Sunday, July 12, 2020

ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७


ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७ 
दोहा १६६ ते १६९ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—होहिं बिप्र बस कवन बिधि कहहु कृपा करि सोउ ।
तुम्ह तजि दीनदयाल निज हितू न देखउँ कोउ ॥ १६६ ॥
ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील, तेही कृपा करुन मला सांगा. हे दीनदयाळू, तुम्हांला सोडून दुसर्‍या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही,’ ॥ १६६ ॥
सुनु नृप बिबिध जतन जग माहीं । कष्टसाध्य पुनि होहिं कि नाहीं ॥
अहइ एक अति सुगम उपाई ॥ तहाँ परंतु एक कठिनाई ॥
( तपस्वी म्हणाला, ) ‘ हे राजा, जगात अनेक उपाय आहेत, परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील ( सांगता येत नाहीं. ) एक उपाय फार सोपा आहे, परंतु त्यातही एक अडचण आहे. ॥ १ ॥
मम आधीन जुगुति नृप सोई । मोर जाब तव नगर न होई ॥
आजु लगें अरु जब तें भयउँ । काहू के गृह ग्राम न गयऊँ ॥
हे राजा, ती युक्ती माझ्याजवळ आहे. पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही. जेव्हापासून मी उत्पन्न झालो, तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही. ॥ २ ॥
जौं न जाउँ तव होइ अकाजू । बन आइ असमंजस आजू ॥
सुनि महीस बोलेउ मृदु बानी । नाथ निगम असि नीति बखानी ॥
परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल. आज मी मोठ्या पेचांत सापडलो आहे.’ हे ऐकून राजा मृदु स्वरात म्हणाला, ‘ हे नाथ, वेदांमध्ये असे सांगितले आहे की, ॥ ३ ॥
बड़े सनेह लघुन्ह पर करहीं । गिरि निज सिरनि सदा तृन धरहीं ॥
जलधि अगाध मौलि बह फेनू । संतत धरनि धरत सिर रेनू ॥
मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच. पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात. खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते.’ ॥ ४ ॥
दोहा—अस कहि गहे नरेस पद स्वामी होहु कृपाल ।
मोहि लागि दुख सहिअ प्रभु सज्जन दीनदयाल ॥ १६७ ॥
असे म्हणून राजाने  मुनीचे पाय धरले. ( आणि म्हटले, ) ‘ हे स्वामी, कृपा करा. तुम्ही संत आहात. दीनदयाळ आहात. म्हणून हे प्रभो, माझ्यासाठी एवढा त्रास जरुर सोसा. ॥ १६७ ॥
 जानि नृपहि आपन आधीन । बोला तापस कपट प्रबीना ॥
सत्य कहउँ भूपति सुनु तोही । जग नाहिन दुर्लभ कछु मोही ॥
राजा आपल्या पूर्ण अधीन झाला आहे, हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला, ‘ हे राजा ! ऐक. मी तुला खरे सांगतो. या जगात मला काहीही कठीण नाही. ॥ १ ॥
अवसि काज मैं करिहउँ तोरा । मन तन बचन भगत तैं मोरा ॥
जोग जुगुति तप मंत्र प्रभाऊ । फलइ तबहिं जब करिअ दुराऊ ॥
मी तुझे काम नक्की करीन. कारण तू कायावाचामनाने माझा भक्त झाला आहेस. परंतु योग, युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो. ॥ २ ॥
जौं नरेस मैं करौं रसोई । तुम्ह परुसहु मोहि जान न कोई ॥
अन्न सो जोइ जोइ भोजन करई । सोइ सोइ तव आयसु अनुसरई ॥
हे राजा ! मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला, पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही, तर मग ते अन्न जो खाईल, तो तो तुमचा आज्ञाधारक होईल. ॥ ३ ॥
पुनि तिन्ह के गृह जेवँइ जोऊ । तव बस होइ भूप सुनु सोऊ ॥
जाइ उपाय रचहु नृप एहू । संबत भरि संकलप करेहू ॥
एवढेच नव्हे, तर त्यांच्या घरीसुद्धा जो कोणी हे भोजन करील, हे राजा, तो सुद्धा तुझ्या अधीन होईल. हे राजा, जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर. ॥ ४ ॥
दोहा—नित नूतन द्विज सहस सत बरेहु सहित परिवार ।
मैं तुम्हरे संकलप लगि दिनहिं करबि जेवनार ॥ १६८ ॥
नित्य नव्या एक लाख ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर. मी तुझ्या संकल्पापर्यंत ( वर्षभर ) रोज स्वयंपाक करीन. ॥ १६८ ॥
एहि बिधि भूप कष्ट अति थोरें । होइहहिं सकल बिप्र बस तोरें ॥
करिहहिं बिप्र होम मख सेवा । तेहिं प्रसंग सहजेहिं बस देवा ॥
हे राजा,अशा प्रकारे फार थोड्या श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील. ब्राह्मण हवन, यज्ञ आणि सेवा-पूजा करतील, त्यामुळे देवसुद्धा सहजपणे वश होतील. ॥ १ ॥
और एक तोहि कहउँ लखाऊ । मैं एहि बेष न आउब काऊ ॥
तुम्हरे उपरोहित कहुँ राया । हरि आनब मैं करि निज माया ॥
मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो. मी या रुपात कधीही येणार नाही. हे राजा, मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन. ॥ २ ॥
तपबल तेहि करि आपु समाना । रखिहउँ इहाँ बरष परवाना ॥
मैं धरि तासु बेषु सुनु राजा । सब बिधि तोर सँवारब काजा ॥
तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून एक वर्ष येथे ठेवून घेईन आणि हे राजा, मी त्याचे रुप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन. ॥ ३ ॥
गै निसि बहुत सयन अब कीजे । मोहि तोहि भूप भेंट दिन तीजे ॥
मैं तपबल तोहि तुरग समेता । पहुँचैहउँ सोवतहि निकेता ॥
हे राजा, रात्र फार झाली आहे, आता झोप. आजपासून तिसर्‍या दिवशी माझी-तुझी भेट होईल. तपोबलाने मी तुला घोड्यासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन. ॥ ४ ॥
दोहा—मैं आउब सोइ बेषु धरि पहिचानेहु तब मोहि ।
जब एकांत बोलाइ सब कथा सुनावौं तोहि ॥ १६९ ॥
मी तो पुरोहिताचा वेष घेऊन येईन. जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्टी सांगेन, तेव्हा तू मला ओळखशील.’ ॥ १६९ ॥
सयन कीन्ह नृप आयसु मानी । आसन जाइ बैठ छलग्यानी ॥
श्रमित भूप निद्रा अति आई । सो किमि सोव सोच अधिकाई ॥
राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला. राजा थकला होता, त्याला फार गाढ झोप आली. पण तो कपटी कसा झोपणार ? त्याला फार काळजी वाटत होती. ॥ १ ॥
कालकेतु निसिचर तहँ आवा । जेहिं सूकर होइ नृपहि भुलावा ॥
परम मित्र तापस नृप केरा । जानइ सो अति कपट घनेरा ॥
त्याच वेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला. त्याने डुक्कराचे रुप घेऊन राजाची दमछाक केली होती. तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपट विद्येत निष्णात होता. ॥ २ ॥
तेहि के सत सुत अरु दस भाई । खल अति अजय देव दुखदाई ॥
प्रथमहिं भूप समर सब मारे । बिप्र संत सुर देखि दुखारे ॥
त्याला शंभर मुले आणि दहा भाऊ होते. ते फार दुष्ट व अजिंक्य होते. देवांना दुःख देणारे होते. ब्राह्मण, संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रतापभानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारुन टाकले होते. ॥ ३ ॥
तेहिं खल पाछिल बयरु सँभारा । तापस नृप मिलि मंत्र बिचारा ॥
जेहिं रिपु छय सोइ रचेन्हि उपाऊ । भावी बस न जान कछु राऊ ॥
त्या दुष्टाने पूर्वींचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी-

राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि

 शत्रूचा नाश ज्याप्रमाणे होईल, तो उपाय योजला.

 भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा ( प्रतापभानू ) 

काहीही समजू शकला नाही. ॥ ४ ॥


Custom Search

No comments:

Post a Comment