Monday, October 31, 2016

DroupadiKruta ShriKrishna Prarthana द्रौपदीकृता श्रीकृष्ण प्रार्थना


DroupadiKruta ShriKrishna Prarthana 
DroupadiKruta ShriKrishna Prarthana is in Sanskrit. It is from MahaBharat Vanaparvani. Droupadi has created this Prarthana addressed to God ShriKrishna. While Pandavas were in vanavasa, Durvas Rushi came to their hut. Now Pandavas and Droupadi were unable to welcome them by offering food to Rushi Durvasa and his ten thousand disciples. Hence Droupadi made a prarthana by her heart addressed to God ShriKrishna to help her and Pandavas. God fulfilled her request and helped them.
द्रौपदीकृता श्रीकृष्ण प्रार्थना
कृष्ण कृष्ण महाबाहो देवकीनन्दनाव्यय ।
वासुदेव जगन्नाथ प्रणतार्तिविनाशन ॥ १ ॥
विश्र्वात्मन् विश्र्वजनक विश्र्वहर्तः प्रभोऽव्यय ।
प्रपन्नपाल गोपाल प्रजापाल परात्पर ॥ २ ॥
आकूतीनां च चित्तीनां प्रवर्तक नतास्मि ते ।
वरेण्य वरदानन्त अगतीनां गतिर्भव ॥ ३ ॥
पुराणपुरुष प्राणमनोवृत्त्याद्यगोचर ।
सर्वाध्यक्ष पराध्यक्ष त्वामहं शरणं गता ॥ ४ ॥    
पाहि मां कृपया देव शरणागतवत्सल ।
नीलोत्पलदलश्याम पद्मगर्भारुणेक्षण ॥ ५ ॥
पीताम्बरपरीधान लसत्कौस्तुभभूषण ।
त्वमादिरन्तो भूतानां त्वमेव च परायणम् ॥ ६ ॥
परात्परतरं ज्योतिर्विश्र्वात्मा सर्वतोमुखः ।
त्वामेवाहुः परं बीजं निधानं सर्वसम्पदाम् ॥ ७ ॥
त्वया नाथेन देवेश सर्वापद्भ्यो भयं न हि ।
दुःशासनादहं पूर्व सभायां मोचिता यथा ।
तथैव सङ्कटादस्मात्त्वमुद्धर्तुमिहार्हसि ॥ ८ ॥   
॥ इति श्रीमहाभारते वनपर्वणी द्रौपदीकृता श्रीकृष्णप्रार्थना संपूर्णा ॥
(महाभारत वनपर्व अध्याय २६३- ८-१६)
द्रौपदी उच्च कोटीची पतिव्रता आणि श्रीकृष्णभक्त होती. ती कृष्णाला आपला रक्षक, हितचिंतक आणि परम आत्मीय मानत असे. श्रीकृष्णाची सर्वव्यापकता व सर्वशक्तिमानता यांवर तिचा विश्र्वास होता. तीच आता संकटांतून सोडवावे म्हणून श्रीकृष्णाचा धावां करीत आहे.
दुर्वास ऋषि त्यांच्या दहा हजार शिष्यांसह वनवासी पांडवांकडे जेवणासाठी आले होते. परंतु नुकतेच द्रौपदीचेही जेवण झाले असल्याने सूर्य थाळींतून अन्नाचा पुरवठा होणार नव्हता. जेवण देता येत नसल्याने दुर्वासांच्या क्रोधांतुन बचाव व्हावा म्हणुन द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णही लगेचच धावत आला. भक्ताचे आर्त बोलावणे आल्यावर पर्याय देवाकडे नाही. आल्याआल्या त्याने द्रौपदीला सांगितले की मी फार लांबून आल्याने मला फार भूक लागली आहे, काहीतरी खायला दे.
द्रौपदीवर धर्मसंकट ओढवले. कारण कृष्णाला देण्यास काहींच नव्हते. तीने तसे सांगितल्यावर तो वत्सलात्मा तीला म्हणाला तू जी थाळी आता धूवून ठेवलीस ती घेऊन ये. थाळी आणल्यावर कृष्णाने ती नीट बघितली तर एक भाजीचे पान थाळीस चिकटलेले त्याने पाहीले. ते तोडांत टाकून कृष्ण म्हणाला, " या भाजीच्या पानाने सम्पूर्ण जगाचे आत्मा यज्ञभोक्ता परमेश्र्वर लगेच तृप्त होवोत." 

नंतर कृष्णाने सहदेवास सांगितले की जा ऋषिवर्य दुर्वास व त्यांच्या शिष्यांना जेवावयास बोलावून आण. सहदेव त्यांना बोलवावयास गेला तर तेथे कोणीच नव्हते. कारण जेव्हां कृष्णाने भाजीचे पान तोंडांत टाकून संकल्प केला तेव्हा दुर्वासांसह सर्व शिष्य पाण्यांत उभे राहून अघमर्षण करत होते. त्याना एकदम वाटू लागले की त्यांचे पोट तुडुंब भरले आहे. मग आता पांडवांकडे काय जेवणार असे म्हणुन सर्व तेथुन निघुन गेले होते. अशारीतीने कृष्णाने द्रौपदीवर येऊ घातलेले संकटांतुन तीला वाचविले. 
मराठी अर्थ (स्वैर) 
ती म्हणते, हे कृष्णा, महाबाहो कृष्णा, देवकीच्या नंदना, वासुदेवा , जगन्नाथा, संकटांतून मुक्त करणार्‍या, विश्र्वात्म्या, विश्र्वजनका, विश्र्वाचे दुःख हरणार्‍या, अव्यय प्रभो, गोपाला, प्रजापाला, परात्परा तुला मी नतमस्तक होते. 

हे वरेण्या, वर देणार्‍या, गतीहीनांना गती देणार्‍या, पुराणपुरुषा, प्राण-मन वृत्तींना अगोचर, सर्वाद्यक्षा मी तुला शरण आले आहे. हे देवा, शरणागत वत्सला माझ्याकडे आपला कृपाकटाक्ष टाक. हे पीताम्बर परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या निळ्या कमळाप्रमाणे श्याम असलेल्या, कौस्तुभमणी भूषणाने शोभणार्‍या, सर्व भूतमात्रांचा आदि-अंत असलेल्या, परात्पर ज्योतीर्विश्र्वात्मा, सर्वाचे बीज व सर्वसम्पदा देणार्‍या, हे नाथा देवेशा तुझ्यामुळे आम्हाला घोर आपत्तींतही भय वाटत नाही. पूर्वी कौरवांच्या सभेमध्ये दुःशासनापासून जसे माझे रक्षण केलेस तसेच आत्तासुद्धा आमच्यावर कोसळलेल्या संकटाचे हरण कर.   
DroupadiKruta ShriKrishna Prarthana
द्रौपदीकृता श्रीकृष्ण प्रार्थना


Custom Search

No comments:

Post a Comment