Saturday, November 14, 2020

ShriRamcharitmans Part 60, श्रीरामचरितमानस भाग ६०,

 

ShriRamcharitmans Part 60 
Doha 272 to 275 
श्रीरामचरितमानस भाग ६० 
दोहा २७२ ते २७५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—मातु पितहि जनि सोचबस करसि महीसकिसोर ।

गर्भन्ह के अर्भक दलन परसु मोर अति घोर ॥ २७२ ॥

अरे राज-बालका, तू आपल्या माता-पित्यांना काळजीत पाडू नकोस. माझा परशू भयानक आहे. हा गर्भातील मुलांचाही नाश करणारा आहे. ‘ ॥ २७२ ॥

बिहसि लखन बोले मृदु बानी । अहो मुनीसु महा भटमानी ॥

पुनि पुनि मोहि देखाव कुठारु । चहत उड़ावन फूँकि पहारु ॥

लक्ष्मण हसत-हसत कोमल वाणीने म्हणाला, ‘ अहो मुनीश्र्वर, तुम्ही स्वतःला फार मोठे योद्धे समजता. वारंवार मला परशूचा धाक दाखवित आहात. फुंकर मारुन पर्वत उडवू पाहात आहात. ॥ १ ॥

इहॉं कुम्हड़बतिया कोउ नाहीं । जे तरजनी देखि मरि जाहीं ॥

देखि कुठारु सरासन बाना । मैं कछु कहा सहित अभिमाना ॥

येथे कोणी बोट दाखविताच मरुन जाणारे काही एखादे कच्चे फळ नाही. तुमचा परशू व धनुष्यबाण पाहूनच मी काहीशा अभिमानाने बोललो आहे. ॥ २ ॥

भृगुसुत समुझि जनेउ बिलोकी । जो कछु कहहु सहउँ रिस रोकी ॥

सुर महिसुर हरिजन अरु गाई । हमरें कुल इन्ह पर न सुराई ॥

भृगुवंशी समजून व यज्ञोपवीत पाहून तुम्ही जे काही बोलत आहात, ते मी राग आवरुन सहन करीत आहे. देव, ब्राह्मण, भगवंताचे भक्त आणि गाय-यांच्यावर आमच्या कुळामध्ये कुणी वीरता दाखवीत नाही. ॥ ३ ॥

बधें पापु अपकीरति हारें । मारतहूँ पा परिअ तुम्हारें ॥

कोटि कुलिस सम बचनु तुम्हारा । ब्यर्थ धरहु बान कुठारा ॥      

कारण यांना मारल्यामुळे पाप लागते आणि यांच्याकडून पराजित झाल्यावर अपकीर्ती होते. म्हणून तुम्ही मारले, तरी तुमच्या पायाच पडले पाहिजे. तुमचे एक-एक वचन कोट्यावधी वज्रांसारखे कठोर आहे. मग त्याच्यासमोर धनुष्यबाण व परशू तुम्ही विनाकारण धारण करता. ॥ ४ ॥

दोहा—जो बिलोकि अनुचित कहेउँ छमहु महामुनि धीर ।

सुनि सरोष भृगुबंसमनि बोले गिरा गभीर ॥ २७३ ॥

ते धनुष्यबाण व परशू पाहून मी काही अनुचित बोललो असेन तर हे धीर महामुनी, क्षमा करा. हे ऐकून भृगुवंशरत्न परशुराम क्रोधाने गंभीर वाणीने म्हणाले, ॥ २७३ ॥

कौसिक सुनहु मंद यहु बालकु । कुटिल कालबस निज कुल घालकु ॥

भानु बंस राकेस कलंकू । निपट निरंकुस अबुध असंकू ॥

‘ हे विश्र्वामित्रा, ऐक. हा बालक मोठा दुष्ट बुद्धीचा व कुटिल आहे. काळाला वश होऊन हा आपल्या कुळाचा घात करु पाहात आहे. हा सूर्यवंशरुपी पूर्णचंद्राला कलंक आहे. हा मोठा उर्मट, मूर्ख व उद्धट हे. ॥ १ ॥

