Monday, November 30, 2015

ShriRam Hrudaya श्रीराम हृदय


ShriRam Hrudaya 
ShriRam Hrudaya is in Sanskrit. It is told to Goddess Parvati by God Shiva. In the Hrudaya it is said that Goddess Sita is telling Ram Hrudaya to God Hanuman. God Ram is Brahma. He don't have any desire, no emotion, he have no unhappiness. He is ever happy. This is how? It is originally told to God Hanuman by Goddess Sita. By hearing/chanting Ram Hrudaya everyday devotee attains Moksha. This is falshruti and said in this Ram Hrudaya by God Ram.
श्रीराम हृदय
यः पृथ्वीभरवारणाय दिविजैः संप्रार्थितश्र्चिन्मयः ।
संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्योऽव्ययः ।
निश्र्चक्रं हतराक्षसः पुनरगाद् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां ।
कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे ॥ १ ॥
विश्र्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं ।
मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् ।
आनन्दसान्द्रममलं निजबोधरुपं ।
सीतापतिं विदिततत्तमहं नमामि ॥ २ ॥
पठन्ति ये नित्यमनन्यचेतसः ।
शृण्वन्ति चाध्यात्मिकसंज्ञि तं शुभम् ।
रामायणं सर्वपुराणसंमतं । 
निर्घूतपापा हरिमेव यान्ति ते  ॥ ३ ॥ 
अध्यात्मरामायणमेव नित्यं ।
पठेद्यदीच्छेद्भवबन्धमुक्तिम् ।
गवां सहस्रायुतकोटिदानात् ।
फलं लभेद्यः शृणुयात्सनि्यम् ॥ ४ ॥
पुरारिगिरिसंभूता श्रीरामार्णवसंगता । 
अध्यात्मरामगंगेयं पुनाति भुवनत्रयम् ॥ ५ ॥ 
कैलासाग्रे कदाचिद्रविशतविमले, मन्दिरे रत्नपीठे ।
संविष्टं ध्याननिष्ठं त्रिनयनमभयं, सेवितं सिद्धसङ्गै ॥
देवी वामाङ्कसंस्था गिरिवरतनया, पार्वती भक्तिनम्रा ।
प्राहेदं देवमीशं सकलमलहरं, वाक्यमानन्दकन्दम् ॥ ६ ॥
पार्वत्युवाच 
नमोऽस्तु ते देव जगन्निवास,
सर्वात्मद्दक् त्वं परमेश्र्वरोऽसि ।
पृच्छामि तत्त्वं पुरुषोत्तमस्य,
सनातनं त्वं च सनातनोऽसि ॥ ७ ॥ 
गोप्यं यदत्यन्तमनन्यवाच्यं, 
वदन्ति भक्तेषु महानुभावाः ।
तदाप्यहोऽहं तव देव भक्ता, 
प्रियोऽसि मे त्वं वद यत्तु पृष्टम् ॥ ८ ॥
ज्ञानं सविज्ञानमथानुभक्ति,
वैराग्ययुक्तं च मितं विभास्वत् ।
जानाम्यंहं योषिदपि त्वदुक्तं, 
यथा तथा ब्रूहि तरन्ति येन ॥ ९ ॥
पृच्छामि चान्यच्च परं रहस्यं,
तदेव चाग्रे वद वारिजाक्ष ।
श्रीरामचन्द्रेऽखिललोकसारे, 
भक्तिर्दृढा नौर्भवति प्रसिद्धा ॥ १० ॥
भक्तिः प्रसिद्धा भवमोक्षणाय, 
नान्यत्ततः साधनमस्ति किञ्चित् ।
तथापि हृत्संशयबन्धनं मे, 
विभेत्तुमर्हस्यमलोक्तिभिस्त्वम् ॥ ११ ॥
वदन्ति रामं परमेकमाद्यं, 
निरस्तमायागुणसंप्रवाहम् ।
भजन्ति चाहर्निशमप्रमत्ताः 
परं पदं यान्ति तथैव सिद्धाः ॥ १२ ॥
वदन्ति केचित्परमोऽपि रामः,
स्वाविद्यया संवृतमात्मसंज्ञम् ।
जानाति नात्मानमतः परेण,
संबोधितो वेद परात्मतत्त्वम् ॥ १३ ॥
यदि स्म जानाति कुतो विलापः,
सीताकृतेऽनेन कृतः परेण ।
जानाति नैवं यदि केन सेव्यः,
समो हि सर्वैरपि जीवजातैः ॥ १४ ॥
अत्रोत्तरं किं विदितं भवद्भिस्तद् ब्रूत 
मे संशयभेदि वाक्यम् ॥ १५ ॥
श्रीमहादेव उवाच 
धन्याऽसि भक्तासि परात्मनस्त्वं, 
यज्ज्ञातुमिच्छा तव रामतत्त्वम् 
पुरा न केनाप्यभिचोदितोऽहं,
वक्तुं रहस्यं परमं निगूढम् ॥ १६ ॥
त्वयाऽद्य भक्त्या परिनोदितोऽहं,
वक्ष्ये नमस्कृत्य रघुत्तमं ते ।
रामः परात्मा प्रकृतेरनादि-
रानन्द एकः पुरुषोत्तमो हि ॥ १७ ॥
स्वमायया कृत्स्नमिदं हि सृष्ट्वा,
नभोवदन्तर्बहिरास्थितो यः ।
सर्वान्तरस्थोऽपि निगूढ आत्मा,
स्वमायया सृष्टमिदं विचष्टे ॥ १८ ॥
जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति, 
यत्सन्निधौ चुम्बकलोहवद्धि ।
एतन्न जानन्ति विमूढचित्ताः,
स्वाविद्यया संवृतमानसा ये ॥ १९ ॥
स्वाज्ञानमप्यात्मनि शुद्धबुद्धे, 
स्वारोपयन्तीह निरस्तमाये ।
संसारमेवानुसरन्ति ते वै,
पुत्रादिसक्ताः पुरुकर्मयुक्ताः ॥ २० ॥
जानन्ति नैवं हृदये स्थितं वै, 
चामीकरं कण्ठगतं यथाऽज्ञाः ॥
यथाऽप्रकाशो न तु विद्यते रवौ, 
ज्योतिः स्वभावे परमेश्र्वरे तथा।    
विशुद्धविज्ञानघने रघूत्तमेऽ
विद्या कथं स्यात्परः परात्मनि ॥ २१ ॥
यथा हि चाक्ष्णा भ्रमता ग्रहादिकं,
विनष्टदृष्टेर्भ्रमतीव दृश्यते ।
तथैव देहेन्द्रियकर्तुरात्मनः 
कृत परेऽध्यस्य जनो विमुह्यति ॥ २२ ॥
नाहो न रात्रिः सवितुर्यथा भवेत्,
प्रकाशरुपाऽव्यभिचारतः क्वचित् ।
ज्ञानं तथाऽज्ञानमिदं द्वयं हरौ,
रामे कथं स्थास्यति शुद्धचिद्धने ॥ २३ ॥
तस्मात्परानन्दमये रघूत्तमे, 
विज्ञानरुपे हि न विद्यते तमः।
अज्ञानसाक्षिण्यरविन्दलोचने 
मायाश्रयत्वान्न हि मोहकारणम् ॥ २४ ॥
अत्र ते कथयिष्यामि रहस्यमपि दुर्लभम् ।
सीताराममरुत्सूनुसंवादं मोक्षसाधनम् ॥ २५ ॥
पुरा रामायणे रामो रावणं देवकण्टकम् ।
हत्वा रणे रणश्र्लाघी सुपुत्रबलवाहनम् ॥ २६ ॥
सीतया सह सुग्रीवलक्ष्मणाभ्यां समन्वितः ।
अयोध्यामगमद्रामो हनूमत्प्रमुखैर्वृतः ॥ २७ ॥
अभिषिक्तः परिवृत्तो वसिष्ठाद्यैर्महात्मभिः ।
सिंहासने समासीनः कोटिसूर्यसमप्रभः ॥ २८ ॥
दृष्ट्वा तदा हनूमन्तं प्राज्जलिं पुरतः स्थितम् ।
कृतकार्यं निराकाङ्क्षं ज्ञानस्य ज्ञानापेक्षं महामतिम् ॥ २९ ॥
रामः सीतामुवाचेदं ब्रहि तत्त्वं हनूमते । 
निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नौ नित्यभक्तिमान् ॥ ३० ॥
तथेति जानकी प्राह तत्त्वं रामस्य निश्र्चितम् ।
हनुमते प्रपन्नाय सीता लोकविमोहिनी ॥ ३१ ॥
सीतोवाच 
रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानन्दमद्वयम् ।
सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रमगोचरम् ॥ ३२ ॥
आनन्दं निर्मलं शान्तं निर्विकारं निरंजनम् ।
सर्वव्यापिनमात्मानं स्वप्रकाशमकल्मषम् ॥ ३३ ॥
मां विद्धि मूलप्रकृतिं सर्गस्थित्यन्तकारिणीम् ।
तस्य संनिधिमात्रेण सृजामीदमतन्द्रिता ॥ ३४ ॥
तत्सान्निध्यान्मया सृष्टं तस्मिन्नारोप्यतेऽबुधैः ।
अयोध्यानगरे जन्म रघुवंशेऽतिनिर्मले ॥ ३५ ॥
विश्र्वामित्रसहायत्वं मखसंरश्रणं ततः ।
अहल्याशापशमनं चापभङ्गो महेशितुः ॥ ३६ ॥
मत्पाणिग्रहणं पश्र्चाद्भार्गवस्य मदक्षयः ।
अयोध्यानगरे वासो मया द्वादशवार्षिकः ॥ ३७ ॥
दण्डकारण्यगमनं विराधवध एव च ।
मायामारीचमरणं मायासीताहृतिस्तथा ॥ ३८ ॥
जटायुषो मोक्षलाभः कबन्धस्य तथैव च ।
शबर्याः पूजनं पश्र्चात्सुग्रीवेण समागमः ॥ ३९ ॥
वालिनश्र्च वधः पश्र्चात्सीतान्वेषणमेव च ।
सेतुबन्धश्र्च जलघौ लंकायाश्र्च निरोधनम् ॥ ४० ॥
रावणस्य वधो युद्धे सपुत्रस्य-दुरात्मनः ।
बिभिषणे राज्यदानं पुष्पकेण मया सह ॥ ४१ ॥
अयोध्यागमनं पश्र्चाद्राज्ये रामाभिषेचनम् ।
एवमादीनि कर्माणि मयैवाचरितान्यपि ।
आरोपयन्ति रामेऽस्मिन्निरविकारे खिलात्मनि ॥ ४२ ॥
रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोच ।
त्याकाङ्क्षते त्यजति नो न करोति किश्र्चित् ।
आनन्दमूर्तिरचलः परिणामहीनो ।
मायागुणाननुगतो हि तथा विभाति ॥ ४३ ॥
श्रीमहादेव - उवाच 
ततो रामः स्वयं प्राह हनूमन्तमुपस्थितम् ।
शृणु तत्त्वं प्रवक्ष्यामि ह्यात्मानात्मपरात्मनाम् ॥ ४४ ॥
आकाशस्य यथा भेदस्त्रिविधो दृश्यते महान् ।
जलाशये महाकाशस्तदवच्छिन्न एव हि ।
प्रतिबिम्बाख्यमपरं दृश्यते त्रिविधं नभः ॥ ४५ ॥
बुद्ध्यवच्छिन्नचैतन्यमेकं पूर्णमथापरम् ।
आभासस्वत्परं बिम्बभूतमेवं त्रिधा चितिः ॥ ४६ ॥ 
साभासबुद्धेः कर्तृत्वमविच्छिन्नेऽविकारिणी ।
साक्षिण्यारोप्यते भ्रान्त्या जीवत्वं च तथाऽबुधेः ॥ ४७ ॥
आभासस्तु मृषाबुद्धिरविद्याकार्यमुच्यते ।
अविच्छिन्नं तु तद्ब्रह्म विच्छेदस्तु विकल्पतः ॥ ४८ ॥
अवच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते ।
तत्त्वमस्यादिवाक्यैश्र्च साभासस्याहमस्तथा ॥ ४९ ॥
ऐक्यज्ञानं यदोत्पन्नं महावाक्येन चात्मनोः ।
तदाऽविद्या स्वकार्यैश्र्च नश्यत्येव न संशयः ॥ ५० ॥
एतद्विज्ञाय मद्भक्तो मद्भावायोपपद्यते ।
मद्भक्तिविमुखानां हि शास्त्रगर्तेषु मुह्यताम् ।
न ज्ञानं न च मोक्षः स्यात्तेषां जन्मशतैरपि ॥ ५१ ॥
इदं रहस्यं हृदयं ममात्मनो,
मयैव साक्षात्कथितं तवानघ ।
मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया, 
दातव्यमैन्द्रादपि राज्यतोऽधिकम् ॥ ५२ ॥
श्रीमहादेव उवाच 
एतत्तेऽभिहितं देवि श्रीरामहृदयं मया ।
अतिगुह्यतमं हृद्यं पवित्रं पापशोधनम् ॥ ५३ ॥
साक्षाद्रामेण कथितं सर्ववेदान्तसंग्रहम् ।
यः पठेत्सततं भक्त्या स मुक्तो नात्र संशयः ॥ ५४ ॥
ब्रह्महत्यादिपापानि बहुजन्मार्जितान्यपि ।
नश्यन्त्येव न सन्देहो रामस्य वचनं यथा ॥ ५५ ॥
योऽतिभ्रष्टोऽतिपापी परधनपरेदारेषु नित्याद्यतो वा 
स्तेयी ब्रह्मघ्नमातापितृवधनिरतो योगिवृन्दापकारी ।
यः सम्पूज्याभिरामं पठति च हृदयं रामचन्द्रस्य भक्त्या
योगीन्द्रैरप्यलभ्यं पदमिह लभते सर्वदेवैः स पूज्यम् ॥ ५६ ॥
॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्र्वरसंवादे बालकाण्डे 

श्रीरामहृदयं नाम प्रथमः सर्गः ॥
मराठी अर्थः 
१) पृथ्वीचा भार निवारण करण्यासाठी ज्या चिन्मय परमात्म्याची देवांनी प्रार्थना केली, असा तो अव्यय परमात्मा या पृथ्वीतलावर मायेच्या योगे सूर्यवंशामध्ये मनुष्य रुपांत अवतरला. राक्षसांचा समूळ नाश करणारा अशी शाश्र्वत कीर्ति संपादन करणारा, जगांतील सर्व पाप निश्र्चयाने हरण करणारा तो जानकीचा ईश्र्वरच असा श्रीराम पुन्हा मूळ अशा ज्ञानस्वरुपात, तसेच निर्विकार अशा ब्रह्मस्वरुपांत जाऊ शकतो त्या श्रीरामाला मी भजतो.
२) विश्र्वाच्या उत्पत्ति, स्थिती आणि लय अशा सर्व अवस्थांचे एकमेव कारण असलेला, मायेचा आश्रय असणारा परंतु मायेत न गुंतणारा ज्याच्या मूळस्वरुपाचे चिंतन करणे अशक्य असलेला, आनंदरुप, निर्मल आणि आत्मस्वरुपाचा बोध हाच ज्याच्या स्वरुपाचा बोध आहे असा तो सीतापति श्रीराम, जो स्वस्वरुपाला जाणणारा व जाणवणारा आहे त्या श्रीरामाला मी वंदन करतो.
३) जे कोणी अनन्य अशा एकाग्र भावाने हे ' अध्यात्म ' असे नाव प्राप्त झालेले मंगलकारक आणि सर्व पुराणांना संमत असलेले रामायण श्रवण करतात किंवा वाचतात त्यांची सर्व पापे नष्ट होऊन ते हरिपदाला प्राप्त होतात. 
४) जो मनुष्य भवबंधनातून मुक्त होण्याची इच्छा करीत असेल त्याने ह्या अध्यात्म रामायणाचे नित्य पठण करावे. त्याचप्रमाणे जो याचे श्रवण करील त्याला सहस्त्रायुत कोटी गोदानाचे फल प्राप्त होईल.
५) त्रिपुराचा अरि म्हणजे शत्रु असलेला भगवान शंकर  त्या शंकररुपी पर्वतापासून उगम पावलेली व श्रीरामरुपी समुद्राला मिळणारी अध्यात्मरामायणाची गंगा त्रिभुवनाला पवित्र करणारी आहे.     
६) एकदा कैलास पर्वताच्या शिखरावर प्रकाशमान् अशा आपल्या मंदिरात रत्नजडित आसनावर ध्यानस्थ बसलेल्या, सिद्ध समुदायाने सेवित असलेल्या, सर्व पापांचा नाश करणार्‍या आणि आनंदाचा गाभा असलेल्या त्रिनेत्रधारी भगवान शंकरांना त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली पर्वतश्रेष्ठ हिमालयाची कन्या पार्वती नम्रपणे भक्तिभावाने म्हणाली-
७) पार्वती म्हणाली, हे देवा ! मी तुला नमन करते. अखिल जगतात भरुन राहिलेला आणि सर्वामध्ये आत्मरुपाने पाहता येणारा असा तू परमेश्र्वरच आहेस. तू स्वतः सनातन असल्यामुळे मी तुलाच त्या सनातन पुरुषोत्तमाचे तात्विक स्वरुप विचारते.   
८) हे परब्रह्माचे स्वरुप अत्यतं गुप्त आहे. परंतु तरी देखील महानुभाव असे साधुपुरुष ते आपल्या भक्तांना सांगतात. हे देवा, मी आपली भक्त आहे. आपण मला अत्यंत प्रिय आहात. म्हणून आपण मला ते सांगा.    
९) मी स्त्री आहे. तेव्हा ज्यामुळे सामान्य लोक (संसार सागरांतून) तरुन जातात. असे ते वैराग्य आणि भक्तियुक्त तसेच अनुभवास येणारे ज्ञान आपण मला थोडक्यांत परंतु स्पष्टपणे आणि मला समजेल अशा प्रकारे सांगा.    
१०) हे कमलनेत्र श्री शंकरा दुसरी एक रहस्यपूर्ण गोष्ट मी आपणास विचारते ती आपण मला प्रथम सांगा. सर्व गोष्टींचे सारच असलेल्या श्रीरामचंद्राच्या ठायी दृढ भक्ति ठेवणे हीच भवसागर तरुन जाण्याची प्रसिद्ध नौका होय.
११) संसारांतून मुक्त होण्यासाठी भक्ती हेच प्रसिद्ध साधन आहे. दुसरे कोणतेही नाही. तथापि माझ्या हृदयांत जे संशयाचे बंध आहेत त्यांची आपल्या भाषणाने उकल करा.
१२) श्रीराम हाच सर्वांचे आदिकारण व सर्व श्रेष्ठ आहे. मायेमुळे निर्माण होणार्‍या गुणप्रवाहाचा त्यानेच निरास केला आहे, असे त्याच्या विषयी सांगतात. रात्रंदिवस त्याचे जे भजन करतात ते ज्ञानी सिद्ध पुरुष परमपदाला जाऊन पोचतात.
१३) काहीजण असे म्हणतात की श्रीराम हा सर्वश्रेष्ठ ज्ञानी असूनही त्याचे आत्मस्वरुप स्वतःच्याच मायारुपी अविद्येने वेष्टिले गेल्यामुळे तो ते स्वतः ही जाणत नव्हता. म्हणून गुरुने त्या संदर्भांत त्याला उपदेश केल्यानंतरच त्याला स्वतःच्या श्रेष्ठ अशा परमात्म स्वरुपाची ओळख झाली.      
१४) त्याला जर स्वस्वरुपाचे ज्ञान होते तर त्याने सीतेसाठी शोक का केला ? तेव्हा ज्ञान नव्हते म्हणावे तर इतर (सर्व सामान्य) जीवांप्रमाणे त्याची योग्यता नव्हे का ? मग त्याची सेवा कुणी का करावी ?
१५) या माझ्या प्रण्नाचे जे उत्तर आपणास ठाऊक असेल आणि जे सांगण्यामुळे माझा संशय नाहीसा होईल ते आपण मला सांगावे.
१६) यावर श्री महादेव म्हणाले, ब्रह्मस्वरुप राम तत्त्व जाणून घेण्याची ज्याअर्थी तुला इच्छा झाली आहे, त्या अर्थी तू खरोखरच धन्य आहेस. त्या परमात्म्याची तू श्रेष्ठ अशी भक्त आहेस. कारण यापूर्वी हे अत्यंत गूढ रहस्य सांगण्यासाठी कुणीही मला प्रश्र्ण विचारला नव्हता.
१७) परंतु तू आज मला भक्तिभावाने विचारले आहेस म्हणून त्या रघुत्तमाला नमस्कार करुन मी हे रहस्य तुला सांगतो. राम हा परमात्माच असून तो अनादि, आनंदरुप असा पुरुषोत्तम आहे.
१८) स्वतःच्या मायेने ही सर्व सृष्टी निर्माण करुन आकाशाप्रमाणे आत बाहेर राहणारा तो सर्वांच्या अंतर्यामी असूनही गुप्तच असतो व आपल्या मायेने निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहत असतो. 
१९) लोहचुम्बकाच्या सान्निध्यात असलेले जग अनेक ब्रह्मांडे ह्याच्या भोवती फिरत असते. परंतु अज्ञानी मनुष्याला हे समजत नाही. कारण त्याच्या अंतःकरणावर अविद्येचे आवरण पडलेले असते.
२०) पुत्रादिकांच्या ठिकाणी आसक्त झालेले आणि विविध कर्मांत बुडालेले ते लोक निर्मल, ज्ञानी आणि केवळ परमेश्र्वरुप अशा त्याला ओळखत नाहीत. व संसार करीत राहतात.
२१) ज्याप्रमाणे अज्ञ व्यक्तीला स्वतःच्या गळ्यातील सुवर्णालंकाराचे भान नसते, त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या हृदयांत असलेल्या रामाला जाणता येत नाही. ज्याप्रमाणे तेजस्वी सूर्याच्या ठिकाणी अंधःकार राहणे शक्य नाही. त्याचप्रमाणे तेजोरुप, निर्मल आणि ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण अशा प्रत्यक्ष परमात्मरुप श्रीरामाच्या ठिकाणी अज्ञान कोठून असणार ?
२२) जसे, स्वतः भोवती फिरताना मनुष्याला बाजूची घरे इत्यादीही सर्वच फिरल्यासारखे दिसते, अगदी तसेच, शरीर आणि इंद्रिये ह्यांच्या ठिकाणी गुंतून पडल्यामुळे आत्म्याकडून केले जाणारे कर्म
परमात्म्यावर आरोपिले गेल्यामुळे प्राणी मोहित होतात.
२३) प्रकाशरुप सूर्याच्या ठिकाणी दिवस वा रात्र कधीच नसतात. कारण त्याचे प्रकाशरुप कधीच नष्ट होत नाही. अगदी त्याचप्रमाणे शुद्ध ज्ञानाने संपन्न असलेल्या व संकटे हरण करणार्‍या श्रीरामाच्या ठिकाणी ज्ञान अथवा अज्ञान दोन्हीही राहत नाहीत.
२४) त्यामुळे परमानंदरुप आणि शुद्ध ज्ञानस्वरुप, अज्ञानरुप मायेचा केवळ साक्षी असलेला जो कमलनयन श्रीराम त्याच्या ठिकाणी मोह उत्पन्न करणारे अज्ञान, तो स्वतःच मायेचा आश्रय असल्यामुळे राहतच नाही.
२५) आता या ठिकाणी मोक्षप्राप्तीला साधनभूत होणारा अत्यंत दुर्लभ असा सीता, रामचंद्र आणि वायुपुत्र हनुमान यांचा रहस्यमय संवाद मी तुला सांगतो.
२६-२७) रामायणकाली देवांचा शत्रु रावणाचा श्रीरामाने वध रणांगणामध्ये त्याच्या पुत्रासह केला व सीता, सुग्रीव, लक्ष्मण तसेच हनुमान वगैरेंसह अयोध्येला पोहोचला.
२८) त्यानंतर वसिष्ठादि महान् ऋषींकडून अभिषेक केल्यानंतर कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी श्रीराम अनेक मंडळीनीं वेष्टित अशा सिंहासनावर बसला.
२९-३०) त्याप्रसंगी त्याने अनेक कार्ये पार पाडली. परंतु ज्याला ज्ञानप्राप्तीखेरीज अन्य कशाचीच अपेक्षा नाही, असा महा बुद्धिवान हनुमान समोर हात जोडून उभा राहिलेला पाहून श्रीराम सीतामाईला म्हणाला (हे सीते) आता तू या हनुमंताला सत्तत्वाचा उपदेश कर. हा ज्ञानोपदेश घेण्याला (पूर्णतः) पात्र असून आम्हा दोघांचीही भक्ती करणारा तसेच निष्कलंक व निष्पाप आहे.
३१) त्यावर ' ठीक आहे', असे म्हणून, लोकांच्या मनाला मोहित करणारी सीता, हनुमंताला श्रीरामाचे सत्यस्वरुप निश्र्चितपणे समजेल अशा प्रकारे सांगू लागली. 
सीतोवाच
३२) (त्यावेळी) सीता म्हणाली, (हे हनुमंता) सच्चिदानंदस्वरुप तसेच अद्वितीय, सर्व उपाधीपासून पूर्णपणे मुक्त सत्तारुपाने सर्वत्र व्यापून असणारे तसेच कोणत्याही इंद्रियाला न समजणारे असे जे ब्रह्मतत्त्व तेच श्रीरामाचे (सत्य) स्वरुप आहे. 
३३) तो श्रीराम आनंदस्वरुप, निर्मल (शुद्ध) शांत, निर्विकार अज्ञान व माया रहित, सर्वांना व्यापून असणारा, स्वयंप्रकाशी आणि निष्पाप आहे असे जाण.
३४) मी आदिमाया असून उत्पत्ति, स्थिती व लय करणारी अशी आहे. केवळ त्याच्या सान्निध्यानेच हे विश्र्व मी निर्माण करते.
३५-४२) त्याच्या सान्निध्यात हे जग मी निर्माण केले असूनही अज्ञानी लोकांकडून त्याचे कर्तृत्व, त्याच्या सान्निध्यामुळे त्याच्या ठायीच आरोपिले जाते. अयोध्या नगरीत अति निर्मल अशा रघुवंशात जन्म घेणे; विश्र्वामित्रांना सहाय्य करणे, यज्ञाचे रक्षण करणे, श्री शिवाच्या धनुष्याचा भंग करणे, माझ्याशी विवाह करणे, परशुरामाचा गर्व हरण करणे, त्याचप्रमाणे अयोध्या नगरींत माझ्यासह बारा वर्षे वास करणे, दण्डकारण्यांत जाणे, विराधाचा वध करणे, त्याचप्रमाणे मायावी मारिचाचे मरण, (आणि) मायेने निर्माण केलेल्या सीतेचे हरण, जटायु त्याचप्रमाणे कबंधाला मोक्षाचा लाभ,
शबरीकडून झालेले पूजन, नंतर सुग्रीव भेट, वालीचा वध, त्यानंतर सीतेचा शोध, समुद्रावर सेतु बांधणे, लंकेला वेढा, पुढे युद्धांत दुष्ट रावणाचा त्याच्या पुत्रांसह वध, बिभीषणाला (लंकेच्या) राज्याचे दान, नंतर माझ्यासह पुष्पक विमानातून अयोध्येस आगमन, त्यानंतर रामाला राज्याभिषेक अशा सर्व गोष्टी माझ्याकडूनच घडविल्या गेल्या आहेत. पण या सर्व गोष्टींचे कर्तृत्व सर्वांच्या अंतरांत असलेल्या विकाररहित अशा श्रीरामाच्या ठायीच लोकांकडून आरोपिले जाते. 
४३) (खरे तर ) श्रीराम चालत नाही, उभा राहत नाही, कशाचाही शोक करीत नाही. किंवा कोणत्याही गोष्टीची इच्छा करीत नाही वा कशाचाही त्याग करीत नाही अगर काहीच करीत नाही. तो आनंदरुप, अढळ, परिणाम शून्य असा आहे. परंतु मायेने निर्माण होणार्‍या गोष्टींना तो आधारभूत असल्याने तो तसा (सृष्टीरुप) भासतो.
४४) श्रीमहादेव म्हणाले: त्यानंतर श्रीराम जवळ असलेल्या हनुमन्ताला म्हणाला, ' हे पहा, मी आता आत्मा अनात्मा आणि परमात्मा (म्हणजेच ईश्र्वर, जीव आणि शुद्ध चैतन्न्य) ह्यांचे तत्त्व काय आहे ते तुला सांगतो.
४५-४६) आकाशाचे ज्याप्रमाणे तीन भेद दिसतात. जसे मोठे आकाश, जलाशयात मर्यादित झालेले आकाश आणि पाण्यात प्रतिबिंबीत झालेले आकाश असे तीन प्रकारचे आकाश दिसते. तसेच बुद्धिरुपी उपाधीने युक्त असे चैतन्य (म्हणजे ईश्र्वर), त्याचप्रमाणे प्रतिबिंबरुपी चैतन्य (म्हणजे जीव), आणि बिंबभूत (आधारभूत) असे चैतन्य (शुद्ध चैतन्य) असे चैतन्याचे तीन प्रकार आहेत.
४७) चैतन्याच्या आभासाने युक्त अशा बुद्धीचे वा अंतःकरणाचे कर्तृत्व तसेच जीवत्व हे अज्ञानी जन केवळ भ्रांतीमुळे साक्षीभूत मर्यादातीत आणि अविकारी अशा शुद्ध चैतन्यावर आरोपित करतात.
४८) आभास याचा अर्थ प्रतिबिंब. हे खरोखर मिथ्या (खोटे) ज्ञानच होय. ते अविद्येमुळे उत्पन्न होते. खरे तर मूळ ब्रह्म भेदरहित आहे. तरीपण त्याच्या ठिकाणी अज्ञानामुळे वा भ्रमामुळे भेद दिसतो.
४९) अशा चैतन्याच्या ठायी भेद उत्पन्न झाला असता आभास वा प्रतिबिंबयुक्त जीवाचे ' तत् त्वम् असि ' (ते तूच आहेस) अशा प्रकारच्या महावाक्यांनी शुद्ध चैतन्याशी ऐक्य प्रतिपादन केले जाते.
५०) ' तत्वमसि ' या महावाक्याच्या योगाने जीव आणि शिव यांचे ऐक्य समजून आले की मग अविद्या (म्हणजेच अज्ञान) आपल्या कार्यासहित त्वरित नष्ट पावते, यात काहीही संशय नाही.
५१) ही गोष्ट जाणल्याने माझा भक्त माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो. परंतु माझ्या भक्तीपासून दूर असणार्‍यांना शास्त्ररुपी गर्तेत (म्हणजेच खड्ड्यात) मोहाच्या योगे पडल्यामुळे शेकडो जन्म घेऊन देखील ज्ञान अथवा मोक्ष मिळणार नाही.
५२) (हे हनुमन्ता) माझ्या स्वरुपासंबंधीचे हे गुप्त रहस्य (म्हणजेच रामहृदय) मी तुला सांगितले आहे. याची योग्यता इंद्राच्या राज्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळेच ज्यांची माझ्यावर भक्ती नाही अशा शठाला ह्याचा उपदेश तू करु नकोस.
५३) श्रीमहादेव म्हणालेः हे देवी पार्वती, मी तुला हे अत्यंत गुप्त, मनोहर, पवित्र आणि पापांचा नाश करणारे असे ' श्रीरामहृदय ' आता सांगितले आहे.
५४) साक्षात् श्रीरामानेच सांगितलेल्या सर्व वेदांतील सिद्धान्तांचे सार असलेल्या ह्या रामहृदयाचे, जो भक्तिपूर्वक नित्य पठणकरील, तो मुक्त होईल ह्यांत संशय नाही. 
५५) त्यामुळे ब्रह्महत्यादि पापें किंवा पूर्वींच्या अनेक जन्मांमध्येकेलेली पापे देखील निःसंदेह नाश पावतील असे स्वतः श्रीरामाचे वचन आहे. 
५६) अत्यंत भ्रष्ट,अत्यंत पापी, परधन आणि परस्त्री ह्यांचे हरण करण्यास नित्य उत्सुक असणारा, चोरी करणारा, ब्रह्महत्या वा मातापित्यांचा वध करण्यास सिद्ध असणारा,सांधूना अपकार किंवा पीडा कणारा, असा कोणीही असो, तो जरश्रीरामाची पूजा करुन आणि भक्तिपूर्वक ह्या रामहृदयाचे पठण करील तर श्रेष्ठ योग्यांनाही दुर्लभ आणि सर्व देवांना पूज्य अशा त्या ब्रह्मपदाला जाईल. 
ShriRam Hrudaya 
श्रीराम हृदय


Custom Search

No comments:

Post a Comment