MahaLaxmi Kavacham
MahaLaxmi Kavacham is in Sanskrit. It is from Brahmavaivart Purana, Ganapati Khanda. This kavacham is very pious and it not only protects the devotee who recites it daily but also gives wealth, health and anything wished by him. Goddess Laxmi remains in the house of the devotee who recites it, forever and in next 100 generations of his family. This Kavacham is told by God Narayan to God Indra.
महालक्ष्मीकवचम्
नारायण उवाच
सर्वसम्पत्प्रदस्यास्य कवचस्य प्रजापतिः ।
ऋषिश्छन्दश्र्च बृहती देवी पद्मालया सव्यम् ॥ १ ॥
धर्मार्थकाममोक्षेषु विनियोगः प्रकीर्तितः ।
पुण्यबीजं च महतां कवचं परमाद्भुतम् ॥ २ ॥
ॐ हृीं कमलवासिन्यै स्वाहा मे पातु मस्तकम् ।
श्रीं मे पातु कपालं च लोचने श्रीं श्रियै नमः ॥ ३ ॥
ॐ श्रीं श्रियै स्वाहेति च कर्णयुग्मं सदावतु ।
ॐ श्रीं हृीं क्लीं महालक्ष्म्यै स्वाहा मे पातु नासिकाम् ॥ ४ ॥
ॐ श्रीं पद्मालयायै च स्वाहा दन्तं सदावतु ।
ॐ श्रीं कृष्णप्रियायै च दन्तरन्ध्रं सदावतु ॥ ५ ॥
ॐ श्रीं नारायणेशायै मम कण्ठं सदावतु ।
ॐ श्रीं केशवकान्तायै मम स्कन्धं सदावतु ॥ ६ ॥
ॐ श्रीं पद्मनिवासिन्यै स्वाहा नाभिं सदावतु ।
ॐ हृीं श्रीं संसारमात्रे मम वक्षः सदावतु ॥ ७ ॥
ॐ श्रीं श्रीं कृष्णकान्तायै स्वाहा पृष्ठं सदावतु ।
ॐ हृीं श्रीं श्रियै स्वाहा मम हस्तौ सदावतु ॥ ८ ॥
ॐ श्रीं निवासकान्तायै मम पादौ सदावतु ।
ॐ हृीं श्रीं क्लीं श्रियै स्वाहा सर्वाङ्गं मे सदावतु ॥ ९ ॥
प्राच्यां पातु महालक्ष्मीराग्नेय्यां कमलालया ।
पद्मा मां दक्षिणे पातु नैर्ऋत्यां श्रीहरिप्रिया ॥ १० ॥
पद्मालया पश्र्चिमे मां वायव्यां पातु श्रीः स्वयम् ।
उत्तरे कमला पातु ऐशान्यां सिन्धुकन्यका ॥ ११ ॥
नारायणेशी पातूर्ध्वमधो विष्णुप्रियावतु ।
संततं सर्वतः पातु विष्णुप्राणाधिका मम ॥ १२ ॥
इति ते कथितं वत्स सर्वमन्त्रौघविग्रहम् ।
सर्वैश्र्वर्यप्रदं नाम कवचं परमाद्भुतम् ॥ १३ ॥
सुवर्णपर्वतं दत्त्वा मेरुतुल्यं द्विजातये ।
यत् फलं लभते धर्मी कवचेन ततोऽधिकम् ॥ १४ ॥
गुरुमभ्यर्च्य विधिवत् कवचं धारयेत् तु यः ।
कण्ठे वा दक्षिणे बाहौ स श्रीमान् प्रतिजन्मनि ॥ १५ ॥
अस्ति लक्ष्मीर्गृहे तस्य निश्र्चला शतपूरुषम् ।
देवेन्द्रैश्र्चासुरेन्द्रैश्र्च सोऽवध्यो निश्र्चितं भवेत् ॥ १६ ॥
स सर्वपुण्यवान् धीमान् सर्वयज्ञेषु दीक्षितः ।
स स्नातः सर्वतीर्थेषु यस्येदं कवचं गले ॥ १७ ॥
यस्मै कस्मै न दातव्यं लोभमोहभयैरपि ।
गुरुभक्ताय शिष्याय शरणाय प्रकाशयेत् ॥ १८ ॥
इदं कवचमज्ञत्वा जपेल्लक्ष्मीं जगत्प्रसूम् ।
कोटिसंख्यं प्रजप्तोऽसि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ १९ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते गणपतिखण्डे महालक्ष्मीकवचं सम्पूर्णम् ॥
(गणपतिखण्ड अध्याय ३८/६४-८२)
मराठीअर्थसंपूर्ण संपत्ती प्रदान करणार्या या कवचाचे प्रजापति हे ऋषि आहेत. याचा छंद बृहती आहे. स्वतः पद्मालया देवता आहे. धर्म-अर्थ-काम-मोक्ष हा विनियोग आहे. हे परम अद्भुत कवच महापुरुषांचे पुण्यबीज आहे.
