Tuesday, June 14, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 4 ज्ञानकर्मसंन्यास योग अध्याय ४


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 4 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 4 is in Sanskrit. Name of this adhyay is Dnyana-Karma-Sanyas Yoga.Here in this Adhyay 4 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, in order to remove the misunderstanding and indicating the greater path of Dnyanan Yoga, the path of knowledge.
ज्ञानकर्मसंन्यास योग अध्याय ४
श्रीभगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ २ ॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥
अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥
श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ५ ॥
अजोऽपि सन्नवयात्मा भूतानामीश्र्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ६ ॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ८ ॥
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि माम विद्ध्यकर्तारमव्ययम्  ॥ १३ ॥
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले सृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४ ॥
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्र्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥ 
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ १९ ॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ २० ॥
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ २१ ॥
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ २२ ॥
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३ ॥
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४ ॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५ ॥
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ २६ ॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७ ॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥ 
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३० ॥
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ३२ ॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३ ॥
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्र्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४ ॥
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मन्यथो मयि ॥ ३५ ॥
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ३६ ॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ३७ ॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥
श्रद्धावॉंल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥
अज्ञश्र्चाश्रद्दधानश्र्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४० ॥
योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४१ ॥
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
भगवान म्हणाले
१) हा अविनाशी व कधीही क्षीण न होणारा योग मी सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो मनूला व मनूनें इक्ष्वाकूला सांगितला.
२) ह्याप्रमाणे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षि जाणत होते. परंतु कालांतरानें हा योग लुप्त झाला. 
३) तो हा पुरातन कर्मयोग मी तुला आज सांगत आहें. तूं माझा भक्त व जिवलग मित्र म्हणून हें उत्तम रहस्य मीं तुला सांगितलें. 
अर्जुन म्हणाला
४) तुमचा जन्म अलीकडचा व सूर्याचा जन्म प्राचीनकाळचा, असें असतां तुम्हीं त्याला हा योग प्रथम सांगितला हें मी कसें ओळखावें?
भगवान म्हणाले
५) हे शत्रुतापना अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व मी जाणतों, तूं जाणत नाहींस.
६) मी जन्मरहित, ज्याच्या स्वरुपांत फरक होत नाहीं असा असूनही व सर्व प्राणिमात्रांचा प्रभु असूनही प्रकृतीच्या ठायीं अधिष्ठित होऊन आपल्या मायेनें मी जन्म घेत असतों. 
७) कारण, हे अर्जुना, ज्या ज्या वेळीं धर्माचा र्‍हास होतो आणि अधर्म माजतो, त्या त्या वेळीं मीं स्वतः जन्म घेतों. 
८) साधूंचे संरक्षण करण्यासाठीं, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठीं, मी युगीं युगीं जन्म घेतो. 
९) माझे या प्रकारचे दिव्य जन्म व कर्मे जो बरोबर जाणतो, तो, हे अर्जुना, देहत्यागानंतर पुनः जन्माला न येतां मलाच येऊन मिळतो.
१०) आसक्ति, भय व क्रोध टाकून देऊन, मत्परायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानरुप तपानें पावन होत्साते माझ्याच स्वरुपाला येऊन मिळालेले आहेत.          
११) अर्जुना, जे ज्या हेतूने मजकडे येतात, त्यांना तसेंच फळ मी देतो. लोक सर्व प्रकारें माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.
१२) कर्मफळाची इच्छा करणारे लोक ह्या लोकीं देवतांची पूजा करतात; कारण ह्या मनुष्यलोकीं तशा कर्माची सिद्धी लवकर मिळत असते.
१३) ही चार वर्णाची समाजरचना मनुष्यांचे स्वभावधर्म आणि तदनुरुप त्यांची कर्मे ह्यांना अनुसरुन मी निर्माण केली आहे. मी तिचा कर्ता असूनही, अकर्ता व अविनाशी आहें असे जाण.
१४) कर्मफळाच्या ठायी माझी इच्छा नाहीं, म्हणून कर्मे मला बंधनकारक होऊं शकत नाहींत. ह्याप्रमाणें मला जो ओळखतो, तोही कर्मानीं बद्ध होत नाही.
१५) ह्या प्रकारे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनींही स्वकर्माचे आचरण केलें आहे, म्हणून तू पूर्वजांनी परंपरागत केलेलें कर्मच कर.
१६) कर्म कोणते व अकर्म कोणते ह्याविषयीं ज्ञाते देखील मोहित झालेले आहेत. जें जाणल्यानें तूं दुःखापासून मुक्त होशील, असे कर्म मी तुला सांगतो. 
१७) कर्म म्हणजे काय, विकर्म (शास्त्र विरुद्ध कर्म) म्हणजे काय व अकर्म (कर्म न करणें) म्हणजे काय हें सर्व जाणलें पाहिजे, कारण कर्माचे तात्त्विक स्वरुप समजणें कठीण आहे.
१८) स्वधर्मनियमित कर्म हेंच अकर्म होय; आणि कर्मरहित राहावयाचे म्हटलें तरी त्यांतही कर्म घडतेच. हें जो जाणतो, तोच सर्व मनुष्यांत खरा बुद्धिमान् असून तोच सर्व कर्मे करीत असतांही योगी होय.
१९) ज्याचे सर्व व्यवसाय फलेच्छाविरहित असतात, आणि आत्मज्ञानरुपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालीं आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित समजतात. 
२०) कर्माच्या फलाची आसक्ति सोडून जो सदा तृप्त व अहंकाररहित असतो, तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुतः कांहींच करीत नाही.
२१) ज्याच्या मनांत वासनांचा ठावठिकाणा राहिला नाहीं, ज्याचें मन व बुद्धि पूर्णपणे स्वाधीन आहेत, आणि ज्यानें संग्रहबुद्धि सोडून दिली आहे, अशा पुरुषाने केवळ शरीरमात्रेंकरुन कर्म केलें, तरी त्याचा त्याला दोष लागत नाही. 
२२) सहजगत्या जें मिळेल त्यांत संतुष्ट, सुखदुःखादि द्वंद्वांपासून अलिप्त, मत्सररहित, यशापयशाविषयीं समदृष्टि ठेवणारा पुरुष कर्मे करुन देखील बद्ध होत नाहीं.
२३) अनासक्त रागद्वेषांपासून मुक्त, साम्यबुद्धिरुप ज्ञानाच्या ठायीं चित्त स्थिर झालेला व केवळ यज्ञासाठी कर्म करणारा असा जो पुरुष, त्याचें समग्र कर्म लयाला जातें. (उपासनामय होतें.)
२४) ज्यानें स्वतःला ब्रह्मस्वरुप मानून ब्रह्मरुपी अग्नींत, ब्रह्मरुपी हविर्द्रव्य ब्रह्मोद्देशाने हवन केलें, असा जो यज्ञकर्ता, त्याची ब्रह्म आणि यज्ञरुप कर्म हीं एकच आहेत. अशी ब्रह्मनिष्ट बुद्धि झाल्यानें तो ब्रह्मपदालाच जाणार.
