Tuesday, May 10, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 7 ज्ञानविज्ञानयोग अध्याय ७


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 7 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 7 is in Sanskrit. The Name of this 7th Adhyay is Dnyana-Vidnyana-Yoga. There is a doubt in the minds of Arjuna and other seekers that how it is possible to understand the unlimited (knowledge) with a limited mind, they have. In this Adhyay God Krishna is clearing the doubt in the mind of Arjuna and other seekers.
ज्ञानविज्ञानयोग अध्याय ७
श्रीभगवानुवाच
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः । 
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥
मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥
मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्र्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्र्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥
बलं बलवतां  चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्र्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२ ॥
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥
कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥ २७ ॥
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९ ॥
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ: 
श्रीभगवान म्हणाले,
१) हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन लावून आणि माझाच आश्रय करुन योगाभ्यास करीत असतां तू मला निःसंशय व संपूर्णपणे कसें जाणशील तें ऐक.
२) मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णपणें सांगतो. तें जाणल्यावर या लोकीं आणखी कांहीं जाणण्यासारखे उरत नाही. 
३) हजारो माणसांतून एखादाच सिद्धीसाठी झटतो, आणि झटणार्‍या अनेक सिद्धांतून एखाद्यालाच माझे खरे ज्ञान होते. 
४) पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि तसाच अहंकार मिळून माझी प्रकृति आठ प्रकारांनी विभागलेली आहे.
५) अर्जुना, ही माझी जड ( खालच्या प्रतीची ) प्रकृति होय, याशिवाय जिच्या योगानें या जगताचें धारण होते अशी परा ( श्रेष्ठ प्रतीची ) माझी जीवनरुप चेतना प्रकृती आहे, ती समजून घे. 
६) सर्व सृष्ट पदार्थ ह्या माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होतात, म्हणून मीच अखिल जगाचें उत्पत्तिस्थान, तसेच विलयस्थान आहें, असे समज.
७) हे अर्जुना, माझ्याहून श्रेष्ठ अथवा वेगळे असे दुसरे काही नाही. दोर्‍यांत ओविलेल्या अनेक मण्यांप्रमाणे माझ्या ठायीं हे सर्व जग ओविलेले आहे.
८) हे अर्जुना, पाण्यामधील रस मी, चंद्रसूर्यामधील प्रभा मी, सर्व वेदांतला प्रणव म्हणजे ॐकार मी, आकाशांतला शब्द मी आणि पुरुषांमधील पराक्रम मीच आहे. 
९) पृथ्वीवरील उत्तम सुवास मी, अग्नीमधले तेज मी, सर्व प्राणिमात्रांतील जीवनशक्ति मी  व तपस्व्यांमधील तप मीच आहे. 
१०) हे पार्था, सर्व पदार्थांचे अनादि बीज मी आहे असे समज. बुद्धिमंतांची बुद्धि मी व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे. 
११) हे अर्जुना, बलवंतांचे वासना व आसक्तिरहित बल मी आहे. व सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला विरुद्ध न जाणारा काम मी आहे. 
१२) जे जे सात्त्विक, राजस व तामस भाव म्हणजे पदार्थ आहेत, ते ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण. परंतु मी त्यांच्यांत नसून तें मात्र माझ्या आश्रयाने असतात.
१३) या सत्व-रज-तमात्मक पदार्थांनी मोहित होऊन हें सर्व जग, त्यांच्या पलीकडे असणारा ( अर्थात निर्गुण ) अविनाशी असा जो मी ( परमेश्र्वर ) त्याला जाणत नाही.
१४) कारण ही माझी त्रिगुणात्मक अलौकिक माया पार होण्यास कठीण आहे. जे मला शरण येतात तेच ह्या मायेला तरुन जातात.
१५) मायेनें ज्यांचे विवेकज्ञान नष्ट झालें आहे, ते मूढ व दुष्कर्मी  नराधम आसुरी बुद्धीने व्यापिले जाऊन मला भजत नाहीत. 
