Monday, November 16, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 7 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
Shree Navanath Bhaktisar adhyay 7 is in Marathi. Machchhinda and Veerbhadra met at Hareshwar. Veerbhadra insulted Machchhindra, his Guru and NathPanth. Hence Machchhindra was very angry and he called Veerbhadra for a fight. Machchhindra and Veerbhadra who was son of God Shiva, had a war in which Veerbhadra was defeated by Machchhindra. All Gods were also there watching their fight. When Machchhindra used a Maya astra (wepon). the effect would have been the end of everything. As such they requested him to stop Maya astra further destruction. Machchhindra uphelled their request and used Vasanik (another) astra to stop Mya astra from causing further destruction. Gods were pleased and they gave him many astras. They took him to the heaven with them as he wished to have a bath in pious Mankarnika river. He was in the heaven for seven years and came back to the earth to visit other pious places and visited Vajra Bhagavati. Then he proceeded to Ayodhya. In Ayodhya interesting things happened which will be told to us in Next adhyay 8 by Malu who is Son of Dhundi and is from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग १/२ 
श्रीगणेशायनमः ॥
जयजयाजी पंकजाक्षा । कमलापते कमलपत्राक्षा ।
अचगुणरुपा गुणसर्वेशा । महादक्षा रघुत्तमा ॥ १ ॥
हे कमळमित्रकुळभूषणा । रावणांतका रघुनंदना ।
पुढें बोलवीं ग्रंथरचना । जेणें श्रोतयां सुख वाटे ॥ २ ॥
मागिले अध्यायीं कथा सुरस । काळिका देवी मच्छिंद्रास ।
प्रसन्न होऊनि वरदानास । साबरीविद्या आतुली ॥ ३ ॥
तेथूनि आला हरेश्र्वरासी । गदातीर्थस्नानउद्देशीं ।
स्नान करुनि पर्वतासी । प्रदक्षिणा आरंभिली ॥ ४ ॥
सवेंचि येतां मच्छिंद्रनाथ । तो वीरभद्र पातला स्नाना तेथ ।
मानववेषी जोगी कृत्य । त्रिशूळ डमरु धनुष्यादि ॥ ५ ॥
शैली शिंगी नाद अद्भुत । नाद नोहे तो आगम व्यक्त ।
साधहिताचा स्वार्थअर्थ । परिणाम सूचवी ॥ ६ ॥
अहो ती शिंगी नोहे देवता । साधकजनांची कामदुहिता ।
पूर्ण करावया परिणाम अर्था । बोधरवि प्रवेशती ॥ ७ ॥
रज तम सत्त्व तृतीय गुण । महामारक अति कठिण ।
ते त्रिवर्ग करिती खडतरपण । ऐक्य केला त्रिशूळ तो ॥ ८ ॥
यापरी आगमनिगमबीजें । सारव्यक्त तेजःपुंजें ।
तयाची पंथिका दावी करांबुजे । विशाळ डमरु विराजला ॥ ९ ॥
सगुणकथा सप्तधातु । गुणीं भरला गुणातीतु ।
नवरंगरसांत झाला व्यक्तु । हरिगुणींचि भक्तु होईना कां ॥ १० ॥
कामक्रोधषड्गुणविकार । सत्त्वस्थाचे शत्रु अनिवार ।
तयां जिंकितां विवेक फार । शरगांडीव विराजलें ॥ ११ ॥
अहो शर नोहे ते जाण युक्ती । कामक्रोधांतें देत मुक्ती ।
गांडीव नोहे तें विषयभक्ती । ज्ञानशरीं विराजलें ॥ १२ ॥
अगा शर न म्हणूं ते ज्ञानदिवटी । अज्ञानतमींचें द्वंद्व निवटी ।
अलक्षसंधानपूर्णकोटी । भेदाभेद सर्वथा ॥ १३ ॥
ऐसा महाराज प्रतापरुद्र । द्वंद्वलेश नसे मनीं वीरभद्र ।
अज्ञानतमींचा महाचंद्र । मच्छिंद्रातें भेटला ॥ १४ ॥
मच्छिंद्र करुनि येतसे स्नान । वीरभद्र येतसे स्नानालागून ।
तों मार्गी मच्छिंद्रातें पाहून । उभा केला हटकोनी ॥ १५ ॥
करुनि उभे नमनानमन । म्हणे स्वामी तुम्ही कोण ।
येरु म्हणे मच्छिंद्र अभिधान । निजदेहा मिरवीतसे ॥ १६ ॥
येरु म्हणे कवण पंथी । अभ्यास मिरवतसां जगाप्रती ।
मच्छिंद्र म्हणे जोगीये नीती । नाथपंथी मिरवीतों ॥ १७ ॥
येरु म्हणे कोण दर्शन । मच्छिंद्र म्हणे जोगीमहिमान ।
शैली कंथा मुद्रा भूषण । निजअंगीं मिरवीतसें ॥ १८ ॥
वीरभद्र म्हणे मुद्रा सान । न घालितां फाडिले कान ।
येरु म्हणे गुरुप्रसादें करुन । मंथनीं निर्मिला हा एक ॥ १९ ॥
वीरभद्र म्हणे काय पाखंड । व्यर्थचि उगलें वाढवूनि बंड ।
जगामाजी मिरवितां काळें तोंड । योग्यायोग्य दिसेना ॥ २० ॥
तरी आतां योगद्रुमा । मुद्रा सोडीं ह्या नसती उत्तमा ।
नाहीं तरी शिक्षा पावसी नेमा । ठाईं ठाईं महाराजा ॥ २१ ॥
अगा तव गुरु ऐसा कोण । वेदविधिच्या प्राज्ञेंकरुन ।
पूर्ण आगळीक पंथ निर्मून । जगामाजी मिरवतो ॥ २२ ॥
अगा स्वबुद्धीं तर्क करुन । भलतेंचि मत करी स्थापन ।
तो प्राज्ञिक नव्हे मुर्खाहून । शतमूर्ख म्हणावा ॥ २३ ॥
ऐसी ऐकतां भद्रगोष्टी । मच्छिंद्र संतप्त झाला पोटीं ।
म्हणे मशका खोटी । वल्गना करिसी अपार ॥ २४ ॥
अरे शतमुर्खाहूनि मूर्ख । म्हणूनि बोलसी दुःखदायक ।
परमात्मा क्षोभवूनि पातक । भार वाहिला निजमौळी ॥ २५ ॥
अरे आत्मा क्षोभतां पराचा । पापभार होत ब्रह्मांडींचा ।
तस्मात् तव गुरु कैंचा । दुजा गुरु विलोकीं ॥ २६ ॥
अरे नष्टा दुर्जन अधमा । तव दर्शने स्नान करणें आम्हां ।
आतां उगाचि जाय आपुल्या कामा । शिक्षा पावसील मम हस्ते ॥ २७ ॥
ऐशापरी मच्छिंद्रनाथाचें भाषण । ऐकतां वीरभद्राचें क्षोभलें मन ।
म्हणे भ्रष्टा तुझा प्राण । आतांचि घेईन ये काळीं ॥ २८ ॥
मग करीं कवळूनि सायकासन । सत्वर रगडूनि लाविला गुण ।
निर्वाण अर्धचंद्र बाण । तूणीरांतूनि काढिला ॥ २९ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे पतित झालासी उन्मत्त ।
अरे उद्धटा आपुलें अहित । जनांमाजी मिरविसी ॥ ३० ॥
अरे सायकासन सिद्ध करुन । सोंग दाविसी मजलागून ।
परी हें बरवे नोहे मरण । ये काळीं पावसी ॥ ३१ ॥
अरे ऐसें सोंग मजकारण । कित्येक झाल अवलोकून ।
बहुरुप्याचें खडतरपण । शूरत्व रणीं मिरवेना ॥ ३२ ॥
कीं अजाकंठींचें लंबस्तन । परी नातुडे त्यांत दुग्धपान ।
तेवीं तूं दाखविसी हावभाव करुन । परी क्षणैक क्षीण होसील कीं ॥ ३३ ॥
वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक । तूतें दावीन यमलोक । 
तव आयुष्य सरलें सकळिक । म्हणूनि येथें आलासी ॥ ३४ ॥
तरी मी तूतें काळक्षय । प्रगट झालों आहें प्रत्यक्ष ।
तरी तव गुरु प्रतापदक्ष । कैसा आहे पाहूं दे ॥ ३५ ॥
मच्छिंद्र म्हणे मशकासाठीं । मेरु मिळवील काय नगांची कोटी ।
कीं महाक्षीराब्धी घेऊनि नरोटी । भीक मागेल पोटातें ॥ ३६ ॥
मूर्खा ऐक वचनार्थ । मम गुरुचा मौळीं वरद हस्त । 
तेणें होतसे शरणागत । मानव दानव देवादि ॥ ३७ ॥
तेथें अर्भका तुझा पाड । किमर्थ आधीं मिरविसी कोड ।
महासविता तप्त उजेड । खद्योतातें मिरवेना ॥ ३८ ॥
वीरभद्र म्हणे तूं काय करिशी । मरणकाळीं फांटा फुटला तुजसा ।
आतां क्षणेंचि भूमीपाशीं । करीन नव्हतासि ऐसें ॥ ३९ ॥
अरे तव ग्रीवेतें काळपाश । आधींच पावलें आयुष्य नाश ।
म्हणूनि मूर्खा तूतें हौस । ये वादा स्फुरलासी ॥ ४० ॥
ऐसें म्हणनि वीरभद्रानें । गुणीं सज्जिलें अस्त्रविंदान ।
म्हणे भ्रष्टा सावधान । राममंत्र जल्पीं कां ॥ ४१ ॥
मच्छिंद्र म्हणे राममंत्र । तूतें वाटला अपवित्र ।
परी तेणेंचि सुखी पंचवक्र । दुःखलेशी मुकलासे ॥ ४२ ॥
अरे राममंत्रें वाल्या तरला । तें नाम तारील आतांचि मजला ।
परी सावध तूं होई कां वहिला । राममंत्रावेगळा ॥ ४३ ॥
ऐसें म्हणूनि कक्षे झोळी । विलोकूनि भस्म करीं कवळी ।
मग शस्त्रास्त्रीं तेणें काळीं । वज्रस्थापना जल्पतसे ॥ ४४ ॥
पूर्ण प्रयोग घालूनि धाटीं । भोंवतीं फिरवी भस्मचिमुटी ।
तेणें करुनि वज्रदाटी । दाही दिशा मिरवीतसे ॥ ४५ ॥
आणिक करीं कवळूनि भस्म । यासी विलोकी योगद्रुम ।
तों वीरभद्रें सायकें परम । निर्वाण बाण सोडिला ॥ ४६ ॥
तो बाण येतां किंकाटत । दृष्टीं पाहे मच्छिंद्रनाथ । 
मग आपुले मानी मनांत । बाण आहे तृणासम ॥ ४७ ॥
ऐसें म्हणूनि स्तब्धदृष्टी । उभा करीं कवळूनि भस्मचिमुटी ।
तवं तो बाण नभापोटीं । संचरुनि उतरतसे ॥ ४८ ॥
मच्छिंद्रनाथातें लक्षून । खालीं उतरतसे घ्यावया प्राण ।
तों सबळ बळें वज्र येऊन । प्रहार करितें पैं झालें ॥ ४९ ॥
तरी तें वज्र वरिष्ठ । आदळतांचि बाण झाला पिष्ट ।
तें पाहूनि वीरभद्र वरिष्ठ । परम चित्तीं क्षोभला ॥ ५० ॥
मग शक्तिअस्त्र देदीप्यमान । योजिता झाला रुद्रनंदन ।
सज्ज करुनि सायकसंधान । साधूनियां प्रेरिलें ॥ ५१ ॥
सवेंचि काढूनि दुसरा बाण । नागास्त्र तयावरी स्थापून ।
तोही चुंबीत पावला गगन । पाठोपाठ शक्तीच्या ॥ ५२ ॥
परी ती शक्ती बलाढ्य बहुत । स्वर्गी मिरवे शब्द करीत ।
ऐकतां शब्द भयभीत । सकळ मही झाली असे ॥ ५३ ॥
दिग्गज पळती रानोरान । शेष न ठेवी आपुली मान । 
वराह पाहूनि अति निर्वाण । दंताने मही सरसावी ॥ ५४ ॥
कूर्म करीतसे सबळ पृष्ठी । पाहूं पातले देव विमानदाटीं ।
तेही पाहूनि कपाटपोटी । संचरुनि पळतात ॥ ५५ ॥
देवविमानीं हडबड । पाहूनि उड्डगण पळती पाड ।
सोडूनि आपुले कार्य उघड । नभामाजी सरळले ॥ ५६ ॥
देव दानव यक्ष दैत्य । म्हणती पावला प्रळयमृत्यु ।
ही शक्ति नोहे प्रळय समस्त । मही बुडवील वाटतसे ॥ ५७ ॥
सबळ बळिष्ठ ती मही कांपत । तेणें नगकड्यांची खांचणी होत ।
मायलेक चुकूनि निश्र्चित । रुदन करिती हंबरडे ॥ ५८ ॥
सहस्त्र विजूंचा कडकडाट । दावूनि शब्द अनिवारलोट ।
नभमंडळ पाहूनि नीट । शक्ती भेदिली वज्रातें ॥ ५९ ॥
तेणें वज्र अति क्षीण । होऊनि पडलें गगनाहून ।
पुढें मच्छिंद्राचा लक्षूनि प्राण । हरावया येतसे ॥ ६० ॥
 यावरी नागास्त्र निःशक्त । तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ।
त्वरें कवळूनि भस्म चिमुटींत । रुद्रास्त्र प्रेरीतसे ॥ ६१ ॥
त्यासवेंचि योजूनि खगेंद्र अस्त्राते । पाठोपाठीं प्रेरीत ।
परी रुद्राक्ष झालें व्यक्त । रुद्र एकादश प्रतापी ॥ ६२ ॥
एकादशरुद्रचूडामणी । शक्तीतें तल्लीन करी कवळूनी ।
तेणें हस्त पाद मूर्धनी । क्षीण होऊनि पडियेली ॥ ६३ ॥
शक्ती पडतां खचूनि महीं । रुद्र मिरवले अदृश्य देहीं । 
येरीकडे खगेंद्र अही । अस्त्रा अस्त्र भक्षेतसे ॥ ६४ ॥
तेणें नागास्त्र त्वरित । अदृश्य झालें युद्धरहित ।
यावरी अस्त्र विनयासुत । तेंही झालें अदृश्य ॥ ६५ ॥
यावरी वीरभद्र प्रतापतरणी । वातास्त्र प्रेरिता झाला गगनीं ।
तें मच्छिंद्रनाथ विलोकुनी । पर्वतास्त्र सोडितसे ॥ ६६ ॥
तेणें कोंडिला अवघा वात । मग वज्रास्त प्रेरी महारुद्रसुत ।
तेणेंकरुनि चूर्ण पर्वत । अदृश्यपणीं मिरवला ॥ ६७ ॥
यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित । प्रेरिता झाला अग्न्यस्त्र । 
ते पाहूनि मच्छिंद्रनाथ । जलदास्त्र प्रेरीतसे ॥ ६८ ॥
त्यानें सकळ अग्नि विझवून । करितें झालें अदृश्य गमन ।
यावरी वीरभद्रें कामास्त्र सोडून । कामव्यथा योजीतसे ॥ ६९ ॥
त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र । प्रेरिता झाला रत्यस्त्र । 
तेणेंकरुनि काम पळत । सुख पावला रतिसंगें ॥ ७० ॥
यावरी वीरभद्र दक्ष । प्रेरिता झाला महोरगास्त्र ।
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । संजिवनी प्रेरितसे ॥ ७१ ॥
वीरभद्र तो वैश्र्वानर । प्रेरिता झाला दानवास्त्र ।
मच्छिंद्रनाथ अति तत्पर । देवास्त्र प्रेरितसे ॥ ७२ ॥
मग अस्त्र तें बळवंत । देव दानव प्रगटले अमित ।
ते पाहूनियां उभयतांते । स्वग्रीवा तुकविती ॥ ७३ ॥
परस्परें धन्य धन्य । वदोनि हृदयीं करिती मान ।
गदगदोनि हास्यवचन । एकमेका बोलती ॥ ७४ ॥
वीरभद्र म्हणे सकळे महीं । वीर जिंकिलें भद्रयुद्धें प्रवाहीं ।
परी मच्छिंद्रा तुजसमान ये देहीं । देखिला नाहीं कोणीच ॥ ७५ ॥
मच्छिंद्र म्हणे वरदहस्त । पुढें पहा भद्रजात ।
येरी म्हणे म्हणे अविनाशवंत । गुरु आहे माझा कीं ॥ ७६ ॥
वीरभद्र तुकावूनि मान । म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ ।
आणि तूंहि त्यांत अससी धन्य । प्राज्ञीकवंत सद्यशा ॥ ७७ ॥
ऐसें देवास्त्र युक्तप्रयुक्त । दानव करुनि सकळ शांत ।
अदृश्यपणीं स्वस्थानांत जाऊनियां पोचलें ॥ ७८ ॥
यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र । प्रेरिता झाला अति पवित्र ।
तें पाहूनियां वरदपात्र । विध्यस्त्र प्रेरितसे ॥ ७९ ॥
तें प्रगटतां चतुर्भुजमूर्ती । विधी लागे चरणाप्रती ।
यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती । सोडिता झाला तत्क्षणीं ॥ ८० ॥              
 तें पाहूनियां दत्तवरदपाणी । स्त्रीअस्त्र सोडित गगनीं ।
तें बोलतां लावण्यखाणीं । स्वामीलागी विहिताती ॥ ८१ ॥
तेणेंकरुनि कार्तिकास्त्र । तत्क्षणीं पावलें शांत ।
यावरी भद्र तो काळास्त्र । प्रेरिता झाला तत्क्षणीं ॥ ८२ ॥
तें पाहुनि मच्छिंद्रनाथ । मायाप्रळयी प्रेरिलें अस्त्र ।
तेणें काळ भक्षूनि पवित्र । पंचतत्त्व कवळीतसे ॥ ८३ ॥
तें पाहूनि सकळ देव । करिते झालें मच्छिंद्रस्तव ।
म्हणती महाराजा युगभाव । सकळ नाश पावेल कीं ॥ ८४ ॥
म्हणती महाराजा कलिभाग । पुढें आहे अनंतयुग । 
तों आजि तुम्ही सकळ याग । विनाशरुपी पाहतां कीं ॥ ८५ ॥
तरी आतां कृपाकरुन । मायाप्रळय घ्या आवरुन । 
मग देववाणी श्रवणीं ऐकून । वासनीक अस्त्र प्रेरितसे ॥ ८६ ॥
तेणें मायाप्रळय हरला । मायाउत्पत्तिप्रयोग राहिला ।
मग सकळ विमानें उतरुनि महीला । देव नमिति मच्छिंद्राला ॥ ८७ ॥
ब्रह्मा विष्णु आणि रुद्र । स्तवनें केला शांत मच्छिंद्र । 
मग संनिध बोलावूनि वीरभद्र । करीं कर ओपिती ॥ ८८ ॥
म्हणती कविनारायण मच्छिंद्रनाथ । तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ।
ऐसें वीरभद्रातें सांगूनि समस्त । प्रेमें प्रीती वाढविती ॥ ८९ ॥
यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन । कीं मच्छिंद्राची कामना कोण ।
ती मीच पूर्ण करीन । वरदचित्तेंकरुनिया ॥ ९० ॥
Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ )


Custom Search

No comments:

Post a Comment