Tuesday, September 1, 2020

ShriRamcharitmans Part 40 श्रीरामचरितमानस भाग ४०

ShriRamcharitmans Part 40  
Doha 207 to 209 
श्रीरामचरितमानस भाग ४० 
दोहा २०७ ते २०९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--देहु भूप मन हरषित तजहु मोह अग्यान ।
धर्म सुजस प्रभु तुम्ह कौं इन्ह कहँ अति कल्यान ॥ २०७ ॥
हे राजा, प्रसन्न मनाने यांना तुम्ही द्या. मोह व अज्ञान सोडून द्या. हे स्वामी, यामुळे तुम्हांला धर्म व सुकीर्ती प्राप्त होईल आणि यांचेही परम कल्याण होईल.' ॥ २०७ ॥
सुनि राजा अति अप्रिय बानी । हृदय कंप मुख दुति कुमुलानी ॥
चौथेंपन पायउँ सुत चारी । बिप्र बचन नहिं कहेहु बिचारी ॥
हे अत्यंत अप्रिय असे बोलणे ऐकून राजांचे मन थरारले. त्यांचा चेहरा उतरला. ( ते म्हणाले, ) ' हे मुने ! म्हातारपणी मला चार पुत्र मिळाले आहेत. तुम्ही विचार करुन बोलला नाहीत. ॥ १ ॥
मागाहु भूमि धेनु धन कोसा । सर्बस देउँ आजु सहरोसा ॥
देह प्रान तें प्रिय कछु नाहीं । सोउ मुनि देउँ निमिष एक माहीं ॥
हे मुनी, तुम्ही पृथ्वी, गाई, धन, खजिना यांपैकी काहीही मागा. मी मोठ्या आनंदाने आपले सर्वस्व अर्पण करीन. देह आणि प्राण यांच्यापेक्षा काहीही अधिक प्रिय नसते. मी तेही एका क्षणात देईन. ॥ २ ॥
सब सुत प्रिय मोहि प्रान कि नाईं । राम देत नहिं बनइ गोसाईं ॥
कहँ निसिचर अति घोर कठोरा । कहँ सुंदर सुत परम किसोरा ॥
सर्व पुत्र मला प्राणांप्रमाणे प्रिय आहेत, त्यातही हे प्रभो, रामाला तर ( कोणत्याही परिस्थितीत ) देता येत नाही. अत्यंत भयानक राक्षस कुठे व अत्यंत किशोर अवस्थेतील ( सुकुमार ) माझे सुंदर पुत्र कुठे ?' ॥ ३ ॥
सुनि नृप गिरा प्रेम रस सानी । हृदयँ हरष माना मुनि ग्यानी ॥
तब बसिष्ठ बहुबिधि समुझावा । नृप संदेह नास कहँ पावा ॥
राजांची ही प्रेमपूर्ण वाणी ऐकून ज्ञानी मुनी विश्वामित्रांना फार आनंद वाटला. जेव्हा वसिष्ठांनी राजांना पुष्कळ प्रकारे समजावले, तेव्हा त्यांचा मनातील संदेह दूर झाला. ॥ ४ ॥
अति आदर दोउ तनय बोलाए । हृदयँ लाइ बहु भॉंति सिखाए ॥
मेरे प्रान नाथ सुत दोऊ । तुम्ह मुनि पिता आन नहिं कोऊ ॥
राजा दशरथांनी मोठ्या आदराने दोन्ही पुत्रांना बोलाविले आणि त्यांना हृदयाशी धरुन अनेक प्रकारे उपदेश केला. ( आणि विश्वामित्रांना म्हटले, ) ' हे नाथ, हे दोन्ही पुत्र माझे प्राण आहेत. हे मुनी, ( आता ) तुम्हीच यांचे वडील आहात. दुसरे कोणी नाही.' ॥ ५ ॥        
दोहा--सौंपे भूप रिषिहि सुत बहुबिधि देइ असीस ।
जननी भवन गए प्रभु चले नाइ पद सीस ॥ २०८ ( क ) ॥
राजांनी अनेक आशीर्वाद देऊन पुत्रांना ऋषींच्या हवाली केले. मग प्रभू मातेच्या महालात गेले आणि तिच्या पाया पडून निघाले. ॥ २०८ ( क ) ॥
सो०--पुरुषसिंह दोउ बीर हरषि चले मुनि भय हरन ।
कृपासिंधु मतिधीर अखिल बिस्व कारन करन ॥ २०८ ( ख ) ॥
ते पुरुष-सिंह दोघे भाऊ ( राम व लक्ष्मण ) मुनींचे भय दूर करण्यासाठी आनंदाने निघाले. ते कृपासागर, धीरबुद्धी आणि संपूर्ण विश्वाच्या कारणाचेही कारण होते. ॥ २०८ ( ख ) ॥
अरुन नयन उर बाहु बिसाला । नील जलज तनु स्याम तमाला ॥
कटि पट पीत कसें बर भाथा । रुचिर चाप सायक दुहुँ हाथा ॥
भगवान रामांचे नेत्र कमळासारखे लालसर होते, विशाल छाती आणि आजानुबाहू होते. नीलकमल आणि तमाल वृक्षासारखे श्यामल शरीर होते, कटीला पीतांबर नेसलेले आणि सुंदर भाते बांधलेले होते. दोन्ही हातांमध्ये सुंदर धनुष्य व बाण होते. ॥ १ ॥
स्याम गौर सुंदर दोउ भाई । बिस्वामित्र महानिधि पाई ॥
प्रभु ब्रह्मन्यदेव मैं जाना । मोहि निति पिता तजेउ भगवाना ॥
श्याम व गौर वर्णाचे दोन्ही भाऊ परम सुंदर होते. विश्वामित्रांना ( त्यांच्या रुपाने ) जणू मोठा निधी मिळाला होता. ( ते विचार करु लागले, ) प्रभू हे ब्राह्मणांचे भक्त आहेत, हे मला समजले. माझ्यासाठी भगवंतांनी आपल्या पित्यालाही सोडले. ॥ २ ॥
चले जात मुनि दीन्हि देखाई । सुनि ताड़का क्रोध करि धाई ॥
एकहिं बान प्रान हरि लीन्हा । दीन जानि तेहि निज पद दीन्हा ॥
वाटेत जाताना मुनींनी ताडका दाखविली. शब्द ऐकताच ती रागाने धावून आली. श्रीरामांनी एकाच बाणात तिला ठार मारले व तिला शरणागत मानून निजपद ( आपले दिव्य स्वरुप ) दिले. ॥ ३ ॥
तब रिषि निज नाथहि जियँ चीन्ही । बिद्यानिधि कहुँ बिद्या दीन्ही ॥
जाते लाग न छुधा पिपासा । अतुलित बल तनु तेज प्रकासा ॥
मग विश्र्वामित्र ऋषींनी प्रभूंना ते विद्येचे भांडार असल्याचे जाणूनही ( लीला पूर्ण करण्यासाठी ) अशी विद्या दिली की, ज्यामुळे त्यांना तहान-भूक लागणार नाही आणि त्यांच्या शरीरात अतुल बळ व तेज प्रकाशित होईल. ॥ ४ ॥ 
 दोहा--आयुध सर्ब समर्पि कै प्रभु निज आश्रम आनि ।
कंद मूल फल भोजन दीन्ह भगति हित जानि ॥ २०९ ॥
सर्व शस्त्रास्त्रे प्रभूंना देऊन मुनी त्यांना आश्रमात घेऊन आले आणि त्यांना आपले हितकर्ते मानून भक्तिपूर्वक कंदमुळे आणि फळांचा आहार दिला. ॥ २०९ ॥
प्रात कहा मुनि सन रघुराई । निर्भय जग्य करहु तुम्ह जाई ॥
होम करन लागे मुनि झारी । आपु रहे मख कीं रखवारी ॥
प्रातःकाळी श्रीरघुनाथांनी मुनींना म्हटले, ' तुम्ही निर्भयपणाने यज्ञ करा, हे ऐकून सर्व मुनी हवन करु लागले. श्रीराम स्वतः यज्ञाचे रक्षण करण्यास उभे राहिले. ॥ १ ॥
सुनि मारीच निसाचर क्रोही । लै सहाय धावा मुनिद्रोही ॥
बिनु फर बान राम तेहि मारा । सत जोजन गा सागर पारा ॥
ही वार्ता समजताच मुनींचा शत्रू असलेला मारीच राक्षस चिडून आपल्या सोबत्यांना घेऊन धावून आला. श्रीरामांनी फाळ नसलेला बाण त्याला मारला, त्यासरशी तो शंभर योजने विस्तार असलेल्या समुद्रापलीकडे जाऊन पडला. ॥ २ ॥
पावक सर सुबाहु पुनि मारा । अनुज निसाचर कटकु सँघारा ॥
मारि असुर द्विज निर्भयकारी । अस्तुति करहिं देव मुनि झारी ॥
नंतर त्यांनी सुबाहूला आग्निबाण मारला. इकडे लक्ष्मणाने राक्षसांच्या सेनेचा संहार केला. अशा रीतीने श्रीरामांनी राक्षसांना मारुन ब्राह्मणांना निर्भय केले. तेव्हा सर्व देव आणि मुनी त्यांची स्तुती करु लागले. ॥ ३ ॥   
तहँ पुनि कछुक दिवस रघुराया । रहे कीन्हि बिप्रन्ह पर दाया ॥
भगति हेतु बहु कथा पुराना । कहे बिप्र जद्यपि प्रभु जाना ॥
श्रीरघुनाथांनी तेथे काही दिवस आणखी राहून ब्राह्मणांच्यावर कृपा केली. त्यानी मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांना पुराणांतील बर्‍याच कथा सांगितल्या. वास्तविक त्या सर्व श्रीरामांना माहीत होत्या. ॥ ४ ॥
तब मुनि सादर कहा बुझाई । चरित एक प्रभु देखिअ जाई ॥
धनुषजग्य सुनि रघुकुल नाथा । हरषि चले मुनिबर के साथा ॥
नंतर मुनींनी आदराने श्रीरामांना समजावून सांगितले की, हे प्रभो, माझ्याबरोबर येऊन एक कौतुक बघा. ' रघुकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र धनुष्ययज्ञाची वार्ता ऐकून मुनिश्रेष्ठ विश्र्वामित्रांच्याबरोबर आनंदाने निघाले. ॥ ५ ॥
आश्रम एक दीख मग माहीं । खग मृग जीव जंतु तहँ नाहीं ॥
पूछा मुनिहि सिला प्रभु देखी । सकल कथा मुनि कहा बिसेषी ॥
वाटेत एक आश्रम दिसला. तेथे पशु-पक्षी, इतकेच काय कोणताही प्राणी नव्हता. तेथे एक शिळा पाहून प्रभूंनी  विचारले, तेव्हा मुनींनी सविस्तर गोष्ट सांगितली. ॥ ६ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment