Friday, March 25, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 35 Part 1/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 35 
Revannath blessed by God Dattaguru and received Mahima siddhi as a blessing. He started to feed all the people in the village and those who were coming in the village. He started to give them whatever they want. Machchhindra came to know about this when he came to that village. He started feeding birds, wild animals that were coming near to him for eating without any fear. Birds sit on his shoulders and use to eat. Revananath also asked Mahima Siddhi that he wanted to do the same. But Mahima told him that it was possible to Machchhindra as he was a Brahmavetta. Revananath started tapas so that his Guru ShriDatta Guru should bless him. Machchhindra went to Girnar and ShriDatta Guru about Revananath. God Dattaguru blessed Revananath and imparted him all the knowledge. Then he sends Revananath for tirtha yatra. He came to a village where Saraswati Brahman with his wife Janhavika offered him Bhiksha. Next day Revananath came to know that only son of that couple died. He told them that he would go to Swarga and bring back there son from Yama till such time for three days he asked them to protect body of their son. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 36th Adhyay.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) भाग १/२
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
जयजयाजी करुणाकरा । पंढरीशा रुक्मिणीवरा ।
दीनबंधो दयासागरा । पुढें ग्रंथ बोलवीं ॥ १ ॥  
तूं दयाळ विश्र्वंभर । बहुधा अर्थीं हें चराचर ।
भरण करिसी जन्म दिला अत्रिनंदन ।
जो शंकरसेवक तयालागून । तेंचि प्राप्त होतसे ॥ ५ ॥
हिरातेज गूढ स्थानालागुनी । दडे तरी तया काढी हिरकणी ।
भेटीलागीं येत धांवोनी । लोहालागीं चुंबक ॥ ६ ॥
कां हंसपक्षी भक्षणांत । कदा न भक्षी मुक्ताविरहित ।
जरी गुंतला पिंजर्‍यांत । परी तेंचि भक्ष्य भक्षीतसे ॥ ७ ॥
तेवीं रेवण योगमूर्ती । मार्गींच भेटला अवचटगती ।
दुग्धालागीं शर्करा निश्र्चितीं । लवण कांहीं मिरवेना ॥ ८ ॥ 
असो ऐसा अवसर त्यांत । घडला परी अबुद्धिवंत ।
सिद्धिकळा घेऊनि चित्तांत । अत्रिसुत दवडला ॥ ९ ॥ 
दत्तें केलें शहाणपण । किंचित कळा त्यां दाखवून ।
रक्षूनि आपुलें सकळ भूषण । गेला निघून महाराजा ॥ १० ॥
जेवीं मर्कटा चणे देउनी । मार्गी हिंडवती बुद्धिमंत प्राणी ।
तेवीं अत्रिआत्मज करणी । करुनि गेला महाराजा ॥ ११ ॥
येरीकडे रेवणनाथ । वृषभ ठेवूनि स्वशेतांत ।
घेऊनियां सिद्ध आउत । करिता झाला महाराजा ॥ १२ ॥
