Thursday, March 12, 2020

ShriRamCharitManas Part 4 श्रीरामचरितमानसस भाग ४


ShriRamCharitManas Part 4 श्रीरामचरितमानसस भाग ४

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
सो उमेस मोहि पर अनुकूला । करिहिं कथा मुद मंगल मूला ॥
सुमिरि सिवा सिव पाइ पसाऊ । बरनउँ रामचरित चित चाऊ ॥
ते उमेश माझ्यावर प्रसन्न होऊन, (श्रीरामांची) ही कथा आनंद आणि मंगल यांचे मूळ बनवितील. अशा प्रकारे पार्वती आणि शिव या दोघांचे स्मरण करुन आणि त्यांचा प्रसाद मिळवून मी मोठ्या आवडीने श्रीरामचरित्राचे वर्णन करतो. ॥ ४ ॥
भनिति मोरि सिव कृपॉ बिभाती । ससि समाज मिलि मनहुँ सुराती ॥
जे एहि कथहि सनेह समेता । कहिहहिं सुनिहहिं समुझि सचेता ॥
होइहहिं राम चरन अनुरागी । कलि मल रहित सुमंगल भागी ॥
ज्याप्रमाणे तारागणांसह चंद्राबरोबर रात्र शोभते, त्याप्रमाणेमाझी कविता श्रीशंकरांच्या कृपेने शोभून दिसेल. जे ही कथा प्रेमाने व एकाग्रतेने समजून-उमजून वर्णन करतील किंवा ऐकतील, ते कलियुगाच्या पापांनी रहित होतील आणि सुंदर कल्याणाची प्राप्ती करुन श्रीरामांच्या चरणांचे भक्त बनतील. ॥ ५-६ ॥
दोहा—सपनेहुँ साचेहुँ मोहि पर जौं हर गौरि पसाउ ॥
तौ फुर होउ जो कहेउँ सब भाषा भनिति प्रभाउ ॥ १५ ॥
जर माझ्यावर श्रीशिव-पार्वती यांची स्वप्नातही खरोखर प्रसन्नता झाली, तर मी या प्राकृत भाषेतील कवितेचा जो प्रभाव सांगितला आहे, तो सर्व खरा होईल. ॥ १५ ॥
बंदउँ अवध पुरी अति पावनी । सरजू सरि कलि कलुष नसावनि ॥
प्रनवउँ पुर नर नारि बहोरी । ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी ॥
मी अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीला आणि कलियुगातील पापांचा नाश करणार्‍या शरयूनदीला वंदन करतो. नंतर मी ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांनी अपरंपार ममता केली, त्या अयोध्येतील नरनारींना मी वंदन करतो. ॥ १ ॥
सिय निंदक अघ ओघ नसाए । लोक बिसोक बनाइ बसाए ॥
बंदउँ कौसल्या दिसि प्राची । कीरति जासु सकल जग माची ॥
श्रीरामांनी सीतामाईंची निंदा करणार्‍यांच्याही पाप-राशींचा नाश करुन, त्यांना शोकरहित केले व त्यांना आपल्या लोकी नेले. तसेच जिची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे, अशा कौसल्यारुपी पूर्व दिशेला मी वंदन करतो. ॥ २ ॥
प्रगटेउ जहँ रघुपति ससि चारु । बिस्व सुखद खल कमल तुसारु ॥
दसरथ राउ सहित सब रानी । सुकृत सुमंगल मूरति मानी ॥
करउँ प्रनाम करम मन बानी । करहु कृपा सुत सेवक जानी ॥
जिन्हहि बिरचि बड भयउ बिधाता । महिमा अवधि राम पितु माता ॥
जेथून ( कौसल्यारुपी पूर्वदिशेतून ) विश्र्वाला सुख देणारा आणि दुष्टरुपी कमळांच्या कडाक्याच्या थंडीप्रमाणे नाश करणारा श्रीरामचंद्ररुपी सुंदर चंद्र उगवला, त्या सर्व राण्यांसह राजा दशरथांना पुण्य व सुंदर कल्याणाची मूर्ती मानून मी काया-वाचा-मनाने प्रणाम करतो. त्यांनी आपल्या पुत्राचा सेवक समजून मजवर कृपा करावी. त्यांना निर्माण करुन ब्रह्मदेवाने मोठेपणा मिळवला. ते श्रीरामांचे माता-पिता असल्याने त्यांचा महिमा अगाध आहे. ॥ ३-४ ॥
सो०—बंदउँ अवध भुआल सत्य प्रेम जेहि राम पद ।
बिछुरत दीनदयाल प्रिय तनु तृन इव परिहरेउ ॥ १६ ॥
मी अयोध्येचा राजा दशरथ यांना वंदन करतो, ज्यांचे श्रीरामांच्या चरणी खरेखुरे प्रेम होते. इतके की, दीनदयाळू श्रीरामांचा वियोग होताच त्यांनी आपले प्रिय शरीर तुच्छ कस्पटाप्रमाणे फेकून दिले. ॥
प्रनवउँ परिजन सहित बिदेहू । जाहि राम पद गूढ सनेहू ॥
जोग भोग महँ राखेउ गोई । राम बिलोकत प्रगटेउ सोई ॥
कुटुंबासह राजा जनकांनाही मी प्रणाम करतो. त्यांच्या मनात श्रीरामांच्या चरणी गूढ प्रेम भरले होते. पण त्यांनी ते योग व भोग यांमध्ये दडवून ठेवले होते, परंतु श्रीरामांना पाहताच ते उचंबळून आले. ॥ १ ॥
प्रनवउँ प्रथम भरत के चरना । जासु नेम ब्रत जाइ न बरना ॥
राम चरन पंकज मन जासू । लुबुध मधुप इव तजइ न पासू ॥
सर्वांत प्रथम मी भरताच्या चरणी प्रणाम करतो. कारण त्याचे नियम व व्रते यांचे वर्णनही करता येणार नाही. शिवाय श्रीरामांच्या चरणकमलांमध्ये भ्रमराप्रमाणे लुब्ध झालेले त्याचे मन त्यांच्यापासून दूर जात नसे. ॥ २ ॥
बंदउँ लछिमन पद जलजाता । सीतल सुभग भगत सुखदाता ॥
रघुपति कीरति बिमल पताका । दंड समान भयउ जस जाका ॥
नंतर मी लक्ष्मणाच्या चरण-कमलांना वंदन करतो, जी चरण-कमले शीतल, सुंदर व भक्तांना सुखदायी आहेत. श्रीरघुनाथांच्या कीर्तीरुपी विमल ध्वजामध्ये ज्यांची कीर्ती ही ( ध्वज उंच फडकविणार्‍या ) दंडासारखी आहे. ॥ ३
सेस सहस्रसीस जग कारन । जो अवतरेउ भूमि भय टारन ॥
सदा सो सानुकूल रह मो पर । कृपासिंधु सौमित्रि गुनाकर ॥
सहस्र शिरे असणारा जो शेष जगाचे कारण आहे व ज्याने पृथ्वीचे भय नाहीसे करण्यासाठी अवतार घेतला, तो गुणांची खाण असलेला कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण माझ्यावर नेहमी प्रसन्न राहो. ॥ ४ ॥
रिपुसूदन पद कमल नममी । सूर सुसील भरत अनुगामी ॥
महाबीर बिनवउँ हनुमाना । राम जासु जस आप बरखाना ॥
त्यानंतर मी शत्रुघ्नाच्या चरण-कमलांना प्रणाम करतो, तो महान वीर, सुशील आणि भरताचा अनुयायी आहे. मी त्या महावीर हनुमानालाही विनंती करतो की, ज्याच्या कीर्तीचे वर्णन स्वतः श्रीरामचंद्रांनी ( आपल्या मुखाने ) केलेले आहे. ॥ ५ ॥
सो०—प्रनवउँ पवनकुमार खल पावक ग्यान घन ।
जासु हृदय आगार बसहिं राम सर चाप धर ॥ १७ ॥
त्या वायुसुत श्रीहनुमानालाही प्रणाम मी करतो, जो दुष्टरुपी वनाला भस्म करणारा अग्नी आहे. तसेच जो ज्ञानघन असून ज्याच्या हृदयमंदिरात धनुष्य-बाण धारण केलेले श्रीराम निवास करतात. ॥ १७ ॥
कपिपति रीछ निसाचर राजा । अंगदादि जे कीस समाजा ॥
बंदउँ सब के चरन सुहाए । अधम सरीर राम जिन्ह पाए ॥
वानरांचा राजा सुग्रीव, अस्वलांचा राजा जांबवान, राक्षसांचा राजा बिभिषण अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे, ज्यांनी अधम ( पशू आणि राक्षस इत्यादी ) शरीरामध्ये जन्मूनही श्रीरामांना प्राप्त करुन घेतले आहे, त्या सर्वांच्या चरणांना मी वंदन करतो. ॥ १ ॥
रघुपति चरन उपासक जेते । खग मृग सुर नर असुर समेते ॥
बंदउँ पद सरोज सब केरे । जे बिनु काम राम के चेरे ॥
पशू, पक्षी, देव, मनुष्य, असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक व निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण-कमलांना मी वंदन करतो. ॥ २ ॥
सुक सनकादि भगत मुनि नारद । जे मुनिबर बिग्यान बिसारद ॥
प्रनवउँ सबहि धरनि धरि सीसा । करहु कृपा जन जानि मुनीसा ॥
शुकदेव, सनकादी, नारदमुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत, त्या सर्वांना मी भूमीवर मस्तक टेकून प्रणाम करतो. हे मुनीश्र्वरांनो ! तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा. ॥ ३ ॥
जनकसुता जग जननि जानकी । अतिसय प्रिय करुनानिधान की ।
ताके जुग पद कमल मनावउँ । जासु कृपॉ निरमल मति पावउँ ॥
राजा जनकांची कन्या, जगन्माता आणि करुणानिधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्या जानकीमातेच्या दोन्ही चरण-कमलांना मी आळवितो की, त्यांच्या कृपेमुळे निर्मळ बुद्धी मला मिळावी. ॥ ४ ॥
पुनि मन बचन कर्म रघुनायक । चरन कमल बंदउँ सब लायक ॥
राजिवनयन धरें धनु सायक । भगत बिपति भंजन सुखदायक ॥
त्यानंतर मी कमलनयन, धनुष्य-बाण धारण करणार्‍या, भक्तांची संकटे दूर करणार्‍या व सर्वांना सुख देणार्‍या श्रीरामांच्या सर्वसमर्थ चरणकमलांना कायावाचामनाने वंदन करतो. ॥ ५ ॥
दोहा---गिरा अरथ जल बीचि सम कहिअत भिन्न न भिन्न ।
बंदउँ सीता राम पद जिन्हहि परम प्रिय खिन्न ॥ १८ ॥
जसे वाणी व तिचा अर्थ, तसेच जल व तरंग यांच्यासारखे सांगण्यापुरते भिन्न आहेत, परंतु वास्तविक एकरुप आहेत, तसेच जे दीनदयाळू आहेत, त्या सीतारामांच्या चरणांना मी वंदन करतो. ॥ १८ ॥
बंदउँ नाम राम रघुबर को । हेतु कृसानु भानु हिमकर को ॥
बिधि हरि हरमय बेद प्रान सो । अगुन अनूपम गुन निधान सो ॥
मी रघुनाथांच्या ‘ राम ‘ नावाला वंदन करतो. जे अग्नी, सूर्य आणि चंद्र यांचे ( ‘ र ‘, ‘ आ ‘ व ‘ म ‘ रुपाने ) बीज आहे, तसेच जे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवरुप आहे, जे वेदांचा प्राण आहे, जे उपमारहित आहे, आणि निर्गुण असून गुणांचे भांडार आहे. ॥ १ ॥
महामंत्र जोइ जपत महेसू । कासी मुकुति हेतु उपदेसू ॥
महिमा जासु जान गनराऊ । प्रथम पूजिअत नाम प्रभाऊ ॥
‘ राम ‘ हे नाम महामंत्र आहे, स्वतः महेश्र्वर त्याचा जप करतात. ज्याचा उपदेश काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो, त्याचा महिमा श्रीगजाननही जाणतो. ‘ राम ‘ या नामाच्या प्रभावामुळे श्रीगजाननाची
सर्वांत प्रथम पूजा होते. ॥ २ ॥
जान आदिकबि नाम प्रतापू । भयउ सुद्ध करि उलटा जापू ॥
सहस नाम सम सुनि सिव बानी । जपि जेईं पिय संग भवानी ॥
अदिकवी श्रीवाल्मीकींना रामनामाचा प्रताप कळला. कारण ते नाम उलटे ( ‘ मरा ‘, ‘ मरा ‘ ) जपूनही ते पवित्र झाले, एक राम—नाम हे (इतर) सहस्र नामांएवढे आहे, असे शिवांचे वचन ऐकल्यावर पार्वतीही नेहमी आपल्या पतीबरोबर राम—नामाचा जप करीत असते. ॥ ३ ॥
हरषे हेतु हेरि हर ही को । किय भूषन तिय भूषन ती को ॥
नाम प्रभाउ जान सिव नीको । कालकूट फलु दीन्ह अमी को ॥
राम नामाबद्दल पार्वतीच्या मनात इतके प्रेम आहे, असे पाहून श्रीशंकरांना हर्ष झाला. त्यांनी स्रियांमध्ये भूषण असलेल्या पार्वतीला आपले भूषण—आपले अर्धे अंग बनविले. नामाचा प्रभाव शिवांना पुरता माहीत आहे. त्यामुळेच कालकूट विषाने त्यांना अमृताचे फल दिले. ॥ ४ ॥
दोहा—बरषा रितु रघुपति भगति तुलसी सालि सुदास ।
राम नाम बर बरन जुग सावन भादव मास ॥ १९ ॥
तुलसीदास म्हणतात की, श्रीरामांची भक्ती हा वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त हे धान्य आहेत आणि ‘ राम ‘ या नामातील दोन अक्षरे श्रावण-भाद्रपद मास आहेत. ( श्रावण—भाद्रपदातील पावसाने पीक उत्तम यावे, तसे रामनामजपाने रामभल्ती करुन भक्त भक्तिसंपन्न होतात. ) ॥ १९ ॥
  आखर मधुर मनोहर दोऊ । बरन बिलोचन जन जिय जोऊ ॥
सुमिरत सुलभ सुखद सब काहू । लोक लाहू परलोक निबाहू ॥
ही दोन अक्षरे मधुर व मनोहर आहेत, ती वर्णमालारुपी शरीराचे दोन नेत्र आहेत. ती ( अक्षरे ) भक्तांचे जीवन आहेत आणि स्मरण करण्यासाठी सर्वांना सुलभ व आनंदप्रद आहेत. तसेच ती इहलोकी लाभ देतात आणि परलोकी सांभाळ करतात. ( अर्थात ती भगवंताच्या दिव्य धामामध्ये दिव्य देहाने नित्य भगवत्सेवेमध्ये ठेवतात. ) ॥ १ ॥
कहत सुनत सुमिरत सुठि नीके । राम लखन सम प्रिय तुलसी के ॥
बरनत बरन प्रीति बिलगाती । ब्रह्म जीव सम सहज सँघाती ॥
ही अक्षरे उच्चारण्यास, ऐकण्यास व स्मरण करण्यास फारच सुंदर आहेत. तुलसीदासांना तर ती राम-लक्ष्मणासारखी प्रिय आहेत. त्यांतील ‘ र ‘ व ‘ म ‘ यांचे वेगवेगळे वर्णन केल्याने परस्पर प्रेम दिसून येते. ही जीव व ब्रह्म यांच्यासारखी स्वभावतःच बरोबर राहातात. ॥ २ ॥
नर नारायन सरिस सुभ्राता । जग पालक बिसेषि जन त्राता ॥
भगति सुतिय कल करन बिभूषन । जग हित हेतु बिमल बिधु पूषन ॥
दोन्ही अक्षरे ही नर-नारायणाप्रमाणे प्रेमळ भाऊ आहेत. ही जगाचे पालन आणि विशेषतः भक्तांचे रक्षण करणारी आहेत. ही अक्षरे भक्तीरुपी सुंदर स्रीच्या कानांतील सुंदर कर्णफुले आहेत आणि जगाचे हित करणारे तेजस्वी चंद्र-सूर्य आहेत. ॥ ३ ॥
स्वाद तोष सम सुगति सुधा के । कमठ सेष सम धर बसुधा के ॥
जन मन मंजु कंज मधुकर से । जीह जसोमति हरि हलधर से ॥
ही मोक्षरुप अमृताच्या गोडीसारखी व तृप्तीसारखी आहेत. ती कूर्म व शेषाप्रमाणे पृथ्वीला धारण करणारी आहेत. भक्तांच्या मनरुपी सुंदर कमळात विहार करणार्‍या भ्रमराप्रमाणे आहेत. जीभरुपी यशोदेला श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासारखी ( आनंद देणारी ) आहेत. ॥ ४ ॥
दोहा—एकु छत्रु एकु मुकुटमनि सब बरननि पर जोउ ।
तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत दोउ ॥ २०
तुलसीदास म्हणतात की, श्रीरघुनाथांच्या नावातील दोन्ही अक्षरे अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्यांतील एक ( र कार ) छत्ररुपाने रेफ ( र् ) आणि दुसरा ( मकार ) ही मुकुटमणी अनुस्वार ( . ) रुपाने सर्व अक्षरांच्या डोक्यावर राहतात. ॥ २० ॥
  समुझत सरिस नाम अरु नामी । प्रीति परसपर प्रभु अनुगामी ॥
नाम रुप दुइ ईस उपाधी । अकथ अनादि सुसामुझि साधी ॥
तसे पाहिले तर नाम आणि नामी दोन्ही एकरुपच आहेत, परंतु दोघांमध्ये स्वामी आणि सेवक यांच्याप्रमाणे प्रेम आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो, त्याच-प्रमाणे नामामागे नामी चालतो. प्रभू श्रीराम ‘ राम ‘ हे घेताच तेथे येतात. नाम आणि रुप या दोन्ही ईश्र्वराच्या उपाधी आहेत. ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत, अनादी आहेत आणि शुद्ध भक्तीने युक्त बुद्धीनेच यांचे स्वरुप जाणता जाते. ॥ १ ॥
को बड छोटा कहत अपराधू । सुनि गुन भेदु समुझिहहिं साधू ॥
देखिअहिं रुप नाम आधीना । रुप ग्यान नहिं नाम बिहीना ॥
यापैकी कोण मोठे व कोण लहान, हे सांगणे हा अपराध आहे. यांच्या गुणांचे तारतम्य ( कमी-जास्तपणा ) साधु-पुरुष स्वतःच जाणतात. रुप हे नामाच्या अधीन दिसून येते आणि नामाशिवाय रुपाचे ज्ञान होऊ शकत नाही. ॥ २ ॥
रुप बिसेष नाम बिनु जानें । करतल गत न परहिं पहिचानें ॥
सुमिरिअ नाम रुप बिनु देखें । आवत हृदयँ सनेह बिसेषें ॥
कोणतेही विशिष्ट रुप हे त्याचे नाम जाणल्याविना अगदी तळहातावर ठेवले तरी ओळखता येणे शक्य नाही आणि रुप पाहिल्याशिवायही नामाचे स्मरण केल्यास विशेष प्रेमासह ते रुप हृदयात प्रकट होते. ॥ ३ ॥
नाम रुप गति अकथ कहानी । समुझत सुखद न परति बखानी ॥
अगुन सगुन बिच नाम सुसाखी । उभय प्रबोधक चतुर दुभाषी ॥
नाम व रुप यांच्यातील संबंध सांगता येण्याजोगा नाही. ते समजण्यास सुखदायक 

आहे, परंतु त्याचे वर्णन करता येत नाही. भगवंताच्या निर्गुण व सगुण रुपांच्या मध्ये 

नाम हे सुंदर साक्षीदार आहे आणि दोन्हींचे यथार्थ ज्ञान करविणारे चतुर दुभाषी 

आहे. 

॥ ४ ॥





Custom Search

No comments:

Post a Comment