Wednesday, April 20, 2016

Shri RamGeeta श्रीरामगीता


Shri RamGeeta
Shri RamGeeta is in Sanskrit. It is from Adhyatma Ramayan. It was originally told to Laxman by God Ram. Then it came into light when God Shiva told it to Goddess Parvati.
श्रीरामगीता 
श्रीमहादेव उवाच ।
ततो जगन्मङ्गलमंगलात्मना 
विधाय रामायणकीर्तिमुत्तमाम् ।
चचार पूर्वाचरितं रघूत्तमो
राजर्षिवर्यैरभिसेवितं यथा ॥ १ ॥
सौमित्रिणा पृष्ट उदारबुद्धिना 
रामः कथाः प्राह पुरातनीः शुभाः ।
राज्ञः प्रमत्तस्य नृगस्य शापतो 
द्विजस्य तिर्यक्त्वमथाह राघवः ॥ २ ॥
कदाचिदेकान्त उपस्थितं प्रभुं 
रामं रमालालितपादपङ्कजम् ।
सौमित्रिरासादितशुद्धभावनः 
प्रणम्य भक्त्या विनयान्वितोऽब्रवीत् ॥ ३ ॥
त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनाम् 
आत्मऽस्यधीशोऽसि निराकृतिः स्वयम् ।
प्रतीयसे ज्ञानदृशां महामते 
पादाब्जभृङ्गहितसंगसंगिनाम् ॥ ४ ॥
अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो 
भवापवर्गं तव योगिभावितम् ।
यथांजसा ज्ञानमपारवारिधिं 
सुखं चरिष्यामि तथानुशाधि माम् ॥ ५ ॥
श्रुत्वाऽथ सौमित्रिवचोऽखिलं तदा 
प्राह प्रपन्नार्तिहरः प्रसन्नधीः ।
विज्ञानमज्ञानतमोपशान्तये
श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः ॥ ६ ॥
आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः 
कृत्वा समासादितशुद्धमानसः ।
समाप्त तत्पूर्वमुपात्तसाधनः 
समाश्रयेत्सद् गुरुमात्मलब्धये ॥ ७ ॥
क्रिया शरीरोद्भवहेतुरादृता  
प्रियाप्रियौ तौ भवतः सुरागिणः ।
धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं 
पुनः क्रिया चक्रवदीर्यते भवः ॥ ८ ॥
अज्ञानमेवास्य हि मूलकारणं 
तद्धानमेवात्र विधौ विधीयते ।
विद्यैव तन्नाशविधौ पटीयसी 
न कर्म तज्जं सविरोधमीरितम् ॥ ९ ॥
नाज्ञानहानिर्न च रागसंक्षयो
भवेत्ततः कर्म सदोषमुद्भवेत् ।
ततः पुनः संसृतिरप्यवारिता 
तस्माद्बुधो ज्ञानविचारवान्भवेत् ॥ १० ॥
ननु क्रिया वेदमुखेन चोदिता 
यथैव विद्या पुरुषार्थसाधनम् ।
कर्तव्यता प्राणभृतः प्रचोदिता 
विद्यासहायत्वमुपैति सा पुनः ॥ ११ ॥
कर्माकृतौ दोषमपि श्रुतिर्जगौ 
तस्मात्सदा कार्यमिदं मुमुक्षुणा ।
ननु स्वतन्त्रा ध्रुवकार्यकारिणी 
विद्या न किंचिन्मनसाऽप्यपेक्षते ॥ १२ ॥
न सत्यकार्योऽपि हि यद्वदध्वरः 
प्रकाङ्क्षते ऽन्यानपि कारकादिकान् ।
तथैव विद्या विधितः प्रकाशितैः 
विशिष्यते कर्मभिरेव मुक्तये ॥ १३ ॥
केचिद्वदन्तीति वितर्कवादिनः 
तदप्यसद्दृष्टविरोधकारणात् ।
देहाभिमानादभिवर्धते क्रिया 
विद्या गताहङ्कृतितः प्रसिद्ध्यति ॥ १४ ॥
विशुद्धविज्ञानविरोचनांचिता 
विद्याऽत्मवृत्तिश्चरमेति भण्यते ।
उदेति कर्माखिलकारकादिभिः 
निहन्ति विद्याऽखिलकारकादिकम् ॥ १५ ॥
तस्मात्त्यजेत्कार्यमशेषतः सुधीः 
विद्याविरोधान्न समुच्चयो भवेत् ।
आत्मानुसंधानपरायणः सदा 
निवृत्तसर्वेन्द्रियवृत्तिगोचरः ॥ १६ ॥
यावच्छरीरादिषु माययाऽऽत्मधीः 
तावद्विधेयो विधिवादकर्मणाम् ।
नेतीति वाक्यैरखिलं निषिध्य तत् 
ज्ञात्वा परात्मानमथ त्यजेत्क्रियाः ॥ १७ ॥
यदा परात्मात्मविभेदभेदकं 
विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरम् ।
तदैव माया प्रविलीयतेंजसा 
सकारका कारणमात्मसंसृतेः ॥ १८ ॥
श्रुतिप्रमाणाभिविनाशिता च सा 
कथं भविष्यत्यपि कार्यकारिणी ।
विज्ञानमात्रादमलाद्वितीयतः 
तस्मादविद्या न पुनर्भविष्यति ॥ १९ ॥
यदि स्म नष्टा न पुनः प्रसूयते 
कर्ताऽहमस्येति मतिः कथं भवेत् ।
तस्मात्स्वतन्त्रा न किमप्यपेक्षते 
विद्या विमोक्षाय विभाति केवला ॥ २० ॥
सा तैत्तिरीयश्रुतिराह सादरं 
न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् ।
एतावदित्याह च वाजिनां श्रुतिः 
ज्ञानं विमोक्षाय न कर्म साधनम् ॥ २१ ॥
विद्यासमत्वेन तु दर्शितस्त्वया        
क्रतुर्न दृष्टान्त उदाहृतः समः ।
फलैः पृथक्त्वाद्वहुकारकैः क्रतुः 
संसाध्यते ज्ञानमतो विपर्ययम् ॥ २२ ॥ 
सप्रत्यवायो ह्यहमित्यनात्मधीरः 
अज्ञनप्रसिद्धा नतु तत्त्वदर्शिनः ।
तस्माद्बुधैस्त्याज्यमपि क्रियात्मभिः 
विधानतः कर्म विधिप्रकाशितम् ॥ २३ ॥
श्रद्धान्वितस्तत्त्वमसीति वाक्यतो 
गुरोः प्रसादादपि शुद्धमानसः ।
विज्ञाय चैकात्म्यमथात्मजीवयोः 
सुखी भवेन्मेरुरिवाप्रकम्पनः ॥ २४ ॥
आदौ पदार्थावगतिर्हि कारणं 
वाक्यार्थविज्ञानविधौ विधानतः ।
तत्त्वंपदार्थो परमात्मजीवका-
वसीति चैकात्म्यमथानयोर्भवेत् ॥ २५ ॥
प्रत्यक्परोक्षादिविरोधमात्मनो-
र्विहाय संगृह्य तयोश्चिदात्मताम् ।
संशोधितां लक्षणया च लक्षितां
ज्ञात्वा स्वमात्मानमथाद्वयो भवेत् ॥ २६ ॥
एकात्मकत्वाज्जहती न संभवे-
त्तथाऽजहल्लक्षणता विरोधतः ।
सोऽयंपदार्थाविव भागलक्षणा 
युज्येत तत्त्वंपदयोरदोषतः ॥ २७ ॥
रसादिपंचिकृतभूतसंभवं 
भोगालयं दुःखसुखादिकर्मणाम् ।
शरीरमाद्यन्तवदादिकमजं 
मायामयं स्थूलमुपाधिमात्मनः ॥ २८ ॥
सूक्ष्मं मनोबुद्धिदशेन्द्रियैर्युतं
प्राणैरपंचिकृतभूतसंभवम् ।
भोक्तुः सुखादेरनुसाधनं भवेत् 
शरीरमन्यद्विदुरात्मनो बुधाः ॥ २९ ॥
अनाद्यनिर्वाच्यमपीह कारणं 
माया प्रधानं तु परं शरीरकम् ।
उपाधिभेदात्तु यतः पृथक् स्थितं 
स्वात्मानमा मन्यवधारयेत्क्रमात् ॥ ३० ॥
कोशेष्वयं तेषु तु तत्तदाकृतिः
विभाति संगात्स्फटिकोपलो यथा ।
असंगरुपोऽयमजो यतोऽद्वयो 
विज्ञायतेऽस्मिन्परितो विचारिते ॥ ३१ ॥
बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते 
स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मनः ।
अन्योऽन्यतोऽस्मिन्व्यभिचारतो मृषा ।
नित्ये परे ब्रह्मणि केवले शिवे ॥ ३२  ॥
देहेन्द्रियप्राणमनष्चिदात्मनां 
संघादजस्त्रं परिवर्तते धियः ।
वृत्तिस्तमोमूलतयाऽज्ञलक्षणा 
यावद्भवेत्तावदसौ भवोद्भवः ॥ ३३ ॥
नेतिप्रमाणेन निराकृताखिलो 
हृदा समास्वादितचिद्धनामृतः ।
त्यजेदशेषं जगदात्तसद्रसं 
पीत्वा यथाऽम्भः प्रजहाति तत्फलम् ॥ ३४ ॥
कदाचिदात्मा न मृतो न जायते 
न क्षीयते नापि विवर्धतेऽनवः ।
निरस्तसर्वातिशयः सुखात्मकः 
स्वयंप्रभः सर्वगतोऽयमद्वयः ॥ ३५ ॥
एवंविधे ज्ञानमये सुखात्मके 
कथं भवो दुःखमयः प्रतीयते ।
अज्ञनतोऽध्यासवशात्प्रकाशते 
ज्ञाने विलीयेत विरोधतः क्षणात् ॥ ३६ ॥
यदन्यदन्यत्र विभाव्यतेभ्रमा-
दध्यासमित्याहुरमुं विपश्र्चितः ।
असर्पभूतेऽहिविभावनं यथा 
रज्ज्वादिके तद्वदपीश्वरे जगत् ॥ ३७ ॥
विकल्पमायारहिते चिदात्मकेऽ-
हङ्कार एष प्रथमः प्रकल्पितः ।
अध्यास एवात्मनि सर्वकारणे 
निरामये ब्रह्मणि केवले परे ॥ ३८ ॥
इच्छादिरागादिसुखादिधर्मिकाः 
सदा धियः संसृतिहेतवः परे ।
यस्मात्प्रसुप्तौ तदभावतः परः 
सुखस्वरुपेण विभाव्यते हि नः ॥ ३९ ॥
अमाद्यविद्योद्भवबुद्धिबिम्बितो 
जीवः प्रकाशोऽयमितीर्यते चितः ।
आत्मा धियः साक्षितया पृथक् स्थितो 
बुद्ध्याऽपरिच्छिन्नपरः स एव हि ॥ ४० ॥
चिद्बिम्बसाक्षात्मधियां प्रसगतः 
त्वेकत्रवासादनलाक्तलोहवत् ।
अन्योन्यमध्यासवशात्प्रतीयते 
जडाजडत्वं च चिदात्मचेतसोः ॥ ४१ ॥      
गुरोः सकाशादपि वेदवाक्यतः
संजातविद्यानुभवो निरीक्ष्य तम् ।
स्वात्मानमात्मस्थमुपाधिवर्जितं 
त्यजेदशेषं जडमात्मगोचरम् ॥ ४२ ॥
प्रकाशरुपोऽहमजोऽहमद्वयोऽ-
सकृद्विभातोऽहमतीव निर्मलः ।
विशुद्धविज्ञानघनो निरामयः
संपूर्ण आनन्दमयोऽहमक्रियः ॥ ४३ ॥
सदैव मुक्तोऽहमचिंत्यशक्तिमान् 
अतीन्द्रियज्ञानमविक्रियात्मकः ।
अनन्तपारोऽहमहर्निशं बुद्धैः
विभावितोऽहं हृदि वेदवादिभिः ॥ ४४ ॥
एवं सदात्मानमखण्डितात्मना
विचारमाणस्य विशुद्धभावना ।
हन्यादविद्यामचिरेण कारकै 
रसायनं यद्वदुपासितं रुजः ॥ ४५ ॥
विविक्त आसीन उपारतेन्द्रियो
विनिर्जितात्मा विमलान्तराशयः ।
विभावयेदेकमनन्यसाधनो 
विज्ञानदृक्केवल आत्मसंस्थितः ॥ ४६ ॥
विश्वं यदेतत्परमात्मदर्शनं 
विलापयेदात्मनि सर्वकारणे ।
पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते 
न वेद बाह्यं न च किंचिदान्तरम् ॥ ४७ ॥
पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेत्
ओङ्कारमात्रं सचराचरं जगत् ।
तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको 
विभाव्यतेऽज्ञानवशान्न बोधतः ॥ ४८ ॥
अकारसंज्ञः पुरुषो हि विश्वको
ह्युकारकस्तैजस ईर्यते क्रमात् ।
प्राज्ञो मकारः परिपठ्यतेऽखिलैः
समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् ॥ ४९ ॥  
विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेत्
उकारमध्ये बहुधा व्यवस्थितम् ।
ततो मकारे प्रविलाप्य तैजसं 
द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमे ॥ ५० ॥
मकारमप्यात्मनि चिद्धने परे
विलापयेत्प्राज्ञमपीह कारणम् ।
सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमत् 
विज्ञानदृङ मुक्त उपाधितोऽमलः ॥ ५१ ॥
एवं सदा जातपरात्मभावनः 
स्वानन्दतुष्टः परिविस्मृताखिलः ।
आस्ते स नित्यात्मसुखप्रकाशकः 
साक्षाद्विमुक्तोऽचलवारिसिंधुवत् ॥ ५२ ॥
एवं सदाऽभ्यस्तसमाधियोगिनो 
निवृत्तसर्वेन्द्रियगोचरस्य हि ।
विनिर्जिताशेषरिपोरहं सदा 
दृश्यो भवेयं जितषड्गुणात्मनः ॥ ५३ ॥
ध्यात्वैवमात्मानमहर्निशं मुनिः
तिष्ठेत्सदा मुक्तसमस्तबन्धनः ।
प्रारब्धमश्नन्नभिमानवर्जितो
मय्येव साक्षात्प्रविलीयते ततः ॥ ५४ ॥
आदौ च मध्ये च तथैव चान्ततो 
भवं विदित्वा भयशोककारणम् ।
हित्वा समस्तं विधिवादचोदितं
भजेत्स्वमात्मनमथाखिलात्मनाम् ॥ ५५ ॥
आत्मन्यभेदेन विभावयन्निदं
भवत्यभेदेन मयात्मना तदा ।
यथा जलं वारिनिधौ यथा पयः 
क्षीरे वियद्व्योम्न्यनिले यथानिलः ॥ ५६ ॥
इत्थं यदीक्षेत हि लोकसंस्थितो
जगन्मृषैवेति विभावयन्मुनिः 
निराकृतत्वाच्छ्रुतियुक्तिमानतो 
यथेन्दुभेदो दिशि दिग्भ्रमादयः ॥ ५७ ॥
यावन्न पश्येदखिलं मदात्मकं 
तावन्मदाराधनतत्परो भवेत् ॥
श्रद्धालुरत्युर्जितभक्तिलक्षणो
यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८ ॥
रहस्यमेतच्छ्रुतिसारसंग्रहं
मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय ।
यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान् 
स मुच्यते पातकराशिभिः क्षणात् ॥ ५९ ॥
भ्रातर्यदीदं परिदृश्यते जगन् 
मायैव सर्वं परिहृत्य चेतसा ।
मद्भावनाभावितशुद्धमानसः 
सुखी भवानन्दमयो निरामयः ॥ ६० ॥
यः सेवते मामगुणं गुणात्परं
हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् ।
सोहं स्वपादांचितरेणुभिः स्पृशन्
पुनाति लोकत्रितय यथा रविः ॥ ६१ ॥
विज्ञानमेतदखिलं श्रुतिसारमेकं 
वेदान्तवेद्यचरणेन मयैव गीतम् ।
यः श्रद्धया परिपठेद्गुरु भक्तियुक्तो 
मद्रुपमेति यदि मद्वचनेषु भक्तिः ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्र्वरसंवादे 
उत्तरकाण्डे श्रीरामगीतानाम पंचमः सर्गः ॥  
श्रीरामगीतेचा मराठी अर्थ 
१) श्रीमहादेव म्हणाले," हे पार्वती ! रघूत्तम श्रीराम म्हणजे जगतात जे काही मंगलरुप, कल्याणरुप आहे, त्या सर्वांना मंगलत्व देणारी प्रत्यक्ष ब्रह्मानंदमूर्तीच आहे. अशा या श्रीरामाने आपल्या चारित्र्याच्याआधारावर अनेक रामायणे होतील अशी उत्तम कीर्ती संपादन केली.
सीतात्यागानंतर तो श्रीराम आपल्या पूर्वजांनी व इतर राजर्षींनी आदरपूर्वकस्वीकारलेल्या आचारांच्या अनुरोधाने वागत असे.
२) श्रीलक्ष्मणाने विचारल्यावर प्राचीनकाळी घडलेल्या कित्येक पुण्यकथा उदार मनाचा श्रीराम त्याला सांगत असे. एके वेळी नकळत अपराध घडून शाप पावलेल्या नृग राजाला क्षुद्र प्राण्याचा सरड्याचा जन्म कसा प्राप्त झाला,ती कथा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगीतली. 
३) फार प्राचीनकाळी नृग नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. तो नेहमीब्राह्मणांना गायी दान करीत असे. एका प्रसंगी त्याच्या गायींच्या कळपांत एका ब्राह्मणाची गाय चुकुन ही गोष्ट राजाला माहीत नसल्याने इतर गायींबरोबर हीहिगाय एका ब्राह्मणाला दान दिली गेली. पुढे ज्या ब्राह्मणाची ती गाय होती, त्याने रागाच्या भरांत राजाला तुला सरड्याचा जन्म येईल असा शाप दिला. न कळतघडलेल्या अपराधाचीही कशी शिक्षा होते, ते यावरुन समजते. 
एकदा श्रीलक्ष्मी एकांतात प्रभु रामचंद्रांची पदसेवा करीत असता, लक्ष्मण तेथे आला. त्याने भक्तिभावाने श्रीरामानां नमस्कार केला. जिज्ञासु भावाने त्याने नम्रतापूर्वक
त्यांना विचारले.
४) हे महामते रामा तू निर्मल ज्ञानस्वरुप आहेस. तू सर्वांचा अंतर्यामी आत्मा आहेस. तू स्वतः निराकार असूनही सर्वांचा नियंता आहेस. ज्ञानाच्या दिव्यादृष्टीलाच तू प्रतीत होणारा आहेस. कमलाच्या ठायी रुंजी घालणार्‍या भ्रमराप्रमाणे ज्यांची अंतःकरणे तुझ्या
चरणी आसक्त होतात, त्यांनाच ही दिव्य दृष्टी प्राप्त होते. 
५) प्रभो ! संसाराची निवृत्ती करणारे, योगिजनांनी ध्याइलेले, असे जे तुझे पदकमल आहेत, त्यांना मी शरण आलो आहे. ज्यामुळे अज्ञानरुप समुद्र मी सुखाने व लवकर तरुन जाईन, असा उपदेश मला कर.
६) श्रीरामाचे ब्रीद म्हणजे शरणागतांची दुःखे हरण करणे, हे असल्याने लक्ष्मणाचे भाषण ऐकून श्रीरामांना परम संतोष झाला. त्यावेळी सर्व लोकांच्या अज्ञानतमाचा नाश जेणेकरुन होईल असे वेदांनाही संमत जे आत्म तत्वज्ञान ते त्याने लक्ष्मणाला सांगीतले.
७) श्रीराम म्हणाला, " प्रथमतः मनुष्यानेस्ववर्णाश्रमानुसार नित्यनैमित्तिक कर्मे करावी. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होईल. पुढे त्या अंतःकरण शुद्धीमुळे शमदमादि साधने प्राप्तझाली की कर्माचरण सोडून द्यावे व आत्मज्ञानासाठी सद्गुरुंचा आश्रय घ्यावा. 
८) पूर्वजन्मी प्राण्याने आदरपूर्वक केलेली कर्मे हेच या शरीराच्या जन्माला कारण असते. या जन्मांतही तो विषयामवर प्रेम करु लागला म्हणजे त्याच्याकडून धर्म व अधर्म घडतात. ते त्याला सुखदुःखजनक होतात. पुढे ते कर्मच मूळ होऊन प्राण्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मांतही तो पुन्हा कर्म करतो. अशाप्रकारे
कर्मापासून जन्म व जन्मापासून कर्म, असे संसारचक्र सारखे चालत असते. असे म्हणतात. 
९) या संसाराला मूळ कारण म्हणजे अज्ञानच होय आणि ते दूर करणे हे प्राण्याचे अवश्य कर्तव्य होय. अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ म्हणजे एक ज्ञानच-आत्मतत्त्वज्ञान
आहे.अज्ञानोत्पन्न कर्मापासून त्याच्या अज्ञानाचा नाश होणे शक्य नाही; कारंण जे सविरोधक असते तेच नाशक होते , असे म्हटले आहे. 
१०) कर्माच्या योगे अज्ञानाचाही नाश होत नाही आणि विषयासक्तीही लोप पावत नाही.
त्यापासून नवे कर्म मात्र उत्पन्न होते व ते सदोष असते. त्यापासून पुन्हा संसार मागे लागतो. त्या संसारास टाळता येणे शक्य नाही. म्हणून सुज्ञ मनुष्याने सदैव आत्मज्ञानविचार करावा.
११) वेदाने आपल्या मुखाने ज्ञान हेजसे पुरुषार्थाचे साधन म्हणून सांगितले आहे, तसेच कर्में -नित्यनैमित्तिक कर्मे- प्राण्याने अवश्य केली पाहिजेत, असेही सांगितले आहे. कर्म हे ज्ञानास पुष्टी करणारे आहे. 
१२) कर्म न केले असता दोष लागतो, असेहि श्रुतीने सांगितले आहे. म्हणून मुमुक्षुने कर्म अवश्य केले पाहिजे. (या आक्षेपावर असे म्हणणे आहे की, ) ज्ञान हेच स्वतंत्रपणाने निश्र्चित कार्य करणारे - मोक्ष पावविणारे आहे. ते कोणाचे साह्य घेण्याचे मनातही आणीत नाही. 
१३) ( यावर ते आक्षेपक असे म्हणतात की, ) " असे नाही. यज्ञाचे फल सत्यपणे मिळावयाचे असले तरीही त्याला सिद्धी करता इतर अंगांची-साधनांची -अपेक्षा करावी लागते. त्याचप्रमाणे ज्ञानास शास्त्रविहित कर्माची जोड मिळेल तरच ते ज्ञान मोक्ष देण्यास समर्थ होईल." 
१४) कित्येक वितर्कवाद्यांचे असे जे म्हणणे आहे, तेही सत्यास सोडून आहे, कारण कर्म आणि ज्ञान ह्यांचा उघड उघड विरोध आहे. देहाभिमान ठेविल्याने प्राण्याच्या ठिकाणी क्रिया वाढत जाईल. तो देहाभिमान जाईल, तेव्हांच त्याला ज्ञान प्राप्त होईल.