सकळ शेत झाल्यापाठीं । नागदोर कवळूनि करसंपुटीं ।
आउतमागीं फिरत जेठी । गायनातें आरंभिलें ॥ १३ ॥
आरंभिले परी दत्तवचन । मंत्रप्रयोगें गाय गायन ।
दत्तमहिमा ऐसें म्हणून । वृषभातें बोलतसे ॥ १४ ॥
येरी महिमा ऐसें वचन । सहज बोले प्रयोगानें ।
परी महिमासिद्धि प्रत्यक्षपणें । प्रकट झाली ते ठायीं ॥ १५ ॥
सिद्धि येऊनि आउतापाशीं । म्हणे कामना कोण तुजसी ।
येरु म्हणे तव नामासी । श्रुत मातें करीं कां ॥ १६ ॥
येरी म्हणे मी सिद्धि पूर्ण । देहधारी महिमान ।
ऐसें ऐकतां उत्तमोत्तम । दत्तबोल आठवला ॥ १७ ॥
जेव्हां सिद्धि दत्त देता । ते सिद्धीची सकळ वार्ता ।
सांगोनियां रेवणनाथा । गेला होता महाराजा ॥ १८ ॥
कीं हा प्रयोगितां मंत्र । महिमा नामें सिद्धि पवित्र ।
प्रत्यक्ष होईल तुजपुढें प्राप्त । कामनेतें पुरवावया ॥ १९ ॥
मागणें जे अर्थिक कामना मनीं । तूं तीस दाखवीं बोलूनी ।
मग तितुके कार्यालागुनी । सकळ कामना पुरवील ॥ २० ॥ 
म्हणसील काय आहे प्रताप तिचा । तरी वदतां न ये आपुले वाचा ।
सकळ भोग जो महीचा । प्राप्त करील क्षणार्धें ॥ २१ ॥
कानन तरु पाषाणपर । जितुके असतील महीवर ।
तितुके कल्पतरु साचार । करुनि देईल क्षणार्धे ॥ २२ ॥
आणि तुळवट जेथ पाषाणखाणी । तयाची दावी अपार करणी ।
कीं परीस तेवीं चिंतामणी । करुनि देईल क्षणार्धें ॥ २३ ॥
वसन भूषण धन कनकराशी । अपार दावी नगाऐसी । 
जें जें वर्तेल स्वकामनेसी । तो तो अर्थ पुरवील बा ॥ २४ ॥
ऐसें सांगूनि अत्रिआत्मजें । ओपिलें होते मंत्रबीज ।
ऐसें श्रुत होतां सहजें । दाटला होता गर्वानें ॥ २५ ॥
परंतु निःस्पृह होतां आनंदभरित । हांकीत होता शेतांत आउत ।
मंत्रप्रयोगीं विचारीत । सहजस्थिति केलीसे ॥ २६ ॥ 
परी महिमासिद्धि भेटतां त्यातें । अधिक झाला आनंदभरित ।
म्हणे सत्पंथ सांगोनि दत्त । गेला असे महाराजा ॥ २७ ॥
मग हातींचा सोडूनि आउतदोर । तीतें बोलता होय उत्तर ।
म्हणे शेतीं पैल असे तरुवर । छायेंकरुनि वेष्टिला ॥ २८ ॥
तरी त्या शीतळ छायेतें । कणाच्या राशी अपरिमित ।
कनक करीं एक क्षणांत । चमत्कार दावीं कां ॥ २९ ॥
दृष्टी पडता कनकराशी । मग मी म्हणेन सिद्धि तुजसी ।
मग जे कामना होईल देहासी । ते मी तुजला सांगेन ॥ ३० ॥   
तरी हें ऐसें परीक्षावचन । आधीं दावीं मजकारण । 
जैसा मोहोरा सूत गुंडोन । अग्नि रक्षी परीक्षे ॥ ३१ ॥
कीं पक्षिकुळांतें हंसदृष्टी । परीक्षे ओपी पयतोयवाटी । 
कीं परिसा पारख पाषाणथाटीं । लोह मिरवी कनकातें ॥ ३२ ॥
तेवीं आतां परीक्षापण । दावीं मिरवूनि अपार सुवर्ण ।
तेणें मग संशय विरहित होवोन । गोड होईल चित्तातें ॥ ३३ ॥
ऐसें बोलतां रेवणनाथ । सिद्धि आश्र्चर्यें हास्य करीत ।
म्हणे महाराजा एका क्षणांत । कनकधनें भरीन सकळ मही ॥ ३४ ॥
मग सहज करुनि कृपादृष्टी । विलोकीतसे महीपाठीं ।
तों नगासमान कनकधनथाटी । अपार राशी मिरवल्या ॥ ३५ ॥
तें पाहूनि रेवणनाथ । म्हणे माते तूं आहेसी सत्य ।
तरी आतां सन्निध मातें । येथूनियां रक्षीं कां ॥ ३६ ॥
तूं सन्निध आसतां सर्व काळ । पुरविसी सकळ इच्छाफल ।
ऐसें बोलतां ती वेल्हाळ । बोलती झाली तयातें ॥ ३७ ॥
म्हणे सन्निध राहीन आतां । परी गुप्त वर्तेन जगाकरितां ।
तुवां न धरावी दर्शनस्पृहता । कार्य तुझें करीन मी ॥ ३८ ॥
मग अवश्य म्हणे रेवणनाथ । कार्यसंबंधीं असावें उदित ।
मग कनकधनराशी गुप्त । अदृश्य सिद्धि मिरविली ॥ ३९ ॥
त्यावरी सायंकाळपर्यंत । शेतीं प्रेरिलें समग्र आउत ।
मग गुरांसवें येऊनि गोठंगणांत । वृषभांतें बांधिलें ॥ ४० ॥
रात्रीं करुनि शयनीं शयन । तों उदय झाला द्वितीय दिन ।
मग मनांत म्हणे ब्रह्मनंदन । ब्यर्थ कां कष्टें कष्टावें ॥ ४१ ॥
शेतीं सायंकाळपर्यंत । संवत्सर हांकावें आउत । 
तरी आतां कष्ट केउते । व्यर्थ शरीरा शिणवावें ॥ ४२ ॥
निधान (साधन) असतां आपुले हातीं । दैन्य भोगावें कवणे अर्थीं ।
परीस लाधला धनप्राप्ती । मेळवूं कां जावें देशांतरा ॥ ४३ ॥
सुरसुरभी असतां घरीं । तक्र मागावें घरोघरीं ।
चिंतामणि ग्रीवेमाझारीं । असतां चिंता कां भोगावी ॥ ४४ ॥
ऐशा कल्पना आणूनि चित्तीं । सोडूनि दिधलें जाणें शेतीं ।
तो दिन येत प्रहरमिती । सहनसारुक बोलतसे ॥ ४५ ॥
म्हणे वत्सा सोडूनि आउत । गृहीं बैसलासी कवणें अर्थें ।
येरु म्हणे जाऊनि शेतांत । काय ताता करावें ॥ ४६ ॥
कष्ट करितां रात्रंदिवस । काय मिरविलें फळास ।
येरु म्हणे धान्य खावयास । पिकवावें पाडसा ॥ ४७ ॥
शेत पिकलिया अपार कणीं । मग सुख भोगूनि अवनीं ।
नातरी भ्रांती खावयालागुनी । पुढें होईल बाळका ॥ ४८ ॥
ऐसें ऐकूनि तातवचन । म्हणे कष्टें पिकवावें शेती अन्न ।
तरी आपले गृहीं काय न्यून । म्हणोनि आतां कष्ट करावे ॥ ४९ ॥
येरु म्हणे बा आपुल्या गृहासी । काय आहे न कळे मजसी ।
नित्य स्थापूनि येरयेरा करड्यासी । दिवसपरी लोटीतसें ॥ ५० ॥
येरु म्हणे बोलसी खोटे । सदन भरलेंसे कनकवटें ।
जाऊनि पहा खरे खोटे । बोल माझे महाराजा ॥ ५१ ॥
तंव तो हासूनि सहजस्थितीं । गमन करीतसे धवळाराप्रती ।
तों कनकराशी धन अपरिमिती । गृहामाजी मिरवतसे ॥ ५२ ॥
तें पाहूनियां सहनसारुक । चित्तीं आश्र्चर्य मानी दोंदिक ।
म्हणे कैसें झालें कौतुक । बाळ बोलेंकरुनियां ॥ ५३ ॥
मग परम होवोनि हर्षयुक्त । म्हणे वरदवाणी आहे सत्य । 
कोणी अवतारी प्रतापवंत । सिद्धमुनी हा असे ॥ ५४ ॥
मग तो सहनसारुक कृषी । कदा न सांगे कवण्या कार्यासी ।
प्रमाण मानूनि त्याचे बोलासी । तदनुसारें वर्ततसे ॥ ५५ ॥
मग तो रेवण ब्रह्मसुत । काय करीतसे नित्यानित्य ।
बुंदल ग्राम तो थोर अत्यंत । मार्गावरी नांदतसे ॥ ५६ ॥
तैं पांथस्थ येता मुक्कामासी । पाचारुनि नेतसे सदनासी ।
कामनेसमान आहारासी । अन्न देतसे नित्यशा ॥ ५७ ॥
मग गांवांत पडली एक हांक (बोलबाला) । कीं रेवण देत अन्न उदक ।
मग चुंगावर चुंगा (झुंडीच्या झुंडी) लोक । पांथिक सत्वर धांवती ॥ ५८ ॥
मग जैसी ज्याची इच्छा गहन । तैसी पुरवी नाथ रेवण ।
वस्त्र पात्र अपार धन । देवोनियां बोळवी ॥ ५९ ॥
रोगभोगादि मनुष्यें येती । तीं सर्व दुःखांची पावूनि शांती ।
धन्य म्हणूनि गृहासी जाती । यशकीर्ति वर्णीत पैं ॥ ६० ॥
मग जगांत होऊनि प्रसिद्ध । सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध ।
देशविदेशीं जनांचे वृदं । रेवण सिद्ध म्हणताती ॥ ६१ ॥
तों कोणे एके दिवशीं मच्छिंद्रनाथ । महीं करीत नानातीर्थ । 
बुंधलग्रामीं अकस्मात । मुक्कामातें पातला ॥ ६२ ॥
वस्तीसी धर्मशाळेंत राहून । करीत बैसला श्रीगुरुचिंतन ।
तों त्या गांवींचे कांहीं जण । धर्मशाळेंत पातले ॥ ६३ ॥
येतांचि त्यांनीं देखिला नाथ । म्हणती बाबा उतरलासी येथ ।
तरी सारावया आपुला भक्त । रेवणसिद्ध पहावा ॥ ६४ ॥
येरु पुसे त्यांतें वचन । रेवणसिद्ध आहे कोण ।
मग ते सांगती मुळापासून । कृषिकर्मी शोध हा ॥ ६५ ॥
ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ । जाऊनि पाहे अंतरीं गुप्त ।
तों दृष्टीं देखतां म्हणे चित्तांत । अवतार असे हा एक ॥ ६६ ॥
आमुचा सांगाती पूर्णांश । हा नारायण प्राज्ञ चमस ।
तरी प्रसन्न कोण झाला यास । शोध करुं तयाचा ॥ ६७ ॥
पुनः येवोनि धर्मशाळेंत । लोकांसी म्हणे गुरु कोण यातें ।
कोण मिरवला जगातें । निजदेहाचें नाम सांगा ॥ ६८ ॥
तंव ते म्हणती बाबा नाथ । आम्हां नाहीं माहीत ।
मग स्तब्ध राहूनि मच्छिंद्रनाथ । काय करी महाराजा ॥ ६९ ॥
पक्षिकुळांतें पाचारुन । घालिता झाला इच्छाभोजन ।
एका करीं बैसवोन । तुष्ट करुनि बोळवी ॥ ७० ॥
शिरी स्कंधीं पक्षिमेळा । मच्छिंद्र बैसोनि घेई सकळां । 
जाय म्हणतां उतावेळा । अंबरातें जाती पैं ॥ ७१ ॥
मग पाचारुनि वनचरांसी । त्यांसही देत आहारासी ।
आपुले हस्तें व्याघ्र-सिंहांसी । ग्रास देत महाराजा ॥ ७२ ॥
ऐसें होतां कांहींएक दिवस । लोक म्हणती महापुरुष ।
हा ईश्र्वरचि म्हणूनि यास । श्र्वापद विहंगम स्पर्शिती ॥ ७३ ॥
मग धन्य धन्य म्हणूनि ख्याती । रेवणसिद्धासी सांगती ।
म्हणती आला आहे एक जती । सर्वांपरी अद्भुत ॥ ७४ ॥
विहंगमादि श्र्वापदगण । सहज घेतसे पाचारुन ।
तेही येती संशय सोडून । भेटीलागी तयाच्या ॥ ७५ ॥
करीं स्कंधीं करुनि आरोहण । अन्नोदकांते सेवून । 
जा म्हणतां करिती गमन । तृप्त मना मिरवोनी ॥ ७६ ॥
म्हणाल बोलणें व्यर्थ चावटी । तरी आपण पहावें तया दृष्टीं ।
पक्षी श्र्वापदें कोट्यानुकोटी । तयापाशीं येताती ॥ ७७ ॥
ऐसें ऐकूनि रेवणसिद्ध । पाहूं चालिला प्रतापसिद्ध । 
तों येतां देखिले पक्षियांचे वृदं । करीं शिरीं मिरवले ॥ ७८ ॥
तें पाहूनि आश्र्चर्यवंत । म्हणे वनचरीं कैसें सांडिलें द्वैत ।
तरी फेडूं या संशयातें । प्रत्यक्ष सिद्ध कोण हा ॥ ७९ ॥
मग शीघ्र येवोनि आपुले सदनीं । जाऊनि बैसे एकान्तस्थानीं ।
म्हणे दत्तमंत्र प्रयोगूनी । प्रत्यक्ष करुं सिद्धीतें ॥ ८० ॥
मग होतां प्रत्यक्ष सिद्धी । म्हणे महाराजा विशाळबुद्धी ।
कवण कामने काय सिद्धी । प्रत्यक्ष केलें तुवां मातें ॥ ८१ ॥
येरु म्हणे वो कृपासरिते । तुष्ट करिसी सर्व जनांतें ।
तेचि रीतीं पक्षिकुळांतें । तुष्ट करीं श्र्वापदें कीं ॥ ८२ ॥
तुष्ट करिसी तरी कैसें । हरुनि त्यांच्या देहबुद्धीस । 
मम सन्निध स्वअंगास । संगोपावें जननीये ॥ ८३ ॥
येरी ऐकोनि वागुत्तर । म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर ।
होणार नाहींत अद्वैतपर । ब्रह्मवेत्त्यावांचोनी ॥ ८४ ॥
जो स्थावर आणि जंगमांत । सर्वांचे नांदे हृदयांत ।
तयाचि गोष्टी ह्या निश्र्चित । जो अद्वैतपणें वसतसे ॥ ८५ ॥
हे महाराजा ऐक बोला । जो जळरुपीच होऊनि ठेला ।
तो जळामाजी मिळावयाला । अशक्य काय उरेल जी ॥ ८६ ॥
तेवीं ब्रह्मपरायण होतां । मग चराचरीं नुरे द्वैतवार्ता ।
अद्वेष्टा झाला सर्वभूतां । चराचरीं महाराजा ॥ ८७ ॥
मग तो प्राणी सर्वभूत । जगातें मानी आप्त ।
आणि मग तेही मानिती त्यातें । सखा सोयरा कीं आपुला ॥ ८८ ॥
तरी आतां श्र्लाघ्यवंत । आधीं व्हावें ब्रह्मव्यक्त । 
त्यावरी बोले रेवणनाथ । ब्रह्मवेत्ता करीं मातें ॥ ८९ ॥
येरु म्हणे चातुर्यखाणी । अत्रिनंदन तुझा स्वामी । 
त्यातें स्तवोनि उगमीं । साध्य करुनि घेईं कां ॥ ९० ॥
तुज तो साह्य झाल्या जाण । मग पक्षि-श्र्वापदीं अद्वैतपण ।
काय असे तेवढें कठिण । देवादिक येतील कीं ॥ ९१ ॥
स्वर्लोक भूलोक तपोलोक । स्वर्गवासी सुरवर अनेक ।
चरणसेवा दोंदिक (मोठी) । वांछितील मग तुझी ॥ ९२ ॥
ऐसें सिद्धि बोलतां वचन । चित्तीं म्हणे हेंचि करीन ।
मग सर्व त्याग करुन । काननांत प्रवेशे ॥ ९३ ॥
जयाठायीं भेटला दत्त । तेथें जाऊनि बैसला नाथ ।
दत्तस्मरणीं ठेवूनि चित्त । वाट पाहे भेटीची ॥ ९४ ॥
मनीं दाटला भेटीचा योग । तेणें अन्नोदकाचा झाला त्याग ।
मग दिवसेंदिवस शरीरभोग । शुष्ककाष्ठ दाहीतसे ॥ ९५ ॥
चाललें तरुचें पर्णभक्षण । येतसे काय जें उडून । 
दत्तवियोगें भेटीकारणें । काये वाचे वेधला ॥ ९६ ॥
मग तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे हा लागला प्रयत्नांत ।
परी कोण गुरु आहें त्यातें । समजला नाहीं अद्यापि ॥ ९७ ॥
अहा गुरु तो ऐसा कैसा । काळरत्ना दृढोत्तर घालूनि फांसा ।
गेला आहे अभ्यासभासा । निष्ठुर मन करुनियां ॥ ९८ ॥
मग रेवणसिद्धाचा प्रताप । पुसूनि घेतला जनमुखें माप ।
ते म्हणती तो आहे जगबाप । परोपकारी असे कीं ॥ ९९ ॥
कितीएकां घातलें इच्छिलें अन्न । कितीएकां दिधलें अपार धन ।
अपार जगाचें अकिंचनपण । अर्थाअर्थीं हरीतसे ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 35  श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) 


Custom Search

No comments:

Post a Comment