Monday, December 25, 2017

Adhyay Satava Upasana Yogaha अध्याय सातवा उपासनायोग


Adhyay Satava Upasana Yogaha 
Ganesh Geeta Adhyay Satava Upasana Yogaha is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय सातवा उपासनायोग
वरेण्य उवाच 
का सुक्ला गतिरुद्दिष्टा  का च कृष्णा गजानन ।
किं ब्रह्म संसृतिः का मे वक्तुमर्हस्यनुग्रहात् ॥ १ ॥
१) वरेण्य म्हणाला, हे गजानना शुक्ला गति कशी असते, कृष्णा गति कशी ओळखावी, ब्रह्म कसें व संसाराचें स्वरुप कसें असरें तें कृपा करुन मला सांगा. कारण या कामांत तूंच योग्य आहेस.   
श्रीगजानन उवाच
अग्निर्ज्योतिरहः शुक्ला कर्मार्हमयनं गतिः ।
चान्द्रं ज्योतिस्तथा धूमो रात्रिश्र्च दक्षिणायनम् ॥ २ ॥
२) श्रीगजानन म्हणाले, हे वरेण्या, अग्नि, ज्योति, दिवस आणि उत्तरायण मिळून शुक्ल गति होते. चान्द्र ज्योति, रात्र व दक्षिणायन मिळून होते, ती कृष्ण गति होते. 
कृष्णैते ब्रह्मसंसृत्योरवाप्तेः कारणं गती ।
दृश्यादृश्यमिदं सर्वं ब्रह्मैवेत्यवधातय ॥ ३ ॥
३) त्या दोन्ही गतींतील शुक्ला गति ब्रह्मप्रापक व कृष्णा गति ही पुन्हां संसाराला देणारी आहे. 
क्षरं पञ्चात्मकं विद्धि तदन्तक्षरं स्मृतम् ।
उभाभ्यां यदतिक्रान्तं शुद्धं विद्धि सनातनम् ॥ ४ ॥   
४) पंचभूतात्मकसर्व क्षर आहे. क्षराच्या आंत व्यापून असणारें तें अक्षर होय. या दोहोच्याही पलीकडील शुद्ध व सनातन असें ब्रह्म आहे.   
अनेकजन्मसंभूतिः संसृतिः परिकीर्तिता ।
संसृतिं प्राप्नुवन्त्येते ये तु मां गणयन्ति न ॥ ५ ॥
५) अनेक जन्म घेणें याला संसृति असें म्हणतात. जें मला मानीत नाहींत त्यांना संसृतींत यावें लागते.
ये मां सम्यगुपासन्ते परं ब्रह्म प्रयान्ति ते ।
ध्यानाद्यैरुपचारैर्मां तथा पय्चामृतादिभिः ।
स्नानवस्त्राद्यलंकारसुगन्धधूपदीपकैः ॥ ६ ॥  
६) या लोकीं जे माझी उत्तम उपासना करतात त्यांना परब्रह्माची प्राप्ति होते.मला ध्यानादिक उपचार तसेच पंचामृत, स्नान, वस्त्रें, अलंकार सुगंधित धूप,  
नैवेद्यैज्ः फलताम्बूलैर्दक्षिणाभिश्र्च योऽर्चयेत् ।
भक्त्यैकचेतसा चैव तस्येष्टं पूरयाम्यहम् ॥ ७ ॥
७) अनेक प्रकारचे नैवेद्य, फले, ताम्बूल, दक्षिणा इत्यादिक उपचारांनीं भक्तिपूर्वक एकाग्र अंतःकरणानें जो माझी पूजा करतो त्याचे मी सर्व इष्ट पुरवितो. 
एवं प्रतिदिनं भक्त्या मद्भक्तो मां समर्चयेत् ॥ ८ ॥
८) याप्रमाणे प्रत्येक दिवशीं भक्तानें भक्तीनें माझी पूजा करावी. 
अथवा मानसीं पूजां कुर्वीत स्थिरचेतसा ।
अथवा फलपत्राद्यैः पुष्पमूलजलादिभिः ॥ ९ ॥
९) किंवा एकाग्र अंतःकरणाने मानसपूजन करावें. अगर फल, पत्र, पुष्प, मूल, जल वगैरे उपचारांनी यत्नपूर्वक माझें पूजन करावें. असें जे करतील त्यांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करितो.   
पूजयेन्मां प्रयत्नेन तत्तदिष्टं फलं लभेत् ।
त्रिविधाक्स्वपि पूजासु श्रेयसी मानसी मता ॥ १० ॥
साऽप्युत्तमा मता पूजाऽनिच्छया या कृता मम ।
१०) या तीनही प्रकारच्या पूजांमध्यें मानसिक पूजा श्रेयस्कर आहे. जी पूजा निष्कामबुद्धीनें केली असेल तीही मला उत्तम म्हणून मान्य आहे.  
ब्रह्मचारी गृहस्थो वा वानप्रस्थो यतिश्र्च यः ॥ ११ ॥
एकां पूजां प्रकुर्वाणोऽप्यन्यो वा सिद्धिमेष्यति ।
११) ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी अगर दुसरा कोणीही एकच माझी पूजा करीत असेल तर त्यालाही सिद्धि प्राप्त होईल. 
मदन्यदेवं यो भक्त्या द्विषन्मामन्यदेवताम् ॥१२ ॥
सोऽपि मामेव यजते परं त्वविधितो नृप ।
१२) ( ही आपली उपास्य देवता नव्हे असें मानून ) माझा द्वेष करुन दुसर्‍याच देवतेची भक्ति करतो, तो मलाच पूजीत असतो; पण तें पूजन विधियुक्त होत नाहीं. 
यो ह्यन्यदेवतां मां च द्विषन्नन्यां समर्चयेत् ॥ १३ ॥
याति कल्पसहस्त्रं स निरयान्दुःखभाक् सदा ।
१३) जो माझा व दुसर्‍या देवतेचा द्वेष करुन तिसर्‍यालाच भजतो. तो सहस्त्र कल्पपर्यंत दुःखें भोगीत नरकांत रहातो.
भूतशुद्धिं विधायाऽऽदौ प्राणानां स्थापनं ततः ॥ १४ ॥
आकृष्य चेतसो वृत्तिं ततो न्यासमुपक्रमेत् ।
१४) ( पूजेंतील क्रम सांगतात ) प्रथम ( शरिरांतील ) भूतांची शुद्धि करावी. नंतर प्राणायाम करुन चित्त स्थिर करावें. नंतर मंत्राचे न्यास करावे. 
कृत्वाऽन्तर्मातृकान्यासं बहिश्र्चाऽथ षडङ्गकम् ॥ १५ ॥
न्यासं च मूलमन्त्रस्य ततो ध्यात्वा जपेन्मनुम् ।
१५) प्रथम अंतबहिर्मातृका न्यास, मूलमंत्राचा न्यास व षडंगन्यास करुन देवतेचें ध्यान करावे. व नंतर मूलमंत्राचा जप करावा.
स्थिरचित्तो जपेन्मन्त्रं यथागुरुमुखागतम् ॥ १६ ॥
जपं निवेद्य देवाय स्तुत्वा स्तोत्रैरनेकधा ।
१६) एकाग्र चित्त करुन गुरुंनीं सांगितल्याप्रमाणें विधिपूर्वक जप करावा. जप पूर्ण झाल्यावर तो देवाला अर्पण करावा. नंतर अनेक स्तोत्रें म्हणून देवाची स्तुति करावी.  
एवं मां य उपासीत स लभेन्मोक्षमव्ययम् ॥ १७ ॥
य उपासनया हीनो धिङ् नरो व्यर्थजन्मभाक् ।
१७) अशी माझी उपासना जो करील त्याला अविनाशी असा मोक्ष मिळेतो. जो मनुष्य उपासना करीत नाही त्याचा धिक्कार असो. तो व्यर्थ जन्माला आला आहे असे समजावे. 
यज्ञोऽहमौषधं मन्त्रोऽग्निराज्यं च हविर्हुतम् ॥ १८ ॥
ध्यानं ध्येयं स्तुतिः स्तोत्रम् नतिर्भक्तिरुपासना ।
त्रयी ज्ञेयं पवित्रं च पितामहपितामहः ॥ १९ ॥
१८-१९) मी यज्ञ, औषध( व्रीहि वगैरे ), मंत्र, अग्नि, आज्य, हविर्द्रव्य, हवनक्रिया, ध्यान, ध्येय, स्तुति, स्तोत्र, नमस्कार, भक्ति, उपासना,वेदत्रयी अगर अग्नित्रयी, ज्ञेयवस्तु,पवित्र पदार्थ व जो पितामह ब्रह्मदेव त्याचाही मी पितामह आहे.   
ॐकारः पावनं साक्षी प्रभुर्मित्रं गतिंर्लयः ।   
उत्पत्तिः पोषको बीजं शरणं वास एव च ॥ २० ॥
२०) ॐकार, सर्वांचा साक्षी, पवित्र करणारा प्रभु, मित्र, गति, लयस्थान, उत्पत्ति, पोषण करणारा, बीज रक्षण करणारा, वसतिस्थान हें सर्वं मीच आहे.
असन्मृ त्युः सदमृतमात्मा ब्रह्माऽहमेव च ।
दानं होमस्तपो भक्तिर्जपः स्वाध्याय एव च ॥ २१ ॥
२१) सत्, असत, ( स्थूलसुक्ष्म ), अमृत, मृत्यु, आत्मा, ब्रह्मही, मीच आहे; तसेंच दान, होम, तप, भक्ति, जप, स्वाध्यायही मीच आहे. 
यद्यत्करोति तत्सर्वं स मे मयि निवेदयत् ॥ २२ ॥
२२) मनुष्य जें जें कर्म करितो तें तें त्यानें मला अर्पण करावें.
योषितोऽथ दुराचाराः पापस्त्रैवर्णिकास्तथा ।
मदाश्रया विमुच्यन्ते किं मद्भक्ता द्विजातयः ॥ २३ ॥
२३) स्त्रिया, दुराचारी, पापी, क्षत्रिय,वैश्य, शूद्र हेही माझ्या आश्रयानें पापमुक्त होतात. मग माझी भक्ति करणारें शुद्ध विप्र मुक्त होणार नाहीत काय? झालेच पाहिजेत.
न विनश्यति मद्भक्तो ज्ञात्वेमा मद्विभूतयः ।
प्रभवं मे विभूतीश्र्च न देवा ऋषयो विदुः ॥ २४ ॥
२४) या माझ्या विभूति जाणणारा माझा भक्त कधींही नष्ट होत नाहीं. माझाजन्म व विभूति देवांना व ऋषींनाही कळत नाहीत. 
नानाविभूतिभिरहं व्याप्य विश्र्वं प्रतिष्ठितः ।
यद्यच्छ्रेष्ठतमं लोके सा विभूतिर्निबोध मे ॥ २५ ॥
२५) हे वरेण्या, मी अनेक विभूतींच्या योगानें या विश्र्वाला व्यापून राहिलों आहे. या जगांत जें जें अतिशय श्रेष्ठ दिसते ती माझी विभूति आहे असे समज.  
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे उपासनायोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
Adhyay Satava Upasana Yogaha
अध्याय सातवा उपासनायोग


Custom Search

No comments:

Post a Comment