Wednesday, June 26, 2019

Somawar Vrata सोमावार व्रत


सोमावार व्रत  Somawar Vrata
सोमवार व्रत
सोमप्रदोष या दिवशी व श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी दिवसा उपोषण (उपवास) करुन सूर्यास्ताच्यावेळी श्रीशंकराची पूजा करावी.
स्मार्त सांप्रदायिक स्री-पुरुषाना ही पूजा नित्य करावी असे आहे. कित्येक माद्वही हे व्रत करतात. 
या पूजेस मुख्यत्वे शिवलिंग असते. ते माती, धातू किंवा इतरही मान्य असलेलेचालते. मातीचे असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करुन मग पूजा करावी.
श्रावण महिन्याच्या पूजेचे विशेष महत्व आहे. या पूजाप्रसंगी महाराष्ट्रांतील स्रीया शंकरास शिवमूठ वाहतात. या वेळी पूजेत बेल, फुले वाहून झाल्यावर तांदूळ, गहू, तीळ, मूग, हरभरे यांपैकी कोणतेही एक धान्य प्रत्येक सोमवारी पांच मूठी अर्पण करावे. नंतर धूप-दीप वगैरे पुढील पूजा करतात. 
शिवमूठ अर्पण करतांना
यावेळी शंकरास " ही फसकी घेउन लक्ष्मी दे  " असे मागणे मागतात.
पुरुषवर्ग लघुरुद्र व अभिषेक करतो. 

२) सोळा सोमवार व्रत
शंकराच्या व्रतांपैकी हे एक अतिप्रभावी व्रत आहे. हे व्रत मोठ्या श्रद्धेने करुन शंकरास प्रसन्न करुन घेता येते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करुन घेता येतात. 
प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास करावा. काहीही खाउ नये. 
संध्याकाळी श्रीशंकराची पूजा करावी, अभिषेक करावा. नैवेद्य, आरती करुन मनोकामना पूर्ण करावी म्हणून श्रीसांबसदाशिवाची प्रार्थना करावी. 
व्रत विधी
अर्धा किलो गव्हाचे पीठ घेउन त्याचे तीन भाग करावे. तूप व गूळ घालून त्याचा नैवेद्य दाखवावा. 
तीन भागांपैकी एक भाग देवाचा, 
दुसरा भाग प्रसाद म्हणून वाटवा. 
व तिसरा भाग स्वतः खावा. 
अशा प्रकारे सलग सोळा सोमवार करावे. 
उद्यापन
सतराव्या सोमवारी पाच किलो कणीक घेउन त्याचा तूप-गूळ घालून (गाकर) चुरमा करावा. तो शंकराच्या देवळांत नेउन शंकराची पूजा झाल्यावर त्याचा नैवेद्य दाखवून त्याचे तीन भाग करुन 
एक देवास अर्पण करावा. 
एक भाग प्रसाद म्हणून वाटावा 
व एक भाग घरी आणून कुटुंबांतील सर्व मंडळींसह आपण खावा. 
सर्व व्रतामध्ये अत्यंत सोपे व लवकर पावणारे हे व्रत भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. 
पुत्रप्राप्ती, पापांपासून मुक्तता, नोकरी, प्रमोशन, अविवाहितांचे विवाह, दारिद्र्य दूर होणे, सर्व प्रकारच्या संकटांतून सुटका होणे. इच्छित सुखांची प्राप्ती होणे. ही सर्व फळे हे व्रत मोठ्या श्रद्धेने व विश्र्वासने केल्यावर मिळतात असे तज्ञलोक सांगतात. 
हे व्रत पुरे होण्याच्याआधीही आपली इच्छापूर्ती झाली तरीही हे व्रत पुरे करावे. सोडू नये. 
स्रियांची अडचण
स्रियांच्या अडचणीच्यावेळी सोमवार आल्यास उपवास करावा. मात्र तो सोमवार सोळामध्ये धरु नये. 

सतराव्या सोमवारी एकतरी मेहुण जेवावयास घालावे. शक्य असेल त्यांनी सोळा मेहुणे जेवावयास घालावीत. तो भोळा सांबसदाशिव त्यांस काहींच कमी पडू देत नाही. 

Custom Search

No comments:

Post a Comment