Saturday, October 8, 2016

Saraswati Sukta सरस्वती सूक्त


Saraswati Sukta 
Saraswati Sukta is in Sanskrit. These are 14 Ruchas from Rigveda (6-61). Saraswati is praised and asked to protect us, give us skills, intelligence, wealth. Saraswati is assumed as a pious river as also Goddess since very long in India. She is a very beautiful goddess having four hands in which she holds a book, Veena, Mala and a Kalasha.
सरस्वती सूक्त
इयमददाद् रभसमृणच्युतं दिवोदासं वध् रयश्  वाय दादुषे ।
या शश् वन्तमाचखादावसं पणिं ता ते दात्राणि तविषा सरस्वति ॥ १ ॥
इयं शुष्मेभिर्बिसखा इवारुजत् सानु गिरीणां तविषेभिरुर्मिभिः ।
पारावतघ्नीमवसे सुवृक्तिभिः सरस्वतीमा विवासेम धीतिभिः ॥ २ ॥
सरस्वति देवनिदो निबर्हय प्रजां विश् वस्य बृसयस्य मायिनः ।
उत क्षितिभ्योऽवनीरविन्दो विषमेभ्यो अस्त्रवो वाजिनीवति ॥ ३ ॥
प्रणो देवि सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । धीनामवित्र्यवतु । ॥ ४ ॥
यस्या देवि सरस्वत्युपब्रूते धने हिते । इन्द्रं न वृत्रतूर्ये ॥ ५ ॥     
त्वं देवि सरस्वत्यवा वाजेषु वाजिनि । रदा पूषेव नः सनिम् ॥ ६ ॥
उत स्या नः सरस्वती घोरा हिरण्यवर्तनिः ।
वृत्रघ्नी वष्टि सुष्टुतिम् ॥ ७ ॥
यस्या अनन्तो अर्‍हुतस्त्वेषश् चेरिष्णुरर्णवः ।
अमश् चरति रोरुवत् ॥ ८ ॥
सा नो विश् वा अति द्विषः स्वसृरन्या ऋतावरी ।
अतन्नहेव सूर्यः ॥ ९ ॥
उत नः प्रिया प्रियासु सप्तस्वसा सुजुष्टा ।
सरस्वती स्तोम्या भूत् ॥ १० ॥
आपप्रुषी पार्थिवान्युरु रजो अन्तरिक्षम् । 
सरस्वती निदस्पातु ॥ ११ ॥
त्रिषधस्था सप्तधातुः पञ्च जाता वर्धयन्ती ।
वाजेवाजे हव्या भूत् ॥ १२ ॥
प्र या महिम्ना महिनासु चेकिते द्युम्नेभिरन्या अपसामपस्तमा ।
रथ इव बृहति विभ्वने कृतोपस्तुत्या चिकितुषा सरस्वती ॥ १३ ॥
सरस्वत्यभि नो नेषि वस्यो माप स्फरीः पयसा मा न आ धक् ।
जृषस्व नः सख्या वेश्याच मा त्वत् क्षेत्राण्यरणानि गन्म ॥ १४ ॥
॥ ऋग्वेद ६-६१ ॥
मराठी अर्थ (स्वैर)
१) बहर्‍यस्व राजाला पितृऋणातून मुक्त करणारा आणि पराक्रमी दिवोदास नावाचा पुत्र प्रदान करणार्‍या, पणींचा संहार करणार्‍या सरस्वती देवते, तू आपल्या भक्तांना भरपूर दान दे.  
२) हत्ती कमळ उखडून टाकतो त्याप्रमाणे पर्वताचे कडे तोडून टाकणार्‍या, अत्यंत बलवान लाटांनी युक्त, शत्रुवर आक्रमण करणार्‍या आणि स्तुती करण्यास योग्य अशा देवी सरस्वती नदीची आम्ही सेवा करतो.
३) पृथ्वीचे वैभव प्राप्त करणार्‍या जलवाहिनी आणि अन्नसमृद्ध सरस्वती नदी देवते, देवांची निंदा करणार्‍या आणि त्यांच्याशी कपटाने वागणार्‍या वृसयपुत्र वृत्रासुराला तू ठार कर.
४) स्तोत्रगान ऐकणारी, अन्नसमृद्ध, अन्नप्रदान करणारी सरस्वती देवी आमचे संरक्षण करो. 
५) वृत्रासुराचा वध करणार्‍या इंद्राप्रमाणे पराक्रमी, भक्तांनी आमंत्रित केलेली देवी सरस्वती तिच्या भक्तांचे रक्षण करो. 
६) हे वैभववान देवी सरस्वती, युद्धामध्ये पूषन् देवाचे रक्षण करुन त्याला धनसमृद्ध केलेस त्याप्रमाणे आम्हाला धन प्रदान कर.
७) सुवर्णाच्या चाकांच्या रथांत विराजमान झालेली, शत्रूचा विध्वंस करणारी आणि शत्रूचा घात करणारी देवी सरस्वती आमच्या स्तुतिस्तोत्रांनी आमच्यावर प्रसन्न होवो.
८) तेजोवान् धारांनी खळखळ नाद करीत वाहणारी सामर्थ्यवान अशी तू अर्णवाकडे धावणारी आहेस.  
९) जलसमृद्ध देवी सरस्वती नदी, दिवसा सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना व्यापून टाकतो त्याप्रमाणे आपल्या अन्य नदी-भगिनींसह आमचा द्वेष करणार्‍या सर्व शत्रूंना तू व्यापून टाक. 
१०) देवी सरस्वती नदीच्या सात भगिनी आहेत. ऋषी तिची स्तुती करतात. अशा आम्हाला प्रिय असणार्‍या सरस्वती नदीचे आम्ही गौरवगान करतो. 
११) द्यौ आणि अंतरीक्ष यांना व्यापून टाकणारी देवी सरस्वती, आमची निंदा करणार्‍यांपासून आमचे रक्षण करो.
१२) देवता, मनुष्य, गंधर्व, पितर आणि सर्प यांचा उद्धार करणार्‍या सप्ततत्त्वांनी युक्त, त्रैलोक्यांत संचार करणारी देवी सरस्वती युद्धामध्ये आमचे रक्षण करो. 
१३) अतीव तेजस्वी, अत्यंत शोभायमान आणि सौंदर्यसंपन्न, रथाप्रमाणे वेगाने धावणार्‍या आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सरस्वती नदीची स्तुतिपाठक प्रशंसा करीत आहेत. 
१४) जलसमृद्ध, धनसमृद्ध सरस्वती नदी देवते, आपल्या अतीव वेगाने दारिद्र्याचा तू नाश करतेस. तू आमचे शेत  धान्यसमृद्ध कर. आम्हाला तुला केव्हाही आलिंगन देता येईल असे कर. 

(धन्यवादासहीत-आधारित प्रसाद मासिक आँगस्ट १९८८ सरस्वती दैवत विशेषांक ) 
Saraswati Sukta 
सरस्वती सूक्त


Custom Search

No comments:

Post a Comment