Sunday, December 13, 2015

Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दहावा (१०) भाग १/२


Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 
Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 is in Marathi. Machchhindra was very much pleased by the devotion of Goraksha towards him. He not only placed eye of the Goraksha at the original place but also he started to impart all the knowledge of Fourteen vidyas, including astra (weapon) vidya, Sanjivani Mantra and all other Astra-Mantra vidya. This knowledge came to him from God Dattatraya. Then all the gods, astabhairav, navadurga, jaladevata, God Ram and God Shiva also came to bless Goraksha. However God Rama told Machchindra to ask Goraksha to complete his 12 years rigorous tapas so that all the knowledge given to him will be more useful. One day Goraksha was practising Sanjivani Mantra as was told to do so by his guru Machchhindra. Boys of his age were playing where Goraksha was chanting the Mantra. Boys requested him to prepare a man of grass to drive their chariot which also was made up of grass. Goraksha prepared a shape of man which actually got a lived as such Goraksha and boys were very frightened thinking that it may be a ghost. They ran away from that place. Machchhindra asked the boys what happened and why they are frightened and running. One boy told him everything. Then Machchhindra took him to the place where the boys feared there was a ghost. Machchhindra saw a small baby there which was crying. He took that baby in his lap and searched for Goraksha. Goraksha was very afraid thinking Machchhindra carrying a ghost. Machchhindra asked him not to afraid and asked him what had happened. Then Goraksha told him that he was chanting Sanjivani Mantra and preparing a man of grass as requested by boys. But that man turned up into a ghost. Machchhindra told him that due to the power of Mantra body of the grass became alive and Karabhajan Narayan has entered into it. Thus that little baby is real and now they have to take care of it. The villagers asked Machchhinda to hand over the baby to a couple who don't have a child. They also told him that that couple is very honest and good having a good conduct who will take proper care of the baby. Hence Machchhindra handed over the baby to Ganga and Madhu Vipra and asked them to name the baby as Gahini. Further he told them that after 12 years Goraksha will come here to offer Diksha and GuruMantra to Gahini. He assured the lady, Ganga that they will not take away Gahini with them even after Diksha. Then Machchhindra and Goraksha proceeded for the thirth yatra, visiting holy places. Reaching to Badrikedar where Goraksha was to a complete his tapas of 12 years, what happened there will be told to us in the next adhyay 11 by Dhundisut Malu who is from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दहावा (१०) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
वक्रतुंड गणाधिपती । विद्यार्णवा कळासंपत्ती ।
भक्तवरदा हरिसी आर्ती । मंगळमूर्ती गजानना ॥ १ ॥
जयजयाजी आदिनाथा । मायाचक्रचालका अनंता ।
सर्वाधीशा भगवंता । साक्षात् अक्षय मोक्ष तूं ॥ २ ॥
तरी मागिले अध्यायीं निरुपण । श्रीगोरक्षाचा पावोनि जन्म ।
उपरी सेवूनि कनकगिरी ग्राम । विद्यार्णवी तो केला ॥ ३ ॥
तरी ती विद्या कोण कैसी । सकळ कळा श्लोकराशी । 
भविष्योत्तरपुराणासी । निरोपितों श्रीश्रोतियां ॥ ४ ॥
श्र्लोक ।
ब्रह्मज्ञान रसावन कविता । वेद शास्त्र ज्योतिष तथा । व्याकरण धनुर्धर जलतरंगता । संगीत काव्य अकरावें ॥ ५ ॥
अश्वारोहण कोकशास्त्र । निपुण नाट्य तथा चार ।
चतुर्दश विद्यांचा सागर । पूर्णपणें भरलासे ॥ ६ ॥
टीका ।
प्रथम सांगून ब्रह्मज्ञान । स्वमुखीं केल्या परायण ।
विश्र्व आणि विश्वंभर दोन भावचि । ऐसा नुरविला ॥ ७ ॥
कीं बहुत जे अर्थप्रकार । जीवजंतु चराचर । 
तो ऐक्यमेळीं सकळ विस्तार । मीच ऐसें भाविलें ॥ ८ ॥
कर्माकर्म सत्कर्मराशी । त्या नुरल्याचि कोणीही बीजांकुराशीं ।
वासना देऊनि योगफांसीं । कामनेतें नुरविती ॥ ९ ॥
ऐशा एकमेळें करुन । गोरक्ष झाला सनातान ।
एवंच सकळ ब्रह्मज्ञान । उपदेशिलें गुरुनाथें ॥ १० ॥
मग पूर्णपणाचें पात्र होऊनी । वसुधेकल्प अव्यक्त भुवनीं ।
सर्व आत्मरुप माननी । तत्स्वरुपीं प्रगटेल ॥ ११ ॥
याउपरी वातपित्तकफहारक । रसायनविद्या सकळिक । 
किमया करणें धातु अनेक । हातवटी सांगितली ॥ १२ ॥
कवित्व रसाळ नवरस । गणादि निरोपी दीर्घ र्‍हस्व ।
व्यक्त अर्थलिंगप्रकरणास । व्यक्ताव्यक्त सांगितलें ॥ १३ ॥
याउपरी वेदाध्ययन । सूक्तऋचेंत केला प्रवीण ।
दीर्घर्‍हस्वें छंदे निपुण । स्वरित छंदी अवघे गुण पैं केला ॥ १४ ॥
ऋक् अथर्वण यजुर्वेद । सामवेदादि सांगूनिप्रसिद्ध ।
उपरि विद्या ज्योतिषसिद्ध । परिपूर्ण सांगितली ॥ १५ ॥
सारस्वत किरात कोश । कोमुदी रघु हरिवंश । 
पंच काव्यें मीमांसा । साही शास्त्रें निवेदिलीं ॥ १६ ॥
यावरी धनुर्धरविद्यानिपुण । सकळ शस्त्रीं केला प्रवीण ।
तीं सकळ अस्त्रें कोण कोण । नामें तयांचीं ऐकिजे ॥ १७ ॥
वातास्त्र आणि जलदास्त्र । उर्मी उभी कामास्त्र । 
वाताकर्षण बळ स्वतंत्र । पर्वतास्त्र सांगितलें ॥ १८ ॥
वज्रास्त्र वासवशक्ति । नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ।
ब्रह्मास्त्रादि निवारणशक्ती । रुद्रास्त्र सांगितलें ॥ १९ ॥
विरक्तास्त्र दानवास्त्र । पवनास्त्र आणि कालास्त्र ।
स्तवन महाकार्तिकास्त्र । स्पर्शविभक्तास्त्र निवेदिलें ॥ २० ॥
यावरी साबरीविद्या कवित्व । प्रत्यक्ष करुनि सकळ दैवत ।
तयांचा वरद पाणी निश्र्चित । गोरक्षमौळीं मिरवला ॥ २१ ॥
तीं दैवतें कोण कोण । बावन्न वीर असती जाण ।
नरक कालिका म्हमंदा उत्तम । महिषासुर आराधिला ॥ २२ ॥
झोटिंग वेताळ मारुती । अस्त्रवीर भद्रपती ।
मूर्तिमंत सीतापती । वरदमौळीं स्पर्शीतसे ॥ २३ ॥
परम आदरीं आलिंगून । श्रीराम घेत चुंबन । 
म्हणे होई सनातन । कीर्तिध्वज मिरविजे ॥ २४ ॥
यावरी प्रत्यक्ष गजवदन । तोहि उतरला सहस्त्रकिरण ।
गोरक्षाते अंकीं घेऊन । वरदमौळी स्पर्शीतसे ॥ २५ ॥
यावरी अष्टभैरव उग्र । तेही पातले तेथें समग्र ।
सिद्धभैरवादि काळभैरव सांग । बाळभैरवादि पातले ॥ २६ ॥
वीरभैरवादि गणभैरव । ईश्र्वरभैरव रुद्रभैरव ।
भस्मभैरवादि महादेव । अपर्णापति पातला ॥ २७ ।
तेणें घेऊनि अंकावरतें । मुख कुरवाळिलें वरदहस्तें ।
खेळता बाबर धांवोनि येती । तेही देती आशीर्ववन ॥ २८ ॥
मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी । कुंड रंडा भालंडा यक्षिणी ।
चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी । वर गोरक्षा देती त्या ॥ २९ ॥
यावरी प्रगटूनि जलदैवत । तेव्हा त्यातें वर ओपीत ।
कुमारी धनदा नंदा विख्यात । देखता त्या गोमट्या ॥ ३० ॥
लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला । नववी दैवत प्रत्यक्ष विमला ।
ऐशाजलदेवता येऊनि तत्काला । वर ओपिती बाळातें ॥ ३१ ॥
यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी । होऊनि वर ओपिती वरमादी ।
आणिमा गरिमा विशाळबुद्धी । महिमा प्रकामें पातली ॥ ३२ ॥
प्रथिमा प्राची वशित्वा सातवी । तेवीं ती सिद्धी महादेवी ।
सज्ज करुनि अस्त्रकार उभवी । अष्टसिद्धी तत्काळ त्या ॥ ३३ ॥
असो बावन्न वीरांसहित । श्रीराम सूर्य जाहला प्राप्त ।
सर्वत्र ओपूनि मौळी हस्त । विद्या करी ओपिती ॥ ३४ ॥
असो वर देऊनि सद्विद्येसी । सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी ।
म्हणती महाराजा गोरक्षासी । तपालागीं बैसवीं ॥ ३५ ॥
तपीं होतां अनुष्ठान । तेणें बळ चढे पूर्ण ।
मग ही विद्या तपोधन । लखलखीत मिरवेल ॥ ३६ ॥
जैसें खड्ग शिकले होतां । मग भय काय तें शत्रु जिंकितां ।
तेवीं तपोबळ आराधितां । सामर्थ्य सत्ता वाढेल ॥ ३७ ॥
ऐसें वदोनि सकळ देव । पाहते झाले आपुलाले गांव ।
रामसूर्यादि महादेव । बावन्न वीरादि पैं गेले ॥ ३८ ॥
यावरी इंद्र वरुण अश्विनी । गणगंधर्वादि पातले भुवनीं ।
वर देती तयालागुनी । सकळ गेले स्वस्थाना ॥ ३९ ॥
याउपरी कोणे एके दिवशीं । गोरक्ष घोकितां सद्विद्येसी ।
मंत्रसंजीवनी पाठ मुखासी । करीत बैसला होता तो ॥ ४० ॥
जवळी नसतां मच्छिंद्रनाथ । बैसला होता एकांतांत ।
तो गांवचीं मुलें खेळत खेळत । तया ठायीं पातलीं ॥ ४१ ॥
हातीं कवळूनि कर्दमगोळा । मुलें खेळती आपुलें मेळां ।
तों गोरक्षापासीं येऊनि आगळा । बोल बोलती सकळीक ॥ ४२ ॥
म्हणती गोरक्षा ऐक वचन । आम्हीं आणिला बहुत कर्दम ।
तरी शकट करुनि दे उत्तम । आम्हालागी खेळावया ॥ ४३ ॥
येरु म्हणे शकट मजसी । करुं येत नाहीं निश्र्चयेंसी । 
येत असेल तुम्हां कोणासी । तरी करुनि कां घ्या ना ॥ ४४ ॥
ऐसें ऐकतां मुलांनी वचन । करीं कर्दम कवळून ।
आपुलाले करे करुन । शकट रचिती चिखलाचा ॥ ४५ ॥
कर्दमचक्र काष्ठ व्यक्त । शकट केला यथास्थित ।
वरीं उदेलें कल्पनेंत । शकटा सारथी असावा ॥ ४६ ॥
म्हणूनि कर्दम घेऊनि गोळा । मुलें रचिती कर्दमपुतळा ।
परी तो साधेना मुलां सकळां । मग गोरक्षातें विनवीती ॥ ४७ ॥
म्हणती गोरक्षा आम्हांप्रती । साह्य देई शकटसारथी ।
आम्हां साधेना कर्दमनीती । तरी तूं करुनि देईं कां ॥ ४८ ॥
अगा तूं सकळ मुलांचे गणी । वयोवृद्ध अससी प्राज्ञी ।
तरी आम्हांसी सारथी करुनी । सत्वर देई खेळावया ॥ ४९ ॥
ऐसें ऐकतां मुलांचे वचन । म्हणे कर्दम आणूनि द्या देतों करुन ।
परी ही वासना भविष्यकारण । गोरक्षाते उदेली ॥ ५० ॥
जैसे ज्याचे पूर्वानुक्रम । तैसी बुद्धि येत घडून ।
जेवीं बीज पेरिल्या समान । तोचि तरु हेलावे ॥ ५१ ॥
पहा मातेच्या द्वेषउद्देशी । ध्रुव बैसला अढळपदासी ।
तेसेंचि वासनालेशीं । क्षीरोदधि उपमन्या ॥ ५२ ॥
कीं गांधारीचा होता अंत । म्हणूनि पार्था सुचला अर्थ । 
अकिंचन तो वायुसुत । ध्वजस्तंभी मिरवला ॥ ५३ ॥
कीं सीतासतीच्या उद्देशीं । लंकेसी राहिली येऊनि विवशी ।
तिनें भक्षुनि दशाननासी । राक्षसकुळ भक्षिलें ॥ ५४ ॥
पहा अनुसर्गकर्म कैसें । त्याचि राक्षसीं वंशलेशें ।
चिरंजीव होऊनि लंकाधीश । भोगभोगी बिभीषण ॥ ५५ ॥
तस्मात् बोलावयाचें  हेंचि कारण । बुद्धि संचरे पूर्वकर्माप्रमाण । 
पुढें उदयाते करभंजन । येणार होते महाराज ॥ ५६ ॥
नवनारायण करभंजन परम । उदय पावणार गहन नाम ।
म्हणूनि गोरक्षा इच्छाद्रुम । चित्तधरेतें उदेला ॥ ५७ ॥
मग हातीं घेऊनि कर्दमगोळा । रचिता झाला उत्तम पुतळा ।
परी रसने पाठ संजीवन आगळा । होत असे मंत्राचा ॥ ५८ ॥
त्यांत विष्णुवीर्य उपचार । पीषयूमांडणी जल्पत स्मर ।
एवंविधि संजीवनीमंत्र । पाठ होता गोरक्षा ॥ ५९ ॥
मुखीं पाठ हस्तें पुतळा । पूर्णपणीं होतां कर्दमगोळा ।
महाभागीं भाग सकळा । व्यक्त असे तत्त्वांचा ॥ ६० ॥
तेणेंकरुनि पंचभूत । दृश्यत्व पावले संजीवनीअर्थ ।
करभंजन ते संधींत । प्रेरक झाला जीवित्वा ॥ ६१ ॥
अस्थिमांस त्वचेसहित । अकार दृश्य झाला त्यांत । 
पुढें शब्द आननांत । अकस्मात उदेला ॥ ६२ ॥
उदय होता करी रुदन । तें पाहिलें सकळ बाळांनीं ।
म्हणती भूत आणिलें गोरक्षांनीं । पळा पळा येथूनियां ॥ ६३ ॥
ऐसें बोलतां एकमेकांत । सकळ होऊनि भयभीत ।
सांडूनि खेळ सकळ अर्थ । पळूनि गेलें वातगती ॥ ६४ ॥
हृदयीं दाटूनि भयकांपरा । मुलें कांपती थरथरां ।
आरडत वरडत मच्छिंद्र आधारा । पळोनियां पैं गेलीं ॥ ६५ ॥
ऐशापरी मुलें भयग्रस्त । तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ।
मग पाचारुनि सकळ मुलांतें । आश्वासूनि पुसतसे ॥ ६६ ॥
म्हणे बाळां होय थरथराट । का रे कांपतां सांगा वाट ।
येरी मुळाहूनि सकळ बोभाट । मच्छिंद्रातें निवेदिला ॥ ६७ ॥
म्हणे कर्दमाचा शकटसारथी । करवीत होतों गोरक्षाहातीं ।
तों बालतत्त्वपणीं भूतमती । कर्दम लोपूनि संचरली ॥ ६८ ॥
तें भूत अद्यापि आहे लहान । परी क्षणैक होईल स्थूळवटपण ।
आम्हांलागी करील भक्षण । म्हणूनियां पळालों ॥ ६९ ॥
परी आम्ही आलों येथें पळून । मागूनि गोरक्षनाथ येत होता धांवून ।
त्यासी भक्षिलें असेल भूतानें । यांत संशय नसेचि ॥ ७० ॥
मच्छिंद्र ऐसी ऐकूनि वार्ता । साशंकित झाला चित्ता ।
चित्तीं म्हणे मुलें वार्ता । सांगती काय तें नोहे ॥ ७१ ॥
अवचट भूत कैसें व्यापिलें । तें पाहूनि बाळ भ्यालें ।
तरी आतां जाऊनि वहिलें । गोचर करावे निजदृष्टीं ॥ ७२ ॥
मग आश्र्वासूनि सकळ मुलां । निकट बैसवूनि पुसे त्यालां ।
कोणत्या ठायीं संचार झाला । भूताचा तो मज सांगा ॥ ७३ ॥
येरी म्हणती बावा ऐक । भूत तेव्हां होतें बाळक । 
आतां थोर फोडोनि हांक । भक्षील आम्हां वाटतसे ॥ ७४ ॥
मच्छिंद्र म्हणे मी असतां । तुम्हां भय नसे सर्वथा ।
चला जाऊं भूतासीं आतां । शिक्षा करुं आगळी ॥ ७५ ॥
मुले म्हणती मच्छिंद्रनाथा । तुम्ही जाऊं नका तेथ ।
बालर्ककिरण आहे भूत । तुम्हां भक्षील तेचि घडी ॥ ७६ ॥
मच्छिंद्र म्हणे दुरुन । दाखवा भूताचा ठिकाण ।
मग तीं बाळें अवश्य म्हणोन । दुरुनी ठाव दाविती ॥ ७७ ॥
यापरी इकडे गोरक्षनाथ । तोही पळाला होऊनि भयग्रस्त ।
मुलाचें मंडळ सांडूनि एकांतीं । लपोनियां बैसला ॥ ७८ ॥
भूत भूत ऐसें म्हणून । मुलें पळालीं आरोळ्या देऊन । 
तेव्हांचि गेला होता पळून । भूतभयेंकरोनियां ॥ ७९ ॥
ठाव लक्षूनि परम एकांत । बैसला होता शुचिष्मंत ।
परी हृदय धडधडीत अत्यंत । भूत येईल म्हणोनियां ॥ ८० ॥
