Wednesday, July 14, 2021

DharmaKrut ShriKrishna Stotram धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्

 

DharmaKrut ShriKrishna Stotram 
धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्
Dharma Krutam ShriKrishna Stotram is in Snskrit. It is created by God Dharma ( God of Death ). These are 24 very pious names of God ShriKrishana. Darma has said that whosover read these 24 names early in the morning every date He will become happy and victotious everywhere. He will follow the path of Dharm and never do any adharma. At the time of date he remembering the name of God ShriKishna. and thus attain Hariloka and become Dasa of God ShriKrishna.
धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्
धर्म उवाच
कृष्णं विष्णुं वासुदेवम् परमात्मानमीश्र्वरम् ।
गोविन्दं परमानन्दमेकमक्षरमच्युतम् ॥ १ ॥
धर्म बोले, 
१) जो सबको अपनी ओर आकृष्ट करनेवाले सच्चिदानंदस्वरुप है, इसलिये ' कृष्ण ' कहलाते हैं, सर्वव्यापी होनेके कारण जिनकी ' विष्णु ' संज्ञा है, सबके भीतर निवास करनेसे जिनका नाम ' वासुदेव ' है, जो ' परमात्मा ' एवं ईश्र्वर हैं, ' गोविन्द ' , ' परमानन्द ' , ' एक ' , ' अक्षर ' , ' अच्युत '  
गोपेश्र्वरं च गोपीशं गोपं गोरक्षकं विभुम् ।
गवामीशं च गोष्ठस्थं गोवत्सपुच्छधारिणम् ॥ २ ॥
२) ' गोपेश्र्वर ', ' गोपीश्र्वर ' , ' गोप ' , ' गोरक्षक ', 'विभु ', ' गौओंके स्वामी ', ' गोष्टनिवासी ' , ' गोवत्सपुच्छधारी ',  गोगोपगोपीमध्यस्थं पुरुषोत्तमम् ।
वन्दे नवघनश्यामं रासवासं मनोहरम् ॥ ३ ॥
३) ' गोपों ' और गोपियोंके मध्य विराजमान ' , ' प्रधान ', '  पुरुषोत्तम ' , ' नवघनश्याम ' , ' रासवास ' और ' मनोहर  ' आदि नाम धारण करते हैं , उन भगवान श्रीकृष्णकी मैं वन्दना करता हूँ ।  
इत्युच्चार्य समुत्तिष्ठन् रत्नसिंहासने वरे । 
ब्रह्मविष्णुमहेशांस्तान् सम्भाष्य स उवास ह ॥ ४ ॥
४) ऐसा कहकर धर्म उठकर खड़े हुए । फिर वे भगवानकी आज्ञासे ब्रह्म, विष्णु और महादेवजीके साथ वार्ता लाप करके उस श्रेष्ठ रत्नमय सिंहासनपर बैठे ।
चतुर्विंशतिनामानि धर्मवक्त्रोद्गतानि च ।
यः पठेत् प्रातरुत्थाय स सुखी सर्वतो जयी ॥ ५ ॥
५) जो मनुष्य प्रातःकाल उठकर धर्मके मुखसे निकले हुए  इन चौबीस नामोंका पाठ करता है, वह सर्वथा सुखी और सर्वत्र विजयी होता है ।  
मृत्युकाले हरेर्नाम तस्य साध्यं भवेद् ध्रुवम् । 
स यात्यन्ते हरेः स्थानं हरिदास्यं लभेद् ध्रुवम् ॥ ६ ॥
६) मृत्युके समय उसके मुखसे निश्र्चय ही हरि नामका उच्चारण होता है । अतः वह अन्तमे श्रीहरिके परम धाममें जाता है तथा उसे श्रीहरिकी अविचल दास्य भक्ति प्राप्त होती है ।
नित्यं धर्मस्तं घटते नाधर्मे तद्गतिर्भवेत् ।
चतुर्वर्गफलं तस्य शश्र्वत् करगतं भवेत् ॥ ७ ॥
७) उसके द्वारा सदा धर्मविषयक ही चेष्टा होती है । अधर्ममें उसका मन कभी नहीं लगता । धर्म, अर्थ, काम और मोक्षरुपी फल सदाके लिए उसके हाथमें आ जाता है ।  
तं दृष्ट्वा सर्वपापानि पलायन्ते भयेन च ।
भयानि चैव दुःखानि वैनतेयमिवोरगाः ॥ ८ ॥
८) उसे देखतेही सारे पाप, सम्पूर्ण भय तथा समस्त दुःख उसी तरह भयसे भाग जाते हैं, जैसे गरुड़पर दृष्टि पड़ते ही सर्प पलायन कर जाते हैं ।

॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रं संपूर्णम् ॥  
DharmaKrut ShriKrishna Stotram 
धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्



   

Custom Search

Monday, July 12, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 10 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १०

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 10 
Ovya 236 to 264 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १० 
ओव्या २३६ ते २६४

परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे ।

तेविं आर्त बहु कां थोडे । तरि सांगावें देवा ॥ २३६ ॥

२३६) परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणें गंगेला जावें लागतें, त्याप्रमाणें आमची ऐकण्याविषयींची इच्छा फार असो अथवा थोडी असो, तरी तें देवांनाच सांगितलें पाहिजे.  

तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहाला आहे ।

तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥

२३७) त्यावेळीं श्रीकृष्ण म्हणाले, हे असूं दे. तुझी आस्था पाहुन जो कांहीं आम्हांस आनंद झाला आहे, त्याच्यावर आता स्तुति सहन होईल, असें राहिलें नाहीं. 

पें परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी ।

ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥

२३८) तूं उत्तम तर्‍हेनें ऐकत आहेस, तेंच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचें काम करतें. याप्रमाणें अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला.

मूल श्लोक

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथकत्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥

१५) तसेंच दुसरें कित्येक, सर्वतोमुख जो मी, त्या माझें ज्ञानयज्ञानें एकत्वानें ( आपल्या स्वप्नांतील पदार्थांशीं, जागृत झाल्यावर, जागृत पुरुष जसें ऐक्य पाहतो, त्या अभेद ज्ञानानें ), व निरनिराळ्या प्रकारानें ( जो आकार जेथें दिसेल, तो मीच आहे, अशा अभेदज्ञानानेंच ) वेगळेपणानें यजन करुन माझी उपासना करतात.      

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा युपु ।

महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥

२३९) तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामध्यें महामूळ संकल्प हा, पशु बांधावयाचा खांब आहे; पंचमहाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे, 

मग पाचांचें जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण ।

हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥

२४०) नंतर पंचमहाभूतांचें जे शब्दस्पर्शादि विशेष गुण, अथवा इंद्रियें व प्राण हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून अज्ञान हें तूप आहे.

तेथ मनबुद्धीचिया कुंडा--। आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।

साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥ २४१ ॥

२४१) तेथें मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरुपी अग्नि असून, हे मित्रा अर्जुना, सुखदुःखादि द्वंद्वांविषयीं जी चित्ताची समता, ती वेदी ( त्या यज्ञांतील शुद्ध केलेला यज्ञाचा ओटा ) होय, असें समज.    

सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव ।

शांति स्त्रुक्स्त्रुव । जीव यज्वा ॥ २४२ ॥

२४२) आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्त्रुक्स्त्रुवा नांवाचीं यज्ञपात्रें आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.  

तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें ।

ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥

२४३) तो यज्ञ करणारा जीव, स्वरुपानुभवरुप पात्रानें, ब्रह्मविचाररुप महायंत्रानें व ज्ञानरुप अग्निहोत्रकर्मानें, जीव व ईश्वर यांच्या भन्नपणाची आहुति देऊन, तो भेद नाहींसा करतो.    

तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये ।

आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥

२४४) त्या वेलेस अज्ञानरुपी तूप सरुन जातें आणि यज्ञ करणरा व यज्ञ करणें ही थांबतात आणि जेव्हां यज्ञ करणारा जीव, अवभृथस्नानाच्या वेळीं आत्मैक्यरुपी पाण्यानें स्नान करतो,

तेव्हां भूतें विषय करणें । हें वे गळालें कांहीं न म्हणे ।

आघवें एकचि ऐसें जाणे । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥

२४५) तेव्हां तो यज्ञ करणारा, पंचमहाभूतें, शब्दादि विषय व इंद्रियें, हीं कांहीं वेगळेपणानें समजत नाहीं. कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत, असें जाणतो.

जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना ।

मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ॥ २४६ ॥

२४६) अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की, झोपेला वश होऊन स्वप्नांतील ही चित्रविचित्र सेना मीच झालों होतो ना;

आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें ।

ऐसें एकत्वें मानवे । विश्र्व तया ॥ २४७ ॥

२४७) जागें झाल्यावर तो म्हणतो कीं, ( स्वप्नांत पाहिलेली होती ) ती सेना आतां ( खरोखरीची ) सेना नाहीं, तर स्वप्नामध्यें सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतों. अशा एकत्वानें संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येतें.

मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे ।

ऐसें भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥

२४८) अशा अनुभवावर आल्यावर मग, मी जीव आहें, ही त्याची कल्पना नाहीशी होते; ब्रह्मदेवापासून तों मुंगीपर्यंत, सर्व ब्रह्मरुपच आहे, अशा ज्ञानानें तो परिपूर्ण होतो. याप्रमाणें ज्ञानयज्ञद्वारां ते या ऐक्य भावनेनें माझें भजन करतात.   

अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक ।

आणि नामरुपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥

२४९) अथवा अनादिकालापासून हें अनेकत्व असेंच आहे. कारण ( जगांतील पदार्थ ) एकसारखें एक नाहीत व त्यांची नामेंरुपेंसुद्धा भिन्न भिन्न आहेत.

म्हणोनि विश्र्व भिन्न । परि न भेदे तयांचें ज्ञान ।

जैसें अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥

२५०) म्हणून जरी विश्वांत त्याच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले, तरी त्या योगानें त्याचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणें अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचें आहेत.

कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा ।

बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥

२५१) अथवा, जशा लहानमोठ्या फांद्या आहेत खर्‍या, परंतु त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणें किरणें अनेक खरीं, परंतु एकाच सूर्याची असतात. 

तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।

ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥

२५२) त्याप्रमाणें नाना प्रकारच्या व्यक्ति, त्यांची भिन्न भिन्न नांवें व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणें भेद असलेल्या प्राण्यांत अभिन्न जो मी, त्या मला ते जाणतात, 

येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा ।

जे न भेदती जानिवा । जाणते म्हणउनि ॥ २५३ ॥

२५३) अर्जुना, ( अशा इंद्रियांना गोचर होणार्‍या ) भेद प्रतीतिद्वारां ते चांगला ( अभेद ) ज्ञानयज्ञ करतात. कारण कीं, ते पुरुष स्वरुपज्ञानी असल्याकारणानें विश्वांतील भिन्न भिन्न पदार्थांच्या, भिन्न भिन्न ज्ञानानें भेदाला पावत नाहींत. ( तर त्या भिन्न भिन्न ज्ञानांतून अन्वयदृष्टीनें परमात्म्याला ते पाहतात ).   

ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं ।

तें मी वांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥

२५४) अथवा जेव्हां ज्या ठिकाणी जें जें कांहीं ते पाहतात, तें तें माझ्या स्वरुपावांचून दूसरें कांहीं नाहीं, असाच त्यांचा बोध असतो. 

पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे ।

मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजि ॥ २५५ ॥

२५५) असें पाहा कीं, बुडबुडा जेथें जाईल, तेथें त्याला एक पाणी मात्रच आहे; मग राहिला तरी पाण्यांतच अथवा नाहींसा झाला तरी पाण्यांतच ! 

कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले ।

आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥

२५६) अथवा वार्‍यानें पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीकणांहून वेगळे झाले नाहींत आणि वर गेलेले कण जरी पुन्हां खालीं पडले, तरी ते पृथ्वीवरच पडतात.   

तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें ।

परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥ २५७ ॥

२५७) त्याप्रमाणें वाटेल तेथें, वाटेल त्या भावानें ( स्थितीनें

 ), वाटेल तेंहि न व्हावे अथवा व्हावें, पण तें मी ( परमात्मा

 ) आहें, असें सर्व त्यास ( अनुभवानें ) होऊन राहिलेलें

 असतें.  

अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति ।

ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि होउनि ॥ २५८ ॥

२५८) बा अर्जुना ! जेवढी ही माझी व्याप्ति आहे, तेवढाच त्यांचाहि अनुभव असतो, याप्रमाणें ते अनुभवाच्या अंगानें, मद्रूप होऊन, अनेक आकारांनीं वावरत असतात.    

हें भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसें धनंजया ।

तैसे ते विश्र्वा या । समोर सदा ॥ २५९ ॥

२५९) अरे अर्जुना, जसें हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या संमुख असतें, त्याप्रमाणें ते ( पुरुष ) नेहमीं या विश्वाच्या समोर असतात.

अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना ।

वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥

२६०) अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असें नाहीं; ज्याप्रमाणें वायु हा आकाशाच्या सर्व पोकळी भर आहे,

तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा ।

तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥

२६१) त्याप्रमाणें जेवढा संपूर्ण मी आहे, तेंच वजन त्यांच्या सद्भावास असतें. ( म्हणजे तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो. ) असें असल्यामुळें, अर्जुना, त्यांनी कृतीनें जरी भजन केलें नाहीं, तरी तें त्यांच्याकडून सहजच होत असते.

एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहे ।

एथ एकें जाणणेनविण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥

२६२) सहज विचार करुन पाहिलें तर, जगांतील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाहीं असें म्हणावे ? असे असूनहि ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाहीं, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेंच त्यांस हे भजन घडत नाहीं.

परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते ।

उपासिती मातें । ते सांगितले ॥ २६३ ॥

२६३) परंतु तें असूं दे, अशा या योग्य ज्ञानयज्ञानें भजन करणारे, माझी जे उपासना करतात, ते भक्त मी तुला सांगितले.

अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं ।

नेणणेयासाठीं मूर्खी । न पविजोचि मातें ॥ २६४ ॥

२६४) हें सर्व, सर्वांच्या द्वारें, सदोदित, माझ्या एकट्याच्या

 ठिकाणी सहजच अर्पण होत आहे; ( म्हणजे सर्व प्राणी जें

 कांहीं करतात, तें सर्व मला एकट्यालाच अर्पण होतें;

 कारण त्या सर्वांच्या रुपानें मीच एक आहे ). पण मूर्खांनीं

 हें न जाणल्यामुळें ( तें सहज अर्पण होणारें सर्व कर्म )

 मला प्राप्त होत नाहीं. 

 


Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 9 
Ovya 206 to 235 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ९ 
ओव्या २०६ ते २३५

जयांचे वाचेपुढां भोजे । नाम नाचत असे माझें ।

जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एक वेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥

२०६)  जें माझें नाम एक वेळ मुखांत यावयास हजारों जन्म सेवा करावी लागते, तें माझें नाम ज्यांच्या वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असतें; 

तो मी वैकुंठीं नसे । एक वेळ भानुबिंबीही न दिसें ।

वरी योगियांचींही मानसें । उमरडोनी जाय ॥ २०७ ॥

२०७) तो मी एक वेळ वैकुंठांत नसतों; एक वेळ सूर्यबिंबांतहि असत नाही; याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदयेंदेंखील उल्लंघन करुन जातो;

परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।

जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥ २०८ ॥

२०८) परंतु अशा रीतीनें मी जरी हरवलों असलों तरी पण माझें भक्त जेथें माझा नामघोष चांगला करतात, त्यांजपाशीं अर्जुना, मला शोधावा, ( मी तेथें सांपडवयाचाच. )

कैसे माझां गुणीं धाले । देशकाळाते विसरले ।

कीर्तनसुखें झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥

२०९) ते महात्मे माझे गुण गाण्यांत असे तृप्त झालें आहेत कीं, त्या योगानें त्यास आपण कोठें आहोंत व आपला काल भजनांत किती गेला, याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखानें आपल्या ठिकाणींच आपलें स्वरुप होऊन राहिले आहेत.

कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।

माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥

२१०) ते महात्मे कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद यां नामांचेंच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीनें पुष्कळ आत्मचर्चा करतात.   

हें बहु असो यापरी । कीर्तित माते अवधारीं ।

एक विचरती चराचरीं । पांडुकुमरा ॥ २११ ॥

२११) आतां हें फार वर्णन करणें राहूं दे. अर्जुना, ऐक याप्रमाणें माझे किती एक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्यें संचार करीत असतात.

मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना ।

पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥ २१२ ॥

२१२) अर्जुना, मग किती एक जे आहेत, त्यांनीं सहजच मोठ्या तत्परतेनें पांच प्राण व मन हें वाटाडे बरोबर घेऊन,   

बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।

वरी प्राणायामांचीं मांडिलीं । याहातीं ॥ २१३ ॥

२१३) बाहेरच्या बाजूला यमनियमांचें कांटेरी कुंपणाच्या आंत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरुपी चालूं असलेल्या तोफा ठेविल्या.

तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडें । मनपवनाचेनि सुरवाडें ।

सतरावियेचे पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥

२१४) तेथें कुंडलिनीच्या प्रकाशानें व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीनें सतरावी जी जीवनकला हेंच कोणी एक तळें, ( त्यांनी ) बळकवलें,

तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली ।

इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥ २१५ ॥

२१५) त्या वेळीं प्रत्यहाराने मोठा पराक्रम केला. ( तो असा कीं, ) त्यामुळें विकारांची भाषा संपली; ( व त्यानें ) इंद्रियांना हृदयाच्या आंत बांधून आणलें .

तंव धारणावारु दाटिले । महाभूतांतें एकवटिलें ।

मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥

२१६) तों इतक्यांत धारणारुपी घोड्यांनी गर्दी केली, ( व त्यांच्या बळानें ) योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केलें व नंतर त्यांनी संकल्पांचें चतुरंग सैन्य ( मन, बुद्धि, चित्त, अहंकार ) ठार केलें.

तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत ।

दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥

२१७) त्यानंतर, ‘ जय झाला रे झाला ‘ म्हणून ध्यानाची नौबद वाजू लागली व स्वरुपऐक्याचें एक छत्र ( एकसत्ता ) चमकत असलेलें दिसलें,

पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा ।

पट्टाभिषेकु देखां । समरसें जाहला ॥ २१८ ॥

२१८) नंतर समाधिरुपी लक्ष्मीचें जें आत्मानुभवरुपी संपूर्ण राज्यसुख, त्यांना समरसतेनें त्यांस राज्यभिषेक झाला. पाहा. 

ऐसें हें गहन । अरजुना माझें भजन ।

आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥

२१९) अर्जुना, याप्रमाणें हे माझें ( अष्टांगयोगद्वारां होणारें ) भजन फार कठीण आहे; आतां किती एक मला दुसर्‍या प्रकारानें ( नमनरुप भक्तीनें ) भजतात. तो प्रकार सांगतों; ऐक.  

तरी दोन्हीं पाचववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।

तैसा मेवांचूनी चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥

२२०) तर वस्त्रामध्यें ज्याप्रमाणें एका पदरापासून दुसर्‍या पदरापर्यंत एक सूतच असतें, त्याप्रमाणें सजीव व निर्जीव पदार्थांत माझ्यावाचून दुसर्‍यास ते ओळखत नाहींत.

आदि ब्रह्मा करुनी । शेवटीं मशक धरुनी ।

माजी समस्त हें जाणोनी । स्वरुप माझें ॥ २२१ ॥

२२१) ब्रह्मदेवापासून आरंभ करुन, अखेर चिलटापर्यंत, मध्यें जे काहीं आहे ते सर्व माझें स्वरुप आहे, हे जाणून, 

मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती ।

देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥

२२२) मग मोठा, लहान याचा विचार न करतां, किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करतां, जो पदार्थ दृष्टीपुढे येईल, त्यास मीच ( परमात्मा ) समजून ते सरळ लोटांगण घालतात.    

आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे ।

एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥

२२३) त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हें कांहीं न जाणतां वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेंच त्यांना आवडते.

जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें ।

तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥

२२४) उमचावरुन पडलेलें पाणी जसें सखल जागेकडेआपोआप जाऊं लागतें, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणिमात्रांस नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. 

कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ।

तैसें जीवमात्रां अशेखां । खालवती ते ॥ २२५ ॥

२२५) अथवा पाहा की, फळभारानें लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणें सर्व प्राणीमात्रांपुढें ते नम्रपणाने लवतात;

अखंड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती ।

जे जयजयमंत्रे अर्पिती । माझांचि ठायीं ॥ २२६ ॥

२२६) ते नेहमीं निरभिमान होऊन राहिलेले असतात; व नम्रपणा ही त्यांची संपत्ति असते. ती संपत्ति ते ‘ जय जय ‘ मंत्रानें माझ्याच ठिकाणी अर्पण करतात.

नमितां मानाभिमान गळाले । म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले ।

ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥

२२७) नमस्कार करीत असतांना मान व अभिमान हे नाहीसे झाले, म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणें माझ्या स्वरुपांत मिसळून ते माझी निरंतर उपसना करतात.

अर्जुना हे गुरुची भक्ती । सांगितली तुहप्रती ।

आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥

२२८) अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ति सांगितली. आतां ज्ञानरुप यज्ञानें जें माझी आराधना करतात. त्या भक्तांचा प्रकार ऐक.

परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी ।

जै मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥

२२९) परंतु ( ही ) भजन करण्याची रीति, अर्जुना, तुला माहीत आहेच. कारण आम्ही या गोष्टी मागें ( अध्याय ४ था श्लोक ३३-४२ ) तुला सांगितल्या आहेत.

तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें ।

तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥ २३० ॥

२३०) तेव्हां अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहें व देवाच्या प्रसादाचें कार्य आहे. म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर, ‘ पुरें, आतां नको, ‘ असें म्हणवेल काय ;    

या बोला अनंते । लागटा देखिलें तयातें ।

कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥

२३१) अर्जुनाच्या वरील बोलण्यारुन, तो हें जाणण्याविषयीं उत्सुख आहे असें पाहून, लागलीच अंतःकरणांत संतोष झाल्यामुळे, श्रीकृष्ण डोलावयास लागले.   

म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा ।

परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥

२३२) श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगलें केलेंस, नाहीं तर ( मागें एकवार सांगितलें असल्यामुळें ) हा मुळींच बोलण्याचा प्रसंग नव्हता; परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते.   

तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं ।

जग निवविजे हा तयांचा ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥

२३३) तेव्हां अर्जुन म्हणाला, असें काय म्हणता ? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एर्‍हवी उगवत नाही काय ? महाराज जगाला शांत करावें, हा त्याच्या ( चंद्राच्या ) ठिकाणी स्वभावच आहे.  

येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।

तेविं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥

२३४) आतां हे चकोर आहेत, ते केवळ आपलीच शांतता व्हावी, या इच्छेनें चंद्राकडे चोच करतात; त्याप्रमाणें आमची विनंती ती किती थोडी आहे ! पण देवा, आपण कृपासिंधु आहांत.

जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी ।

वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥ 

२३५) महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावानें संपूर्ण जगाची पीडा घावितो. वास्तविक पाहिलें तर, त्या पावसाच्या दृष्टीच्या मानानें चातकांची तहान ती केवढी ?  

  


Custom Search

Saturday, July 3, 2021

ShriRamMangalaShashanam श्रीराममङ्गलाशासनम्

ShriRamMangalaShashanam श्रीराममङ्गलाशासनम्
ShriRamMangalaShaShanam is in Sanskrit. This is the praise of God Ram made by his devotee. It is written by Muni Nmaed as Jamata. All the virtues of God Ram are described in here. Many events in his life, are described here. By this MangalaShshanam   onecan have how was God Ram, how he performed his duties while living his life as at trustworthy and obedient son of king  Dashrath.  There are about 16 Shlokas in this MangalaShashanam and it is  desired all the  good to happen to God Ram.
ShriRamMangalaShashanam
श्रीराममङ्गलाशासनम्
मङ्गलं कोसलेन्द्राय महनीयगुणाब्धये ।
चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलम् ॥ १ ॥
वेदवेदान्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये ।
पुंसां मोहनरुपाय पुण्यश्लोकाय मङ्गलम् ॥ २ ॥
विश्र्वामित्रान्तरङ्गाय मिथिलानगरीपतेः ।
भाग्यानां परिपाकाय भव्यरुपाय मङ्गलम् ॥ ३ ॥
पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया ।
नन्दिताखिललोकाय रामभद्राय मङ्गलम् ॥ ४ ॥
त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे ।
सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मङ्गलम् ॥ ५ ॥
सौमित्रिणा च जानक्या चापबाणासिधारिणे ।
संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मङ्गलम् ॥ ६ ॥
दण्डकारण्यवासाय खरदूषणशत्रवे ।
गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मङ्गलम् ॥ ७ ॥
सादरं शबरीदत्तफलमूलाभिलाषिणे । 
सौलभ्यपरिपूर्णाय सत्त्वोद्रिक्ताय मङ्गलम् ॥ ८ ॥
हनुमत्समवेताय हरीशाभीष्टदायिने । 
बालिप्रमथनायास्तु महाधीराय मङ्गलम् ॥ ९ ॥
श्रीमते रघुवीराय सेतूल्लङ्घितसिन्धवे ।
जितराक्षसराजाय रणधीराय मङ्गलम् ॥ १० ॥
बिभीषणकृते प्रीत्या लङ्काभीष्टप्रदायिने ।
सर्वलोकशरण्याय श्रीराघवाय मङ्गलम् ॥ ११ ॥
आसाद्य नगरीं दिव्यामभिषिक्ताय सीतया ।
राजाधिराजराजाय रामभद्राय मङ्गलम् ॥ १२ ॥
ब्रह्मादिदेवसेव्याय ब्रह्मण्याय महात्मने ।
जानकीप्राणनाथाय रघुनाथाय मङ्गलम् ॥ १३ ॥
श्रीसौमजामातृमुनेः कृपयास्मानुपेयुषे ।
महते मम नाथाय रघुनाथाय मङ्गलम् ॥ १४ ॥
मङ्गलाशासनपरैर्मदाचार्यपुरोगमैः ।
सर्वैश्र्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम् ॥ १५ ॥
रम्यजामातृमुनिना मङ्गलाशासनं कृतम् ।
त्रैलोक्याधिपतिः श्रीमान् करोस्तु मङ्गलं सदा ॥ १६ ॥
॥ इति श्रीराममङ्लाशासनम् संपूर्णम् ॥  
  अनुवाद हिंदी
' प्रशंसनीय गुणोंके सागर कोसलेन्द्र श्रीरामचन्द्रजीका मङ्गल हो, चक्रवर्ती राजा दशरथके पुत्र मण्डलेश्र्वर श्रीरामचन्द्रजीका  मङ्गल हो । 
जो वेद-वेदान्तोंसे ज्ञेय हैं, मेघके समान श्याममूर्तिवाले हैं और पुरुषोंमें जिनका स्वरुप अत्यन्त मनोहर है, उन पुण्यश्लोक ( पवित्र यशवाले श्रीरामचन्द्रजीका मङ्गल हो । 
जो विश्र्वमित्र ऋषिके प्रिय और राजा जनकके भाग्योंके फलस्वरुप हैं, उन भव्यरुपवाले श्रीरामचन्द्रजीका मङ्गल हो ।  
जो सदा पिताकी भक्ति करनेवाले हैं, जो अपने भ्राताओं और सीताजीके साथ सुशोभित होते है और जिन्होंने समस्त लोकको आनन्दित किया है, उन श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
जिन्होंने अयोध्या-निवासको छोडकर चित्रकूटपर विहार किया और जो सब यतियोंके सेव्य हैं, उन धीरोदय श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
लक्ष्मण तथा जानकीजी सदा भक्तिपूर्वक जिनकी सेवा करते हैं, जो धनुष्य-बाण और तलवारको धारण किये हुए है, उन मेरे स्वामी श्रीरामभद्रका मङ्गल हो ।  
जिन्होंने दण्डकवनमें निवास किया है, जो खर-दूषणके शत्रू है और अपने भक्त गृध्रराजको मुक्ति देनेवाले हैं, उन रामभद्रका मङ्गल हो ।
जो आदरसहित शबरीके भी दिये हुए फल-मूलके अभिलाषी हुए, जो सुलभतासे पूर्ण ( अर्थात् थोडे ही परिश्रमसे प्राप्य ) हैं और जिनमे सत्त्वगुणका आधिक्य है, उन श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
जो हनुमानजीसे युक्त है, हरीश ( सुग्रीव ) के अभीष्टको देनेवाले हैं और बालिको मारनेवाले हैं, उन महावीर श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
जो सेतु बॉंधकर समुद्रको लॉंघ गये और जिन्होंने राक्षसराज रावणपर विजय पायी, उन रणधीर श्रीमान् रघुवीरका मङ्गल हो ।
जिन्होंने प्रसन्नतासे बिभीषणको उसका अभीष्ट लंकाका राज्य दे दिया और जो सब लोकोंको शरणमें रखनेवाले हैं, उन श्रीराघव रामभद्रका मङ्गल हो ।
वनसे दिव्य नगरी अयोध्यामें आनेपर जिनका सीताजीके सहित राज्याभिषेक हुआ, उन महाराजाओंके राजा श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
जो ब्रह्मा आदि देवताओंके सेव्य हैं, ब्रह्मण्य ( ब्राह्मणों और  वेदोंकी रक्षा करनेवाले ) हैं, श्रीजानकीजीके प्राणनाथ है, उन रघुकुलके नाथ श्रीरामभद्रका मङ्गल हो ।
जो श्रीसम्पन्न सुन्दर आकारवाले जामात मुनिकी कृपासे हमलोगोंको प्राप्त हुए हैं, उन मेरे महान् प्रभु रघुनाथजीका मङ्गल हो ।
मेरे आचार्य जिनमें मुख्य हैं, उन अर्वाचीन आचार्यों तथा संपूर्ण प्राचीन आचार्योंने मङ्गलाशासनका निर्माण किया है । इससे प्रसन्न होकर तीनों लोकोंके पति श्रीमान् रामभद्र सदा ही मङ्गल करें ।    
    ShriRamMangalaShashanam श्रीराममङ्गलाशासनम्  

         



Custom Search