Tuesday, December 10, 2019

Kahani Somwarchi कहाणी सोमवारची खुलभर दुधाची


Kahani Somwarchi 
This is a story of Somwar(Monday), which belogs to God Shiva. This is all about the Love of God Shiva kids,animals and hole community.
कहाणी सोमवारची खुलभर दुधाची
ऐका परमेश्र्वरा, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा,असे होते. पण हे घडावे कसे. अशी त्याला काळजी वाटत असे. प्रधानाने राजाला युक्ती सांगितली.व गावांत राजाच्या अनुद्येने दंवडी पिटली, की, गावांतील सर्वांनी आपल्या घरचे सर्व दुध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या मंदिरांत पूजेस यावे. 
सर्व गावकर्‍यांना मोठा धाक पडला. ते घाबरुन गेले. सोमवारी घरांतील लहान मुलांनाही दूध दिले नाही. चासरांनाही दूध पिऊ दिले नाही. घरांतील सर्व दूध महादेवाच्या मंदिरी नेले. गावांतील सर्व दूध देवाच्या गाभार्‍यांत पडले तरी गाभारा भरला नाही. 
गावांत एक म्हातारी बाई होती. तिने आपल्या घरांतील सर्व कामकाज आटोपले. मुलाबाळांना खाऊ घातले. लेकी-सुनांना न्हाऊ घातले. गाई-वासरांना चारा दिला. त्यांचा आत्मा तृप्त केला. आपल्या जीवाच सार्थक व्हावे म्हणून गंध-फूल घेतले, चार तांदळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानें घेतली आणि खुलभर दूध घेतले व महादेवाच्या देवळांत आली. मनोभावे देवाची पूजा केली, नमस्कार केला. थोडे दूध नैवेद्यास ठेवले. जय महादेवा ! नंदिकेश्र्वरा ! राजाने सर्व गावांतील दूध तुझ्या गाभार्‍यांत घातले. पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्याही खुलभर दुधाने भरणार नाही. पण मी भावभक्तीने आणलेले दूध तुला अर्पण करते. असे म्हणून शिल्लक राहिलेले दूध गाभारी अर्पण केले व माघारी फिरली. 
म्हातारी गेल्यावर देवळांत चमत्कार घडला.  देवाचा गाभारा दूधाने भरुन गेला. हे देवळांतील गुरवाने पाहीले व राजाला कळविले. पण त्यांना कांही समजेना की गाभारा कसा भरला. दुसर्‍या सोमवारी राजाने देवळांत शिपाई बसविले. याही सोमवारी गाभारा दुधाने भरला. पण कसा भरला हे कांही समजेले नाही. पुढे तिसर्‍या सोमवारी राजा स्वतः देवळांत बसला. म्हातारी पूजा करुन दूध अर्पण करुन जाऊ लागताच गाभारा दुधाने भरला. राजाने शिपायांकरवी म्हातारीस पकडले. ती घाबुन गेली. पण राजाने तीला अभयवचन दिले व गाभारा कसा भरला हे विचारले. म्हातारी म्हणाली, तुझ्या आज्ञेने काय झाले ? वासरांचे, मुलांचे आत्मे तळ[पले. त्यांना दूध मिळाले नाही. मोठ्या माणसांनीही हाय हाय केले. ते देवास आवडत नाही. म्हणून देवाचा गाभारा भरला नाही. मी मात्र घरच्या गाईना चारा, वासरांना दूध पिऊ दिले, मुलांना दूध दिले व मग उरलेले दूध घेऊन देवाची पूजा करुन त्याला अर्पण केले. हे देवाला आवडले म्हणून माझ्या खुलभर दूधाने देवाचा गाभारा भरला. 
आता पुढच्या सोमवारी गावांतील सर्व मुला-वासरांना दुध पाजून मग उरलेले दूध देवास अर्पण करण्यासाठी देवळांत आणावे अशी गावांतील लोकांना दवंडी पिटून माहीती द्यावी. म्हणजे देव आणलेल्या दूधाने संतुष्ट होईल. व गाभारा भरेल. 
राजाने त्याप्रमाणे केले.

चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना, गाईवासरांना दूध पाजून आलेले दूध देवाला वाहिले. हात जोडून देवची प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतो, तर काय देवाचा गाभारा दुधाने भरुन आलेला दिसला. राजाला आनंद झाला. त्याने म्हतारी मोठे इनाम दिले. लेकी-सुनांसह ती मोठ्या सुखासमाधानांत राहू लागली. तसेच तुम्ही आम्ही महादेवाच्या कृपाशर्वादाने राहू या. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.          

Custom Search

No comments:

Post a Comment