Sunday, December 13, 2015

Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 Part 2/2


Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 
Shri NavanathBhaktiSar Adhyay 10 is in Marathi. Machchhindra was very much pleased by the devotion of Goraksha towards him. He not only placed eye of the Goraksha at the original place but also he started to impart all the knowledge of Fourteen vidyas, including astra (weapon) vidya, Sanjivani Mantra and all other Astra-Mantra vidya. This knowledge came to him from God Dattatraya. Then all the gods, astabhairav, navadurga, jaladevata, God Ram and God Shiva also came to bless Goraksha. However God Rama told Machchindra to ask Goraksha to complete his 12 years rigorous tapas so that all the knowledge given to him will be more useful. One day Goraksha was practising Sanjivani Mantra as was told to do so by his guru Machchhindra. Boys of his age were playing where Goraksha was chanting the Mantra. Boys requested him to prepare a man of grass to drive their chariot which also was made up of grass. Goraksha prepared a shape of man which actually got a lived as such Goraksha and boys were very frightened thinking that it may be a ghost. They ran away from that place. Machchhindra asked the boys what happened and why they are frightened and running. One boy told him everything. Then Machchhindra took him to the place where the boys feared there was a ghost. Machchhindra saw a small baby there which was crying. He took that baby in his lap and searched for Goraksha. Goraksha was very afraid thinking Machchhindra carrying a ghost. Machchhindra asked him not to afraid and asked him what had happened. Then Goraksha told him that he was chanting Sanjivani Mantra and preparing a man of grass as requested by boys. But that man turned up into a ghost. Machchhindra told him that due to the power of Mantra body of the grass became alive and Karabhajan Narayan has entered into it. Thus that little baby is real and now they have to take care of it. The villagers asked Machchhinda to hand over the baby to a couple who don't have a child. They also told him that that couple is very honest and good having a good conduct who will take proper care of the baby. Hence Machchhindra handed over the baby to Ganga and Madhu Vipra and asked them to name the baby as Gahini. Further he told them that after 12 years Goraksha will come here to offer Diksha and GuruMantra to Gahini. He assured the lady, Ganga that they will not take away Gahini with them even after Diksha. Then Machchhindra and Goraksha proceeded for the thirth yatra, visiting holy places. Reaching to Badrikedar where Goraksha was to a complete his tapas of 12 years, what happened there will be told to us in the next adhyay 11 by Dhundisut Malu who is from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दहावा (१०) भाग २/२ 
हाति घेऊनि कर्दमगोळा । पूर्णपणीं रचिला पुतळा ।
परी नेणों कैशी झाली कळा । भूत त्यांत संचरले ॥ १०१ ॥
लोपूनि सकळ कर्दमनीती । दिसूं आली मानवाकृती ।
तेणें भय व्यापूनि चित्तीं । पळालों मी मुलांसह ॥ १०२ ॥
यावरी मच्छिंद्र बोले वाणी । तूतें सांगितली संजीवनी ।
तो मंत्र घोकितां क्षणीं । करीत होतासी काय तूं ॥ १०३ ॥
येरी म्हणे आज्ञा तुमची । भंगिली नाहीं शपथ पायांची ।
खेळतां वाणी मंत्राची । सांडिली नाही महाराजा ॥ १०४ ॥
कर्दमपुतळा करितां हातीं । परी मंत्र सांडिला नाहीं उक्तीं ।
चुकलों नाहीं शिक्षेहाती । ओपू नका गुरुनाथा ॥ १०५ ॥
ऐसी ऐकतां गोरक्षवाणी । मच्छिंद्र तोषला आपुले मनीं ।
म्हणे बा बरी केली करणी । ऊठ आतां वेगेसी ॥ १०६ ॥
मुख कवळूनि चुंबन घेत । हास्य मानूनि कुरवाळीत ।
म्हणे होई आतां स्वस्थ । चाल वेगीं पाडसा ॥ १०७ ॥
येरी म्हणे गुरुनाथा । तुम्ही आणिलें आहे भूता । 
तें मज खाईल प्रांजळ आतां । बाहेर नेऊं नका जी ॥ १०८ ॥
मच्छिंद्र म्हणे ऐक मात । हें बाळ नसे रे भूत ।
तुवा घोकोनि संजीवनीत । मनुष्यपुतळा तो झाला ॥ १०९ ॥
जैसा गौरउकिरडां स्थान । बाळ झालासी उत्पन्न ।
त्याच नीतीं खेळतां कर्दम । बाळ उदयातें आलें हो ॥ ११० ॥
ऐसी ऐकतां गुरुगोष्टी । म्हणे भूत नोहे तपोजेठी ।
मच्छिंद्र म्हणे भय पोटीं । सांडी मनुष्य तें असे ॥ १११ ॥
ऐसें ऐकूनि प्रांजळ मत । मग श्रीगुरुचा धरुनि हात ।
बाळ होतें चीरपदरांत । तयापासी पातले ॥ ११२ ॥
बाळ उचलोनि मच्छिंद्रनाथ । आपुल्या शिबिरा घेऊनियां जात ।
गोदुग्ध आणूनि पान त्वरित । ते बाळका पैं केलें ॥ ११३ ॥
यावरी वसनझोळीं करुन । आंत घातला गहिनीनंदन । यावरी तया गावींचे जन । शिबिरापाशीं पातले ॥ ११४ ॥
नाथचरणीं अर्पूनी माथा । पुसती हे नाथ समर्था । 
बाळ कोणाचें हालवितां । श्रवण करु इच्छितो ॥ ११५ ॥
मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ । तयां ग्रामस्थां निवेदित ।
तो ऐकूनि सकळ वृत्तांत । आश्र्चर्य करिती क्षणोक्षणीं ॥ ११६ ॥
म्हणे धन्य धन्य संजीवनी । हा कलींत उदेला उशनामुनी ।
परी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणीं । नाथ मच्छिंद्र वाटतो ॥ ११७ ॥
पहा पहा हा गुरुदैत्य । शवशरीरा सावध करीत ।
परी त्या म्हणाया जडदेहस्थ । जीवदशा व्यापीतसे ॥ ११८ ॥
तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ । कर्दमपुतळा केला जिवंत ।
तस्मात् शुक्र तो त्या तुलनेंत । सहस्त्रभागी दिसेना ॥ ११९ ॥
तरी उशना  न म्हणूं संमती । द्वितीय ब्रह्मा पातला क्षितीं ।
तीही संमत गौण चित्तीं । मच्छिंद्रभाग्य दिसतसे ॥ १२० ॥
पहा पहा  विधिराज । उत्पन्न करी जगा सहज ।
तरी मूळ त्यांत असे बीज । बीजासमान रुख होय ॥ १२१ ॥
यावरी आणिक दुसरा अर्थ । विधी स्वअंगें उत्पत्ति करीत ।
तैसा नोहे मच्छिंद्रनाथ । शिष्याहाती करविला ॥ १२२ ॥
महाबीजावीण जाण । कर्दमी केला मनुष्य उत्पन्न ।
तस्मात् धन्य विधीहून । मच्छिंद्रनाथ मिरविला ॥ १२३ ॥
ऐसें परस्परें भाषण । करिती गांवींचे सकळ जन ।
यावरी बोलती नाथाकारण । नाथानिकट बैसूनियां ॥ १२४ ॥ 
म्हणती महाराजा प्रतापतरणी । बाळाचे कष्ट करुं जाणे जननी ।
ती तो बाळका न दिसे करणी । गैबीनंदन हा असे ॥ १२५ ॥
पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट । पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ ।
तरी यासी धर्मजननी वरिष्ठ । करुनि द्यावी महाराजा ॥ १२६ ॥ 
तीतें बाळक करीं अर्पण । करील तयाचें संगोपन ।
तुम्हांलागीं कष्ट दारुण । होणार नाहीत महाराजा ॥ १२७ ॥
ऐशी ऐकतां जगाची वाणी । मान तुकावी मच्छिंद्रमुनि । 
म्हणे बा ते धर्मजननी । कोणती करावी महाराजा ॥ १२८ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । विचार करिताती ग्रामस्थ ।
तों ग्रामामाजी विप्रगृहांत मधुनामा नांदतसे ॥ १२९ ॥
तयाची कांता लावण्यखाणी । पतिव्रता धर्मपत्नी । 
सत्य संचित सर्वज्ञानी । ज्ञानकळा पै असे ॥ १३० ॥
नामें कौतुका असे गंगा । निर्मळपणीं असे अभंगा ।
पतिसेवे अंतरंगा । जगामाजी मिरवली ॥ १३१ ॥
उदरीं नाहीं संतति । तेणें विव्हळ प्रेम चित्तीं ।
संततीवीण कामगती । संसार ते वेदना ॥ १३२ ॥
सदा वाटे हुरहुर । लोकांचे पाहूनि किशोर । 
चिंत्ती पाहूनि चित्ती गहिर । साशंकित होताती ॥ १३३ ॥ 
नाना यत्न संततीसाठीं । करुनि बैसले होते जेठी ।   
उपाय न चाले परम कष्टी । जगामाजी मिरविला ॥ १३४ ॥
ऐसे असतां उभय जन । तो दैवें उदेला मांदुसाकारण ।
ग्रामस्थांकरीं तयाचें स्मरण । अकस्मात पैं झाले ॥ १३५ ॥
जैसा द्रोणाचा विषमकाळ । निवटावया उदेला उत्तम वेळ ।
सहजखेळीं गांधारी बाळ । विटी कूपांत पडियेली ॥ १३६ ॥
कीं रत्नांची होणे उत्पत्ती । म्हणोनि देवदानवमती ।
अब्धिमंथनी उदेली चित्तीं । एकभावेंकरुनियां ॥ १३७ ॥
तन्न्यायें मधुविप्राचें । दैव उदेलें जगमुखें साचें ।
म्हणूनि स्मरण निघालें त्यांचे । मान्य पडलें सर्वांसी ॥ १३८ ॥
मग मच्छिंद्रनाथा विनवणी करुन । म्हणती महाराजा मधुब्राह्मण ।
तयाची कांता परम सगुण । ज्ञानकळा असे कीं ॥ १३९ ॥
तो वोपूनि बाळ गोमट । तेथेचि होईल पूर्ण शेवट ।
पुत्रार्थिया परम अनिष्ट । दिवस असती महाराजा ॥ १४० ॥
ऐसी ऐकूनि मच्छिंद्रवाणी । पुत्राच्या राहे संरक्षणी ।
मग त्या विप्रा बोलावूनि । कांतेसहित आणिलें ॥१४१ ॥
परी ते भार्या लावण्यराशी । सद्गुणवर्या जगासी ।
नाथ पाहतांच ते चित्तासी । ओळखिलें हृदयांत ॥ १४२ ॥
मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ । उत्तम जागीं दिसून येत ।
सकळ जग मान देत । तस्मात् श्रेष्ठ आतां हे ॥ १४३ ॥
जो जगामाजी आहे भला । तो तैसाचि परलोकां ठेला ।
जो जगीं जाय मानवला । परलोकीं मानवला तोचि एक ॥ १४४ ॥
आणिक भविष्य अवश्य जाण । अर्थाअर्थी करी गमन ।
मग कौतुकानें जवळ घेऊन । बाळ ओटी ओपीतसे ॥ १४५ ॥
म्हणे माय वो माय ऐक । हा बाळ आहे वरदायक । नवनारायणांतील एक । करभंजन मिरवला ॥ १४६ ॥
याचें होता संगोपन । फेडील दृष्टीचें पारण ।
जगामाजी स्थूलवट मान । पुत्र तुझा मिरवेल हा ॥ १४७ ॥
म्हणसील हा होईल कैसा । तरी कीर्तिध्वज मित्र जैसा ।
कीं देवकीचा हरि जैसा । वंद्य असे जगातें ॥ १४८ ॥
माय मी काय सांगू गहन । या बाळाचे चांगुलपण । 
मूर्तिमंत याचे सेवेकारण । कैलासपती उतरेल गे ॥ १४९ ॥
तयाची निवटूनी अज्ञानराशी । हा अनुग्रह होईल तयासी ।
आणूनि ठेवील निवृत्तिपदासीं । निवृत्तिनामें मिरवुनी ॥ १५० ॥
म्हणे हा अयोनि संभवला । जगामाजी सहज गे मिरवला ।
परी अति गहनीं नाम याला । गहनी ऐसें देई कां ॥ १५१ ॥
यावरी आणिक सांगतो तुजसी । आम्ही जातों तीर्थस्नानासी ।
उपरी फिरुनि द्वादशवर्षी । गोरक्षबाळ येईल गे ॥ १५२ ॥
तो यातें अनुग्रह देऊन । माय गे करील सनातन । 
परी तूं आता जीवित्व लावून । संगोपन करी याचें ॥ १५३ ॥
यावरी बोले कौतुकें सती । कीं महाराजा योगमूर्ती ।
बाळ ओपिलें माझे हातीं । परी संशय एक असे ॥ १५४ ॥
तुम्ही द्वादश वरुषां आला परतोन । बाळ न्याल कीं मजपासून ।
मग कैसें जननीपण । जगामाजी मिरवावे ॥ १५५ ॥
मग केल्या कष्टाचें आचरण । मज मिरवेल कीं भाडायितपण ।
तरी प्रांजलपणीं आतांचि वचन । मजप्रती सांगिजे ॥ १५६ ॥
पहा पहा जी आशाबद्ध । सकळ जग असे प्रसिद्ध ।
तरी इच्छा प्रांजळ शुद्धबुद्ध । एकभागीं लावा जी ॥ १५७ ॥
तुम्हां आशा असेल याची । तरी तैशीच गोष्टी सांगायाची ।
मग नाथ गोष्टी ऐकूनि तिची । प्रांजळ वचन बोलतसे ॥ १५८ ॥
माये संशय सांडूनि मनीं । बाळ न्यावें आपुलें सदनी ।
माझी आशा बाळालागुनी । गुंतत नाहीं जननीये ॥ १५९ ॥
तरी तुज तुझा लाभो सुत । प्रांजळपणीं मिरवी जगांत ।
तूं माय हा सुत । लोकांमाजी बोलतील ॥ १६० ॥
मी आणि माझा शिष्य । गुंतणार नाहीं या आशेस ।
हा बाळ तुमचा तुम्हांस । लखलखीत बोलतों ॥ १६१ ॥
परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी । पुढें जाईल तीर्थस्नानांसी ।
तूं सांभाळ तुजपाशी । चिरंजीव असो हा ॥ १६२ ॥
ऐसें बोलूनि ग्रामस्थांतें । शपथपूर्वक साक्षसहित ।
निर्मळपणीं करुनि चित्त । कौतुकसदनीं बोलवी ॥ १६३ ॥
मंत्रे चर्चूनि विभूति माळा । मोहनास्त्र घातलें गळां ।
कौतुकें स्पर्शीत हृदयकमळा । पयोधरीं पय दाटतसे ॥ १६४ ॥
मग तें बाळ लावोनि स्तनीं । गांवींच्या आणूनि सुवासिनी ।
पालखांत घातलें प्रेमेंकरुनी । गहनी नाम स्थापिले ॥ १६५ ॥
यावरी मच्छिंद्र कांही दिवस । तया ग्रामीं करुनि वास ।
मग सवें घेऊनि गोरक्षास । तीर्थस्नाना चालिला ॥ १६६ ॥
पुसूनि सकळ ग्रामस्थांसी । निघता झाला गौरवेसीं ।
मार्ग लक्षूनि तीर्थस्नानासी । बद्रिकाश्रमीं जातसे ॥ १६७ ॥
परी मार्गी चालतां वाटीवाट । श्रीगोरक्षाच घेऊनि पाठ ।
कार्यरुपी कार्य घेऊनि अलोट । परीक्षेतें पाहतसें ॥ १६८ ॥
नंतरी ते पाहतां परी विषम अशी । विषम दिसती सर्व कार्यासी ।
मग मच्छिंद्र विचार करी मानसी । तप पूर्ण नसे या ॥ १६९ ॥
मुळींच पदरी पैसा नसतां । कीम दान मिरवी दांभिका व्ययसा ।
तेवीं मंत्रहेतु  तपोलेशा । विना विषम आहे हा ॥ १७० ॥
तरी आतां बदरिकाश्रमीं । बद्रीकेदार उभा स्वामी । 
तया हाती गोरक्ष ओपूनी । तयालागीं रुझवावा ॥ १७१ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । उभयतां हिंडले नाना तीर्थी ।
मग लक्षूनि हिमाचलमार्गाप्रती । बद्रिकाश्रमाप्रती पैं गेले ॥ १७२ ॥
गेले परी तेथिल कथन । पुढिलें अध्यायीं होईल श्रवण ।
अर्थ धरुनि अपूर्ण । स्वीकार करावा श्रोत्यांनीं ॥ १७३ ॥
तुम्ही विचक्षण श्रोते संत । सदा तुमचा धुंडीसुत ।
सेवेलागीं अर्थी प्राणांत । ग्रंथ आदरी मिरवितसे ॥ १७४ ॥
तुमचे कृपेचें लेवूनि भूषण । नरहरिवंश पूर्ण ।
कवि मालू धुंडीनंदन । संतगणीं मिरवला ॥ १७५ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । दशमाध्याय गोड हा ॥ १७६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीनवनाथभक्तिसार दशमाध्याय संपूर्ण ॥



Shri NavanathBhaktiSar Adhyay 10
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दहावा


Custom Search

No comments:

Post a Comment