Thursday, July 16, 2015

Gurucharitra Adhyay 36 Part 4/5 श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग ४/५


Gurucharitra Adhyay 36 
Gurucharitra Adhyay 36 is in Marathi. This Adhyay describes many things which are required to do by a Brahmin. It describe the importance of Gayatri Mantra, How to perform Sabdhya, what should be the daily routine of a Brahmin and so on. Name of this Adhyay is AanhikNirupanam.
श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग ४/५
आहवनीयाग्निगार्हपत्य- । दक्षिणाग्नि उपस्थानानि ।
पृथ्विव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तअनुदात्तस्वरित--स्वराः ॥ ३३१ ॥
पीत-विद्युत्-कृष्णवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनी ।
विश्र्वतैजसप्राज्ञस्वरुपिणी । जागृतिस्वप्नसुषुप्त्यवस्था ॥ ३३२ ॥
ऐसें त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी ।
आतां विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ३३३ ॥
ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्र्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
ओं ' अं ' नामौ । ' उं ' हृदये, ' मं ' कंठे ॥ ३३४ ॥
ॐ ' भूः ' अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी । 
अग्नि-देवता परियेसीं । विश्र्वामित्र-ऋषि देखा ॥ ३३५ ॥
षड्जस्वर श्र्वेत वर्ण । पाद स्पर्शा उच्चारोन ।
प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याहृति म्हणावी ॥ ३३६ ॥
ॐ ' भुवः ' -अक्षरमंत्रासी । उष्णिक्-नाम छंदासी ।
वायुदेवता परियेसीं । भृगुऋषि असे जाणा ॥ ३३७ ॥
ऋषभेश्र्वर असे जाण । असे रुप श्यामवर्ण ।
करा तुम्ही ऐसें ध्यान । जानूमध्यें न्यासावें ॥ ३३८ ॥
प्राणायामे विनियोगः म्हणोनि । न्यास करा भक्तींनी ।
ॐ ' सुवः ' -व्याहृति म्हणोनि । ध्यान करावें भक्तिनें ॥ ३३९ ॥
सुवः- व्याहृतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप्-छंदासी ।
सवितादेवता परियेसीं । भारद्वाजऋषि जाणा ॥ ३४० ॥
स्वर-गांधार पीतवर्णा । कटि स्पर्शोनि मंत्र म्हणा ।
प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याहृतिमंत्रासी ॥ ३४१ ॥
ॐ ' महः ' मंत्रासी । म्हणा बृहतीछंदासी ।
बृहस्पतिदेवता परियेसीं । वसिष्ठऋषि अवधारा ॥ ३४२ ॥
मध्यम-स्वर, पिशंगवर्ण । ऐसें करा तुम्ही ध्यान ।
नाभीं स्पर्शोन म्हणा । ' प्राणायामे विनियोगः ' ॥ ३४३ ॥
ॐ ' जनः '--मंत्रउच्चारासी । म्हणा पंक्तिछंदासी । 
वरुणादेवता, गौतमऋषि । पंचमस्वर असे जाण ॥ ३४४ ॥
रुप असे नीलवर्ण । करा न्यास हृदयस्थान । 
प्राणायामे विनियोगून । जनः न्यास ऐसा असे ॥ ३४५ ॥
ॐ ' तपः ' --मंत्रन्यासासी । त्रिष्टुपछंद परियेसीं ।
इंद्रदेवता, कश्यपऋषि । धैवतस्वर परियेसा ॥ ३४६ ॥
असे आपण लोहित - वर्ण । स्पर्श करावें कंठस्थान । 
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मण हो ॥ ३४७ ॥
ॐ ' सत्यं ' म्हणिजे मंत्रासी । जाणा जगती छंदासी ।
विश्र्वेदेवता, अंगिरसऋषि । निषादस्वर असे जाण ॥ ३४८ ॥
रुप असे कनकवर्ण । भुवोर्ललाट स्पर्शस्थान ।
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तिनें ॥ ३४९ ॥
इतुके  न्यास करोनि । हस्त ठेवोनि शिरस्थानीं ।
ध्यान करा विधीनीं । सांगेन ऐक ब्राह्मणा ॥ ३५० ॥
शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप्छंदासी ।
उच्चारावा प्रजापतिऋषि । परमात्मादेवता जाण ॥ ३५१ ॥
प्राणायामे विनियोगून । मग करावें गायत्रीं ध्यान । 
ॐ ' आपोज्योति ' म्हणोन । मंत्र म्हणावा भक्तीनें ॥ ३५२ ॥  
ॐ ' आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःसुवरों । 
शिरसीं स्थान, येणेंविधि । अंगन्यास करावे ॥ ३५३ ॥ 
चव्वीस अक्षरें गायत्रीसी । न्याय सांगेन एकेकासी ।
एकचित्तें परियेसीं । म्हणे पराशर ऋषीश्र्वर ॥ ३५४ ॥
या त्रिपदागायत्रीसी । असे विश्र्वामित्रऋषि ।
दैवीगायत्रीछंदेसीं । वर्ण-देवता सांगेन ॥ ३५५ ॥
" ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो । नः प्रचोदयात् " ॥ ३५६ ॥
ऐसें त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चव्वीस अक्षरें परियेसीं ।
पृथक् न्यास विस्तारेसीं । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥ ३५७ ॥
' तत् ' वर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
अग्निदेवता परियेसीं । गायत्री छंद म्हणावा ॥ ३५८ ॥
सुवर्णचंपक पुष्पें जैसीं । रुप तैसें जाणा त्यासी ।
ध्यान केलिया पाप नाशी । ' पादांगुष्ठीं ' न्यास जाणा ॥ ३५९ ॥
' स ' वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
वायुदेवता परियेंसी । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६० ॥
अतसीपुष्पें वर्णे जैसीं । रुप त्यांचे परियेसीं ।
उपपातक दोष नाशी । ' गुल्फन्यास ' करावा ॥ ३६१ ॥
' वि ' वर्णनाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
सूर्यदेवता परियेसीं ।  दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६२ ॥
' जंघास्थानीं ' असे न्यास । सौम्यरुप कपिल वर्ण सुरस ।
महापापें दहतीं परियेस । --विवर्णाचें लक्षण ॥ ३६३ ॥
' तु ' वर्ण नाम अक्षरासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
विद्युत्-देवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६४ ॥
न्यास करावया ' जानुस्थान ' । इंद्रनील विद्युद्वर्ण ।
ऐसें अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥ ३६५ ॥
' र्व ' वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
यमदेवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६६ ॥    
न्यास करा ' ऊरुस्थानीं ' । दीप्ति असे जैसा वन्हि ।
रुप असे सौम्यपणीं । भ्रूणहत्या पाप नाशी ॥ ३६७ ॥
' रे ' वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
वरुणदेवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६८ ॥ 
शुद्ध-स्फटिक-कांति । ' गुह्यस्थानीं ' न्यास बोलती ।
अगम्यागमन दोष नाशतीं । रे--वर्णस्थाना उत्तम ॥ ३६९ ॥
' णि ' वर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
बृहस्पति-देवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३७० ॥  
णि-कार ' वृषभस्थान ' जाणा । विद्यत्प्रकाश रुपधारणा ।
बार्हस्पत्य नाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥ ३७१ ॥
' यं ' अक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
पर्जन्यदैवत परियेसी । दैवीगायत्रीछंद असे ॥ ३७२ ॥
यं- ' कटिस्थान ' तारकावर्ण । देहहत्यापापज्वलन ।
न्यास करावें सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥ ३७३ ॥
भ-कारा ' नाभीं ' करा व्यास । कृष्णमेघवर्ण सुरस ।
इंद्रदेवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥ ३७४ ॥
' भ ' वर्ण नाम अक्षरासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
इंद्रदेवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३७५ ॥
' र्गो ' अक्षरा ' उदर ' न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस ।
गंधर्व--देवता परियेस । गोहत्येचें पाप जाय ॥ ३७६ ॥
' र्गो ' नाम अक्षरासी । जाणावा विश्र्वामित्र-ऋषि ।
गंधर्व--देवता परियेसी । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३७७ ॥  
' दे ' --कारन्यास ' स्तनासी ' । पूषा नाम देव परियेसीं ।
स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्तें परियेसा ॥ ३७८ ॥
' दे ' वर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
पूषा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद देखा ॥ ३७९ ॥
' व ' -कारा ' हृदयस्थान न्यास । शुक्लरुप वर्ण परियेस ।
रुद्र-देवता असे त्यास । वाग्जातपाप नाशी ॥ ३८० ॥
' व ' वर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्र्वामित्र ऋषि ।
रुद्र-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८१ ॥
स्य-अक्षरा ' कंठन्यास ' । कांचनवर्ण रुप सुरस ।
त्वष्टा देवता परियेस । मानकौटिल्य पाप जाय ॥ ३८२ ॥
' स्य ' वर्ण अक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
त्वष्टा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८३ ॥
' धी ' काराक्षरमंत्रा ' दंतीं ' न्यास । शुक्लकुमुद-संकाश ।
वसु-देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥ ३८४ ॥
' धी ' वर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
वसु देवता परियेसी । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८५ ॥
' म '-कारन्यास ' तालुस्थान ' । पद्मराग तेज जाण ।
मरुत्-देवता असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥ ३८६ ॥
' म ' वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
मरुत्-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८७ ॥
हि-कारा ' नासिकीं ' करा न्यास । शंखवर्ण असे त्यास ।
सोम-देवता परियेस । सर्व पापहरण होय ॥ ३८८ ॥
' हि ' वर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि । 
सोम-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८९ ॥
' धि ' -कारा ' नेत्रस्थानीं ' न्यास । पांडुरमास संकाश ।
अंगिरा-देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥ ३९० ॥
' धि ' वर्ण नाम अक्षरासी । तोचि विश्र्वामित्र-ऋषि ।
-अंगिरा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९१ ॥
यो-काराक्षर मंत्रासी । ' भ्रुवोर्मध्ये ' न्यासिजे त्यासी ।
रक्तगौरवर्ण रुपेसीं । प्राणिवधपाप जाय ॥ ३९२ ॥
' यो ' कार नाम वर्णासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
विश्र्वेदेव-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९३ ॥
यो कारा- ' ललाटस्थानीं ' न्यास । रुप रुक्माभसंकाश । 
सर्वपाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावें ॥ ३९४ ॥
' यो ' वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
अश्र्विनौ-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९५ ॥
न--कारा न्यास ' प्राङ्गमुखा ' । उदित-सूर्यासमान देखा ।
प्रजापति-देवता असे निका । चिरंजिपद पाविजे ॥ ३९६ ॥
' न ' काराक्षर वर्णासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
प्रजापति-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९७ ॥
प्र-काराक्षरन्यास करोनि ' दक्षिणे ' । रुप असे इंद्रनील वर्ण । 
सर्वदेव-देवता जाण । सर्वदेवपदवी पाविजे ॥ ३९८ ॥
' प्र ' वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
सर्व-देवदेवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९९ ॥
चो-कार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया ' पश्र्चिम ' भागासी ।
कुंकुमरुप वर्ण त्यासी । कैलासपद पाविजे ॥ ४०० ॥
' चो ' कार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्र्वामित्र-ऋषि ।
रुद्र-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०१ ॥
द-काराक्षराचा ' उत्तरे ' न्यास । शुक्लवर्ण रुप सुरस ।
करावें तुम्हीं ऐसे न्यास । ब्रह्मपद पाविजे ॥ ४०२ ॥
' द ' काराक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ॥
ब्रह्मा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०३ ॥
या-कार ' मूर्धास्थानीं ' न्यास । सुवर्णरुप सुरस । 
विष्णुपदीं होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४०४ ॥  
या वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
विणु-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०५ ॥
त्--कार न्यास ' शिखास्थानीं ' । निरुपम वैष्णवभुवनीं ।
विष्णुरुप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥ ४०६ ॥
' त् ' कार वर्णाक्षरममत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
विष्णु-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०७ ॥
ऐसे चव्वीस अक्षरमंत्रासी । न्यास करावें विधीसीं ।
हस्त ठेवोनियां शिरसीं । आणिक न्यास करावें ॥ ४०८ ॥
शिरस्थानन्यासासी । म्हणावें अनुष्टुप्-छंदासी ।
ख्यात प्रजापति-ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥ ४०९ ॥
' प्राणायामे विनियोग: ' म्हणोनि । ' ओं आपो ' स्तन-स्थानीं ।
' ज्योति ' नेत्र स्पर्शोनि । ' रसो ' जिव्हा न्यासावें ॥ ४१० ॥
' अमृते ' ति ललाटेसी । मग स्पर्शोनि मूर्ध्नीसी । 
ब्रह्मभूर्भुवःस्वरोमे ' सीं । न्यास करावा विधिपूर्वक ॥ ४११ ॥
इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि । 
व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळां ॥ ४१२ ॥
' ॐ भूर्भुवःस्वः ' विन्यसोनि । गायत्री दशपादांनी । 
दशांगुलीं न्यासोनि । पादप्रमाण करावें ॥ ४१३ ॥
अंगुष्ठमूळ धरोनि । कनिष्ठिकाग्र स्पर्शोनि ।
उभय हस्त न्यासोनि । दशपाद न्यासावें ॥ ४१४ ॥
चव्वीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी । 
तर्जनीमूळारंभेसीं । कनिष्ठिकाग्रपर्यंत ॥ ४१५ ॥
द्वादशाक्षरीं एकैक हस्त । करावे न्यास सुनिश्र्चित । 
व्यापक न्यास उपरान्त । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४१६ ॥
ओं ' भूः ' हिरण्यगर्भात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः ।
ओं ' भुवः ' प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥ ४१७ ॥
ओं ' स्वः ' सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ओं ' महः ' ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः ।
ओं ' जनः ' विष्ण्वात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः । ॐ ' तपः '  रुद्रात्मने 
करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥ ४१८ ॥
ॐ ' सत्यं ' सर्वात्मने अस्त्रायफट् । ॐ ' तत्सवितुः ' -अंगुष्ठाभ्यां नमः ।
' वरेण्यं ' --तर्जनीभ्यां नमः ।
' भर्गो देवस्य ' --मध्यमाभ्यां नमः । ' धीमहि ' --अनामिकाभ्यां नमः  ॥ ४१९ ॥
' धियोयोनः ' --कनिष्ठिकाभ्यां नमः । ' प्रचोदयात् ' -करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।
एवं उभय हस्तांगुलिन्यासं कुर्यात् । अथ षडंगन्यासाः ॥ ४२० ॥
ओं ' भूः ' हिरण्यात्मने --हृदयाय नमः । ओं ' भुवः ' प्रजापत्यात्मने-शिरसे स्वाहा ।
ओं ' स्वः ' सूर्यात्मने शिखायै वषट् । ओं ' महः ' ब्रह्मात्मने-कवचाय हुं ॥ ४२१ ॥
ओं ' जनः ' विष्ण्वात्मने-नेत्रत्रयाय वौषट । ओं ' तपः ' रुद्रात्मने-अस्त्रायफट् । 
ओं ' सत्यं ' सर्वात्मने-दिग्बंधः । ' ॐ तत्सवितु ' र्हृदयाय नमः ॥ ४२२ ॥
ॐ ' वरेण्यं ' शिरसे स्वाहा ।  ॐ ' भर्गोदेवस्य ' शिखायै वषट् ।
ॐ ' धीमहि ' कवचाय हुम । ॐ ' धियो योनः ' नेत्रत्रयाय वौषट् ॥ ४२३ ॥
ऐसा षडंगन्यास करोनि । अंग न्यासावें दशस्थानीं । 
त्यांचीं नांवें सांगेन विधानीं । एकचित्तें अवधारा ॥ ४२४ ॥
पाद-जानु-कटिस्थानीं । नाभि-हृदय-कंठभुवनीं ।
तालु-नेत्र स्पर्शोनि । ललाट-शिर दशस्थानें  ॥ ४२५ ॥
गायत्रीमंत्र दहा पदांसी । दशस्थानें अंगन्यासासी ।
' तत् ' ' सवितु ' ' वरेण्ये ' सी । ' भर्गो ' ' देवस्य ' पंचमस्थान ॥ ४२६ ॥
' धीमहि ' म्हणिजे षष्ठस्थान । ' धियो ' सप्तमस्थान जाण ।
' यो ' कारो अष्टम धरिनि पूर्ण । अंगन्यास करावे ॥ ४२७ ॥
' न ' कार नवमस्थान । ' प्रचोदयात् ' दहावें जाण ।
अंगन्यास येणें गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥ ४२८ ॥
चतुर्विशति अक्षरांसी । करावें मग न्यासासी ।
पादांगुष्ठ धरुनि हर्षी । शिखापर्यंत न्यासावें ॥ ४२९ ॥
' तं ' अंगुष्ठाभ्यां नमः । ' त्सं ' गुल्फयोर्नमः ।
' विं ' जंघयोर्नमः । ' तुं ' जानुभ्यां नमः ॥ ४३० ॥
' वै ' ऊरुभ्यां नमः । ' रें ' गुह्याय नमः ।
' णिं ' वृषणाय नमः । ' यं ' कट्यै नमः ॥ ४३१ ॥
' भं ' नाभ्यै नमः । ' र्गों ' उदराय नमः ।
' दें ' स्तनाभ्यां नमः । ' वं ' हृदयाय नमः ॥ ४३२ ॥
' स्यं ' कंठाय नमः । ' धीं ' दंतेभ्यो नमः ।
' मं ' तालवे नमः । ' हिं ' नासिकायै नमः ॥ ४३३ ॥
' धिं ' नेत्राभ्यां नमः । ' यों ' भ्रुवोर्मध्याय नमः ।
' यों ' ललाटाय नमः । ' नः ' प्राङ्मुखाय नमः ॥ ४३४ ॥
' प्रं ' दक्षिणमुखाय नमः । ' चों ' पश्र्चिममुखाय नमः ।
' दं ' उत्तरमुखाय नमः । ' यां ' मूर्ध्ने नमः । ' तं ' शिखायै नमः  ॥ ४३५ ॥
ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ट धरोनि ।
कटीपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥ ४३६ ॥
त-- कारा अंगुष्टस्थान । त्स--कार गुल्फ असे स्थान ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणा । जंघा स्पर्शा वि--कार मंत्रें ॥ ४३७ ॥
तु--कार जानू, र्व--कार ऊरवे । रे--कारें गुह्य स्पर्शावें ।
णि--कार वृषणीं न्यासा बरवें । य--कार कटिस्थानीं देखा ॥ ४३८ ॥
शिखा धरोनि नाभीपर्यंत । करावे न्यास उतरत । 
सांगेन त्यांचे आदिअंत । एकचित्तें परियेसा ॥ ४३९ ॥
' तं ' नमः शिखा विन्यस्य । ' यां ' नमः मूर्ध्नि विन्यस्य ।
' दं ' नमः उत्तरमुखाय विन्यस्य । ' चों ' नमः पश्र्चिममुखाय ॥ ४४० ॥



Gurucharitra Adhyay 36 Part 4/5 
 श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग ४/५


Custom Search

No comments:

Post a Comment