Sunday, August 26, 2018

ShriYogeshwari Ashtak श्रीयोगेश्र्वरीचे अष्टक ( मराठी )


ShriYogeshwari Ashtak 
ShriYogeshwari Ashtak is in Marathi. It is a beautiful creation of Gosavinandan.
श्रीयोगेश्र्वरीचे अष्टक ( मराठी )
अंबे महा त्रिपुर सुंदरी आदि माये ।
दारिद्र्य दुःख भय हारुनि दाविपाये । 
तुझा अगाध महिमा वदती पुराणीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ १ ॥
आंता क्षमा करिशी तूं अपराध माझा ।
मी मूढ केवळ असे परी दास तुझा ।
तूं सांडशील मजला जरि हो निदानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ २ ॥   
लज्जा समस्त तुजला निज बाळकाची ।
तूं माऊली अतिशयें कनवाळुसाची ।
व्हावें प्रसन्न मजला परिसोनी कानी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ३ ॥
नेणो पदार्थ तुज वांचुनि अन्य कांही ।
तूं मायबाप अवघे गणगोत आई ।
तुझाच आश्रय असें जगीं सत्य मानी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ४ ॥
निष्ठूरता जरीं मनीं धरशील आई ।
रक्षील कोण मजला न उपाय कांहीं ।
आणीक देव दुसरा हृदयांत नाहीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ५ ॥
हें चाललें वय वृथा पडलों प्रपंची ।
तेणें करुन स्थिरता न घडे मनाची ।
दुःखार्णवांत पडलों धरिशीघ्र पाणी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ६ ॥
जाळीतसे मजसि हा भवताप अंगी ।
याचे निवारण करी मज भेट वेगीं ।
आनन्द सिंधु लहरि गुण कोण वर्णी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ७ ॥ 
तूं धन्य या त्रिभुवनांत समर्थ कैसी ।
धाकें तुझ्या पळसुटे रिपु दानवांसी ।
येती पुजेसी सुर बैसुनिया विमानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ८ ॥
जैसे कळेल तुजला मज पाळीं तैसें ।
मी प्रार्थितों सकळ साक्ष निदान ऐसे ।
गोसावीनंदन म्हणे मज लावी ध्यानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ९ ॥ 
ShriYogeshwari Ashtak 
श्रीयोगेश्र्वरीचे अष्टक ( मराठी )


Custom Search

No comments:

Post a Comment