Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 8 Doha 17 and 18 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ८ दोहा १७ व १८

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 8 
Doha 17 and 18 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ८ 
दोहा १७ व १८

दोहा---लछिमन अति लाघवँ सो नाक कान बिनु कीन्हि ।

ताके कर रावन कहँ मनौ चुनोती दीन्हि ॥ १७ ॥

लक्ष्मणाने मोठ्या चपळाईने तिचे नाक व कान कापले. जणू त्याने तिच्याद्वारे रावणाला आव्हान दिले. ॥ १७ ॥

नाक कान बिनु भइ बिकरारा । जनु स्त्रव सैल गेरु कै धारा ॥

खर दूषन पहिं गइ बिलपाता । धिग धिग तव पौरुष बल भ्राता ॥

नाक-कानांविना ती भयंकर दिसू लागली. काळ्या पर्वतातून कावेचा प्रवाह वाहावा, तसे तिच्या शरीरातून रक्त वाहू लागले. ती विलाप करीत खर-दूषण यांच्यापाशी गेली आणि म्हणाली,  ‘ बंधूंनो, तुमच्या पौरुषाचा धिक्कार असो, तुमच्या सामर्थ्याचा धिक्कार असो.’ ॥ १ ॥ 

तेहिं पूछा सब कहेसि बुझाई । जातुधान सुनि सेन बनाई ॥

धाए निसिचर निकर बरुथा । जनु सपच्छ कज्जल गिरि जूथा ॥

त्यांनी विचारल्यावर तिने सर्व सांगितले. ते सर्व ऐकून राक्षसांनी सेना सज्ज केली. राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी धावून गेल्या. त्या जणू पंखधारी कजळाच्या पर्वतांच्या झुंडी दिसत होत्या. ॥ २ ॥

नाना बाहन नानाकारा । नानायुध धर घोर अपारा ॥

सूपनखा आगें करि लीनी । असुभ रुप श्रुति नासा हीनी ॥        

ते अनेक प्रकारच्या वाहनांवर बसलेले व अनेक आकारांचे होते. ते अपार होते आणि अनेक प्रकारची असंख्य भयंकर शस्त्रे त्यांनी धारण केली होती. त्यांनी नाक-कान कापलेल्या अमंगलरुपिणी शूर्पणखेला पुढे केले. ॥ ३ ॥

असगुन अमित होहिं भयकारी । गनहिं न मृत्यु बिबस सब झारी ॥

गर्जहिं तर्जहिं गगन उड़ाहीं । देखि कटकु भट अति हरषाहीं ॥

अगणित भयंकर अपशकुन होत होते. परंतु मृत्युच्या तोंडी असल्यामुळे त्या सर्वांनी त्याची पर्वा केली नाही. गर्जना करीत, ललकारत आणि आकाशात ते उडत होते. सेना पाहून योध्यांना फार हर्ष वाटत होता. ॥ ४ ॥

कोउ कह जिअत धरहु द्वौ भाई । धरि मारहु तिय लेहु छड़ाई ॥

धूरि पूरि नभ मंडल रहा । राम बोलाइ अनुज सन कहा ॥

कोणी म्हणत होता की, ‘ दोघा भावांना पकडा, पकडून मारुन टाका आणि स्त्रीचे अपहरण करा. ' आकाश धूळीने भरुन गेले होते. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावून सांगितले, ॥ ५ ॥

लै जानकिहि जाहु गिरि कंदर । आवा निसिचर कटकु भयंकर ॥

रहेहु सजग सुनि प्रभु कै बानी । चले सहित श्री सर धनु पानी ॥

‘ राक्षसांची भयंकर सेना आलेली आहे. जानकीला घेऊन तू पर्वतांच्या गुहेमध्ये जा. सावध राहा. ‘ प्रभु रामचंद्रांचे बोलणे ऐकून लक्ष्मण हातांमध्ये धनुष्य-बाण घेऊन सीतेसह निघाला. ॥ ६ ॥

देखि राम रिपुदल चलि आवा । बिहसि कठिन कोदंड चढ़ावा ॥

शत्रूंची सेना जवळ आल्याचे पाहून श्रीरामांनी हसून कठीण धनुष्य सज्ज केले. ॥ ७ ॥

छं०—कोदंड कठिन चढ़ाइ सिर जट जूट बॉंधत सोह क्यों ।

मरकत सयल पर लरत दामिनि कोटि सों जुग भुजग ज्यों ॥

कटि कसि निषंग बिसाल भुज गहि चाप बिसिख सुधारि कै ।

चितवत मनहुँ मृगराज प्रभु गजराज घटा निहारि कै ॥

कठिण धनुष्य सज्ज केलेले व शिरावर जटा बांधलेले प्रभू असे शोभत होते की पाचूच्या पर्वतावर कोट्यावधी विजांबरोबर दोन साप लढत आहेत. कमरेला भाते बांधून, विशाल भुजांमध्ये धनुष्य बाण सज्ज करुन प्रभु श्रीरामचंद्र राक्षसांकडे पाहात होते. जणू उन्मत्त हत्तींची झुंड पाहून सिंह त्यांना पाहात होता.          

सो०---आइ गए बगमेल धरहु धरहु धावत सुभट ।

जथा बिलोकि अकेल बाल रबिहि घेरत दनुज ॥ १८ ॥

‘ पकडा, पकडा ‘ असे ओरडतराक्षस योद्धे मोठ्या वेगाने धावत आले. त्यांनी श्रीरामांना चोहीकडे घेरले. ज्याप्रमाणे बालसूर्य एकटा आहे, असे पाहून मंदेह नामक दैत्यांनी त्याला घेरावे. ॥ १८ ॥


प्रभु बिलोकि सर सकहिं न डारी । थकित भई रजनीचर धारी ॥

सचिव बोलि बोले खर दूषन । यह कोउ नृपबालक नर भूषन ॥

सौंदर्य-माधुर्य-निधी असलेल्या श्रीरामांना पाहून राक्षसांची सेना थक्क झाली. ती त्यांच्यावर बाण सोडू शकली नाही. मंत्र्याला बोलावून खर-दूषण म्हणाले, ‘ हा राजकुमार कोणी मनुष्यांचा भूषण असावा. ॥ १ ॥

नाग असुर सुर नर मुनि जेते । देखे जिते हते हम केते ॥

हम भरि जन्म सुनहु सब भाई । देखी नहिं असि सुंदरताई ॥

जितके म्हणून नाग, असुर, देव, मनुष्य आणि मुनी आहेत, त्यांपैकी किती तरी आम्ही पाहिले आहेत. जिंकले आहेत आणि मारुन टाकले आहेत. परंतु सर्व बंधूनो, आम्ही जन्मात कधी असे सौंदर्य कोठे पाहिले नाही. ॥ २ ॥

जद्यपि भगिनी कीन्हि कुरुपा । बध लायक नहिं पुरुष अनूपा ॥

देहु तुरत निज नारि दुराई । जीअत भवन जाहु द्वौ भाई ॥

जरी याने आमच्या बहिणीला कुरुप केले असले, तरी हा अनुपम पुरुष वध करण्याजोगा नाही. ‘ लपविलेली तुमची स्त्री आम्हांला ताबडतोप द्या आणि तुम्ही दोघे बंधू जिवंतपणे  परत जा. ॥ ३ ॥

मोर कहा तुम्ह ताहि सुनावहु । तासु बचन सुनि आतुर आवहु ॥

दूतन्ह कहा राम सन जाई । सुनत राम बोले मुसुकाई ॥

असा माझा निरोप त्याला सांगा आणि त्याचे उत्तर घेऊन लगेच परत या. ‘ दूतांनी जाऊन हा निरोप श्रीरामचंद्रांना सांगितला. तो ऐकून श्रीराम हसून म्हणाले, ॥ ४ ॥

हम छत्री मृगया बन करहीं । तुम्ह से खल मृग खोजत फिरहीं ॥

रिपु बलवंत देखि नहिं डरहीं । एकबार कालहु सन लरहीं ॥

‘ आम्ही क्षत्रिय आहोत. आम्ही वनात शिकार करतो व तुमच्या-सारख्या दुष्ट पशूंना शोधत असतो. आम्ही बलवान शत्रू पाहून घाबरत नसतो. लढाई करण्यास प्रत्यक्ष काळ आला तरी वेळ आली तर आम्ही त्याच्याशीही लढू. ॥ ५ ॥    

जद्यपि मनुज दनुज कुल घातक । मुनि पालक खल सालक बालक ॥

जौं न होइ बल फिरि जाहू । समर बिमुख मैं हतउँ न काहू ॥

जरी आम्ही मनुष्य असलो, तरी दैत्यकुलाचा नाश करणारे आणि मुनींचे रक्षण करणारे आहोत. आम्ही बालक आहोत. परंतु दुष्टांना दंड देणारे आहेत. जर बळ नसेल तर परत जा. युद्धामध्ये पाठ फितविणार्‍याला मी मारत नाही. ॥ ६ ॥

रन चढ़ि करिअ कपट चतुराई । रिपु पर कृपा परम कदराई ॥

दूतन्ह जाइ तुरत सब कहेऊ । सुनि खर दूषन उर अति दहेऊ ॥

रणामध्ये येऊन कपटकारस्थान करणे आणि शत्रूला पाठ दाखविणे, हा फार मोठा भित्रेपणा आहे’ दूतांनी परतून लगेच सर्व गोष्टी सांगितल्या. त्या ऐकून खर-दूषण यांचे पित्त खवळले.


Custom Search

No comments:

Post a Comment