ॐ हृीं कमलवासिन्यै स्वाहा माझ्या मस्तकाचे रक्षण करो.
श्रीं माझ्या कपाळाचेआणि श्रीं श्रियै माझ्या नेत्रांचे रक्षण करो.
ॐ श्रीं श्रियै माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो.
ॐ श्रीं हृीं क्लीं महालक्ष्म्यै माझ्या नाकाचे रक्षण करो.
ॐ श्रीं पद्मालयायै माझ्या दातांचे रक्षण करो.
ॐ श्रीं कृष्णप्रियायै माझ्या दातांतील छिद्रांचे रक्षण करो.
ॐ श्रीं नारायणेशायै माझ्या कण्ठाचे रक्षण करो.
ॐ श्रीं केशवकान्तायै माझ्या खांद्यांचे रक्षण करो.
ॐ श्रीं पद्मनिवासिन्यै माझ्या नाभिचे रक्षण करो.
ॐ हृीं श्रीं संसारमात्रे माझ्या वक्षःस्थळाचे रक्षण करो.
ॐ श्रीं श्रीं कृष्णकान्तायै माझ्या पाठीचे रक्षण करो.
ॐ हृीं श्रीं श्रियै माझ्या हातांचे रक्षण करो.
ॐ श्रीं निवासकान्तायै माझ्या पायांचे रक्षण करो.
ॐ हृीं श्रीं क्लीं श्रियै माझ्या सर्वाङ्गाचे रक्षण करो.
पूर्वेकडून " महालक्ष्मी " आग्नेयेकडून " कमलालया "
दक्षिणेकडून " पद्मा " नैर्ऋत्येकडून " श्रीहरिप्रिया "
पश्र्चिमेकडून " पद्मालया " आणि वायव्येकडून " श्री "
उत्तरेकडून " कमला " आणि ईशान्येकडून " सिन्धुकन्या "
माझे रक्षण करो. ऊर्ध्वेकडून " नारायणेशी " व अधरेकडून " विष्णुप्रिया "
रक्षण करो. " विष्णुप्राणाधिका " नेहमी सगळीकडून माझे रक्षण करो.
(भगवान नारायण इन्द्राला म्हणतात) वत्सा ! मी तुला सर्वैश्र्वर्यै देणार्या परम अद्भुत कवच सांगितले. हे सर्व मंत्रांचे मूर्तिमंत स्वरुप आहे. धार्मिक पुरुष ब्राह्मणाला पर्वताएवढे सोने दान करुन जेवढे पुण्य मिळवतो त्यापेक्षा पुण्य या कवचाच्या (धारण) करण्याने मिळते. जो माणुस विधिवत हे कवच गळ्यांत किंवा उजव्या दंडावर धारण करतो, तो प्रत्येक जन्मांत श्रीसम्पन्न (धनवान) होतो. आणि त्याच्या घरी शंभर पिढ्यांपर्यंत श्री निश्र्चलपणे राहाते. तो देवेन्द्र किंवा राक्षसांकडून अवध्य होतो. ज्याने गळ्यांत हे कवच धारण केले त्या बुद्धिमानाने सर्व पुण्य मिळवले, सर्व यज्ञांचे व सर्व तीर्थस्थानांत स्नान केल्याचे फल मिळवले.
हे कवच लोभ, मोह व भयाने ऐर्यागैर्याला देऊ नये. शरणागताला व गुरुभक्त शिष्याला मात्र द्यावे. या कवचाचे ज्ञान प्राप्त करुन न घेता जगत्जननी लक्ष्मीचा करोडो जप केला तरी तो सफळ होत नाही. अशा रीतीने हे नारायणाने इंद्राला सांगितलेले ब्रह्मवैवर्तपुराणांतील गणपतिखण्डांतील महालक्ष्मी कवच संपूर्ण झाले.
MahaLaxmi Kavacham
महालक्ष्मीकवचम्
Custom Search
🙏🙏🙏
ReplyDeletethanks
really very useful mantra. It has the power to heal our wounds . Chanting mahalakshmi stotram daily has given me immense strength. Thanks for providing it.
ReplyDelete