Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 11 Doha 24 to 25 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ११ दोहा २४ ते २५

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 11 
Doha 24 to 25 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ११ 
दोहा २४ ते २५

दोहा—करि पूजा मारीच तब सादर पूछी बात ।

कवन हेतु मन ब्यग्र अति अकसर आयहु तात ॥ २४ ॥

मग मारीचाने रावणाचा सन्मान करुन आदराने विचारले, ‘ हे स्वामी ! तुमचे मन कशामुळे इतके बैचैन आहे आणि तुम्ही एकटेच कसे आलात ? ॥ २४ ॥

दसमुख सकल कथा तेहि आगें । कही सहित अभिमान अभागें ॥

होहु कपट मृग तुम्ह छलकारी । जेहि बिधि हरि आनौं नृपनारी ॥

भाग्यहीन रावणाने सर्व कथा अभिमानाने त्याला सांगितली. आणि म्हटले, ‘ तू फसवणारा कपटमृग बन. त्या उपायाने मी त्या राजवधूला हरण करुन आणीन.’ ॥ १ ॥

तेहिं पुनि कहा सुनहु दससीसा । ते नररुप चराचर ईसा ॥

तासों तात बयरु नहिं कीजै । मारें मरिअ जिआएँ जीजै ॥

तेव्हा मारीच म्हणाला, ‘ हे दशानन ! ऐका. ते मनुष्यरुपातील चराचराचे ईश्वर आहेत. स्वामी ! त्यांच्याशी वैर धरु नका. त्यांनी मारल्यास मरण व त्यांनी जगविल्यास जगणे असते सर्वांचे जीवन मरण त्यांच्या हाती आहे. ॥ २ ॥

मुनि मख राखन गयउ कुमारा । बिनु फर सर रघुपति मोहि मारा ॥

सत जोजन आयउँ छन माहीं । तिन्ह सन बयरु किएँ भल नाहीं ॥

हेच राजकुमार, मुनी विश्वामित्रांच्या यज्ञाचें रसण करण्यासाठी गेले होते. त्यावेळ श्रीरघुनाथांनी फाळ नसलेला बाण मला मारला होता, त्यामुळे मी एका क्षणात शंभर योजने दूर येऊन पडलो. त्यांच्याशी वैर करण्यात कल्याण नाही. ॥ ३ ॥

भइ मम कीट भृंग की नाई । जहँ तहँ मैं देखउँ दोउ भाई ॥

जौं नर तात तदपि अति सूरा । तिन्हहि बिरोधि न आइहि पूरा ॥

माझी अवस्था कुंभारमाशीसारखी झालेली आहे. मला जिकडे तिकडे राम-लक्ष्मण हे दोघे भाऊच दिसतात. आणि हे राजा ! जर ते मनुष्य असतील, तरीही मोठे शूरवीर आहेत. त्यांना विरोध करुन यश मिळणार नाही. ॥ ४ ॥

दोहा—जेहिं ताड़का सुबाहु हति खंडेउ हर कोदंड ।

खर दूषन तिसिरा बधेउ मनुज कि अस बरिबंड ॥ २५ ॥

ज्याने ताडका व सुबाहू यांना मारुन शिवांचे धनुष्य मोडले आणि खर, दूषण व त्रिशिरा यांचा वध केला. असा प्रचंड बलवान कधी मनुष्य असेल काय ? ॥ २५ ॥

जाहु भवन कुल कुसल बिचारी । सुनत जरा दीन्हिसि बहु गारी ॥

गुरु जिमि मूढ़ करसि मम बोधा । कहु जग मोहि समान को जोधा ॥

म्हणून आपल्या कुळाच्या कल्याणाचा विचार करुन परत जा. ‘ हे ऐकून रावण रागावला आणि त्याने खूप शिव्या दिल्या. तो म्हणाला, ‘ अरे मूर्खा, तू एखाद्या गुरुप्रमाणे मला शिकवतोस काय ? सांग बरे ! जगात माझ्यासारखा योद्धा आहे कोण ?’ ॥ १ ॥

तब मारीच हृदयँ अनुमाना । नवहि बिरोधें नहिं कल्याना ॥

सस्त्री मर्मी प्रभु सठ धनी । बैद बंदि कबि भानस गुनी ॥

तेव्हा मारीचाने मनात विचार केला की, शस्त्रधारी, रहस्य जाणणारा, समर्थ मालक, मूर्ख, श्रीमंत, वैद्य, भाट, कवी व स्वयंपाकी या नऊ व्यक्तींशी वैर करणार्‍याचे कल्याण होत नाही. ॥ २ ॥

उभय भॉंति देखा निज मरना । तब ताकिसि रघुनायक सरना ॥

उतरु देत मोहि बधब अभागें । कस न मरौं रघुपति सर लागें ॥

जेव्हा मारीचाने दोन्हीकडे आपले मरण आहे, असे जाणले, तेव्हा त्याने श्रीरघुनाथांना शरण जाणें, हे चांगले असे ठरविले. त्याने विचार केला की, ‘ नाही ‘ म्हणताच हा नीच रावण मला मारणार. मग श्रीरघुनाथांचा बाण लागून मी का मरु नये ? ॥ ३ ॥

अस जियँ जानि दसानन संगा । चला राम पद प्रेम अभंगा ॥

मन अति हरष जनाव न तेही । आजु देखिहउँ परम सनेही ॥

मनात असा विचार करुन तो रावणाबरोबर निघाला.

 श्रीरामांच्या चरणी त्याचे अखंड प्रेम होते. त्याला मनातून

 आनंद वाटत होता की, आज मी आपल्या परमप्रिय

 श्रीरामांना पाहीन, परंतु ही आनंदाची गोष्ट त्याने

 रावणाला सांगितली नाही. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment