Monday, July 16, 2018

Renukechi Aarati रेणुकेची आरती


Renukechi Aarati 
Renukechi Aarati it is composed by Shrimati Saraswatibai Soman in Marathi. It is a beautiful creation of Aarati.
रेणुकेची आरती
जयजयकार प्रेमे करु तव रेणुका माते, रेणुका माते ।
निज भक्तासि अक्षयसुख देशि कृपावंते ॥ ध्रु. ॥
जमदग्नि मुनी तपोनिधींच्या वामांकी वससी ।
अगाध महिमा सांगति शिवप्रभु कार्तीकेयासी ।
विश्र्वाचे तव वैभव अंबे करुणासागरे ।
उपासना तव करिति देवगण नाना उपचारे ।
पराक्रमाचा पुतळा परशूरामाची माता ।
दुष्टां मर्दुनि भारतवर्षा उज्जवल करि आता ॥ १ ॥ ॥ धृव ॥
अनंतरुपें अनंतनामे जगती वावरशी ।
अंतर्यामी जागृति देईं सार्‍या जनतेसी ।
सत्वर करि गे प्रकट पराक्रम स्वाभिमान रक्षीं ।
क्षात्रतेज दशदिाशा उजाळुनि असुरांना भक्षी ।
अनुदिनी चढती कळा देईं जे जशी शुक्ल पक्षी ।
भाग्यचंद्र अक्षय्य रजनिचा सदोदीत रक्षी ॥ २ ॥ धृव. ॥
सत्कीर्तीच्या भरजरि वसना रेखिव काचोळी ।
साज तुझा किति नयनमनोहर शिरि मौत्त्किकजाळी ।
कंठि हार तव नवरत्नांचे (नररत्नांचे) सतत शोभिवंत ।
मिरवी मेखला शौर्याची गे शोभवि कटिप्रांत ।
सुढाळ मौत्त्किक नाकि तुझ्या गे कर्णफुले कानीं ।
बिंदि बिजवरा हस्तभूषणें पैंजण तव चरणी ॥ ३ ॥ ध्रुव. ॥
अलंकारमंडिता परी तू प्रहरणाधारीणी ।
उद्धारिणि आपदाहारिणी सुजना तारीणी ।
मृगमद केशर कुंकुम भाळी चंद्रकोर साजे ।
जयजयकारे मंगलचारे तंतुवाद्य वाजे ।
गाऊ तव स्तुतिस्तोत्र रेणुके नाचू आनंदे ।
विजयोल्हासे धरणी अंबर दुमदुमवू नादे ।॥ ४ ॥ ध्रुव ॥
तपस्विनी मानिनी प्रभावति तेजस्विनि मूर्ती ।
अन्यायाचे पारिपत्य करि अशीच तव कीर्ती ।
यशोनिधी करि भारत आपुला देवांचा हा देश ।
सुसंपन्न सामर्थ्यवान हा मंगलमय आदेश ।
धन्य भारता देव देवता तुझिया क्षेत्रांत ।
सर्व देसी आगळा चंद्रमा जे नक्षत्रांत ॥ ५ ॥ ध्रुव ॥
माते निज कर्णांनी आम्ही मंगल ऐकावे ।
नेत्रांनी शुभ नित्य पाहावे दृढदेही व्हावे ।
सुदृढ अंगे सेवा करु तव जोवरि जीवनप्राण-
सत्कार्यचि आम्ही नित्य करावे हेचि देई वरदान ।
ठेवा आपुल्या पुण्याईचा मेवा मोक्षाचा ।
सरस्वतीसह लाभ घेउ गे तुझ्या प्रसादाचा ॥ ६ ॥ ध्रुव. ॥
Renukechi Aarati 
रेणुकेची आरती






Custom Search

No comments:

Post a Comment