Wednesday, December 21, 2016

ShriKrishna Panchak Stotram श्रीकृष्णापंचकस्तोत्रम्


ShriKrishna Panchak Stotram 
ShriKrishna Panchak Stotram is in Sanskri. It is a beautiful composition by Shri Vasudevanand Saraswati. It is a praise of River Krishna. Origin Of the river is at Kshetra Mahabaleshwar in Maharashtra. It is the longest river flows through Maharashtra, Karnataka, Telangana and Andhra Pradesh. Shri Vasudevanand Saraswati says that ShriKrishna River gives Moksha, Mukti to all who resides on her bank. It removes Jywar, fever and fear. It is always young. God Hari always use to come on the bank of Krishna River Hense Shri Vasudevanand Saraswati is asking her to let him see god Hari.
श्रीकृष्णापंचकस्तोत्रम् 
कृष्णा नः पातु तृष्णाहरमधुररसा चिद्रसासारसाक्षी
साक्षीभूता नतानां निखिलमलहरा या हरानंतमूर्तिः ॥
जूर्तिघ्नी भीतिनिघ्नी सकलहितरता तारतम्यव्यतीता-
तीता वाक्चित्तमार्गं जगति गतिदयत्ख्यातिरेषा विशेषा ॥ १ ॥
अर्थ 
१) ही कृष्णा महानदी आमचे पालन, पोषण व रक्षण करो. हिचे पाणी तहानलेल्या माणसाची तहान अर्थात् आशा दूर करणारे (पुरविणारे) असून मधुर आहे. ही चैत्यन्यरसाच्या वृष्टीला साक्षिभूत आहे. ही शरणागतांना प्रत्यक्ष दिसणारी असून त्यांचे सर्व मनोमालिन्य हरण करणारी आहे. ही कृष्णानदी म्हणजे साक्षात् शिव व विष्णूंची आकृतीच आहे. ही श्रीकृष्णा महानदी ज्वर, ताप व भय यांना घालविणारी, सर्व लोकांचे हित किंवा अभीष्ट करण्यास तत्पर असलेली व तर-तम भाव न पाहणारी अशी आहे. हिचा मार्ग वाणी व मनाला अगोचर असा आहे. ही सर्व जगामध्यें सर्वांना सद्गती देणारी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.
कृष्णावेणी सतततरुणी वीक्षिता मध्यनीवृद्      
योषा वेषा सुषमवपुषा भासमाना समाना ॥
मानातीतापि खलु भजतां दृश्यतां याति माता
माता पादेरित उपरि परिक्रांतिवार्ता मयीह ॥ २ ॥
२) ही श्रीकृष्णा महानदी प्रवाहदृष्ट्या नेहमी तरुणी म्हणजे वाहणारी आहे असे दिसते. हिच्या द्वीपासारख्या भागांत लोक राहतात. ही उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या नाजुक शरीराच्या स्त्रीप्रमाणे भासणारी मानिनी आहे. ही परिमाणाच्या पलीकडची असूनही सेवकांना मातेप्रमाणे प्रत्यक्ष दर्शन देते. जर हिच्या चरणांचा मला स्पर्श झाला तर माझी उत्क्रांती अर्थात् उद्धार होण्याची शक्यता आहे.
तव गुणगणं वारं वारं सुधारुचिरं चिरं 
भगवति सति स्मारं स्मारं परं त्ववरं वरं  ॥
न लषति मतिः सारं सारं विचार्य परावरं 
लषति म इतो दूरं दूरं प्रदर्शय तं परम् ॥ ३ ॥
३) हे भगवती ! हे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णे ! तुझे अमृततुल्य गुणसमुदाय मला नेहमी आठवतात. तुझ्या सौंदर्यापुढे मदनसुद्धा कमी सुंदर वाटतो. सारासार विचार करुननही माझी मती मोक्षाची अपेक्षा करीत नाही; मात्र तिला हे परब्रह्म पाहाण्याची अपेक्षा आहे. ते दूर म्हणजे अवघड किंवा कठिण असले तरी मला दाखव.
कृष्णे कृष्णतनो मनोहरकथे नाथेश्र्वरि प्रार्थये
दत्तं दत्तपदं प्रदर्शय परं नातो वरं त्वर्थये ॥
अन्यं योटति ते तटे नट इवानेकांगधारी हरिः 
संसारारिररिंदमः शमपरः साक्षाद्य आत्मा विभुः ॥ ४ ॥
४) हे श्रीकृष्णा महानदी ! हे नीलवर्ण देहधारिणी ! तू अत्यंत मनोरंजक कथा असलेली अशी आहेस. हे सर्वाचे नियमन करणार्‍या श्रीकृष्णे ! हे स्वामिनी ! तुला मी अशी प्रार्थना करतो की, मला देऊ केलेले श्रीदत्तात्रेयांचे चरण दाखव. त्याचप्रमाणे जो हरि अनेक रुपे धारण करणारा आहे, जो तुझ्या तीरावर सदैव ये-जा करीत असतो, जो शान्त असून शत्रुनाशक आहे, जो संसाराचा अर्थात् जन्म-मरण-परंपरेचा शत्रु आहे आणि जो व्यापक असा साक्षात् आत्मा अर्थात् प्राण आहे (त्या हरिचेही चरण मला दाखव ) असा दुसरा वर मी तुला मागत आहे.
प्रत्यक्प्रवाहितखहृत्सु महत्सु देव 
उद्यन्स्वयं हरति हार्दतमः स एव ॥
तीरे भ्रमत्यनुदिनं तव भावगम्य-
स्तं दर्शयाद्य कृपयाप्यनुपाधिगम्यम् ॥ ५ ॥
५) जो दिव्य देव मोठ्या आणि उलट वाहणार्‍या पोकळीरुपी हृदयांत उगवतो म्हणजे श्रीगुरुकृपेमुळे आत्मशक्तिरुपाने अर्थात् कुंडलिनीशक्तीच्या रुपाने सुषुम्नेमध्ये जागृत होतो व साधकाच्या हृदयांतील अंधार किंवा तमोगुण तोच जागृत शक्तिरुप देव घालवितो. जो केवळ भाव-भक्तीने व भावनेनेच जाणला जातो व जो उपाधींनी अर्थात् कोणत्याही साधनांनी सापडत नाही. तोच तुझ्या तीरावर नेहमी भ्रमण करतो अर्थात् ये-जा करतो किंवा चकरा मारतो. हे श्रीकृष्णे ! माझ्यावर दयाळू होऊन तू अशा परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन मला करव.              

॥ इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीकृष्णापंचकं सम्पूर्णम् ॥
ShriKrishna Panchak Stotram
श्रीकृष्णापंचकस्तोत्रम् 


Custom Search

No comments:

Post a Comment