत एक खेपेस । प्रसन्न होईल महाराजा ॥ ८७ ॥
ऐसें सांगोनि माय भगवती । गेली आपुले स्थानाप्रती ।
येरु पावला अंजनपर्वतीं । सरितापात्री ओघांतें ॥ ८८ ॥
काळी महाकाळी देवतांस । नमोनि निघाला काननास । 
करीं कवळोनि शुक्लवेलास । कुंडालागी शोधीतसे ॥ ८९ ॥
असो एकशत कुंडें पाहोन । तितुक्यांत शुक्लवेल स्थापोन ।

पुन्हां पाहें परतोन । सकळ कुंडांमाझारी ॥ ९० ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 2
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दुसरा (२)



Custom Search

No comments:

Post a Comment