Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 18 Doha 38 to 39 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १८ दोहा ३८ ते ३९

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 18 
Doha 38 to 39 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १८ 
दोहा ३८ ते ३९

दोहा—तात तीनि अति प्रबल खल काम क्रोध अरु लोभ ।

मुनि बिग्यान धाम मन करहिं निमिष महुँ छोभ ॥ ३८ ( क) ॥

हे बंधो ! काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही अत्यंत प्रबल व दुष्ट आहेत. ते ज्ञानसंपन्न मुनींचेही मन क्षणात क्षुब्ध करुन टाकतात. ॥ ३८ ( क ) ॥

लोभ कें इच्छा दंभ बल काम कें केवल नारि ।

क्रोध कें परुष बचन बल मुनिबर कहहिं बिचारि ॥ ३८ ( ख ) ॥

लोभाला इच्छा व दंभाचे बळ असते, कामाला केवळ स्त्रीचे बळ असते आणि क्रोधाला कठोर वचनांचे. श्रेष्ठ मुनी विचारपूर्वक असेच सांगतात. ‘ ॥ ३८ ( ख ) ॥

गुनातीत सचराचर स्वामी । राम उमा सब अंतरजामी ॥

कामिन्ह कै दीनता देखाई । धीरन्ह कें मन बिरति दृढ़ाई ॥

शिव म्हणतात, ‘ हे पार्वती, श्रीरामचंद्र हे त्रिगुणातीत, चराचर जगाचे स्वामी आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहेत. ‘ त्यांनी वरील वर्णनातून कामी लोकांची लाचारी दाखवून दिली आणि विवेकी पुरुषांच्या मनातील वैराग्य दृढ केले. ॥ १ ॥

क्रोध मनोज लोभ मद माया । छूटहिं सकल राम कीं दाया ॥

सो नर इंद्रजाल नहिं भूला । जा पर होइ सो नट अनुकूला ॥

काम, क्रोध, लोभ, मद आणि माया हे सर्व श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होतात, तो मनुष्य मायेमुळे भटकत नाही. ॥ २ ॥

उमा कहउँ मैं अनुभव अपना । सत हरि भजनु जगत सब सपना ॥

पुनि प्रभु गए सरोबर तीरा । पंपा नाम सुभग गंभीरा ॥

हे उमे, मी तुला आपला अनुभव सांगतो. हरीचे भजन सत्य आहे आणि हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. नंतर प्रभू श्रीराम पंपा नामक सुंदर आणि अथांग सरोवराकाठी आले. ॥ ३ ॥

संत हृदय जस निर्मल बारी । बॉंधे घाट मनोहर चारी ॥

जहँ तहँ पिअहिं बिबिध मृग नीरा । जनु उदार गृह जाचक भीरा ॥

त्या सरोवराचे पाणी संतांच्या हृदयाप्रमाणे निर्मळ होते. त्याला बांधलेले मनोहर सुंदर चार घाट होते. तर्‍हेतर्‍हेचे पशू इकडे तिकडे पाणी पीत होते. जणू उदार दानी पुरुषांच्या घरी याचकांची गर्दी झालेली असावी. ॥ ४ ॥

दोहा—पुरइनि सघन ओट जल बेगि न पाइअ मर्म ।

मायाछन्न न देखिऐ जैसें निर्गुन ब्रह्म ॥ ३९ ( क ) ॥

दाट कमल-पत्रांनी झाकलेल्या पाण्याचा लवकर पत्ता लागत नाही, ज्याप्रमाणे मायेने झाकल्यामुळे निर्गुण ब्रह्म दिसत नाही. ॥ ३९ ( क ) ॥

सुखी मीन सब एकरस अति अगाध जल माहिं ।

जथा धर्मसीलन्ह के दिन सुख संजुत जाहिं ॥ ३९ ( ख ) ॥

त्या सरोवराच्या अत्यंत अथांग जलामध्ये सर्व मासे सतत एकसमान सुखी राहात होते. ज्याप्रमाणे धर्मशील पुरुषांचे सर्व दिवस सुखात जातात. ॥ ३९ ( ख ) ॥

बिकसे सरसिज नाना रंगा । मधुर मुखर गुंजत बहु भृंगा ॥

बोलत जलकुक्कुट कलहंसा । प्रभु बिलोकि जनु करत प्रशंसा ॥

त्यात रंगी-बेरंगी कमळे उमललेली होती. पुष्कळ भ्रमर मधुर स्वरांनी गुंजारव करीत होते. पाणकोंबडे व राजहंस बोलत होते, जणु प्रभूंना पाहून ते त्यांची प्रशंसा करीत असावेत. ॥ १ ॥

चक्रबाक बक खग समुदाई । देखत बनइ बरनि नहिं जाई ॥

सुंदर खग गन गिरा सुहाई । जात पथिक जनु लेत बोलाई ॥

चक्रवाक, बगळे इत्यादी पक्ष्यांचे समुदाय पाहातच राहावे, असे वर्णनीय वाटत होते. सुंदर पक्ष्यांची किलबिल फार गोड वाटत होती; जणू रस्त्याने जाणार्‍या वाटसरुंना ते बोलावीत होते. ॥ २ ॥

ताल समीप मुनिन्ह गृह छाए । चहु दिसि कानन बिटप सुहाए ॥

चंपक बकुल कदंब तमाला । पाटल पनस परास रसाला ॥

त्या सरोवराच्याजवळ मुनींनी आश्रम बनविले होते. त्याच्या चारी बाजूंना वनातील सुंदर वृक्ष होते. चाफा, बकुळ, कदंब, तमाल, पाटस, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादी ॥ ३ ॥

नव पल्लव कुसुमित तरु नाना । चंचरीक पटली कर गाना ॥

सीतल मंद सुगंध सुभाऊ । संतत बहइ मनोहर बाऊ ॥

अनेक प्रकारचे वृक्ष नवनवीन पाने आणि सुगंधित फुलांनी भरलेले होते, त्यांवर भ्रमरांचे समूह गुंजारव करीत होते. तसेच शीतल, मंद, सुगंधित हवा नित्य वाहात होती. ॥ ४ ॥

कुहू कुहू कोकिळ धुनि करहीं । सुनि रव सरस ध्यान मुनि टरहीं ॥

कोकिळ ‘ कुहू-कुहू ‘ बोलत होते. त्यांचे मधुर बोल ऐकून मुनींचे ध्यानही भंग पावत होते. ॥ ५ ॥   



Custom Search

No comments:

Post a Comment