२५) कांहीं कर्मयोगी लोक केवळ देवतांच्याच उद्देशानें यज्ञोपासना करतात, तर दुसरे कोणी ब्रह्मरुपी अग्नींत यज्ञ करुन यज्ञरुपी परमेश्र्वराची उपासना करणारे असतात.
२६) कोणी संयमरुप अग्नीमध्यें श्रोत्रादि इंद्रियांचा यज्ञ करितात, तर कोणी इंद्रियरुप अग्नीमध्यें शब्दादि विषयांचा यज्ञ करितात.             
२७) दुसरे कोणी ज्ञानानें प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरुपी अग्नींत, इंद्रियांची व प्राणाचीं सर्व कर्में हवन करतात.
२८) ह्याप्रमाणें तीक्ष्णव्रताचरण करणारे यति म्हणजे संयमनशील पुरुष कोणी द्रव्यरुप, कोणी तपोरुप, कोणी योगरुप, कोणी स्वाध्याय म्हणजे दिव्य स्वकर्मानुष्ठानरुप आणि कोणी ज्ञानरुप यज्ञ करीत असतात.
२९) प्राणायामाविषयीं तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतींचा निरोध करुन प्राणाचा अपानांत आणि अपानाचा प्राणांत होम करितात. 
३०) दुसरे कोणी आहार नियमित करुन प्राणांतच प्राणांचें हवन करितात. हे सर्वही यज्ञ जाणणारे व यज्ञानें आपल्या पापाचा क्षय करुन घेणारे होय.
३१)  पुरुषश्रेष्ठा, अर्जुना, यज्ञ करुन शेष राहिलेला प्रसाद हेंच अमृत, तें सेवन करणारे लोक सनातन ब्रह्माप्रत पावतात. यज्ञ न करणाराला हा मनुष्यलोकसुद्धां प्राप्त होत नाहीं, मगपरलोकपदप्राप्ति कोठची?
३२) असे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्ममुखांत चालू आहेत ते सर्व  यज्ञ कर्मानेंच संपादन होणारे आहेत, असें जान. असें जाणल्यानें तूं कर्मबंधापासून मुक्त होशील.
३३) हे परंतपा अर्जुना, द्रव्यम यज्ञापेक्षां ज्ञानमय यज्ञ अधिक क्षेष्ठ होय, कारण सर्व कर्मांचें पर्यवसान ज्ञानांत होतें. 
३४) तत्त्ववेत्ते ज्ञानी हे, त्यांना प्रणिपात केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्र्ण केल्यानें व त्यांची सेवा केल्यानें, आत्मज्ञान सांगतात हें लक्षांत ठेव.
३५) अर्जुना, जे ज्ञान प्राप्त झाल्यावर तूं असा पुनः मोहांत पडणार नाहींस; ज्या ज्ञानानें संपूर्ण सृष्टि तूं आपल्या ठायीं व नंतर माझ्याही ठायीं पाहाशील.
३६) जरी तूं सर्व पातक्यांहून अधिक पातकी असलास, तरी त्या ज्ञानरुपी नौकेनें सर्व पापसमुद्र तूं सहज तरुन जाशील.
३७) हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नि जसा काष्ठांना भस्म करुन टाकतो. तसाच ज्ञानरुपी अग्नि सर्व कर्मबंधनांचें भस्म करितो.
३८) कारण, ज्ञानासारखीं पवित्र वस्तु ह्या जगांत दुसरी कोणतीही नाही. कर्मयोगानें शुद्ध अंतःकरण झालेला पुरुष योग्य काळी तें ज्ञान आपल्या ठायीं प्राप्त करुन घेतो. 
३९) श्रद्धावान जितेंद्रिय व ज्ञानाची उत्कंठा असलेल्या पुरुषाला तें ज्ञान प्राप्त होतें आणि तें प्राप्त होतांक्षणींच त्याला पूर्ण शांति मिळते.
४०) जो ज्ञानहीन, श्रद्धाहीन व संशयखोर असतो, तो अधोगतीला जातो, संशयखोराला ना इहलोक ना परलोक, ना सुख.
४१) हे धनंजया, कर्मयोगविधीनें ज्यानें आपली कर्में म्हणजे कर्मबंधनें टाकली, ज्ञानानें ज्याचे संशय नाहीसे झाले अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्में बद्ध करीत नाहीत. 
४२) म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयांतला हा संशय ज्ञानरुपी खड्गाने छेदून टाकून निष्काम कर्मयोगाचें अवलंबन कर आणि युद्धाला सिद्ध हो.

ह्या प्रमाणे श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील 'ज्ञानकर्मसंन्यासयोग प्रकरण ' या नांवाचा चौथा अध्याय संपूर्ण झाला. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 4 ज्ञानकर्मसंन्यास योग अध्याय ४



Custom Search

No comments:

Post a Comment