येरीकडे मच्छिंद्राते । ठाव दाविती मुलें समस्त । 
परी दूरचि असती यत्किंचित । सन्निध न येत भयानें ॥ ८१ ॥
जैसा राजभयाचा तरणी । लखलखीत मिरवत असतां अवनीं ।
मग दुष्कृत चोर जार जारणी । दर्शनार्थ ते न येती ॥ ८२ ॥ 
कीं रामनामबोधोत्तर । असतां भूत न ये समोर ।
कीं पीयूषीं विषदृष्टिव्यवहार । कादाकाळीं चालेना ॥ ८३ ॥
तन्न्यायें मुलें भिऊन । दुरुनि दाविती मच्छिंद्रा ठिकाण ।
म्हणती याचि ग्रामांतून । भूत प्रगट जाहलें ॥ ८४ ॥
मग त्या ग्रामांत मच्छिंद्रनाथ । मुलें दावितां सधट जात ।
तों बाळ टाहा आरडत । महीलागीं उकिरडा ॥ ८५ ॥
बालार्ककिरणी तेज लकाकत । मुखीं टाहा टाहा वदत ।
तें पाहूनि मच्छिंद्रनाथें । करभंजन ओळखिला ॥ ८६ ॥
हृदयीं धरुनि लवडसवडी । बाळ उचलोनि घेतला आवडीं ।
मग लगबगी गांवाबाहेर अतितांतडीं । बाळासह पावला ॥ ८७ ॥
तें सकळ मुलें पाहूनी । पळतीं झालीं प्राण घेऊनि । 
म्हणे नाथांनी भूत धरोनी । आणिलें आतां बरें नसे ॥ ८८ ॥
आतां त्या भूतासी देईल सोडून । मग तें आपल्या पाठीसी लागून ।
एकएकासी भक्षील धरुन । ऐसें म्हणून पळताती ॥ ८९ ॥
पळता पडती उठूनि जाती । भयेंकरुनि सांदींत दडती ।
हृदयीं धडधडा अर्थार्थ चित्तीं । लपोनियां बैसला ॥ ९० ॥
येरीकडे बाळ घेऊन । गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन ।
सदनीं सदनीं हांका मारुन । गोरक्षातें पुकारी ॥ ९१ ॥
परीं ज्या सदनी जाय जती । तें सदनींचीं मुलें आरडूनि उठती ।
आई आई बया बया म्हणती । आणिक पळती पुढारां ॥ ९२ ॥
परी सदनींसदनींचे जन । नाथा पुसती हाटकून ।
भय काय दाविलें मुलांकारण । म्हणूनि आरडूनि पळताती ॥ ९३ ॥
कोणाचें मूल घेवोनि । फिरतां तुम्ही सदनी सदनी ।
येरी म्हणे गोरक्ष नयनी । पाहेन तेव्हां सांगेन ॥ ९४ ॥
ऐसें बोलूनि पुढें जात । तों पातला गोरक्ष होता जेथ । 
उभा राहोनि अंगणांत । गोरक्षातें पाचारी ॥ ९५ ॥
ऐकूनि श्रीगुरुची वाणी । गोरक्ष निघाला सदनांतुनी ।
परी येतांचि बाळ पाहिला नयनी । पुन्हां आरडूनि पळे तो ॥ ९६ ॥
हा विपर्यास पाहुनि नयनीं । मच्छिंद्र विचारी आपुले मनीं ।
गोरक्ष व्यापला भयेकरुनी । बाळ येथें ठेवावें ॥ ९७ ॥
मग स्वशिरींचें काढूनि वसन । त्यावरी निजविलें बाळरत्न ।
मग त्या सदनीं संचरुन । गोरक्षापासीं पातला ॥ ९८ ॥
जातां कवळूनि धरिलें हृदयीं । म्हणे वाहसी व्यर्थ भयप्रवाहीं ।
तें भूत नाहीं मनुष्यदेहीं । करभंजन उदेला ॥ ९९ ॥
परी तयाची उदयराहाटी । सांग जाहली निर्भय पोटीं ।

येरी म्हणे मुलांसाठीं । खेळत होतो महाराजा ॥ १०० ॥
Shri NavanathBhaktiSar Adhyay 10  
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दहावा (१०) 


Custom Search

No comments:

Post a Comment