१५) परम निर्मल आत्मज्ञान करुन देणार्‍या वेदान्तवाक्यांच्या आलोचनाने जी शेवटी अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती होते, तिलाच विद्या-तत्त्वज्ञान असे विद्वान लोक म्हणतात. सकल कारकांच्या -अंगाच्या योगे योगे कर्म उदयाला येते. उलट ज्ञान सर्व कारकांचा कर्तृत्वादि बुद्धीचा नाश करते.                  
१६) म्हणूनच मुमुक्षु पुरुषाने कर्माचा पूर्णपणे त्याग करावा. कारण कर्माचा ज्ञानाशी विरोध आहे. आणि म्हणून (कर्म आणि ज्ञान) या दोघांचा समुच्चय एकत्र राहणे शक्य नाही. याकरिता सर्व इंद्रियांच्या वृतीचे विषय नित्य सोडून द्यावे आणि आत्मानुसंधान परायण होऊन राहावे. 
१७) जोपर्यंत प्राणी शरीरादि (जड) वस्तुंवर अज्ञानाने अहंभाव मी म्हणजे शरीर ही बुद्धी ठेवतो, तोपर्यंत वेदांतील कर्मबोधक विधी त्याला पाळावे लागतात. परंतु नेति नेति हे असे नव्हे, ह्या वचनांनी सर्व जगत् मिथ्या आहे, असे पक्के समजून आले आणि परमात्मा त्या जगाहून वेगळा, अर्थांत सत्य आहे, हे ज्ञान झाले म्हणजे सर्व कर्मे मुमुक्षूने सोडावीत. 
१८) जेव्हा आत्मा आणि परमात्मा हा भेद दूर करणारे प्रकाशमय आत्मज्ञान अंतःकरणांत उत्पन्न होते, तेव्हा माया आपल्या कारकांसह- कारणासह -तत्काल लयाला जाते. जीवाला संसारांत पाडण्याचे कारण म्हटले म्हणजे ही मायाच होय. 
१९) श्रुतिप्रमाणोत्पन्न ज्ञानाच्या योगे ही माया एकदा नष्ट केली, म्हणजे मग ती पुन्हा आपले कार्य-संसार-कसा बरे करील? निर्मल व द्वैतरहित आत्मतत्त्वज्ञानाने ती नष्ट झाली असता पुन्हा उत्पन्नच होणार नाही. 
२०) ती माया नष्ट होऊन पुनः उत्पन्न होत नाही, असे झाल्यावर 'मी कर्ता ' हा अभिमान तरी कसा उत्पन्न होईल? म्हणून ज्ञान हेच एकटे स्वतंत्र असे मोक्षाचे साधन असून त्याला दुसर्‍या कोणाच्याही साहाय्याची अपेक्षा नाही.
२१) तैत्तिरीय उपनिषदांत आदरपूर्वक असे स्पष्टपणे सांगितले आहे की, वेदात (अर्थवादवाक्यांनी ) कर्माची प्रशंसा केली असली, तरी ती सर्व कर्मे सोडून द्यावी. वाजसनेयी शाखेच्या ' एतावत् ' ह्या श्रुतीनेही हेच सांगितले आहे की, ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे कर्म नाही.
२२) हे समुच्चयवाद्या यज्ञ ज्ञानासारखा आहे, हे तू दाखविलेस; परंतु त्याला योग्य असा दृष्टांत सांगितला नाहीस. यज्ञाची फळे वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या सिद्धतेस विपुल साधने लागतात. ज्ञान ह्याच्या उलट आहे.
२३) "कर्मत्यागाने मी दोषी होईन," हा जडधर्माचा आरोप अज्ञानी-तत्त्वज्ञान नसलेल्या -जनांच्या ठिकाणी आढळून येतो. परंतु जे तत्त्वज्ञानी आहेत, त्यांना तसे वाटत नसते. म्हणून सुज्ञ पुरुषांनी शास्त्रांतील विहित कर्मे देखील सोडून द्यावी. 
२४) श्रद्धायुक्त होऊन आणि मन निर्मळ करुन गुरुकृपेने 'तत्त्वमसि ' इत्यादि वाक्यांनी परात्मा आणि जीवात्मा यांचे एकरुपत्व जाणावे आणि मेरुप्रमाणे निश्चल व सुखरुप होऊन रहावे.
२५) (हे लक्ष्मणा !) वाक्याचा बरोबर - भ्रमरहित-अर्थ कळण्यासाठी प्रथमतः त्यांतील पदांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. महावाक्यातील -' तत्त्वमसि -' यातील ' तत् ' आणि ' त्वं ' ह्या दोन पदांचे अर्थ ' परमात्मा ' आणि ' जीव ' हे आहेत. ' असि ' हे पद उभयतांचे ऐक्य दाखविते. 
२६) ( आता परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि जीव किंचिज्ज्ञ आहे, ह्यामुळे दोघांचे ऐक्य होणे विरुद्ध होय. ह्या आशंकेला उत्तर असे की, ) जीवाच्या ठिकाणी अहंबुद्धिवेद्यत्व आहे. ईश्र्वराच्या ठिकाणी ते नाही. अर्थात अंतःकरणातील अहंभावनेनेच समजून येणारा जीव आणि अहंभाव नष्ट झाल्यावर समजून येणारे ईशस्वरुप यांमधील प्रत्यक्षत्वपरोक्षत्वाचा विरोध काढून टाकावा आणि लक्षणेने विचार करुन ते दोघेही चैतन्यरुपाने एक आहेत, हे जाणावे. मग आपण जीव-आपला आत्मा-तसाच चैतन्यमय आहे, हे समजून तद्रुप व्हावे. 
२७) जीवात्मा व परमात्मा ह्यांचे स्वरुप एकच असल्यामुळे येथे ( ' तत्त्वमसि ' चा अर्थ करताना ) ' अहत्स्वार्थलक्षणा- ' मूळचा अर्थ न सोडता धोरणाने दुसरा भरीला घालणे -हेही संभवत नाही. कारण तेथे ह्या दोघांचा विरोध आहे. आता राहिलेली ' जहदजहत्स्वार्थलक्षणा ' किंवा ' भागलक्षणा-' मूळचा काही अर्थ सोडणे व काही न सोडणे -ती येथे जुळते. कारण, ' सोऽयं '-'तो हा ' ह्या पदांप्रमाणे ' तत् त्वं '- ' ते तू ' -ह्या पदांतील अनुक्रमे सर्वज्ञत्व व अल्पज्ञत्व सोडून दोघांचे चिदात्मकत्व -ब्रह्मरुपत्व -घ्यावयाचे आहे. अशा रीतीने ' तत्त्वं ' ह्या पदाचा अविरोधाने अर्थ लावावा. 
२८)  हे शरीर पृथ्व्यादि एकवटलेल्या पंचभूतांच्या योगे उत्पन्न झालेले असून सुखदुःखादि प्राप्त करुन देणार्‍या कर्माचे भोग स्थान आहे. ह्याला उत्पत्ती व नाश ही आहेत. हे पूर्वजन्मार्जित कर्मापासून उत्पन्न झालेले आहे. हे परंपरेने मायेचे कार्य आहे. असे हे शरीर म्हणजे जीवाची स्थूल उपाधी होय. 
२९) विद्वान लोक, मन, बुद्धी, दहा इंद्रिये आणि पंचप्राण ह्यांनी युक्त, असे दुसरे एक सूक्ष्म शरीर जीवाची उपाधी आहे, असे मानतात. याची उत्पत्ती अपंचीकृत- मिश्र न झालेल्या पाच भूतांपासून होते. भोक्त्याला सुखदुःखादि भोग मिळण्याचे साधन म्हणजे हेच होय. 
३०) ( आता ईश्र्वराची उपाधी कोणती, ते सांगतो. ) अनादि,अनिर्वचनीय, सकल जगताच्या उत्पत्तीचे कारण अशी माया म्हणजे ईश्र्वराचे परम प्रधान शरीर आहे. मूळ आत्मा एक आहे, तरी या उपाधीभेदामुळे तो जीव आणि ईश्र्वर असा वेगळा होऊन राहिला आहे म्हणून ( श्रवण, मनन व निदिध्यासन ह्या ) क्रमाने जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य आहे, असे जाणावे. 
३१) हा आत्मा शरीरामध्ये असणार्‍या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या संबंधामुळे त्या त्या आकाराने भासू लागतो. स्फटिकाच्या खड्याच्या संगतीत जशी वस्तू असेल, तसा त्या स्फटिकाला रंग येतो. ( हे येथे उदाहरण होय. ) ' तत्त्वमसि ' या ( महावाक्याचा ) म्हणजे ' ते तू ब्रह्मच  आहेस, ' याचा सम्यक् रीतीने विचार केला असता हा आत्मा असंग, अज, अद्वितीय आहे, अशी प्रतीती येते. 
३२) ह्या (आत्म्याच्या) ठिकाणी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती अशा तीन प्रकारच्या अवस्था भासतात. त्या सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणात्मक बुद्धीचे धर्म होत. ( आत्म्याचे नव्हेत. ) आत्मा नित्य तिन्ही गुणामवेगळा, व्यापक, असंग आणि आनंदरुप आहे. अशा आत्म्यावर हे अनित्य, मिथ्या अवस्थात्रय आरोपिले जाते. बुद्धीच्या अध्यासामुळे तसा भास होतो. ह्या तीन अवस्थांपैकी एक अनुभवीत असता दुसर्‍या दोन हातच्या जातात, म्हणून ह्या तीन अवस्था क्षणिक अतएव अनित्य आहेत. 
३३) देह, इंद्रिये, प्राण आणि मन ह्यांपैकी प्रत्येकाचा आत्म्यावर अध्यास झाल्यामुळे बुद्धीचा तमोमूल आणि अज्ञानजन्य प्रवाह सर्वदा चालू राहातो आणि हा जोपर्यंत वाहात राहील, तोपर्यंत संसाराचे रहाटगाडगे चालू असायचेच.
३४) ' नेति नेति ' ह्या प्रमाणावरुन दृश्य हे सारे खोटे आहे, असे कळले आणि सत्वगुणप्रधान हृदयात चिद्घनामृताचा- ज्ञानमय सुखाचा अनुभव आला, म्हणजे कोवळ्या नारळातील मधुर रस पिऊन ती कवची जशी फेकून दिली जाते, त्याचप्रमाणे निखिल जगताचा त्याग करावा. ( त्याविषयी उदासीन राहावे. )
३५) हा आत्मा कधी मेला नाही, उत्पन्न होत नाही, क्षीण होत नाही, वाढत किंवा नवा होत नाही. त्याने देहेंद्रियादि सर्वाचे महत्व नाहीसे केले आहे. हा सुखरुप, स्वयंप्रभ, सर्वव्यापी व द्वैतविहीन आहे.
३६) ( ह्यावर शंका ) अशा प्रकारचा ज्ञानस्वरुप आणि सुखमय आत्मा आहे, तर त्याच्यावर दुःखात्मक संसार कसा बरे प्रत्ययाला -अनुभवाला -येतो? ( ह्याला उत्तर ) अज्ञाानामुळे आत्म्यावर ( देहेंद्रियांचा ) अध्यास केल्याने हा संसार अनुभवास येतो. परंतु एकदा स्वरुपज्ञान झाले की, तो क्षणांत नाश पावतो; कारण अज्ञान आणि ज्ञान ह्यांचा विरोध आहे.
३७) पदार्थ वेगळाच असून त्यावर भलत्याच पदार्थाच्या भ्रमामुळे आरोप केला जातो. ह्याला विद्वान लोक ' अध्यास ' असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तुतः सर्प नव्हे अशा दोरी वगैरे पदार्थावर अध्यासाने सर्पाचा आरोप करतात. त्याचप्रमाणे ईश्र्वरावर जगाचा अध्यास ( लोकांकडून ) केला जातो. 
३८) ज्ञानस्वरुप आत्म्याच्या ठिकाणी विकल्पाचे कारण जी माया ती नाही. आत्मा हा सर्वाचे कारण, दुःखरहित, सर्वव्यापी, सर्वविकारशून्य, दिसणार्‍या सृष्टीहून वेगळा, असा आहे. त्याच्यावर प्रथमतः अहंकार कल्पिला गेला. हाच अध्यास होय. 
३९) इच्छा-उपेक्षा, प्रीती-द्वेष, सुख-दुःख ही ज्यांचे गुणधर्म, ती संसाराची कारणे परमेश्र्वरावर आरोपिली जातात, वस्तुतः ती बुद्धीवर राहणारी होत. झोपेमध्ये ह्या भावनांचा लोप होत असल्यामुळे सुखस्वरुप आत्मप्रत्यय येत असतो. 
४०) अनादि अविद्येपासून जी बुद्धी उत्पन्न होते, तिच्यामध्ये चैतन्याच्या प्रकाशाचे प्रतिबिंब पडले असता, त्या प्रतिबिंबाला ' जीव ' असे म्हणतात. तेथे आत्मा बुद्धीचा साक्षी होऊन वेगळा राहात असतो. बुद्धीला त्याचा परिच्छेद करता येत नाही. ( तो व्यापक आहे. ) 
४१) लोखंड अग्नींत घालून तप्त केले असता एकत्र सहवासामुळे, त्याला अग्नी हे नाव प्राप्त होते व लोखंडाचाही गुण अग्नीवर दिसतो, त्याचप्रमाणे चैतन्याचे प्रतिबिंब ( जीव ) आणि इंद्रियांसहित मन, ह्यांच्या सान्निध्याने परस्पर अध्यास होऊन आत्म्याचा धर्म चेतनत्व मनावर व मनाचा धर्म जडत्व आत्म्यावर होतो. 
४२) म्हणून गुरुपासून अगर वेदवचनांकडून ज्ञानरुप आत्मानुभव प्राप्त करुन घ्यावा, त्याचे नीट चिंतन करावे आणि आपला आत्मा उपाधिवर्जित असून हृदयांत राहात असतो, हे जाणून आत्म्यावर दृश्य होणार्‍या सर्व जड देहेंद्रियादिकांस टाकून द्यावे. ( त्याविषयीं उदासीन राहावे. ) 
४३) मी प्रकाशरुप आहे, मी अज आहे, मी अद्वय आहे, मी नित्य प्रतीत आहे, मी अत्यंत निर्मल आहे, मी शुद्ध ज्ञानाने भरलेला आहे, मी दुःखरहित, व्यापक व आनमदमय आहे, मी अक्रिय आहे, 
४४) मी नित्यमुक्त आहे, माझ्या शक्तीला पार नाही, अतीन्द्रियज्ञान हे माझे रुप आहे, मी परिणामहीन आहे, मी अनंत, अपार आहे, वेदवेत्ते विद्वान लोक अंतःकरणांत अहर्निश माझे चिंतन करतात. 
४५) असे चिंतन करीत पुरुष चित्ताला विषयांकडे जाऊ न देता स्वरुपविचार करीत राहील, तर त्याची अंतःकरणवृत्ती ब्रह्माकार होऊन जाईल आणि मग त्या योगे अविद्या सर्व कारकांसह -देहान्तराला कारण अशा कर्मासह - तत्काल लयाला जाईल. रसायन घेतले असता रोगाचा तत्क्षणी नाश होतोच. ( तद्वतच या वृत्तीने अज्ञानाचा नाश होतो. )
४६) पुरुषाने विजनस्थानी आसनावर बसावे, इंद्रिये आटोक्यांत ठेवावी, प्राणायामादि साधनांनी मन जिंकावे, चित्त शुद्ध करावे, आत्मज्ञानावाचून ( मोक्षाचे ) दुसरे कोणतेच साधन नाही, हा निश्चय करावा, आत्मज्ञानाकडेच दृष्टी लावावी आणि मग असंग होऊन आत्मस्वरुपी लीन व्हावे. 
४७) या सगळ्या जगताला प्रकाशित करणारा म्हटला म्हणजे परमात्मा होय. तो जगाचे सर्व कारण-उपादानकारण -आहे. तरी अशा आत्मरुपी सर्व जगताचा लय करावा. असा पुरुष पूर्ण चिदानंदमय होऊन राहातो. त्याला बाह्य किंवा आंतर विषयांचे ज्ञानच राहात नाही. 
४८) त्याने समाधीच्यापूर्वी सर्व स्थावरजंगमात्मक जगत् ओंकारमात्र आहे, असे मानावे. जग हे प्रणवाचे-ओंकाराचे-वाच्य आहे व प्रणव हा जगताचा वाचक आहे, हे प्रसिद्ध आहे. जगत् ओंकाररुप पाहणे, हादेखील अज्ञानाचा प्रकार होय. ज्ञान झाले असता ही वृत्ती राहात नाही. 
४९) ' ओम् " हा शब्द अ, उ, म् अशी तीन अक्षरे मिळून झाला आहे. जागृतावस्थेचा साक्षी जो ' विश्व ' त्याचीच ' अ ' ही संज्ञा आहे. क्रमाने दुसरा वर्ण ' उ ' हा स्वप्नावस्थेचा साक्षी असून त्याला ' तैजस ' असे म्हणतात आणि तिसरा ' म् ' हा सुषुप्तावस्थेचा साक्षी असून त्याला ' प्राज्ञ ' असे सगळे लोक म्हणतात. हा विचार समाधीपूर्वीचा होय. तत्त्वज्ञान झाल्यावर हा विचारच राहात नाही. 
५०) जागृतावस्थेचा अभिमानी असलेला ' विश्व ' पुरुष व त्याचा वाचक ' अ ' वर्ण ह्यांना उकारामध्ये विलीन करावे; नंतर स्वप्नावस्थेचा अभिमानी ' तैजस ' आणि त्याचा वाचक ' उ ' यांना प्रणवाच्या शेवटच्या वर्णांत ' म् ' वर्णांत लीन करावे. 
५१) नंतर त्या मकाराला आणि त्याचा वाच्य आणि कारणाभिमानी प्राज्ञ पुरुष यांना चिदात्मरुपावर विलीन करावे आणि मग विज्ञानदृष्टी होऊन आणि सर्व उपाधींपासून मुक्त, अर्थात् रागद्वेषादि मलरहित होऊन, ते नित्यमुक्त परब्रह्म मी आहे, अशी भावना करावी. 
५२) अशा प्रकारे परमात्मरुपी ऐक्यस्थिती झाली असता तो सर्व -पुत्रगेहादि विसरुन जातो आणि स्वरुपानंदानेच तुष्ट होतो. नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच त्याचे रुप होय; असा तो पूर्ण निर्मुक्त-जीवनमुक्त-पुरुष निश्चल उदकाने भरलेल्या समुद्रासारखा स्थिर असतो. 
५३) अशा रीतीने जो सर्वदा समाधीयोगाचा अभ्यास करतो, सर्व इंद्रियविषयांपासून दूर राहातो, सर्व कामक्रोधादिक रिपूंना जिंकतो व षड्गुणसंपन्न आत्म्याला स्वाधीन करुन घेतो, त्यालाच माझे दर्शन होते. 
५४) मुनीने अशा रीतीने अहर्निश आत्मस्वरुपी आपले ध्यान लावावे आणि समस्त बंधांतून मुक्त होऊन राहावे. प्रारब्ध कर्मे करुन जे प्राप्त होईल, ते अभिमान सोडून भोगावे, म्हणजे तो माझ्याच स्वरुपी लय पावेल. 
५५) हा संसार म्हणजे प्रारंभी, मध्ये व अंतीही भय आणि शोक यांचे कारण आहे, असे जाणून विधिवाक्यांनी सांगितलेली सर्व कर्मे सोडून द्यावी, सर्वांतरी असणारा आत्मा-परमेश्र्वर-जो मी त्या माझीच भक्ती करावी. 
५६) माझ्या स्वरुपी जीव अभेदाने आहे, असे चिंतन करीत जो राहातो, तो माझ्याशी ऐक्य पावतो. समुद्राला पाणी जाऊन मिळाले की, ते एकरुप होते, ते समुद्ररुप होते; दुधात दूध मिळाले की ते एकरुप होते; घट फुटला असता त्यातील आकाश मोठ्या आकाशांत मिळते;  ( बाहेरील ) वातावरणांत ( भात्यातील ) वायू एकवटून जातो, त्याचप्रमाणे जीवात्मा परमात्म्याशी तद्रूप होतो. 
५७) अशा रीतीने लौकिक व्यवहार करीत असताही मुनी ' जग खोटेच आहे, ' असा सतत विचार करीत राहील, तर त्याला ऐक्यज्ञान होईल आणि त्याची जगतावरील सत्यपणाची भ्रांती दूर होईल. कारण श्रुती आणि युक्ती ह्या दोन्ही प्रमाणांनी दृश्य -जगत् - हे सारे खोटे ठरवून त्याचा निरास केला आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला कधी एका चंद्राचे दोन चंद्र दिसतात, किंवा दिशाभूल होते, परंतु सत्यज्ञान झाले असता हे भ्रम दूर होतात, त्याचप्रमाणे आत्मतत्त्वज्ञान झाल्याने सर्व जगत् मद्रूप आहे, असे दिसून येते.
५८) जोपर्यंत हे सर्व जगत् मद्रूप आहे, ही गोष्ट दृष्टीला समजून येत नाही, तोपर्यंत मनुष्याने माझे आराधन करण्यांत तत्पर राहावे. ज्या श्रद्धाळु पुरुषाच्या हृदयांत माझ्याविषयी अत्यंत भक्ती असल्याचे चिन्ह दिसून येते, त्याच्याच हृदयांत मी दृश्य होतो.
५९) हे प्रिय ( लक्ष्मणा !) सर्व वेदांचा सारसंग्रह म्हणून निष्चित केलेला असा जो अत्यंत गुप्त तत्त्वविचार तो मी तुला सांगितला. जो बुद्धिमान् पुरुष याचा नीट विचार करील, तो क्षणामध्ये पातकांच्या अनेक राशींपासून मुक्त होईल. 
६०) बंधो ! हे जे सर्व जगत् दिसत आहे, ती सर्व मायाच आहे, असे समज आणि अंतःकरणातून तिचा त्याग कर. मग माझ्या चिंतनाने तुझे मन शुद्ध होईल आणि तू आनंदमय, निरामय आणि सुखी असा होशील.
६१) मी सत्त्वादि गुणांनी रहित आहे, मी गुणातीत - त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडे आहे; मी कधीकाळी गुणांनी युक्त असे -सगुण-रुपही धारण करतो. अशा माझी निर्मल अंतःकरणाने जो सेवा करतो, तो मद्रूप होऊन जातो. जसा सूर्य आपल्या किरणांनी जगत्रयाला पवित्र करतो, त्याचप्रमाणे तो भक्तही आपल्या चरणधुलीच्या स्पर्शाने त्रैलोक्याला शुद्ध -पवित्र करतो. 
६२) वेदान्तरहस्य समजल्यानेच ज्याच्या चरित्राचे यथार्थ आकलन होऊ शकते, तो मी आहे. सगळ्या श्रुतीत जणू काय एकच सार, असले हे विज्ञान-तत्त्वज्ञान -मी तुला सांगितले. त्याचे जो श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक पठण करील आणि माझ्या वचनावर भक्ती ठेवून राहील, त्याला माझ्या स्वरुपी गती मिळेल.
अशा रीतीने श्रीमद् अध्यात्मरामायणांतील श्रीउमामहेश्र्वर संवादयुक्त उत्तरकांडातील श्रीरामगीता नावाचा पाचवा सर्ग समाप्त झाला.    

श्रीरामगीता अर्थासहीत " श्रीथोरले स्वामी महाराज खण्ड सहावा या पुस्तकांतुन आभार व धन्यवाद !  
Shri RamGeeta 
श्रीरामगीता 



Custom Search

No comments:

Post a Comment