काल कवलु होइहि छन माहीं । कहउँ पुकारि खोरि मोहि नाहीं ॥

तुम्ह हटकहु जौं चहहु उबारा । कहि प्रतापु बलु रोषु हमारा ॥

आता या क्षणी हा मृत्युचा घास बनेल. मी हे अगदी ओरडून सांगतो. जर याला वाचवावयाचे असेल, तर माझा प्रताप, बल आणि क्रोध हे सांगून याला अडवा. ‘ ॥ २ ॥

लखन कहेउ मुनि सुजसु तुम्हारा । तुम्हहि अछत को बरनै पारा ॥

अपने मुँह तुम्ह आपनि करनी । बार अनेक भॉंति बहु बरनी ॥

लक्ष्मण म्हणाला, ‘ हे मुनी, तुमची कीर्ती तुम्ही असताना दुसरा कोण सांगू शकेल ? तुम्ही स्वतःच्या तोंडानेच आपली कृत्ये अनेक वेळा, अनेक तर्‍हेने सांगितलेली आहेत. ॥ ३ ॥

नहिं संतोषु त पुनि कछु कहहू । जनि रिस रोकि दुसह दुख सहहू ॥

बीरब्रती तुम्ह धीर अछोभा । गारी देत न पावहु सोभा ॥

एवढ्यावरही समाधान झाले नसेल तर आणखी काही सांगा. आपला राग आवरुन उद्वेग सहन करु नका. तुम्ही वीरतेचे व्रत धारण करणारे, धैर्यवान आणि क्षोभरहित आहात. शिव्या देणे तुम्हांला शोभत नाही. ॥ ४ ॥

दोहा—सूर समर करनी करहिं कहि न जनावहिं आपु ।

बिद्यमान रन पाइ रिपु कायर कथहिं प्रतापु ॥ २७४ ॥

शूरवीर हे युद्धात पराक्रम करतात. तो शब्दांनी सांगून दुसर्‍याला पटवून देत नाहीत. शत्रू युद्धामध्ये आल्यावर भित्रे लोकच फुशारकी मारु लागतात. ॥ २७४ ॥

तुम्ह तौ कालु हॉंक जनु लावा । बार बार मोहि लागि बोलावा ॥

सुनत लखन के बचन कठोरा । परसु सुधारि धरेउ कर घोरा ॥

तुम्ही जणू काळाला हाक मारुन वारंवार त्याला माझ्यासाठी बोलवीत आहात. ‘ लक्ष्मणचे कठोर शब्द ऐकताच परशुरामांनी आपला भयंकर परशू परजून हात उगारला. ते म्हणाले, ॥ १ ॥

अब जनि देइ दोसु मोहि लोगू । कटुबादी बालकु बधजोगू ॥

बाल बिलोकि बहुत मैं बॉंचा । अब यहु मरनिहार भा सॉंचा ॥

‘ आता मला कोणी दोष देऊ नका. हा खवचट बोलणारा बालक ठार मारण्याच्या योग्यतेचाच आहे. याला लहान समजून मी आतापर्यंत वाचविले, परंतु आता हा खरोखरच मरायलाच आला आहे. ‘ ॥ २ ॥

कौसिक कहा छमिअ अपराधू । बाल दोष गुन गनहिं न साधू ॥

खर कुठार मैं अकरुन कोही । आगें अपराधी गुरुद्रोही ॥

विश्र्वामित्र म्हणाले, ‘ अपराधाची क्षमा असावी. साधुजन बालकांचे दोष किंवा गुण पाहात नाहीत. परशुराम म्हणाले, ‘ तीक्ष्ण धारेचा परशू, मी निर्दय व क्रोधी आणि हा गुरुद्रोही आणि अपराधी माझ्यासमोर ॥ ३ ॥

