Wednesday, October 14, 2015

Kilakam अथ कीलकम्



Kilakam
Kilakam is in Sanskrit. This stotra is to be recited before performing Saptashati Patha. Devotee who is performing Sptashati Patha should surrender to the Goddess and everything he has including money, property, gold, ornaments etc. is to be offered to the goddess and then as a Goddess blessings he should have that. So owenership is with Goddess. With all this in mind such devotee should concentrate on performing Saptashati Patha. He receives Goddess's blessings and have no fear anywhere in this world, no untimely death and after death becomes beneficiary of Moksha.  
  अथ कीलकम्
ॐ अस्य श्रीकीलकमन्त्रस्य शिव ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, 
श्रीमहासरस्वती देवता, श्रीजगदम्बाप्रीत्यर्थं सप्तशतीपाठाङ्गत्वेन 
जपे विनियोगः ।
मार्कण्डेय उवाच 
ॐ विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ॥ १ ॥
सर्वमेतद्विजानीयान्मत्राणामभिकीलकम् ।
सोऽपि क्षेममवाप्नोति सततं जाप्यतत्परः ॥ २ ॥
सिद्ध्यन्त्युच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि । 
एतेन स्तुवतां देवी स्तोत्रमात्रेण सिद्ध्यति ॥ ३ ॥
न मन्त्रो नौषधं तत्र न किञ्चिदपि विद्यते ।
विना जाप्येन सिद्ध्येत सर्वमुच्चाटनादिकम् ॥ ४ ॥
समग्राण्यपि सिद्ध्यन्ति लोकशङ्कामिमां हरः ।
कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवमिदं शुभम् ॥ ५ ॥
स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुप्तं चकार सः ।
समाप्तिर्न च पुण्यस्य तां यथावन्नियन्त्रणाम् ॥ ६ ॥
सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेवं न संशयः ।
कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टम्यां वा समाहितः ॥ ७ ॥
ददाति प्रतिगृह्णाति नान्यथैषा प्रसीदति ।
इत्थंरुपेण कीलेन महादेवेन कीलितम् ॥ ८ ॥
यो निष्कीलां विधायैना नित्यं जपति संस्फुटम् ।
स सिद्धः स गणः सोऽपि गन्धर्वो जायते नरः ॥ ९ ॥
न चैवाप्यटतस्तस्य भयं क्वापीह जायते ।
नापमृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात् ॥ १० ॥
ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत न कुर्वाणो विनश्यति ।
ततो ज्ञात्वैव सम्पन्नमिदं प्रारभ्यते बुधैः ॥ ११ ॥
सौभाग्यादि च यत्किञ्चिद् दृश्यते ललनाजने ।
तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभम् ॥ १२ ॥
शनैस्तु जप्यमानेऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः ।
भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत् ॥ १३ ॥
ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः ।
शत्रुहानिः परो मोक्षः स्तूयते सा न किं जनैः ॥ १४ ॥ ॐ
इति देव्याः कीलकस्तोत्रं संपूर्णम् ॥   
मराठी अर्थ
ह्या श्रीकीलक मन्त्राचे ऋषि शिव, छन्द अनुष्टुप, देवता महासरस्वती  सप्तशतीपाठासाठी श्रीजगदम्बेप्रीत्यर्थ जप करण्यात येत आहे.
ॐ चण्डिकादेवीला नमस्कार आहे. 
मार्कण्डेय म्हणतात: विशुद्ध ज्ञान हेच ज्यांचे शरीर आहे. तीन वेद हे ज्यांचे तीन दिव्य नेत्र आहेत, जे कल्याण प्राप्ति हेतुसाठी आहेत तसेच ज्यांनी आपल्या मस्तकावर अर्धचन्द्राचा मुकुट धारण केला आहे. त्या भगवान शंकरांना नमस्कार आहे. 
२) मंन्त्राचा जो अभिकीलक आहे अर्थांत मन्त्रांच्या सिद्धिमध्ये विघ्न आणणार्‍या शापरुपी कीलकाचे जे निवारण करणारे आहे त्या सप्तशती स्तोत्राला पूर्णपणे जाणून घेऊन त्याची उपासना करावयास हवी. तथापी त्या व्यतिरिक्त दुसर्‍या मंत्रांचा जप जो करतो तो सुद्धा (त्याचे) कल्याण होण्यास पात्र असतो. 
३) त्याचीही उच्चाटनादि कर्मे सफल होतात. तसेच त्यालासुद्धा सर्व दुर्मिळ वस्तुंची प्राप्ती होते. तरी जो दुसर्‍या मंत्रांचा जप न करता फक्त या सप्तशती नावाच्या स्तोत्राने देवीची स्तुती करतो त्याला ह्या स्तुतीनेच देवी प्रसन्न होते.
४) त्यांना आपल्या कर्मसिद्धीसाठी मन्त्र, औषधे किंवा अन्य कोठच्याच साधनांची आवश्यकता नसते. जप न करतासुद्धा त्यांना उच्चाटनादि सर्व अभिचारिक कर्मे सिद्ध होतात. 
५) इतकेच नाहीतर त्यांना सर्व अभिष्ट वस्तु प्राप्त होतात. लोकांच्या मनांत शंका होती की सप्तशतीच्या उपासनेद्वारे किंवा अन्य मंत्रांच्या उपासनेमुळे जर समान फळाची प्राप्ती होते तर यांत श्रेष्ठ साधन कोणते ? भगवान शंकरांनी त्यांच्याकडे आलेल्या जिज्ञासुंना समजावले आणि सांगितले की सप्तशतीची उपासना हीच खरी सर्वश्रेष्ठ कल्याणकारी उपासना आहे.
६)  त्यानंतर भगवान शंकरानी चण्डीकेचे हे सप्तशती स्तोत्र गुप्त केले. सप्तशतीच्या पाठाने जे पुण्य प्राप्त होते त्याची कधी समाप्ती होत नाही. अन्य मंत्राच्या जपसाधनेने जे पुण्य प्राप्त होते त्या पुण्याची समाप्ती होते. 
७- ८) दुसर्‍या मंत्रांची साधना करणारा सप्तशतीच्या स्तोत्राचे व मंत्राचे अनुष्ठान करेल तर तो सुद्धा पूर्णपणे कल्याण होण्यास लायक होतो यांत संशय नाही. जो साधक कृष्णपक्षांतील चतुर्दशी किंवा अष्टमीला मन एकाग्र करुन सर्वस्व अर्पण करुन भगवतीच्या सेवेंत समर्पित होतो आणि नंतर भगवतीच्या प्रसादाने परत सर्व ग्रहण करतो त्याच्यावर भगवती प्रसन्न होते. अन्यथा प्रसन्न होत नाही. अशा प्रकारे भगवान शंकरांनी सिद्धीच्या प्रतिबन्धकरुप कीलाने या स्तोत्राला कीलित करुन ठेवले आहे.  
९) जो आधी सांगितल्याप्रमाणे धनधान्यादी सर्व भगवतीला अर्पण करुन या स्तोत्राचे निष्कीलन करुन या सप्तशती पाठाचा प्रत्येक दिवशी स्पष्ट उच्चारणाने उच्च स्वरांत पाठ करतो तोच साधक सिद्ध होतो. तोच देवीचा पार्षद होतो. तोच गंधर्व होतो. 
१०) सर्वत्र संचार करतांना त्याला या संसारांत कसलेही भय नसते. त्याला अपमृत्युचे भय नसते. देहत्याग केल्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते. 
११) या कीलकाला जाणून त्याचा परिहार करुन मगच सप्तशती पाठास आरंभ करावा. जो असे करत नाही त्याचा नाश होतो. या कीलकाचे व निष्कीलनाचे ज्ञान प्राप्त करुन घेऊनच हे स्तोत्र निर्दोष होते. आणि ज्ञानी साधक या निर्दोष स्तोत्राचाच पाठ करतात. 
१२) स्त्रीयांना जे सौभाग्य इत्यादी दृष्टीगोचर होते ते  सर्व देवीच्या प्रसादाचेच फळ असते. म्हणून ह्या कल्याणमय स्तोत्राचा नेहमी पाठ केला पाहिजे. 
१३) या सप्तशतीचा पाठ हळू आवाजांत केला असता स्वल्प फळाची प्राप्ती होते व मोठ्या आवाजांत पाठ केला असता संपूर्ण फळाची प्राप्ती होते. म्हणुन मोठ्या आवाजांतच याचा पाठ करावयास हवा. 
१४)  जीच्या प्रसादाने ऐश्वर्य, सौभाग्य, आरोग्य, सम्पत्ति, शत्रुनाश तसेच परम मोक्षाची प्राप्ती होते त्या जगदम्बेची स्तुति आपण कां करत नाही?
Kilakam 
अथ कीलकम्



Custom Search

No comments:

Post a Comment