Friday, March 18, 2016

Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) भाग १/२


Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32 
Goraksha and Machchhindra were performing thirtyatra and came to Prayag. King Trivikram had died and people were very sad. Hence they decided to make alive king again. Machchhindra entered in to the body of king. People were very happy. Goraksha took the help of the lady looking after the temple; kept Machchhindra's body into the cave. Queen Revati had a male child from Machchhinda. Once she came in the temple. She knew that Machchhindra's body in the cave and he had entered into the body of king Trivikram. One knight she with the help of two solders broke down the body of Machchhindra into pieces and thrown in to the forest. Uma (wife of God Shiva) came to know about this and as per the order of God Shiva, She asked Chamundas to collect the pieces of the Machchhindra's body and kept on the Kailas under protection of Virabhadra. After 12 years Goraksha came to Prayag. What happens next will be told to us by Dhundisut Malu in the next 33rd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय जगुद्धारा । जगदाश्रिता रुक्मीणीवरा ।
दीनबंधो दयासागरा । वीर सुरवर तूं एक ॥ १ ॥
तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वां । सुरवरांप्रती जैसा मधवा (इंद्र) ।
तरी आतां कृपार्णवा । ग्रंथादरीं येईंकां ॥ २ ॥
मागिले अध्यायीं कथन । चौरंगी बैसे तपाकारण ।
उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन । गिरनारगिरीं पोचलें ॥ ३ ॥
पोंचलें परी आनंदभरित । प्रेमें वंदिला मच्छिंद्रनंदन । 
पुढें पाहतांचि अत्रिसुत । आनंदडोहीं बुडाला ॥ ४ ॥
मच्छिंद्रातें कवळूनि हृदयीं । म्हणे माझी आलीस गे आई ।
चक्षु मीनले (डोळे लागले ) तुझे ठायीं । मार्ग पाहें पाडसापरी ॥ ५ ॥
जैसें इंदूचें आगमन । तिकडेचि हेलावे समुद्रजीवन ।
तेवीं तुझें मार्गेंकरुन । चक्षू वेधले माझे बा ॥ ६ ॥
तरी आतां असो कैसें । माझें मला भेटलें पाडसें । 
तरी वत्सा सांडूनि आम्हांस । जाऊं नको पुढारां ॥ ७ ॥
ऐसी धृति वृत्ती मती । ऐक्य झाली उभयव्यक्ती ।
जैसें जळ जळाप्रती । ऐक्य होय मेळवितां ॥ ८ ॥
मग नाना गोष्टी विचारप्रसंग । तीर्थगमनादि योगसंयोग ।
दुःखसुखादि सकळ प्रयोग । एकमेकां निवेदिलें ॥ ९ ॥
आसन वसन भोजन शयनीं । सदा सन्निध मच्छिंद्रमुनी ।
जैसी अर्भका तान्हुले मनीं । माय नातळती होईना ॥ १० ॥ 
ऐसे मोहाचिये परी । षण्मास लोटले तैं गिरीं ।
यावरी गोरक्ष सदनांतरी । तीर्थस्थानीं जल्पतसे ॥ ११ ॥
मग तो श्रीदत्ताकारण । म्हणे महाराजा अत्रिनंदन ।
तीर्थ केलें साधुदर्शन । करावया महाराजा ॥ १२ ॥
तरी आम्हां आज्ञा द्यावी । आतां लंघूनि येतों मही ।
मही धुंडाळिल्या संगमप्रवाहीं । साधु मिरवीती महाराजा ॥ १३ ॥
तरी याचि निमित्ताकारणें । आम्हीं घेतला आहे जन्म ।
सकळ जगाचें अज्ञानपण । निवटावया महाराजा ॥ १४ ॥
ऐसें बोलतां गौरसुत । दत्त ग्रीवा तुकावीत ।
आणि पुढील जाणूनि भविष्यार्थ । अवश्य म्हणे पाडसा ॥ १५ ॥
मग परमप्रीतीं स्नेहेंकरुन । बोळवितां झाला उभयांकारण ।
येरीं उभयें करुनि नमन । पर्वताखालीं उतरले ॥ १६ ॥
मार्गीं चालता उभय जण । परी त्या पर्वता क्षणोक्षण ।
पाहे मच्छिंद्रनंदन । म्हणे प्राण अंतरला ॥ १७ ॥
प्रेमाश्रु ढाळी नयनीं । पुढें ठेवा पदलागुनी ।
ऐसें चालता तया अवनीं । दुरदुरावा पडला असे ॥ १८ ॥
मग धरुनि काशीपुरी । चालते झाले ते अचसरीं ।
मुक्कामोमुक्काम लंघितां धरित्री । प्रयागस्थानीं पातले ॥ १९ ॥
तों त्या गांवीं मूर्तिमंत । औदार्यराशि प्रतापादित्य ।
त्रिविक्रम नामें नृपनाथ । धर्मप्राज्ञी नांदतसे ॥ २० ॥
गज वाजी रथ संगतीं । जयाची सेना अपरिमिती ।
तरी अधर्मनाशार्थ निगुतीं । सैन्यसिंधु मिरवला ॥ २१ ॥
भद्रासनीं तो राजेश्र्वर । जयाची संपत्ति औडंबर (अपरंपार ) ।
पाहुनि लाजती अमर । हा एक प्रभु म्हणती ते ॥ २२ ॥
ऐसियेपरी राजसंपत्ती । परी उदरीं नाहीं संतती ।
तैशांत देहीं जरा निगुती । प्राप्त झाली बळत्वें ॥ २३ ॥
परी तो राजा सुगम प्राज्ञ । परोपकारी अपार ज्ञान ।
मूर्तिमंत जयाचें संधान । पाळीत असे नेटका ॥ २४ ॥
याचे राज्यांत बावन्न वर्ण । कोणी न देखों अकिंचन ।
संत आलिया करिती पूजन । सकळ जगीं मिरवतसे ॥ २५ ॥
चौदा विद्यांमाजीं कुशल । जैसा दुसरा मूषकपाळ ।
हीनदीनांची माय कनवाळ । आणि काळ तत्काळ शत्रूचा ॥ २६ ॥
सकळ गृहीं देशावर । त्या राजाचा परोपकार ।
त्यामुळें मिरवती सकळ नर । चिंताविरहित सुखानें ॥ २७ ॥
असो ऐसे तेजस्थितीं । तया देशीं-पावले निगुतीं ।
तेथें सकळ नारीनर क्षितीं । विजयवचनीं गहिंवरले ॥ २८ ॥
यापरी तयाची गृहस्वामिणी । जिये मिरविती ज्ञानखाणी ।
पतिव्रता सौदामिनी । षडर्णवगुणी गुणस्वी ॥ २९ ॥
कीं राव तों उत्तम धवळार । तैं दिसती ती स्तंभाकार ।
कीं संसारमहीचा हांकणार । अनंतरुपीं नटलासे ॥ ३० ॥
ऐसेपरी राजयुवती । परी जरा पाहूनि राजाप्रती ।
तेणें भयार्त होऊनि वित्तीं । चिंतेमाजी पडली असे ॥ ३१ ॥
म्हणे रायाचें सकळ अवसान । जिंकूनि नेलें आहे जरेनें ।
नेणो दिवस येईल कोण । संगतीसी सोडावया ॥ ३२ ॥ 
ऐसी चिंता व्यापिली चित्तीं । तो रायासी भरली आयुष्यभरती ।
तप्त शरीरीं पाहुनि वृत्ती । गमन करी परत्र ॥ ३३ ॥
प्राण सांडूनि शरिरातें । गेला असे निराळपंधरणथें ।
महीं उरलें असे प्रेत । झाला आकांत राज्यांत ॥ ३४ ॥
पवित्रनामी रेवती ललना । अट्टहास करी शोकरुदना ।
तेचि रीतीं इतर जनां । दुःखप्रवाह लोटला असे ॥ ३५ ॥
आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुण । परम विलापें आक्रंदती जन ।
म्हणती पुनः या रायासमान । होणार नाहीं दूसरा ॥ ३६ ॥
ऐसे अट्टहासें घरोघरीं जन । नारीनरादिदुःखसंपन्न ।
तये संधींत गांवीं येऊन । नाथ तेथे पातले ॥ ३७ ॥
क्षेत्र महान प्रयागस्थान । उभय संचरती त्याकारण ।
तों गृहोगृहीं दुःखनिमन्न । शोकाकुलित मिरवले ॥ ३८ ॥       
कोणी शरीर टाकीत अवनीं । कोणी पडले मूर्च्छा येउनी ।
कोणी योजूनि हृदयीं पाणी । धबधबां पिटिती ते ॥ ३९ ॥
कोणीं येऊनि पिशाचवत । इकडूनि तिकडे धांव घेत ।
अहा म्हणूनि शरीरातें । धरणीवरी ओसंडिती ॥ ४० ॥
कोणी धरणीवरी आपटिती भाळ । रुधिरव्यक्त करुनि बंबाळ ।
अहा त्रिविक्रमराव भूपाळ । सोडूनि गेला म्हणताती ॥ ४१ ॥
ऐसियेपरी एकचि आकांत । नारीनरादि बोलती समस्त ।
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । परम चित्तीं कळवळला ॥ ४२ ॥
सहच चालतां तेथ पंथ । ठायीं ठायीं उभा राहत ।
त्या रायाचे गुण समस्त । आठवूनि रडताती ॥ ४३ ॥
धर्मज्ञानिक रायाचे गुण । मोहकपणीं होतां श्रवण ।
तंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदन । मोहदरींत रिघतसे ॥ ४४ ॥
मनांत म्हणे धन्य पुरुष । जयासाठी जग पिसें ।
जाहलें आहे तस्मात् यास । राव उपकारी वहिवटला ॥ ४५ ॥
तरी हा ऐसा भलेपणीं । राव मिरवला आहे अवनीं ।  
तरी यातें पुनः आणोनी । देहगत (जिवंत) करावा ॥ ४६ ॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत । पाहे रायाचें आयुष्य भरत ।
तंव तो राव तितुकियांत । निरामयीं पोंचला ॥ ४७ ॥
राव नुरलासे जीवितपणीं । मिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यीं ।
ऐसें देखतां अजीवितपणीं । मग उपाय ते हरले ॥ ४८ ॥
कीं मुळींच बीजा नाहीं ठाव । मग रुखपत्रीं केवीं हेलाव (झाडांच्या पानांचे हलणें) ।
तेवीं जिवितपणीं राणीव । नातुडपणीं उतरलीसे ॥ ४९ ॥
मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदन । परतता झाला ग्रामांतून ।
परी मच्छिंद्राहूनि गौरनंदन । कलवळला स्वचित्तांत ॥ ५० ॥
राज्यभागीं जगाचें बोलणें । ऐकूनियां गौरनंदनानें ।
मोहे चित्तस्फोट होऊन । अश्रु ढाळी नयनातें ॥ ५१ ॥
ऐसें स्थितीं ग्रामांतून । निघते झाले उभय जण ।
तो ग्रामाबाहेर निवांत काननीं । शिवालय देखिलें ॥ ५२ ॥    
तें पाहूनि एकांतस्थान । जाते झाले तयाकारण ।
तों पलीकडे मोहक जन । प्रेतसंस्कार मांडिला ॥ ५३ ॥ 
प्रेत स्कंधीं वाहूनि चतुर्थ । येते झाले शिवालयांत । 
सवें अपार जन वेष्टित । शोकसिंधु उपासिती ॥ ५४ ॥
परी आकळीकपणें वंचना । शोकसिंधूची दावी भावना ।
परम आटूनि आपुल्या प्राणा । प्रेतालागीं कवटाळिती ॥ ५५ ॥
यापरी गांवोगांवींचे जन । तेही ऐकूनि वर्तमान । 
धांव घेती आक्रोशपणें । आप्तजनांसारिखे ॥ ५६ ॥
तें पाहूनियां गोरक्षनाथ । परम कळवळूनियां चित्तांत ।
बोलता झाला मच्छिंद्रातें । ऐशा पुरुषा उठवावें ॥ ५७ ॥
मच्छिंद्र ऐकूनि तयाची वाणी । उगाचि बैसें म्हणे तयालागुनी ।
परी स्थिर नोहे गोरक्षमुनी । पुन्हां वागुत्तर देतसे ॥ ५८ ॥
म्हणे जरी तुम्ही न उठवाल यातें । तरी मी उठवीन स्वसामर्थ्यें ।
मच्छिंद्र म्हणे तुझें सामर्थ्य । त्यासी उठवावया नसे कीं ॥ ५९ ॥
ऐसें ऐकूनि गोरक्ष वदत । म्हणे याच्यासाठीं वेंचीन जीवित ।
परी सुखी करीन सकळ जनांतें । निश्र्चयेंसीं महाराजा ॥ ६० ॥
जरी न उठवे माझेनि राजा । तरी अग्नींत ओपीन शरीर ओजा ।
हाचि सिद्धार्थ पण माझा । निश्र्चयेंसीं वरिला असे ॥ ६१ ॥
जरी ऐसिया बोला संमत । जरी मातें न घडे नाथ ।
तरी रौरव भोगीन कोटि वर्षांत । कुंभीपाक महाराजा ॥ ६२ ॥
ऐसें बोलता दृढोत्तरवचन । मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन ।
अहा वत्सा शोधाविण । व्यर्थ काय वदलासी ॥ ६३ ॥ 
सारोखपणें (जीवावर उदार होऊन) केलासी पण । राव उतरला जीवित्वें करुन ।
ब्रह्मरुपीं सनातन । ऐक्यरुपीं मेळ झालासे ॥ ६४ ॥
ऐसें बोलतां वसुआत्मज । मग तो गोरक्षमहाराज ।
हृदयीं शोधितां तेंचि ओज । लक्षापरी भासलें ॥ ६५ ॥
मग म्लान करुनि आपुलें वदन । म्हणे आतां अग्नि घेईन ।
मग प्रत्योदक तेथूनि उठून । काष्ठांलागीं मेळविलें ॥ ६६ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । परम झाला भयभीत ।
चित्तीं म्हणे हा प्राणांतें । चुकणार नाहीं द्यावया  ॥ ६७ ॥
जेणें वडे आणायाकरितां । चक्षु काढुनि आपुलें हाता ।
तोषविली विप्रकांता । निवरगट्ट (निगरगट्ट) हा असे ॥ ६८ ॥
मग पाचारुनि गोरक्षांतें । बोलता झाला प्रांजळवंत । 
म्हणे बा रे सुखी करावें जनांतें । यालागीं वदलासी ॥ ६९ ॥
तरी जनांचे उपकारास । उदार झालासी प्राणास ।
चित्तीं तुझे समाधानास । विचार एक ऐकावा ॥ ७० ॥
मी याचे देहस्थित । होतों रक्षाया तुझा हेत ।
परी बा माझिया शरीरास । द्वादश वर्षें सांभाळीं ॥ ७१ ॥
द्वादश वर्षें जाहलिया पूर्ण । पुन्हां देहांतर्गत होऊन ।
सकळ जगाचें करुं कल्याण । उपकारीं मिरवेन बा ॥ ७२ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । अवश्य गोरक्षक म्हणत ।
मग शीघ्र सांडूनि शरीरातें । रायशरीरीं संचरला ॥ ७३ ॥
संचरला परी स्मशानमहीं । उठोनि बैसला राजदेहीं ।
तें पाहोनियां लोक सर्वही । आनंदसरिते मिरवले ॥ ७४ ॥
जैसा पक्षियें सांडिला ठाव । मिरवे वृक्षा अन्य वाव ।
तेवीं देहातें सांडूनि बरवें । रावदेहीं संचरला ॥ ७५ ॥   
लोक म्हणती आम्हां प्रजेकारण । मोहे वेष्टिलें हरिहरांचे मन ।
म्हणोनि होऊनि सुप्रसन्न । रायालागीं जीवविलें ॥ ७६ ॥
एक म्हणती आयुष्य होतें । काळें हरण केलें जीवंत ।
चुकारपणीं समजूनि मागुतें । जीवविलें रायातें ॥ ७७ ॥
असो ऐशा बहुधा प्रकरणीं । आनंद वदतसे जगाची वाणी ।
मग ते परम हर्षेंकरुनी । स्वस्थानातें पावले ॥ ७८ ॥
विधिवत् कनकाचा पुतळा करुन । स्मशानक्रिया संपादून ।
पाहते झाले आपुलें स्थान । अप्तजनांसमवेत ॥ ७९ ॥
येरीकडे शिवालयांत । सच्छिष्य महाराजा गोरक्षनाथ ।
रक्षावया गुरुचें प्रेत । स्थानालागीं विचारी ॥ ८० ॥
तों तितुक्यांत आली पूजारणी । होती शैवगुरविणी ।
तियेलागीं पाचारुनीं । वृत्तांतातें निवेदी ॥ ८१ ॥
म्हणें मायें रायाकरितां । आणि प्रजेची धरुनि ममता ।
मम गुरु मच्छिंद्र केला सरता (नाहींसा) । राजदेहाकारणें ॥ ८२ ॥
तरी आतां श्रीगुरुचें प्रेत । कवणा ठायीं रक्षूं यातें । 
जरी तुजला आहे माहीत । ठाव मातें सांग कीं ॥ ८३ ॥
ठाव तरी म्हणसील कैसा । गुप्त जगांत न कळे लेशा ।
पूर्ण झाली द्वादश वर्षें । पुन्हां श्रीगुरु उठेल वो ॥ ८४ ॥
तरी तूं ठाव ऐसा मनांत । सांगूनि दृढ रक्षीं प्रेत ।
आणि स्वचित्तीं रक्षूनियां मात । गुप्त जगीं वर्तें वो ॥ ८५ ॥
तरी या कर्मासी साक्षभूत । तुझें माझें उभय चित्त ।
ही गोष्ट कळतां जनांत । परम विक्षेप वाटेल गे ॥ ८६ ॥
तरी आतां चिंतार्णवीं । झालें कर्म वडवानलदेहीं ।
धैर्यजळाचे प्रवाहडोहीं । गुप्त यातें रक्षावें ॥ ८७ ॥
ऐसें बोलतां तपःप्राज्ञी । अवश्य म्हणत शैवराणी ।
मग त्या शिवालयामध्यें नेउनी । गुप्त गुहार दावीतसे ॥ ८८ ॥
तेही गुप्त गुहार जगांत । माहीत नव्हतें किंचितार्थ । 
तें दावूनि गोरक्षनाथ । तुष्ट केला स्वदेहीं ॥ ८९ ॥
मग तें गुहाग्रामींचे मुख । मही विदारुनि पाहे देख ।
उत्तम ठाव लक्षूनि तेथ । प्रेत त्यांत ठेवीतसे ॥ ९० ॥
प्रेत ठेवोनि गुहागृहांत । मुख आच्छादिलें त्वरितात्वरित ।
गृह लक्षूनि पुन्हां आलयांत । येवोनियां बैसला ॥ ९१ ॥
बैसे परी शैवकांता । म्हणे महाराजा गोरक्षनाथा ।
द्वादश वर्षें रक्षीन प्रेता । निश्र्चय त्वां केला असे ॥ ९२ ॥
केला परी बोलें शरीर । कैसें राहील साचोकार ।
एक दिन नव्हे संवत्सर । द्वादश निश्र्चय केला असे ॥ ९३ ॥
ऐशी ऐकूनि तियेचे वाणी । गोरक्ष म्हणे वो शुभाननी ।
चिरंजीव देहालागूनी । मच्छिंद्रनाथ मिरवीतसे ॥ ९४ ॥
तरी हा देह नाशरहित । आहे मायाप्रळयवंत ।
परी ऐसी जगांत मात । प्रविष्ट न करी जननीये ॥ ९५ ॥
ऐसें उत्तर सांगूनि तीतें । उभय चित्तीं मिरवली शांत ।
तों इकडे नृपनाथ । अंतःपुरीं पातला ॥ ९६ ॥
परी तो त्रिकाळज्ञानीं । चांचरा (घाबरटपणा) न घे प्रज्ञेलागूनि ।
जेवीं माहितगार पूर्वींचे सदनीं । राज्यभुवनीं वर्ततसे ॥ ९७ ॥ 
असो गेलिया अंतःपुरांत । रेवती कांता प्रज्ञावंत ।
मंचकीं नेवोनि आपुला नाथ । प्रीतीं आदरें आदरिला ॥ ९८ ॥
स्नान भोजन झालियाउपरी । राव बैसला मंचकावरी ।
अंकीं बैसवोनी सद्गुणलहरी । अनंत वल्गने वदतसे ॥ ९९ ॥
परी जे कांता पुसे त्यातें । तेंहीं प्राज्ञिक प्रांजळ सांगत ।
गुप्त प्रगट वृत्तान्त । उत्तरा उत्तर देतसे ॥ १०० ॥
Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) 


Custom Search

No comments:

Post a Comment