Shri NavanathBhaktiSar Adhyay 11
Machchhindra and Gorksha came to a holy temple of God Shiva at Badrikedar. They bowed to God Shiva and praised him with devotion. God Shiva asked Machchhindra what is his desire. Then Machchhidra told him that He had brought Goraksha with him and Goraksha has to perform a rigorous 12 years tapas at Badrikedar. God Shiva told him that he knows everything at assured him that he himself will take care of Goraksha. So Machchhindra proceeded on his ThirthYatra after guiding Goraksha about his tapas. Machchhindra visited many holy places and at Setubandha he met with God Hanuman who was waiting for Machchhindra. Then he took him to women kingdom where Mainakini was lady queen of that kingdom. Hanuman told her as agreed by him that he will bring Machchhindra to her who can fulfil her desire and live with her. After some years Machchindra and Mainakaini were pleased by the birth of there son who was named as Meenanath. The second story in this adhyay is of a king Bruhadrava who was from Janmejay Vansha and performed a Somayaga for about a year. God Agni gave him blessings in the form of a son. This son was named as Jalindar and taken care off by king Bruhadrava and his wife Sulochana. As Jalindar grown up the king and queen were thinking of his marriage. Jalindar was not ready for marriage. He ran away in a forest where he mate his father-mother AgniNarayan. Now in the next 12th adhyay Dhunadi sut Malu who is from Narahari family, will tell us what next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अकरावा ( ११ ) भाग २/२
त्यातें भरतां द्वादश दिवस । उत्तमापरी केलें बारसें ।
नाम ठेविलें त्या देहास । मीननाथ म्हणवूनी ॥ १०१ ॥
याउपरी याचकां देऊनि दान । उचितार्थे सकळ तोषविले जन ।
नानारत्नीं देऊनि भूषण । गौरवातें मिरविलें ॥ १०२ ॥
असो ऐसे संगोपनीं । तीन संवत्सर तया स्थानी ।
लोटूनि गेली सुखासनी मच्छिंद्रातें भोगितां ॥ १०३ ॥
यावरी आतां दुसरे कथन । हस्तिनापुरीं कुरुनंदन ।
जनमेजयाच्या वंशाकारण । बृहद्रवा जन्मला ॥ १०४ ॥
तो जन्मेजयापासूनि पुढती । सातवा पुरुष वंशाप्रती ।
दोन सहस्त्र सातशतीं । कली गेलासे लोटूनी ॥ १०५ ॥
तो बृहद्रवा राजा थोर । राज्यपदी हस्तिनापूर ।
मेळवूनि महीचे अपार विप्र । सोमयाग मांडिला ॥ १०६ ॥
एक वरुषें त्या क्षितीं । अग्निकुंडी पूर्णाहुती ।
पुष्ट होऊनि दाहकमूर्ती । तुष्ट शरीरी मिरवला ॥ १०७ ॥
परी शिवनेत्रींचा प्रळयाग्नी । तेणें दाहिले होते पंचवाणी (मदन) ।
परी तो गेला भक्षुनि । द्विमूर्धनी महाराज ॥ १०८ ॥
तो शिवशरीरीं चेतला मदन । जठरीं वाहत होता द्विमूर्धन ।
तयामाजी जीवित्वप्राण । अंतरिक्ष संचरला ॥ १०९ ॥
तो अंतरिक्ष महाराज । अग्नि जठरामाजी विराजे ।
तो गर्भ अति तेजःपुंज । यज्ञकुंडीं सांडिला ॥ ११० ॥
पूर्ण होतांचि यज्ञआहुती । शेष प्रसाद मिरवूनी निगुती ।
मग यज्ञकुंडीं विप्राहुती । रक्षा काढी बृहद्रवा ॥ १११ ॥
विप्राहातें सलील बाळतेजातें । रक्षा स्पर्शतां लागे हातें ।
दृष्टी पाहतां बाळातें । मंजुळवत रुदन करी ॥ ११२ ॥
तंव तो पुरोहित ज्ञानी द्विज । रायासी म्हणे महाराज ।
यज्ञकुंडीं तेजःपुंज । बाळ प्रसाद मिरविलें ॥ ११३ ॥
प्रत्योदक उचलोनि हाती । बाळ दावी रायाप्रती ।
राव पाहोनि तेजस्थिती । परम चित्तीं तोषला ॥ ११४ ॥
जैसा जलार्णव मंथन करितां । त्यांत चतुर्दश रत्नें निघतां ।
मग आनंद न माये सुरवरचित्ता । तैसें झालें बृहद्रव्या ॥ ११५ ॥
कीं संजीवनींचा धरुनि अर्थ । कच गेला शुक्रगृहातें ।
साधूनि येतां संजीवनीतें । शचीनाथ आनंदला ॥ ११६ ॥
कीं राम उपजतां कौसल्ये कुशीं । आनंद झाला दशरथासी ।
तेवीं पाहतां बाळमुखासी । बृहद्रवा आनंदला ॥ ११७ ॥
मग पुरोहित विप्रपासून । निजकरीं कवळी अग्निनंदन ।
परम स्नेहें हृदयीं धरुन । घेत चुंबन बाळाचे ॥ ११८ ॥
परम उदेला आनंद पोटीं । कीं चंद्रोदयींची ऐक्यभेटी ।
मग समुद्रपात्रा तोयदाटी । प्रेमलहरी उचंबळे ॥ ११९ ॥
वारंवार घेत चुंबन । कीं त्यातें भासे प्रत्यक्ष मदन ।
परी तो मदनचि व्यक्त पूर्ण । शिवकायेचा प्रगटला ॥ १२० ॥
कीं सत्वगुणी विद्युल्लता । पाळा मांडिला शरीरावरुता ।
कीं पुनर्विधु प्रसन्न होतां । तेज आपुलें अर्पिलें ॥ १२१ ॥
कीं संघांत अपार किरणीं । महीं मिरवला हा उत्तम तरणी ।
असो ऐसा अपार चिन्ही । वर्णिता ग्रंथ वाढेल ॥ १२२ ॥
असो बृहद्रवा लवडसवडीं । अंतःपुरांत जात तांतडी ।
धर्मपत्नी संसारसांगडी । निजदृष्टीं विलोकी ॥ १२३ ॥
नाम तिचें सुलोचना । होय ती प्रत्यक्ष सुलोचना ।
शुभानना ती देवांगना । महीलागीं उतरली ॥ १२४ ॥
कीं प्रत्यक्ष रमा सरस्वती । कीं दिव्य अपर्णेची मूर्ती ।
उदया आली मायभगवती । कुरुकुळातें तारावया ॥ १२५ ॥
जिचे पाहतां चरण । गंगोदक दिसे मळिण ।
शंतनूसारखें टाकूनि रत्न । शिवमौळी विराजली ॥ १२६ ॥
तस्मात् गंगासमान हातीं । देतां अपूर्व लागे गोष्टी ।
असो तिनें बाळक देखतां दृष्टी । पुसे रायातें आवडीनें ॥ १२७ ॥
म्हणे महाराजा विजयध्वजा । करीं कवळिलें कवण आत्मजा । मातें भासें मित्रवोजा । दुसरा तरणी आहे हा ॥ १२८ ॥
येरु म्हणे वो शुभाननी । यज्ञकुंडाद्विमूर्धनी ।
प्रसादरुपें दिधलें तेणें । राजस्तंभीं मिरवावया ॥ १२९ ॥
तव उदरी जो मीनकेत । मनानें वरीं आपुला सुत ।
तयावरील सकळ हेत । या बाळातें मिरवाया ॥ १३० ॥
तरी वशासी मीनकेत । दिव्यस्वरुपा आहे सुत ।
तयाचा पाठीराखा निश्र्चित । ईश्र्वरें हा प्रेरिला ॥ १३१ ॥
अगे हा अयोनिसंभव जाण । अवतारदक्ष चिद्रत्न ।
ज्वाळाभाळी होऊनि प्रसन्न । प्रसाद दिधला आपणांसी ॥ १३२ ॥
ऐसें वदतां राजभूप । सुलोचना कवळी बाळकंदर्प ।
तयाचे पाहूनि दिव्यरुप । मोहदीप उजळला ॥ १३३ ॥
बाळ हृदयीं कवळूनि धरितां । पयोधरी लोटली पयसरिता ।
बाळमुखी स्तन घालितां । पयःपान स्वीकारी ॥ १३४ ॥
मग उत्तम करी बाळरीती । स्नानमार्जनादि सारिती ।
यापरी द्वादश दिनांप्रती । परम सोहळा मांडियेला ॥ १३५ ॥
मेळवूनि सुवासिनी । पाळणा घातला योगप्राज्ञी ।
जालिंदर हें नाम जनीं । सकळा आवडीं ठेविलें ॥ १३६ ॥
यज्ञकुंडींचा ज्वाळामाळी । प्रसन्न झाला तेणें काळीं ।
ज्वाळांत उदेला म्हणूनि सकळीं । नाम जालिंदर स्थापिले ॥ १३७ ॥
ऐशा करुनियां गजरा । ग्रामांत वाटिली गोड शर्करा ।
अपार धन याचक नरां । लौकिकार्थ वांटिले ॥ १३८ ॥
ऐशिया गजरें पूर्ण राहटी । झाली बहुत दिवसां लोटी ।
मास संवत्सर पंचवटी । षट् सप्तम लोटले ॥ १३९ ॥
यापरी तो बृहद्रवा राणा । अपार पाळिल्या ललना ।
पुढें योजूनि मौंजीबंधना । यज्ञोपवीत आराधी ॥ १४० ॥
याउपरी कोणे एके दिवसी । राव विचार करी मानसीं ।
गृहस्थाश्रमी जालिंदरासी । लग्नविधी उरकाया ॥ १४१ ॥
म्हणवूनि आपला पुरोहित । मंत्रि सवें देऊनि त्यातें ।
उत्तम कुमारी शोधार्थ । महीवरी प्रेरिला ॥ १४२ ॥
गुणवंत रुपवंत । सुलक्षणी कुमारी पाहत ।
मंत्री आणि पुरोहित । देशावरी हिंडती ते ॥ १४३ ॥
येरीकडे जालिंदर । राजांगना परम सुंदर ।
घेऊनिया अंकावर । चुंबन घेती लालसें ॥ १४४ ॥
परम स्नेहानें ऊर्ध्वदृष्टी । पाहूनि बोले योगजेठी ।
धूर्मिण मंत्री मम दृष्टीं । दिसत नाहीं कां माते ॥ १४५ ॥
येरी म्हणे पाडसा ऐके । तुज स्त्री करावया जनकें ।
पुरोहित आणि मंत्री देखें । पाठविले आहेत बा ॥ १४६ ॥
येरी म्हणे स्त्री काये । माता म्हणे बायकोसी म्हणावें ।
येरु म्हणे मज दावावें । बायका कैशा जननीये ॥ १४७ ॥
येरी म्हणे मजसमान । बायको येईल तुजकारण ।
जैसी मी बा त्याचसमान । तुज बायको येईल कीं ॥ १४८ ॥
ऐसी सुलोचना त्यातें वदतां । तो शब्द रक्षूनि आपुल्या चित्ता ।
बाळांत येऊनि खेळतां खेळतां । बाळांलागीं पुसतसे ॥ १४९ ॥
म्हणे गडे हो ऐका एकु । मम तात माता करिती बायकु ।
तीस कासयासाठीं । अर्थकौतुकु । करितां बायकु तें सांगा ॥ १५० ॥
तंव ते बोलती विचक्षण । बहु शठपणीं बोलती हांसून ।
जालिंदर बुद्धिहीन । बायकोही कळेना ॥ १५१ ॥
मग ते म्हणती मूर्खा ऐक । बायकु म्हणतां संसार निक ।
विषयसुखाचें पूर्ण भातुक । जगामाजी मिरवीतसे ॥ १५२ ॥
विषयसुख म्हणजे काई । सांगती न ठेवता गोबाई ।
ते ऐकूनि थरारुन जाई । मनीं विचार करीतसे ॥ १५३ ॥
अगा जग हें परम अधम । आचरण आचरती परम दुर्गम ।
जें कां जगाचें उत्पत्तिस्थान । तेचि रमणी रमतात ॥ १५४ ॥
तरी आपण करुं नये ऐसें । याचा मनाला सबळ त्रास ।
ऐसें रचुनि विवेकास । मुलांतूनि निघाला ॥ १५५ ॥
मनांत अति करी विचार । मातेच्या शब्दासी पर ।
तरी ते ते करुनि वेव्हार । अधर्मराशी दिसतसे ॥ १५६ ॥
माता बोलली मजसमान । कांता मिरवतसे चिद्रत्न ।
तरी ती कांता मज मातेसमान । वेव्हारा योग्य वाटेना ॥ १५७ ॥
तरीही पूर्ण अधर्मराशी । कदा न वर्तू कार्यासी ।
मग सांडूनि ग्रामधामदारासी । काननांतरीं निघाला ॥ १५८ ॥
परी ग्रामद्वारीं ग्रामरक्षक । त्यांनीं जातां पाहिलें बाळक ।
परी राजनंदन म्हणूनि धाक । हटकावया अंतरले ॥ १५९ ॥
परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला । हेर मागें पाठविला ।
कोणी जाऊनि त्वरें नृपाला । सांगताती तांतडीनें ॥ १६० ॥
हे महाराज भुवननाथ । विपिनीं गेला आपुला सुत ।
रायें ऐसा ऐकूनि वृत्तांत । आला धांवत तांतडीने ॥ १६१ ॥