उतर देत छोड़उँ बिनु मारें । केवल कौसिक सील तुम्हारें ॥

न त एहि काटि कुठार कठोरें । गुरहि उरिन होतेउँ श्रम थोरें ॥

उत्तर देत आहे. तरीही मी याला न मारता सोडून देतो. विश्र्वामित्रा ! हे फक्त तुमच्या प्रेमामुळे; नाही तर या कठोर कुठाराला कापून काढून अल्प प्रयासाने मी आपल्या शिवगुरुंच्या ऋणातून मुक्त झालो असतो. ‘ ॥ ४ ॥

दोहा—गाधिसूनु कह हृदयँ हँसि मुनिहि हरिअरइ सूझ । 

अयमय खॉंड़ न ऊखमय अजहुँ न बूझ अबूझ ॥ २७५ ॥

विश्र्वामित्र मनातल्या मनात हसून म्हणाले, मुनींना सर्वत्र हिरवे हिरवेच दिसत आहे. ( अर्थात सर्वत्र विजयी झाल्यामुळे हे श्रीराम-लक्ष्मणांना सामान्य क्षत्रियच समजत आहेत. ) परंतु हे पोलादी खांड ( खड्ग ) आहे. उसाच्या रसाची खांड ( साखर ) नाही. मुनी अजुनही अजाण आहेत यांचा प्रभाव त्यांना समजत नाही. ॥ २७५ ॥

कहेउ लखन मुनि सीलु तुम्हारा । को नहिं जान बिदित संसारा ॥

माता पिताहि उरिन भए नीकें । गुर रिनु रहा सोचु बड़ जी कें ॥

लक्ष्मण म्हणाला, ‘ हे मुनी, तुमचे चरित्र कुणाला माहीत नाही ? ते जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही माता-पित्याच्या ऋणातून चांगल्या प्रकारे मुक्त झालात. आता राहिले गुरुऋण. त्याची मनात रुखरुख लागून राहिली आहे. ॥ १ ॥

सो जनु हमरेहि माथे काढ़ा । दिन चलि गए ब्याज बड़ बाढ़ा ॥

अब आनिअ ब्यवहरिआ बोली । तुरत देउँ मैं थैली खोली ॥

ते जणू आमच्या डोक्यावर ओढवले आहे. फार दिवस झालेत, त्यामुळे त्याचे व्याजही वाढले असेल. आता एखाद्या हिशोब करणार्‍याला बोलावून घ्या, मग मी लगेच थैली उघडून ते फेडतो. ॥ २ ॥

सुनि कटु बचन कुठार सुधारा । हाय हाय सब सभा पुकारा ॥

भृगुबर परसु देखावहु मोही । बिप्र बिचारि बचउँ नृपद्रोही ॥

लक्ष्मणाचे तिखटबोलणे ऐकून परशुरामांनी परशू उचलला. सार्‍या सभेमध्ये अरे बाप रे ! अरे बाप रे ! असे शब्द घुमले. लक्ष्मण म्हणाला, ‘ हे भृगुश्रेष्ठ, तुम्ही मला परशू दाखवीत आहात ? परंतु हे राजांच्या शत्रो. मी तुम्हांला ब्राह्मण समजून सोडून देतो. ॥ ३ ॥

मिले न कबहुँ सुभट रन गाढ़े । द्विज देवता घरहि के बाढ़े ॥

अनुचित कहि सब लोग पुकारे । रघुपति सयनहिं लखनु नेवारे ॥

तुम्हांला कधी रणधीर बलवान वीर भेटले नाहीत. हे

ब्राह्मण देवा, तुम्ही घरातल्या घरातच मोठे हात. ‘ हे

ऐकून ‘ छे ! छे ! भलतेच ! ‘ असे म्हणून सर्व लोक

ओरडले. तेव्हा श्रीरघुनाथांनी खूण कुन लक्ष्मणाला

थोपविले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment