Monday, February 22, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 4 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ४

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 4 
Doha 17 to 22 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ४ 
दोहा १७ ते २२

दोहा—तुम्हहि न सोचु सोहाग बल निज बस जानहु राउ ।

मन मलीन मुह मीठ नृपु राउर सरल सुभाउ ॥ १७ ॥

तुम्हांला आपल्या सौभाग्याच्या खोट्या बळामुळे काहीच विचार उरला नाही. तुम्हांला वाटते की, राजा आपल्या मुठीत आहे. परंतु राजा हे मनाने कपटी आणि तोंडाने गोड आहेत आणि तुमचा स्वभाव सरळ आहे. ॥ १७ ॥

चतुर गँभीर राम महतारी । बीचु पाइ निज बात सँवारी ॥

पठए भरतु भूप ननिअउरें । राम मातु मत जानब रउरें ॥

रामाची आई कौसल्या ही मोठी चतुर व पत्ता लागू न देणारी आहे. तिने वेळ येताच आपले काम साधले. राजांनी भरताला आजोळी पाठविले, ते रामाच्या आईच्या सल्ल्यानेच, असे समजा. ॥ १ ॥

सेवहिं सकल सवति मोहि नीकें । गरबित भरत मातु बल पी कें ॥

सालु तुम्हार कौसिलहि माई । कपट चतुर नहिं होइ जनाई ॥

कौसल्येला असे वाटते की, सर्व सवती माझी व्यवस्थित सेवा करतात. एकटी भरताची आई पतीच्या जोरावर गर्विष्ठ असते. म्हणून हे माई, कौसल्येला तुम्ही फार खटकत आहात. परंतु ती कपट करण्यामध्ये चतुर आहे, म्हणून तिच्या मनातला भाव जाणता येत नाही. ॥ २ ॥

राजहि तुम्ह पर प्रेमु बिसेषी । सवति सुभाउ सकइ नहिं देखी ॥

रचि प्रपंचु भूपहि अपनाई । राम तिलक हित लगन धराई ॥

राजांचे तुमच्यावर खास प्रेम आहे. स्वामींचा स्वभाव माहीत असल्यामुळे कौसल्येला हे पाहावत नाही. म्हणून तिने जाळे पसरुन राजाला वश करुन घेतले व भरताच्या अनुपस्थितीत रामाच्या राजतिलकाचा मुहूर्त ठरवून टाकला. ॥ ३ ॥

यह कुल उचित राम कहुँ टीका । सबहि सोहाइ मोहि सुठि नीका ॥

आगिलि बात समुझि डरु मोही । देउ दैउ फिरि सो फलु ओही ॥

रामाला राजतिलक व्हावा, ही रघुकुलातील रीत योग्यच आहे आणि ती सर्वांनाच बरी वाटते. मलाही ती फार चांगली वाटते. परंतु पुढचा विचार केल्यावर मला भीती वाटते. दैव फिरुन त्याचे फळ त्या कौसल्येलाच मिळो.’ ॥ ४ ॥

दोहा—रचि पचि कोटिक कुटिलपन कीन्हेसि कपट प्रबोधु ।

कहिसि कथा सत सवति कै जेहि बिधि बाढ़ बिरोधु ॥ १८ ॥

अशा प्रकारे कोट्यावधी कुटिलपणाच्या गोष्टी घोळून मंथरेने कैकेयीला उलट-सुलट सांगितले व कित्येक सवतींच्या गोष्टी विरोध वाढावा, या हेतूने रचून सांगितल्या. ॥ १८ ॥

भावी बस प्रतीति उर आई । पूँछ रानि पुनि सपथ देवाई ॥

का पूँछहु तुम्ह अबहुँ न जाना । निज हित अनहित पसु पहिचाना ॥

भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे कैकेयीच्या मनाला विश्वास वाटू लागला. राणी पुन्हा शपथ घालून विचारु लागली, तेव्हा मंथरा म्हणाली, ‘ विचारता काय ? अहो, तुम्हाला अजुनी समजले नाही ? आपले बरे-वाईट पशूंनासुद्धा समजते. ॥ १ ॥

भयउ पाखु दिन सजत समाजू । तुम्ह पाई सुधि मोहि सन आजू ॥

खाइअ पहिरिअ राज तुम्हारें । सत्य कहें नहिं दोषु हमारें ॥

समारंभाचे सामान गोळा करण्यात पंधरवडा गेला आणि तुम्हांला आज माझ्याकडून समजत आहे ? मी तुमचे मीठ खाते, म्हणून खरे बोलण्यात मला कसलाही दोष नाही. ॥ २ ॥

जौं असत्य कछु कहब बनाई । तौ बिधि देइहि हमहि सजाई ॥

रामहि तिलक कालि जौं भयऊ । तुम्ह कहुँ बिपति बीजु बिधि बयऊ ॥

 उद्या रामाला राजतिलक झाला, तर तुमच्यासाठी विधात्याने संकटाचे बीज पेरले, असे समजा. ॥ ३ ॥

रेख खँचाइ कहउँ बलु भाषी । भामिनि भइहु दूध कइ माखी ॥

जौं सुत सहित करहु सेवकाई । तौ घर रहहु न आन उपाई  

मी अगदी निश्चितपणे सांगते की, राणीसाहेब ! तुम्ही आता दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्याज्य झाला आहात. जर मुलासह कौसल्येची चाकरी कराल, तर घरात राहाता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही. ॥ ४ ॥

दोहा—कद्रूँ बिनतहि दीन्ह दुखु तुम्हहि कौसिलॉं देब ।

भरतु बंदिगृह सेइहहिं लखनु राम के नेब ॥ १९ ॥

कद्रूने ज्याप्रमाणे विनतेला दुःख दिले, तसे तुम्हांला कौसल्या देईल. भरत कारावास भोगेल आणि लक्ष्मण रामाचा सहकारी असेल.’ ॥ १९ ॥

कैकयसुता सुनत कटु बानी । कहि न सकइ कछु सहमि सुखानी ॥

तन पसेउ कदली जिमि कॉंपी । कुबरीं दसन जीभ तब चॉंपी ॥

कैकेयी मंथरेची कटू वाणी ऐकताच घाबरुन जाऊन काही बोलू शकली नाही. तिला घाम फुटला आणि ती केळीप्रमाणे थरथरु लागली. मग कुबड्या मंथरेने आपली जीभ चावली. ( कदाचित हे भयंकर चित्र ऐकून कैकेयीचे हृदय बंद पडेल, अशी भीती तिला वाटली. ) ॥ १ ॥

कहि कहि कोटिक कपट कहानी । धीरज धरहु प्रबोधिसि रानी ॥

फिरा करमु प्रिय लागि कुचाली । बकिहि सराहइ मानि मराली ॥

मग तिने कपटाच्या पुष्कळ गोष्टी सांगून राणीला बरेच समजाविले की, ‘ धीर धरा. ‘ कैकेयीचे दैव फिरले. तिला दुष्टपणा आवडू लागला. ती बगळी मंथरेला हंसी समजून तिची तारीफ करु लागली. ॥ २ ॥

सुनु मंथरा बात फुरि तोरी । दहिनि आँखि नित फरकइ मोरी ॥

दिन प्रति देखउँ राति कुसपने । कहउँ न तोहि मोह बस अपने ॥

कैकेयी म्हणाली, ‘ मंथरे, ऐक. तुझे म्हणणे खरे आहे. माझा उजवा डोळा सारखा फडफडत आहे. मला रोज रात्री वाईट स्वप्ने दिसतात, परंतु आपल्या अजाणतेपणाने तुला सांगत नाही, इतकेच. ॥ ३ ॥

काह करौं सखि सूध सुभाऊ । दाहिन बाम न जानउँ काऊ ॥

सखे, काय करु ? माझा स्वभाव पडला साधा-भोळा. मला डावे-उजवे काही समजत नाही. ॥ ४ ॥

दोहा—अपनें चलत न आजु लगि अनभल काहुक कीन्ह ।

केहिं अघ एकहि बार मोहि दैअँ दुसह दुखु दीन्ह ॥ २० ॥

मी आजपर्यंत कधीच कुणाचे वाईट केले नाही. मग दैवाने मला एकदमच हे असह्य दुःख का दिले, कुणास ठाऊक ? ॥ २० ॥

नैहर जनमु भरब बरु जाई । जिअत न करबि सवति सेवकाई

अरि बस दैउ जिआवत जाही । मरनु नीक तेहि जीवन चाही ॥

हवे तर मी माहेरी जाऊन तिथेच आयुष्य घालवीन, परंतु जिवंतपणी सवतीची चाकरी करणार नाही. दैव ज्याला जिवंतपणी शत्रूच्या ठेवते, त्याने जगण्यापेक्षा मरणेच चांगले.’ ॥ १ ॥

दीन बचन कह बहुबिधि रानी । सुनि कुबरीं तियमाया ठानी ॥

अस कस कहहु मानि मन ऊना । सुखु सोहागु तुम्ह कहुँ दिन दूना ॥

राणी दीनवाणी होऊन बरेच काही बोलली. ते ऐकल्यावर कुबडीने स्त्रीचरित्र दाखविले. ती म्हणाली, ‘ तुम्ही मनात निराश होऊन असे का म्हणता ? तुमचे सुख-सौभाग्य दिवसेंदिवस वाढत राहील. ॥ २ ॥

जेहिं राउर अति अनभल ताका । सोइ पाइहि यहु फलु परिपाका ॥

जब तें कुमत सुना मैं स्वामिनि । भूख न बासर नीद न जामिनि ॥    

जिला तुमचे वाईट व्हावे, अशी इच्छा आहे, तिलाच हा परिणाम भोगावा लागेल. हे स्वामिनि, जेव्हापासून मी ही वाईट मसलत ऐकली आहे, तेव्हापासून मला दिवसा भूक लागत नाही आणि रात्री झोपही येत नाही. ॥ ३ ॥

पूछेउँ गुनिन्ह रेख तिन्ह खॉंची । भरत भुआल होहिं यह सॉंची ॥

भामिनि करहु त कहौं उपाऊ । है तुम्हरीं सेवा बस राऊ ॥

मी ज्योतिष्यांना विचारले, तेव्हा त्यांनी गणित मांडून सांगितले की, भरतच राजा होईल, हे सत्य आहे. हे महाराणी !  तुम्ही करणार असाल, तर मी उपाय सांगते. राजा तुमच्या सेवेच्या अधीन आहेतच. ‘ ॥ ४ ॥

दोहा—परउँ कूप तुअ बचन पर सकउँ पूत पति त्यागि ।

कहसि मोर दुखु देखि बड़ कस न करब हित लागि ॥ २१ ॥

कैकेयी म्हणाली, ‘ तू सांगितल्यावर मी विहिरीत उडी घेईन, पुत्र व पतींना सोडू शकेन. तू जर माझे मोठे दुःख पाहून काही सांगत आहेस , तर मग मी आपल्या हितासाठी ते का करणार नाही ? ‘ ॥ २१ ॥

कुबरीं करि कबुली कैकेई । कपट छुरी उर पाहन टेई ॥

लखइ न रानि निकट दुखु कैसें । चरइ हरित तिन बलिपसु जैसें ॥

कुबडीने कैकेयीकडून सर्व प्रकारे कबूल करुन घेतले आणि कपटरुपी सुरीला आपल्या पाषाण हृदयावर धार लावली. बळीचा पशू ज्याप्रमाणे हिरवे गवत अजाणपणे खात असताना मृत्यु जाणत नाही, त्याप्रमाणे कैकेयीचे झाले. तिला आपल्यावर कोसळणारे दुःख कळले नाही. ॥ १ ॥

सुनत बात मृदु अंत कठोरी । देति मनहुँ मधु माहुर घोरी ॥

कहइ चेरि सुधि अहइ कि नाहीं । स्वामिनि कहिहु कथा मोहि पाहीं ॥

मंथरेच्या गोष्टी ऐकायला गोड होत्या, परंतु परिणामी भयानक होत्या. ती जणू मधात कालवून विष पाजवीत होती. दासी म्हणाली, ‘ हे स्वामिनि, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती आठवते ना ?’ ॥ २ ॥

दुइ बरदान भूप सन थाती । मागहु आजु जुड़ावहु छाती ॥

सुतहि राजु रामहि बनबासू । देहु लेहु सब सवति हुलासू ॥

तुमचे दोन वर राजांच्याजवळ अमानत ठेवलेले आहेत. आज ते राजांकडून मागून घेऊन मनाचे समाधान करुन घ्या. पुत्राला राज्य आणि रामाला वनवास द्या आणि सवतीचा सर्व आनंद तुम्ही मिळवा. ॥ ३ ॥

भूपति राम सपथ जब करई । तब मागेहु जेहिं बचनु न टरई ॥

होइ अकाजु आजु निसि बीतें । बचनु मोर प्रिय मानेहु जी तें ॥

राजा जेव्हा रामाची शपथ घेईल, तेव्हाच वर मागा. त्यामुळे दिलेले वचन टळू शकणार नाही. आजची रात्र तशी गेली तर काम बिघडून जाईल. माझे बोलणे मनापासून चांगले समजा.’ ॥ ४ ॥

दोहा--बड़ कुघातु करि पातकिनि कहेसि कोपगृहँ जाहु ।

काजु सँवारेहु सजग सबु सहसा जनि पतिआहु ॥ २२ ॥

पापी मंथरेने सापळा रचून सांगितले की, ‘ कोप-भवनात जा. सर्व काम अत्यंत सावधगिरीने करा. राजांवर एकदम विश्र्वास ठेवू नका. ‘ ॥ २२ ॥

कुबरिहि रानि प्रानप्रिय जानी । बार बार बड़ि बुद्धि बखानी ॥

तोहि सम हित न मोर संसारा । बहे जात कइ भइसि अधारा ॥

राणीने कुबडीला प्राणाहून प्रिय समजून वारंवार तिच्या बुद्धीची वाखाणणी केली आणि म्हणाली, ‘ जगात तुझ्यासारखी माझी हितकारी कोणीही नाही. मी वाहावत जात होते, तू मला आधार दिलास. ॥ १ ॥

जौं बिधि पुरब मनोरथु काली । करौं तोहि चख पूतरि आली ॥

बहुबिधि चेरिहि आदरु देई । कोपभवन गवनी कैकेई ॥

जर विधात्याने उद्या माझे मनोरथ पूर्ण केले, तर हे सखी, मी तुला डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे अत्यंत आवडती मानीन.’ अशाप्रकारे दासीला पुष्कळ आदर देत कैकेयी कोप-भवनात गेली. ॥ २ ॥

बिपति बीजु बरषा रितु चेरी । भुइँ भइ कुमति कैकई केरी ॥

पाइ कपट जलु अंकुर जामा । बर दोउ दल दुख फल परिनामा ॥

विपत्ती हे बी होते. दासी वर्षा-ऋतू होती. कैकेयीची कुबुद्धी मशागत केलेली जमीन होती. कपटरुपी पाणी मिलताच त्या बीजाला अंकुर फुटला. दोन्ही वर हे त्या अंकुराची दोन पाने होती आणि शेवटी याला दुःखरुपी फळ येणार होते. ॥ ३ ॥

कोप समाजु साजि सबु सोई । राजु करत निज कुमति बिगोई ॥

राउर नगर कोलाहलु होई । यह कुचालि कछु जान न कोई ॥

कैकेयी कोपाचा वेष घेऊन कोपभवनात जाऊन झोपली.

 ती राज्य करीत होती पण स्वतःच्या दुष्ट बुद्धीमुळे नष्ट

 झाली. राजमहाल व नगरामध्ये धूम-धाम चालली होती.

 ही दुष्ट चाल कुणालाच समजली नाही. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment