Tuesday, October 6, 2020

ShriRamcharitmans Part 50 श्रीरामचरितमानस भाग ५०

 

ShriRamcharitmans Part 50 
Doha 237 to 239 
श्रीरामचरितमानस भाग ५० 
दोहा २३७ ते २३९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--जनमु सिंधु पुनि बंधु बिषु दिन मलीन सकलंक ।
सिय मुख समता पाव किमि चंदु बापुरो रंक ॥ २३७ ॥
चंद्राचा जन्म खार्‍या समुद्रात झाला आहे. त्याचा समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे विष याचा भाऊ आहे. दिवसा हा मलिन असतो आणि कलंकित आहे. बिचारा चंद्र सीतेच्या मुखाची बरोबरी कशी करु शकेल ? ॥ २३७ ॥
घटइ बढ़इ बिरहिनि दुखदाई । ग्रसइ राहु निज संधिहिं पाई ॥
कोक सोकप्रद पंकज द्रोही । अवगुन बहुत चंद्रमा तोही ॥
शिवाय तो वाढतो व घटत जातो. विरहिणींना दुःख देतो. राहू संधी मिळताच त्याला ग्रासून टाकतो, चंद्र हा चक्रवाक पक्ष्याला चक्रवाकीच्या वियोगामुळे शोक देणार आणि सूर्यविकासी कमळांचा वैरी आहे. हे चंद्रा, तुझ्यामुध्ये पुष्कळसे अवगुण आहेत. ॥ १ ॥
बैदेही मुख पटतर दीन्हे । होइ दोषु बड़ अनुचित कीन्हे ॥
सिय मुखछबि बिधु ब्याज बखानी । गुर पहिं चले निसा बडि जानी ॥ 
म्हणून जानकीच्या मुखाला तुझी उपमा देण्याने मोठे अनुचित कर्म करण्याचे पाप लागेल. ' अशा प्रकारे चंद्राच्या निमित्ताने सीतेच्या मुख-सौंदर्याचे वर्णन करता-करता रात्र फार झाल्याचे पाहून श्रीराम गुरुजींच्याजवळ गेले. ॥ २ ॥
करि मुनि चरन सरोज प्रनामा । आयसु पाइ कीन्ह बिश्रामा ॥
बिगत निसा रघुनायक जागे । बंधु बिलोकि कहन अस लागे ॥
मुनींच्या चरण-कमलांना प्रणाम करुन व आज्ञा घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. रात्र संपल्यावर श्रीरघुनाथ जागे झाले आणि लक्ष्मणाला पाहून म्हणाले, ॥ ३ ॥
उयउ अरुन अवलोकहु ताता । पंकज कोक लोक सुखदाता ॥
बोले लखनु जोरि जुग पानी । प्रभु प्रभाउ सूचक मृदु बानी ॥
' लक्ष्मणा, बघ. कमल, चक्रवाक व संपूर्ण जगाला सुख देणारा अरुणोदय झाला. ' लक्ष्मण दोन्ही हात जोडून प्रभूंच्या प्रभावाला अनुकूल अशा कोमल वाणीने म्हणाला, ॥ ४ ॥
दोहा--अरुनोदयँ सकुचे कुमुद उडगन जोति मलीन । 
जिमि तुम्हार आगमन सुनि भए नृपति बलहीन ॥ २३८ ॥
' अरुणोदय झाल्यामुळे कुमुदिनी मिटली आणि तारांगणांचा प्रकाश निस्तेज झाला. ज्याप्रमाणे तुम्ही आल्याचे समजताच सर्व राजे बलहीन व्हावे. ॥ २३८ ॥
नृप सब नखत करहिं उजिआरी । टारि न सकहिं चाप तम भारी ॥
कमल कोक मधुकर खग नाना । हरषे सकल निसा अवसाना ॥
सर्व राजेरुपी तारे मंद प्रकाश देतात, परंतु ते धनुष्यरुपी महान अंधकाराला दूर करु शकत नाहीत. रात्रीचा अंत झाल्यामुळे कमल, चक्रवाक पक्षी, भ्रमर आणि नाना प्रकारचे पक्षी आनंदून गेले आहेत. ॥ १ ॥
ऐसेहिं प्रभु सब भगत तुम्हारे । होइहहिं टूटें धनुष सुखारे ॥
उयउ भानु बिनु श्रम तम नासा । दुरे नखत जग तेजु प्रकासा ॥
त्याप्रमाणे हे प्रभो, धनुष्य मोडल्यावर तुमचे सर्व भक्त सुखी होतील. सूर्योदय झाला आणि अनायासे अंधार नष्ट झाला. तारे मावळले आणि जगात तेजाचा प्रकाश पडला. ॥ २ ॥
रबि निज उदय ब्याज रघुराया । प्रभु प्रतापु सब नृपन्ह दिखाया ॥
तव भुज बल महिमा उदघाटी । प्रगटी धनु बिघटन परिपाटी ॥
हे रघुनाथ, सूर्याने आपल्या उदयाने सर्व राजांना तुमचा प्रताप दाखवून दिला आहे. तुमच्या भुजांच्या बलाचा महिमा प्रकट करण्यासाठी धनुष्य मोडण्याचा पण लावण्यात आला आहे. ॥ ३ ॥
बंधु बचन सुनि प्रभु मुसुकाने । होइ सुचि सहज पुनीत नहाने ॥
नित्यक्रिया करि गुरु पहिं आए । चरन सरोज सुभग सिर नाए ॥
लक्ष्मणाचे बोल ऐकून श्रीरामांनीं मंद हास्य केले. नंतर स्वभवतःच पवित्र असलेल्या श्रीरामांनी प्रातर्विधीनंतर स्नान केले आणि नीत्य कर्म आटोपून ते गुरुंजवळ आले. त्यांनी गुरुंच्या पूज्य चरण-कमलांवर मस्तक ठेवले. ॥ ४ ॥
सतानंदु तब जनक बोलाए । कौसिक मुनि पहिं तुरत पठाए ॥
जनक बिनय तिन्ह आइ सुनाई ॥ हरषे-बोलि लिए दोउ भाई ॥
एवढ्यांत राजा जनकांनी शतानंदांना बोलावून विश्र्वामित्रांच्याकडे पाठविले. त्यांनी येऊन जनकांची विनंती निवेदन केली. विश्र्वामित्रांनी आनंदाने दोघा भावांना बोलाविले. ॥ ५ ॥
 सतानंद पद बंदि प्रभु बैठे गुर पहिं जाइ ।
चलहु तात मुनि कहेउ तब पठवा जनक बोलाइ ॥ २३९ ॥
शतानंदांच्या चरणांना वंदन करुन प्रभू श्रीराम गुरुजींच्याजवळ बसले. तेव्हा मुनी म्हणाले, ' वत्सांनो, चला. जनक राजांनी आपल्याला बोलावणे पाठविले आहे. ॥ २३९ ॥   
मासपारायण, आठवा विश्राम 
नवाह्नपारायण, दुसरा विश्राम 
सीय स्वयंबरु देखिअ जाई । ईसु काहि धौं देइ बड़ाई ॥
लखन कहा जस भाजनु सोई । नाथ कृपा तव जापर होई ॥
( मुनी म्हणाले, ) जाऊन सीतेचे स्वयंवर पाहिले पाहिजे. बघूया, ईश्वर कुणाला सन्मान देणार आहे.' लक्ष्मण म्हणाला, ' हे नाथ, ज्यावर तुमची कृपा असेल, तोच सन्मानाला पात्र ठरणार.' ॥ १ ॥
हरषे मुनि सब सुनि बर बानी । दीन्हि असीस सबहिं सुखु मानी ॥
पुनि मुनिबृंद समेत कृपाला । देखन चले धनुषमख साला ॥
ही उत्तम वाणी ऐकून सर्व मुनी प्रसन्न झाले. सर्वांना आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुनिसमुदायासह कृपाळू श्रीरामचंद्र धनुष्ययज्ञ-शाला पाहण्यास गेले. ॥ २ ॥
रंगभूमि आए दोउ भाई । असि सुधि सब पुरबासिन्ह पाई ॥
चले सकल गृह काज बिसारी । बाल जुबान जरठ नर नारी ॥
दोघे भाऊ रंगभूमीवर आले आहेत, अशी वार्ता जेव्हा नगरवासीयांना मिळाली, तेव्हा आबालवृद्ध स्त्री-पुरुष, घर आणि काम-धाम विसरुन निघाले. ॥ ३ ॥
देखी जनक भीर भै भारी । सुचि सेवक सब लिए हँकारी ॥
तुरत सकल लोगन्ह पहिं जाहू । आसन उचित देहु सब काहू ॥
जेव्हां जनकांना दिसले की, मोठी गर्दी झाली आहे, तेव्हा त्यांनी सर्व विश्वासू सेवकांना बोलावून घेतले आणि म्हटले , ' तुम्ही ताबडतोब सर्व लोकांपाशी जा आणि सर्वांना यथायोग्य आसने द्या. ' ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment