Monday, April 18, 2016

Namsmaran Bhakti नामस्मरणभक्ति


Namsmaran Bhakti 
NamSmaran Bhakti is in Marathi. It is from Dasbodha, Chaturtha Dashak, and Third Samas. Samarth Ramdas is telling importance of chanting Nam.
नामस्मरणभक्ति
चतुर्थ दशक तिसरा समास
मागां निरोपिलें कीर्तन । जें काळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोस्मरण । तिसरी भक्ति ॥ १ ॥
स्मरण देवाचें करावें । अखंडनाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २ ॥
नित्यनेम प्रातःकाळीं । माध्याह्नकाळीं सायंकाळीं । 
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३ ॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरुप असतां ।
नामस्मरणेंवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४ ॥
हर्षकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५ ॥
कोडें सांकडें संकट । नाना संसार खटपट ।
अवस्था लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६ ॥
चालतां बोलतां धंदा करितां । खाता जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७ ॥
संपत्ति अथवा विपत्ति । जैशी पडेल काळगति ।
री नामस्मरणाची स्थिति । सांडोचि नये ॥ ८ ॥
वैभव सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९ ॥
आधीं अवदसा मग दशा । अथवा दशेउपरी अवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १० ॥
नामें संकटें नासती । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११ ॥
भूरपिशाच नाना छंद । ब्रह्मग्रह ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२ ॥
नामें विषबाधा हरती । नामें चेडें चेटकें नासती ।
नामें होय उत्तमगती । अंतकाळीं ॥ १३ ॥
बालपणीं तरुणकाळीं । कठिणकाळीं वृद्धापकाळीं ।
सर्वकाळीं अतंकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥
नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्र्वेश्र्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरुनी ॥ १५ ॥
उफराट्या नामासाठी । वाल्मीक तरला उठाउठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ॥ १६ ॥
हरिनामें प्रल्हाद तरला । नाना अपघातांपासूनि सुटला ।
नारायणनामें पावन झाला । अजामेळ ॥ १७ ॥
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
महापापी तेचि झाले । परमपवित्र ॥ १८ ॥
परमेश्र्वराची अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां यमें । बाधिजेना ॥ १९ ॥
सहस्त्रनामांमध्ये कोणी एक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्र्लोक । होईजे स्वयें ॥ २० ॥
कांहींच न करुनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणे संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥
नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
महादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२ ॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हालाहालापासूनि सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३ ॥
चंहू वर्णासि नामाधिकार । नामीं नाहीं लहानथोर ।
जडमूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥
म्हणोनि नाम अखंड स्मरावें । रुप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ति स्वभावें । निरोपिली ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके 
नामस्मरणनिरुपणं तृतीयः समासः ॥ 
Namsmaran Bhakti 
नामस्मरणभक्ति


Custom Search

No comments:

Post a Comment