Friday, December 4, 2015

Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ ) भाग २/२


Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 
Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 is in Marathi. Machchhindra proceeded for his visit to holy places. He visited all seven moksha puries namely Kashi, Avantika, Mathura, Mathura, Ayodhya, Gaya, Prayaga, Kashmiri. Then he entered into Bangal. He reached to the Chandragiri. He remembered that he had given Vibhuti-Bhasma to Saraswati in that village so that she would have a child. Pleas refer Adhyay 2. Reaching to called her and asked her to bring her son. But she old him that she had no son. She didnot believed the Mantra-vibhuti which she had thrown in cows mud. He asked her to show the place which she deed. Then Machchhindra called the son by the name Goraksha who replied from the mud and asked Machchhindra to help him come out. Machchhindra helped him and saw that a boy of 12 years with a very vibrant body. Then he asked Saraswati to leave the place to avoid him to curse her. Then Goraksha and Machchhindra proceeded for visiting Jagannath puri. In between they came to Kanakgiri a village. Machchhindra asked Goraksha to bring bhiksha. Which Goraksha did and asked Machchhindra to eat. One particular namely wada was liked by Machchindra very much. Hence Goraksha again went to the same house from where he was served the bhiksha. He particularly asked for wada for his guru. The lady unbelieving asked to give her his eye in return of wada. Gorksha immediately took out his eye and offered it to the lady for wada. The lady was very frighten by seeing the blood and the eye in the hand of Goraksha. She asked him to forgive her and brought wadas and asked Goraksha to took wadas and eye also with him. Goraksha brought the wadas but he was hiding his eyes as such Mchchhindra warned him that he will not eat wada unless Goraksha tells him what has happened to his eyes. Pleased by his devotion towards his guru. Machchhindra was very much pleased and he immediately placed Goraksha's eye by chanting SanjivaniMantra. Then he also teach him everything of Astra-vidya and also gave him Shabari Kavittva. Goraksha also became expert in all these vidyas within a month. Now what happened next will be told to us by Malu who is from Dhindi's son and from Narahari family, in the Adhyay 10.


श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ ) भाग २/२

ॐ इति एकाक्षर अक्षर । संबोधीत समग्र । 
नारायणी नामोच्चार । मंत्रविधीनें निरोपिला ॥ १०१ ॥
वरदहस्त ठेवूनि मौळीं । सकळ निवटिली अज्ञानकाजळी ।
वरदविभूती चर्चूनि भाळीं । मुख कुरवाळीं प्रेमानें ॥ १०२ ॥
मग हस्त धरोनि तत्त्वतां । म्हणे तान्हुल्या ऊठ आतां ।
महीचे गोचर करुनि तीर्था । हरिपरायणा सकामातें ॥ १०३ ॥
अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ । सलीन चरणीं माथा ठेवीत ।
श्रीमच्छिंद्राचा धरुनि हस्त । गमन करिता पैं झाला ॥ १०४ ॥
चंद्रागिरीस्थान सोडूनि । करिती जगन्नाथीं गमन ।
तों मार्गी जातां एक ग्राम । कनकगिरि लागला ॥ १०५ ॥
मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस । बोलतां झाला गोरक्षास । 
बा रे प्रारंभ क्षुधेस । जठरामाजी दाटला ॥ १०६ ॥
कक्षेमाजी घालूनि झोळी । बा रे संचरोनी वस्तिमेळीं ।
भिक्षा मागूनि ये वेळीं । क्षुधा माझी हरी कीं ॥ १०७ ॥
अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ । सत्वर झोळी कक्षे घेत । 
संचरोनि कनकग्रामांत । भिक्षा मागे घरोघरीं ॥ १०८ ॥
भिक्षा मागतां अति उद्देशीं । तंव तो गेला एका विप्रगृहासी ।
तेथें पाहतां ते दिवशीं । पितृश्राद्ध मिरवलें ॥ १०९ ॥
विप्र करुनियां भोजन । उपरी मागत्यासी देतसे अन्न ।
ते संधीसी गोरक्ष जाऊन । ' अलख ' आदेश जल्पतसे ॥ ११० ॥
तंव त्या घरची नितंबिनी । महाप्राज्ञिक सुस्वरुपिणी ।
क्षमाशांतीची लावण्यखाणी । सर्चगुणीं संपन्न ॥ १११ ॥
तिनें पाहतां गोरक्षनाथ । भाविती झाली चित्तांत । 
म्हणे धन्य हें बाळ अतित । चांगुलपणीं मिरवतसे ॥ ११२ ॥
प्रत्यक्ष मातें भासे कैसा । कीं बालार्कतनूचा ओतिला ठसा ।
कीं हरुनि चपळेचे (विद्युल्लता) मांदुसा (पेटी) । महीलागीं उतरला ॥ ११३ ॥
परी हा तापसी योगी वरिष्ठ । मातें भासतो योग हा श्रेष्ठ ।
पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट । जगामाजी मिरवतसे ॥ ११४ ॥
ऐसें जाणूनि लवडसवडी (सत्वर) । पात्रीं पदार्थ स्वकरें वाढी ।
अन्नसामग्री अति तांतडी । घेऊनि आली भिक्षेसी ॥ ११५ ॥
खाज्या करंज्या पदार्थ धिवर । पोळी भात शिरा कचोर ।
मालपुव्यादि सुकुमार । परम मृदू भक्ष्य तो ॥ ११६ ॥
चोटी मुगदळ बुंदी विशेष । पूर्ण पोळिया विस्तीर्ण पात्रास ।
घार्‍या पुर्‍या पंचमधुरस । श्रद्धा ठेविल्या ॥ ११७ ॥
वड्या पातवड्या शाखा बहुत । सौम्यमठ्ठकाचे द्रोण भरित ।
कोशिंबिरी  आंबेरायतें । बहु भात चटणिया ॥ ११८ ॥
कढी सांबारें वडे त्यांत । सार आमटी चणचणीत ।
नाना द्रोण भरुनि घृत । मेतकुटादि वाढिलें ॥ ११९ ॥
मध्यभागीं ठेवूनि भात । त्यावरी वरण कनकवर्णांत ।
तळीं वडे पोखरे दह्यांत । घालोनियां वाढिले ॥ १२० ॥
ऐसियापरी षड्रसान्न । घवघवीत पात्र वाढून ।
श्रीगोरक्षापुढे ठेवून । नमस्कारी प्रीतीनें ॥ १२१ ॥
गोरक्ष पाहतां पात्र सुरस । मनीं वाटला परम हर्ष ।
चित्तीं म्हणे त्या नितंबिनीस । धन्य धन्य माउले ॥ १२२ ॥
अहा आम्ही कोठील कोण । नोहे इष्ट सोयरे जन ।
आम्हासाठीं सिद्ध करुन । पात्र वाढून आणिलें ॥ १२३ ॥
पात्र पहा घवघवीत । हें पात्र नोहे यथार्थ । 
शिवलिंगी शोभला भात । पात्र शाळुंका मिरवली ॥ १२४ ॥
नाना पदार्थ अर्थप्रकरण । तें शिवासी अपार सुगम ।
कीं शिवलाखोली ढांसळून । शाळुंकाते मिरविली ॥ १२५ ॥
कीं प्रीतीं पाहतां तो भात । सकळ अन्नाचा प्रभु शोभत ।
पात्रमहीतें प्रीतीनें बहुत । नाना पदार्थ मिरवले ॥ १२६ ॥
तरी शाक नोहे पृतनामेळ । खाजे मंत्री दिसे सबळ ।
मौळीं छत्र तेजाळ । वरान्न हें मिरवले ॥ १२७ ॥
ऐसा भास भासूनि हृदयीं । पात्र कक्षझोळींत ठेवी ।
आशीर्वचनें तोषवूनि बाई । जाता झाला महाराज ॥ १२८ ॥
चित्तीं म्हणे उदरापुरतें । प्राप्त अन्न झालें मातें ।
आतां वेंचूनि स्वकष्टातें । केवीं हिंडावें घरोघरीं ॥ १२९ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । येऊनि वंदिलें श्रीगुरुमूर्ती ।
भिक्षाझोळी कक्षेंतूनि निगुती । काढुनि ठेवी पुढारां ॥ १३० ॥
तंव ती प्रत्यक्ष तपोमौळी । विकासूनि पाहे झोळी ।
तंव तें अन्न सुंदर परिमळीं । निजदृष्टीं देखिलें ॥ १३१ ॥
मग तें घेऊनि आपुलेपासीं । भोजन करी योगींद्र तापसी । 
अन्न स्वादिष्ट रसनेसी । लागता भक्षी आवडीनें ॥ १३२ ॥
मुखामाजी कवळ करितां । रसना न लावी दंतां । 
म्हणे हे तरकी (वाढ) होतील आतां । लवडसवडी लोटीतसे ॥ १३३ ॥
जठरभांडारीं भरुनि भरतें । आणीक इच्छे नाहीं पुरतें ।
परी सर्व पदार्थ कामनायुक्त । वडा प्रिय मिरवला  ॥ १३४ ॥
परी पदार्थ अपूर्वपणीं । कामना येथें राहिली मनीं ।
कीं वडा आणीक असतां भोजनीं । चांगुलपणा मिरवतो ॥ १३५ ॥
ऐसी चित्तीं कल्पना आणून । पाहता झाला गोरक्षवदन ।
तों सच्छिश्य ओळखून । बोलतां झाला गुरुसी ॥ १३६ ॥
म्हणे महाराजा तपोघना । कवण कामना आली मना ।
तो अर्थ उघड दावूनि वचना । आम्हां कार्या निरोपावें ॥ १३७ ॥
येरु म्हणे गोरक्षनंदना । कामना वेधली माझिया मना ।
आणिक वडा असता भोजना । तृप्त चित्तीं मिरवतों ॥ १३८ ॥
ऐसें ऐकोनि गुरुचें चोज । म्हणे गुरुराजा महाराज । 
आतांचि वडा आणूनि सहज । तुम्हांप्रती देईन मी ॥ १३९ ॥
ऐसें म्हणूनि तात्काळिक । उठता झाला तपोनायक ।
विप्रगृहीं येऊनि देख । मारी हांक गोरक्ष तो ॥ १४० ॥
म्हणे माय वो माय आतां । आणिक वडा दे तत्त्वतां ।
मम गुरुची कामना असे चित्ता । तृप्ती अस्तातें पावेना ॥ १४१ ॥
तंव ते बोले नितंबिनी । आलासी गुरुचें निमित्त करोनि ।
परी सकामसविता स्वेच्छापणीं । हृदयपात्रीं हेलावे ॥ १४२ ॥
मातें दावूनि गुरुभक्ती । कामने करुं पाहसी तृप्ती । 
तस्मात् सकळ अर्थ कळूं आला चित्तीं । मजलागीं जाण पां ॥ १४३ ॥
येरु म्हणे जननी ऐसें । कामनीं वेधलें नाहीं मानस ।
गुरुइच्छा कमउद्देश । पाहूं आलों तव ठाया ॥ १४४ ॥
तंव ती बोले विप्रनंदिनी । गुरुअर्थ कामना मनीं ।
वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी । वचन माझें ऐकावें ॥ १४५ ॥
अगा मम भक्तीचे प्रसंगेकरुन । तूतें दिधलें पहा वाढून ।
पुन्हां आलासी मागून । तरी तें नाहीं फुकाचें ॥ १४६ ॥
येरु म्हणे तरी त्यास । काय लागतें सांग आम्हांस ।
तेंचि देऊनि तूतें खास । वडे जाण इच्छितों ॥ १४७ ॥
येरी म्हणे गुरुभक्ती । मातें दावूं पावलासी शक्ती ।
परी वडे अन्नावरते पाहिजेती । डोळा काढूनि देई कां ॥ १४८ ॥
येरु म्हणे काय कठिण । चक्षुकामनीं वेधलें मन ।
तरी चक्षु आतां देईन जाण । उशीर नसे या कार्या ॥ १४९ ॥
ऐसें बोलूनि केलें कौतुका । तत्काळ अंगुळी अनामिका ।
चक्षुद्वारीं घालोनि देखा । बाहेर काढिलें बुबुळातें ॥ १५० ॥
बुबुळगोळ वामकरतटी । ठेवितां लोटला रुधिर पाटी ।
जैसा नगीं झरा लोटीं । अकस्माद उद्भवलासे ॥ १५१ ॥
कीं मांदारनदी स्वर्गीहुनी । उतरे मनकर्णिकेचे जीवनीं ।
तन्न्यायें चक्षुद्वाराहूनी । लोट लोटला रुधिराचा ॥ १५२ ॥
म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती । दाखवूं पातली गुरुभक्ती ।
विप्र कामना पात्र भरुनि । जीवनभागीरथी दाविली ॥ १५३ ॥
कां ते जाया हेलनभाव । ती सागराची मिरवली ठेव ।
तदर्थ जीवनभागिरथीराव । गोरक्षनगींची आणिली असे ॥ १५४ ॥
असों ऐसें तेणें रुधिरा । लोट लोटला महीवरा । 
तें पाहूनि चिंतातुरा । प्रेमें जाया मिरवली । १५५ ॥
रुधिर वाहतां भडभडाट । महीं लोटला रक्तपाट ।
खंडणा नोहे परम अचाट । भूषण मिरवी लोकांतें ॥ १५६ ॥ 
तरी तो पाहतां रुधिरपाट । नोहे धरादेवीचा शुद्ध मळवट ।
भाळीं चर्चूनि कुंकुमपाट । भूषण मिरवी लोकांतें ॥ १५७ ॥
ऐसी ती विप्रदारा पाहून । लज्जित झाली अरिष्टपण ।
परम चित्तीं खोच मानून । सदनामाजी परतली ॥ १५८ ॥
चित्तीं म्हणे हा अहाहा कैसे । बोलतां झालें विपर्यासें । 
धन्य हा एक शिष्य असे । जगामाजी मिरवला ॥ १५९ ॥
अहा कैसे केलें धैर्यपण । बोलतांचि काढिला जेणें नयन ।
परी ती व्यापूनि  भयसंपन्न । म्लानवदन मिरवली ॥ १६० ॥
मग वडे घेऊनि सातपांच । देऊं पातली लगबगें साच ।
पुढें ठेवूनि वदे वाचे । ऐक्यार्थे करी भावार्थ ॥ १६१ ॥
उपरी जोडूनि उभय पाणी । विनंती करी म्लानवदनीं । 
म्हणे महाराजा सहजवाणी । शब्द माझा उदेला ॥ १६२ ॥
 परी उदय होतां न लावितां वेळ । तुम्ही बाहेर काढिलें बुबुळ ।
परी मम अन्यायी शब्द केवळ । क्षमापात्रीं मिरवणें ॥ १६३ ॥
तुम्ही कृपाळू संपूर्ण । बैसतां अंगीं क्लेश धरुन ।
परी तितुकें दुःख पराकारण । देऊं ऐसें वाटेना ॥ १६४ ॥
कीं कमळ करी अस्तसमयीं । घ्यावया विद्रा इच्छा घेत हृदयीं ।
परी ते दुःखप्रवाही । कदाकाळी मिरवेना ॥ १६५ ॥
शेवटीं आपण पावोनि मरण । परातें कळिके सुख ओपून ।
राहे तन्न्यायें करुन । तुम्ही संत आहाती ॥ १६६ ॥
उपरी बोले गोरक्षनाथ । तूं किमर्थ झालीस भयभीत ।
वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ । चक्षु दिधला म्यां आपुला ॥ १६७ ॥
तरी तूं भयभीत न होई सकळ । स्वकरीं माझे विराजे बुबुळ ।
येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ । कृपा करीं मजवरी ॥ १६८ ॥
इतुकें देऊनि मातें दान । बुबुळासहित नेईजे अन्न ।
आपुलें कार्य संपादून । क्षमा वाढवीं आमुतें ॥ १६९ ॥
ऐसें ऐकूनि गोरक्षनाथ । म्हणे तूं न होई भयभीत ।
बुबुळासह वडे अन्नातें । घेऊनियां चालिलो ॥ १७० ॥
चक्षूसी आडवोनि पदर । जावोनि उभा राहिला गुरुसमोर । 
वाचे बोले नम्रोत्तर । इच्छा पूर्ण करा जी ॥ १७१ ॥
परी तो कनवाळु मच्छिंद्रनाथ । सच्छिष्याचें मुख पाहत ।
तंव वसनपदर चक्षूवरतें । घेऊनियां मिरवला ॥ १७२ ॥
तें पाहूनि चक्षुवसन । म्हणे चक्षू झांकिला केवीं वसनें ।
येरु म्हणे उगेच करुन । चक्षु वसनें धरियेला ॥ १७३ ॥
मनांत कल्पी गोरक्षनाथ । जरी मी यातें करीं श्रुत ।
तरीं धिक्कारुनि वडे अन्नासहित । दुःखप्रवाहीं मिरवेल ॥ १७४ ॥
जैसा श्रावणाचा अंतकाळ । ऐकतां न सेविती वृद्ध तेथें केवळ ।
