ShriRamCharitManas
छं०—नमामि भक्त वत्सलं ।
कृपालु शील कोमलं ।
भजामि ते पदांबुजं ।
अकामिनां स्वधामदं ॥ १ ॥
‘ हे भक्तवत्सल, हे
कृपाळू, हे कोमल स्वभावाचे, मी तुम्हांला नमस्कार करतो. निष्काम पुरुषांना आपले
परमधाम देणार्या तुमच्या चरणकमलांना मी भजतो. ॥ १ ॥
निकाम श्याम सुंदरं । भवाम्बुनाथ
मंदरं ।
प्रफुल्ल कंज लोचनं । मदादि
दोष मोचनं ॥ २ ॥
तुम्ही अत्यंत सुंदर,
सावळे, संसाररुपी समुद्राचे मंथन करण्यासाठी मंदराचलरुप, प्रफुल्लित कमलासमान
नेत्रांचे आणि मद इत्यादी दोषांपासून मुक्त करणारे आहात. ॥ २ ॥
प्रलंब बाहु विक्रमं ।
प्रभोऽप्रमेय वैभवं ।
निषगं चाप सायकं । धरं
त्रिलोक नायकं ॥ ३ ॥
हे प्रभो, तुमच्या लांब
भुजांचा पराक्रम आणि तुमचे ऐश्वर्य बुद्धीपलीकडील आहे. भाले व धनुष्य-बाण धारण
करणारे तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी, ॥ ३ ॥
दिनेश वंश मंडनं । महेश चाप
खंडनं ।
मुनींद्र संत रंजनं ।
सुरारि वृदं भंजनं ॥ ४ ॥
सूर्यवंशाचे भूषण,
महादेवांचे धनुष्य मोडणारे, मुनिराज व संतांना आनंद देणारे तसेच देवांचे शत्रू
असलेल्या असुरांचे समूह नष्ट करणारे आहात. ॥ ४ ॥
मनोज वैरि वंदितं । अजादि देव
सेवितं ।
विशुद्ध बोध विग्रहं ।
समस्त दूषणापहं ॥ ५ ॥
तुम्हांला कामदेवाचे शत्रू असलेले महादेव वंदन करतात.
ब्रह्मदेव इत्यादी देव तुमची सेवा करतात. तुमचा विग्रह विशुद्ध ज्ञानमय असून
तुम्ही संपूर्ण दोषांचा नाश करणरे आहात. ॥ ५ ॥
नमामि इंदिरा पतिं । सुखाकरं सतां गतिं ।
भजे सशक्ति सानुजं । शची पति प्रियानुजं ॥ ६ ॥
हे लक्ष्मीपती, हे सुखनिधान, हे सत्पुरुषांचे आश्रय, मी
तुम्हांला नमस्कार करतो. हे इंद्राचे प्रिय अनुज वामनावतार, स्वरुपभूत शक्ती सीता
व लक्ष्मण यांचेसह मी तुम्हांला भजतो. ॥ ६ ॥
त्वदंघ्रि मूल ये नराः ।
भजंति हीन मत्सराः ।
पतंति नो भवारणवे । वितर्क
वीचि संकुले ॥ ७ ॥
जे लोक मत्सररहित होऊन
आपल्या चरण-कमलांची सेवा करतात, ते तर्क-वितर्करुपी तरंगांनी पूर्ण असलेल्या
संसाररुपी समुद्रात पडत नाहीत. ॥ ७ ॥
विविक्त वासिनः सदा । भजंति
मुक्तये मुदा ।
निरस्य इंद्रियादिकं ।
प्रयांति ते गतिं स्वकं ॥ ८ ॥
जे एकांतवासी लोक
मुक्तीसाठी विषयांपासून इंद्रियादींचा निग्रह करुन तुम्हांला प्रेमाने भजतात, ते
तुमच्या गतीला प्राप्त होतात. ॥ ८ ॥
तमेकमद्भुतं प्रभुं ।
निरीहमीश्र्वरं विभुं ।
जगद्गुरुं च शाश्र्वतं ।
तुरीयमेव केवलं ॥ ९ ॥
जे अद्वितीय, मायिक
जगाहून विलक्षण, सर्वसमर्थ, इच्छारहित, सर्वांचे स्वामी, व्यापक, जगद्गुरु, नित्य,
तिन्ही गुणांपलीकडील आणि आपल्या स्वरुपात स्थित असलेले असे तुम्ही आहात. ॥ ९ ॥
भजामि भाव वल्लभं ।
कुयोगिनां सुदुर्लभं ।
स्वभक्त कल्प पादपं । समं
सुसेव्यमन्वहं ॥ १० ॥
आणि जे भावप्रिय, विषयी
पुरुषांना अत्यंत दुर्लभ, आपल्या भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष,
पक्षपातरहित आणि नित्य आनंदाने सेवा करण्यास योग्य आहात, अशा तुम्हाला मी निरंतर
भजतो. ॥ १० ॥
अनूप रुप भूपतिं ।
नतोऽहमुर्विजा पतिं ।
प्रसीद मे नमामि ते ।
पदाब्ज भक्ति देहि मे ॥ ११ ॥
हे अनुपम सुंदर, हे
पृथ्वीपती, हे जानकीनाथ, मी तुम्हांला प्रणाम करतो. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी
तुम्हांला नमस्कार करतो. मला आपल्या चरणकमलांची भक्ती द्या. ॥ ११ ॥
पठंति ये स्तवं इदं ।
नरादरेण ते पदं ।
व्रजंति नात्र संशयं ।
त्वदीय भक्ति संयुताः ॥ १२ ॥
जे लोक ही स्तुती
आदराने म्हणतील, ते तुमच्या भक्तीने युक्त होऊन तुमच्या परमपदास प्राप्त होतील,
यांत शंका नाही.’ ॥ १२ ॥
दोहा०—बिनती करि मुनि नाइ सिरु
कह कर जोरि बहोरि ।
चरन सरोरुह नाथ जनि कबहुँ
तजै मति मोरि ॥ ४ ॥
मुनींनी अशी विनंती
करुन नतमस्तक होऊन, हात जोडून म्हटले, ‘ हे नाथ, माझी बुद्धी तुमचे चरण-कमल कधी न
सोडो.’ ॥ ४ ॥
अनुसुइया के पद गहि सीता ।
मिली बहोरि सुसील बिनीता ॥
रिषिपतिनी मन सुख अधिकाई ।
आसिष देइ निकट बैठाई ॥
नंतर परम शीलवती विनम्र
सीतेने अत्रिपत्नी अनसूयेचे पाय धरुन तिची भेट घेतली. ऋषिपत्नीच्या मनास खूप आनंद
झाला. तिने आशीर्वाद देऊन सीतेला जवळ बसवून घेतले. ॥ १ ॥
दिब्य बसन भूषन पहिराए । जे
नित नूतन अमल सुहाए ॥
कह रिषिबधू सरस मृदु बानी ।
नारिधर्म कछु ब्याज बखानी ॥
आणि तिने नित्य नवी,
निर्मळ आणि सुदंर राहाणारी दिव्य वस्त्रे व अलंकार सीतेला घातले. नंतर ऋषि-पत्नी
त्या निमित्ताने मधुर व कोमल वाणीने स्त्रियांच्या काही धर्मांचे वर्णन सांगू
लागली.
मातु पिता भ्राता हितकारी ।
मितप्रद सब सुनु राजकुमारी ॥
अमित दानि भर्ता बयदेही ।
अधम सो नारि जो सेव न तेही ॥
‘ हे राजकुमारी, ऐक.
माता, पिता, भाऊ हे सर्व हितकारक असतात, परंतु ते एका मर्यादेपर्यंतच सुख देणारे
आहेत. परंतु हे जानकी, पती हा मोक्षरुप असीम सुख देणारा असतो. अशा पतीची जी सेवा
करीत नाही, ती स्त्री अधम होय. ॥ ३ ॥
धीरज धर्म मित्र अरु नारी ।
आपद काल परिखिअहिं चारी ॥
बृद्ध रोगबस जड़ धनहीना ।
अंध बधिर क्रोधी अति दीना ॥
धैर्य, धर्म, मित्र व
स्त्री या चौघांची परीक्षा संकटकाळीच होत असते. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, अंध,
बहिरा, क्रोधी व अत्यंत दीन, ॥ ४ ॥
ऐसेहु पति कर किएँ अपमाना ।
नारि पाव जमपुर दुख नाना ॥
एकइ धर्म एक ब्रत नेमा ।
कायँ बचन मन पति पद प्रेमा ॥
अशाही पतीचा अपमान
केल्यास स्त्रीला यमपुरीत तर्हेतर्हेचे दुःख भोगावे लागते. शरीर, वचन आणि मनाने
पतीच्या चरणी प्रेम करणे हा स्त्रीचा एकच धर्म आहे, एकच व्रत आहे आणि एकच नियम
आहे. ॥ ५ ॥
जग पतिब्रता चारि बिधि
अहहीं । बेद पुरान संत सब कहहीं ॥
उत्तम के अस बस मन माहीं ।
सपनेहुँ आन पुरुष जग नाहीं ॥
जगात चार प्रकारच्या
पतिव्रता असतात. वेद, पुराण व संत हे सर्व असे म्हणतात की, जगात माझा पती सोडल्यास
दुसरा पुरुष माझ्या स्वप्नातही येत नाही, असा भाव उत्तम श्रेणीच्या पतिव्रतेच्या
मनात असतो. ॥ ६ ॥
मध्यम परपति देखइ कैसें ।
भ्राता पिता पुत्र निज जैसें ॥
धर्म बिचारि समुझि कुल रहई
। सो निकिष्ट त्रिय श्रुति अस कहई ॥
मध्यम श्रेणीची
पतिव्रता दुसर्या पुरुषाला अवस्थेप्रमाणे आपला सख्खा भाऊ, पिता किंवा पुत्र
यांच्या रुपात पाहाते. जी धर्माचा विचार करुन आणि आपल्या कुळाची मर्यादा जाणून
स्वतःचा ( मनात असूनही ) परपुरुषापासून बचाव करते, ती निकृष्ट प्रतीची पतिव्रता
होय, असे वेद म्हणतात. ॥ ७ ॥
बिनु अवसर भय तें रह जोई ।
जानेहु अधम नारि जग सोई ॥
पति बंचक परपति रति करई ।
रौरव नरक कल्प सत परई ॥
आणि ज्या स्त्रीला व्यभिचाराची संधी मिळत नाही, किंवा जी
भीतीमुळे पतिव्रता राहते. जगात त्या स्त्रीला अधम मानावे. पतीचा विश्वासघात करुन
जी स्त्री परपुरुषाशी रती करते, ती स्त्री तर शंभर कल्पांपर्यंत रौरव नरकात पडते.
॥ ८ ॥
छन सुख लागि जनम सत कोटी ।
दुख न समुझ तेहि सम को खोटी ॥
बिनु श्रम नारि परम गति लहई
। पतिब्रत धर्म छाड़ि छल गहई ॥
क्षणभराच्या सुखासाठी
कोट्यावधी जन्मामध्ये भोगावे लागणारे दुःख जिला समजत नाही. त्या स्त्रीसारखी दुष्ट
कोण असणार ? जी स्त्री फसवणूक न करता पतिव्रत्य धर्म स्वीकारते, तिला विनासायास
परम गती प्राप्त होते. ॥ ९ ॥
पति प्रतिकूल जनम जहँ जाई ।
बिधवा होइ पाइ तरुनाई ॥
परंतु जी पतीविरुद्ध वागते. ती पुढे जेथे जन्म घेते, तेथे ती
तारुण्यातच विधवा होते.