१६) हे भरतश्रेष्ठा, अर्जुना दुःखपीडित, ज्ञानाची इच्छा करणारे, द्रव्यादि विषयेच्छु व ज्ञानी, असे चार प्रकारचे सदाचारी लोक माझी उपासना करतात.
१७) ह्या चार प्रकारच्या भक्तांमध्यें नेहमी निष्कामतेने वागणारा व अनन्य भक्ति करणारा असा जो ज्ञानी तो श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून, तो मलाही तसाच प्रिय असतो.
१८) हे सर्वही भक्त उत्तमच आहेत. पण त्यांतील ज्ञानी म्हणजे मीच असें मला वाटतें. कारण मीच सर्वोत्तम गति मानून युक्तचित्त होत्साता त्यानेंच माझा आश्रय निरंतर केलेला असतो. 
१९) अनेक जन्मांच्या शेवटी, हे सर्व जगत वासुदेवमयच आहे असे ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो. परंतु असें जाणणारा महात्मा फारच दुर्लभ होय.
२०) आपापल्या प्रकृतिनियमाप्रमाणे त्या त्या ( स्वर्गादिक फलांच्या ) कामवासनांनीं वेडावलेले लोक तो तो ( उपासनेचा ) नियम पाळून दुसर्‍या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात. 
२१) जो जो भक्त ज्या ज्या देवतास्वरुपाची उपासना श्रद्धापूर्वक करुं इच्छितो, त्या त्या भक्ताची त्या त्या देवतास्वरुपावरील श्रद्धा मी स्थिर करितो. 
२२) तो त्या स्थिर श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली ती इच्छित फळे त्याला मिळतात. 
२३) परंतु त्या मंदबुद्धि भक्तांना मिळणारे ते फळ अल्पकाळ टिकणारे असते. त्या त्या देवतांचे भक्त त्या त्या देवतांकडे पोचतात व माझे भक्त मलाच येऊन मिळतात.
२४) मूढ लोक माझें श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि अव्यक्त स्वरुप न जाणतां, मलाही अव्यक्त दशेंतून व्यक्त अशा स्वरुपांत मी प्रकट झालो आहे असे समजतात. 
२५) मी योगमायेनें झाकलो असल्यामुळे सर्वांना प्रकट दिसत नाही. मी जन्मरहित व अविनाशी आहे हे मूढ लोक जाणत नाहीत. 
२६) हे अर्जुना, मी भूत, वर्तमान आणि भविष्य काळांतील सर्व प्राणिमात्रांना जाणतो, पण मला कोणीही जाणत नाहीत.
२७) कारण हे भारता, इंद्रियांच्या इच्छा व द्वेष ह्यांपासून उद्भवणार्‍या ( सुखदुःखादि ) द्वंद्वांच्या मोहांनीं सर्व भूतें, हे परंतपा ! ह्या सृष्टींत भ्रम पावत असतात.
२८) परंतु ज्या सत्कर्माचरणी लोकांचे पातक नष्ट झालेलें असतें, ते सुखदुःखादि द्वंद्वजन्य मोहापासून मुक्त होऊन, दृढव्रत होत्साते माझी उपासना करतात.
२९) वार्धक्य व मृत्यु यांपासून मुक्त होण्याकरितां जे माझ्या आश्रयानें प्रयत्न करतात, तें परब्रह्माला, अध्यात्माला, तसेंच अखिल कर्माला जाणणारे असे होतात. 
३०) जे अधिभूतासह, अधिदैवतासह, आणि अधियज्ञासह ( म्हणजे सर्व मीच आहे अशा प्रकारे ) मला जाणतात, ते युक्तचित्त असल्यामुळे अंतःकाळी देखील मला जाणतात.  
Meaning in English
Bhagwan said
1) Listen how, with the mind intent on Me, taking refuge in Me, and practising Yoga, O Partha, you will know Me in full, free from doubt.  
2) I shall tell you without reserve about this knowledge together with realization, knowing which there remains nothing further to be known here. 
3) Among thousands of men one perchance struggles for perfection; even amongst those (one perchance becomes perfect ) , and even amongst those that are perfect, one perchance knows Me in reality.
4) Earth, Water, Fire, Air, Ether, Mind, Intellect and egoism--that is My Prakruti (Nature) divided into eight categories. 
5) This is My lower Prakruti; different from this, O mighty armed one, know that higher Prakruti of Mine in the form of the individual soul (Jiva) by which this world is sustained. 
6) know that all beings have these two for their origin: I am the origin of the entire universe as also its destroyer.
7) Higher than Myself there is nothing else, O Dhananjaya. In Me all this is strung like gems in a string.             8) I am the sapidity in waters, o son of Kunti, I am the light in the Moon and the Sun; I am the syllable OM in all the Vedas, sound in ether, and virility in men.
9) I am the sweet fragrance in Earth, and the brilliance in the fire, the life in all beings, and I am austerity in the austere.
10) Know Me, O Partha, as the eternal seed of all beings; I am the intelligence of the intelligent; the splendour of the splendid (things and beings), am I.
11) Of the strong, I am the strength--devoid of desire and attachment, and in 
(all) beings, I am the desire--unopposed to Dharma, O best among the Bharatas.
12) Whatever beings (and objects) that are pure, active and inert, know them to proceed from Me, yet I am not in them, they are in Me.
13) All this world, deluded by these three states composed of Gunas, does not know Me, who am beyond these and immutable.
14) This divine illusion of Mine, constituted of the Gunas, is indeed hard to surmount; those who take refuge in Me alone, get over this illusion.
15) Wretches among men, the wicked and the ignorant do not take refuge in Me, being deprived of discrimination by Maya, and betaking themselves to demoniac attitude.
16) Four kinds of people who have done virtuous deeds worship me, O Arjuna- -the distressed person, the aspirant after knowledge, the seeker of wealth and the man of knowledge, O best of Bharatas. 
17) Of these, the man of knowledge who is constantly in communionand singleminded in devotion excels. To the man of knowledge I am very dear indeed, and he is dear to Me.
18) All these are indeed noble, but the man of realization I regard as My very self; for with his mind fixed (on Me), he has taken refuge in Me alone as the highest goal. 
19) At the end of innumerable births, the man of realization takes refuge in Me, knowing that all this is Vasudeva.Such a saint is exceedingly rare.
20) Deprived of discrimination by particular desires, they worship other deities observing particular rites, being swayed by their own nature.
21) Whatever form a particular devotee wishes to worship with faith- concerning that alone I make his faith unflinching. 
22) Endowed with that faith, he worships that deity, and from him gets his desires, which are indeed granted by Me alone.
23) But that fruit of these men of little understanding has an end; the worshippers of Gods go to the Gods,(but) My devotees come to Me.
24) Not knowing My immutable, unsurpassed supreme nature, the ignorant regard Me, the unmanifest, as coming into being.
25) I am not manifest to all, being veiled by My mysterious power (Yoga-Maya) This ignorant world does not know Me, the unborn and immutable.
26) I know, O Arjuna, all beings past, present and future, but nobody knows Me.
27) All beings, O scorcher of foes, are deluded at birth by that deception due to the pairs of opposites which arises out of desire and aversion, O descendant of Bharata.
28) But those of virtuous actions whose sins have been at an end, are freed from the delusion of the dualities and worship Me with firmness of vow.
29) Those who strive for freedom from decay and death, taking refuge in Me, know that Brahman, all about the embodied self and action in its entirety.
30) Those who know Me together with what concerns beings, the gods and sacrifices-fix their mind (on Me) and know Me even at the time of death.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 7 ज्ञानविज्ञानयोग अध्याय ७


Custom Search

No comments:

Post a Comment