तन्न्यायें येथे केवळ । दुःखसरिता लोटेल ॥ १७५ ॥   
म्हणूनि पुसतां गुरुंनीं वचन । बोले श्रीगुरुतें गौप्य धरुन ।
सहज स्थिती चक्षुवसन । धरिलें असें महाराजा ॥ १७६ ॥
येरु म्हणे बा मुखकमळा । प्रत्यक्ष पाहूं दे माझिया डोळां ।
येरु म्हणे गुरुस्नेहाळा । भोजन झालिया दाखवीन ॥ १७७ ॥
मी तों असतां सहजस्थिती । कीं परी उगलाच नयन केउतगती ।
ठणका उठला चक्षुप्रती । आला की काय कळेना ॥ १७८ ॥
तरी तें दावूनि चक्षुद्वार । परम दिसेल अपवित्र ।
किळस बाधील भोजनोत्तर । चक्षु पहावा महाराजा ॥ १७९ ॥
येरु म्हणे बा न घडे ऐसें । आधीं पाहुनि तव मुखास ।
नंतर सारुं भोजनास । दुःख तुझें हरोनियां ॥ १८० ॥
जरी तूं करिसी अनमान । तरी प्रत्यक्ष गोमांससमान ।
मानीन हें अन्न निश्र्चय जाण । चक्षु आधीं दावी कां ॥ १८१ ॥
ऐसें ऐकतां निर्वाणवचन । गोरक्ष बोले श्रीगुरु कारण ।
कीं मागूं गेलों वडेअन्न । कथा झाली ती ऐका ॥ १८२ ॥
जया घरी वडे अन्न । तेथिल सद्भक्ति आहे कामिन ।
तिनेचि प्रथम दिधलें अन्न । मागूनि गेलों दुसर्‍यानें ॥ १८३ ॥ 
तुमची इच्छा काम दावून । म्यां मागितलें वडेअन्न ।
तंव ती बोलली मजकारण । गुरुभक्त म्हणविसी ॥ १८४ ॥
तरी तूं काढूनि देई डोळा । मग वडे देईन बाळा ।
ऐसे बोलतां तर्जनी बुबुळा । खोवूनियां काढिलें ॥ १८५ ॥
तरी हा अन्याय घालूनि पोटीं । मातें करावी कृपादृष्टी ।
ऐसें ऐकतां तपोजेठी । परम चित्तीं तोषला ॥ १८६ ॥
मग चक्षुरद्वाराहूनि वसन । हस्तें काढी मच्छिंद्रनंदन ।
तों रुधिरप्रवाह अति दारुण । चक्षुद्वारा येतसे ॥ १८७ ॥
मग बोले मच्छिंद्रनाथ त्यातें । बुबुळ कोठें सांग मातें ।
येरु काढूनि स्वहस्ते । गुरुनाथा दर्शवी ॥ १८८ ॥
मग तो प्रतापी योगद्रुम । मंत्रसंजीवनी आराधोनि नेम ।
सवितातेज बुबुळधामी । मंत्रप्रयोगी स्थापिलें ॥ १८९ ॥
पूर्णमंत्राचा होता पाठ । बुबुळ संचरले चक्षुकपाट ।
मग पूर्वस्थितीहूनि अचाट । तेजालागीं मिरवलें ॥ १९० ॥
मग अंकी घेऊनि गोरक्षनाथ । स्वकरें मुख कुरवाळीत ।
म्हणे धन्य धन्य बा महींत । तूंचि एक सच्छिष्य ॥ १९१ ॥
मग त्यासी घेऊनि अंकावरी । सच्छिष्यासह भोजन करी ।
परी धैर्यशक्तीची अपार लहरी । मच्छिंद्रदेहीं मिरवतसे ॥ १९२ ॥
झालिया सांगोपांग भोजन । गोरक्षकासी बोले मच्छिंद्र जाण ।
बा रे तव भक्ति पाहून । परम चित्तीं संतोषलो ॥ १९३ ॥
तरी मजपासींचे विद्याधन । हृदयीं साठवीं ठेवून ।
मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देंणे । सकळ तूंते निरोपीन ॥ १९४ ॥   
कवित्वविद्या साबरी सबळ । तीही विद्या अर्पिली सकळ ।
एक मास करुनि वस्तीस्थळ । विद्येचा अभ्यास केला पैं ॥ १९५ ॥
असो आतां निरुपण । पुढले अध्यायीं धुंडीनंदन । 
मालू सांगेल श्रोत्याकारण । नरहरिप्रसादें करुनियां ॥ १९६ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । समंत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । नवाध्याय गोड हा ॥ १९७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीनवनाथभक्तिसार नवमाध्याय संपूर्ण ॥  
       

Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ )


Custom Search

No comments:

Post a Comment