परी तो चपळ विलक्षण । म्हणे कोणी येईल धांवोन ।
म्हणोनि मार्गातें सोडोन । महाकाननीं रिघाला ॥ १६२ ॥
तंव त्या विपिनीं तरुदाटी । विशाळ जाळिया तृण अफाटी ।
त्यांत संचरतां हेर दृष्टी । चुकुर झाले पाहतां ॥ १६३ ॥
परी तो योगेंद्र वपळ बहुत । जातां जातां एक पर्वत ।
त्याची दरी धरुनि सुत । उत्तरदिशे चालिला ॥ १६४ ॥
येरीकडे नृपनाथ । काननीं निघाला शोध करीत ।
परी शोध लागला दूतस्थानापर्यंत । पुढें शोध लागेना ॥ १६५ ॥
पाहतां परी बहु विपिन । परी जालिंदराचें न पावें दर्शन ।
जैसा अमावास्येचा दिन । चंद्रमणी लोपतसे ॥ १६६ ॥
ऐसें झालें सकळांसी । निराशपणें ग्रामासी ।
येते झाले झालिया निशी । शोक करितां सकळांनीं ॥ १६७ ॥
रायासह अपार जन । पाहती आपुलालें सदन ।
परी बृहद्रवा आणि सुलोचना । परम अट्टहास करिताती ॥ १६८ ॥
बाळलीला खेळ अद्भुत । आठवोनि गातां रुदन करीत ।
राव म्हणे हा अनुचित । प्रसाद हातींचा पै गेला ॥ १६९ ॥
मातें अग्नि झाला प्रसन्न । अहा माझें कर्म गहन ।
हातींचे गेले चिद्रत्न । काय करुं उपाय हो ॥ १७० ॥
अहा बाळक माझें अर्कासमान । तेजरुप वाटे मदन ।
माता म्हणे खेळ उत्तम । काय वर्णू तयाचा ॥ १७१ ॥
ऐसा करितां अट्टहास । परी आणिक सरदार बुद्धिलेश ।
रायास सदा बोधी नानाभाष्य । युक्तिप्रयुक्ती करोनियां ॥ १७२ ॥
म्हणती राया नरोत्तमा । जालिंदर अयोनिसंभव ।
तरी हा सेवितां महाकानन । त्यासीं मरण नसेचि ॥ १७३ ॥
मही समुद्रवलयांकित । शोध करु आम्ही निश्र्चित ।
परी केव्हांतरी तरी तुमचा सुत । तुम्हां भेटेल महाराजा ॥ १७४ ॥
तरी निःसंशयेंकरुन । धैर्यअर्गळी ठेवा मन ।
ऐशा युक्तकरुन । रायासी शांत करिताती ॥ १७५ ॥
येरीकडे जालिंदर । पर्वतदरी अतिगुहार ।
संचरला परी महीवर । काळोखी रात्र दाटली ॥ १७६ ॥
तयामाजी झालें विपरित । विपिनी वणवा लागला बहुत ।
पुढें तें कानन अग्नि जाळीत । तयापासीं पातला ॥ १७७ ॥
तंव त्या दरींत जालिंदर । निद्रे व्यापिला तृण अपार ।
तों जवळी आला वैश्र्वानर । तृण भक्षावया कारणें ॥ १७८ ॥
तों बाळ गोमटें देखिले दृष्टीं । विस्मयो करी आपुले पोटीं ।
हे बाळ मम उदरजेठीं । उदय पावलें होतें कीं ॥ १७९ ॥
उत्तम ठाव पाहूनि यातें । सांडिलें होतें म्यां गर्भातें ।
येथे यावया कारण यातें । कां पडलें न कळे हो ॥ १८० ॥
मग शांत होऊनि मूर्तिमंत । बाळ त्वरें केला जागृत ।
अंकी घेऊनि पुसे त्यातें । कारण काय येथे यावया ॥ १८१ ॥
येरु पाहूनि तया आदरें । म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर ।
येरु म्हणे मी वैश्र्वानर । जननीजनक तुझा मी ॥ १८२ ॥
येरु म्हणे जननीजनक । कैसे होतील हरएक ।
मग तो मुळींहूनि कथा पावक । तयालागीं सांगतसे ॥ १८३ ॥
असो आतां वैश्र्वानर । पुढें पुढती लिहितां पर ।
ती कथा पुढें धुंडीकुमार । मालू नरहरीचा सांगे की ॥ १८४ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । एकादशाध्याय गोड हा ॥ १८५ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार एकादशाध्याय संपूर्ण ॥

श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अकरावा ( ११ )
Custom Search