Saturday, June 4, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 5 कर्मसंन्यासयोग अध्याय ५


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 5 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 5 is in Sanskrit. Name of this Adhyay is Karma-Sanyas Yoga. Here in this Adhyay 5 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, about Renunciation and the performance of selfless action both lead to Liberation (Moksha). However the performance of selfless action is superior to the renunciation of action.
कर्मसंन्यासयोग अध्याय ५
अर्जुन उवाच 
सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्र्चितम् ॥ १ ॥
श्रीभगवानुवाच
संन्न्यासः कर्मयोगश्र्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥
ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३ ॥
साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥
यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥
सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ६ ॥
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥
नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्र्नन्गच्छन्स्वपञ्श्र्वसन् ॥ ८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिशन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १० ॥
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११ ॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ १२ ॥
सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्र्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्र्नुते ॥ २१ ॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्येय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३ ॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्र्चक्षुश्र्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्र्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः ॥   
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) हे श्रीकृष्णा, एकदा कर्मसंन्यासाची व पुनः कर्मयोगाची तू प्रशंसा करतोस. तेव्हां ह्या दोहोपैकीं अधिक श्रेयस्कर असेल तेच निश्र्चित करुन मला सांग.
श्रीभगवान म्हणले
२) कर्मसंन्यास व कर्मयोग हें दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु त्यापैकीं कर्मसंन्यासापेक्षां कर्मयोगाची योग्यता विशेष आहे. 
३) हे अर्जुना, जो मनुष्य कशाचाही द्वेष किंवा कशाचीही  इच्छा करीत नाही, तो (कर्मयोगी) नित्य संन्यासीच समजावा. कारण तो रागद्वेषादि-द्वंद्वातीत झाला; आणि  जो द्वंद्वातीत झाला तो कर्मबंधनांतून सहज मुक्त होतो.
४) कर्मसंन्यास व कर्मयोग हे वेगळे आहेत असें मूर्ख लोक म्हणतात; ज्ञानी असें म्हणत नाहींत. ह्या दोहोपैकीं कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य आचरण घडलें असलें तरीही दोहोंचे उत्तम फळ (मोक्ष) मिळतें. 
५) जें स्थान (मोक्ष) सांख्यांना मिळतें तेंच कर्मयोग्यांनाही मिळतें, म्हणून सांख्यमार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असें जो जाणतो, त्यानेंच (खरें तत्त्व) ओळखले म्हणायचें.
६) अर्जुना, कर्मयोगाच्या साहाय्यावांचून संन्यास साध्य होणें दुर्घट आहे. पण कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ति अल्पकालांत होते.
७) ज्यानें मन व इंद्रियें जिंकली , ज्याचें अंतःकरण शुद्ध आहे, सर्व भूतांचा आत्मा हाच जो स्वतःचा आत्मा मानितो, असा कर्मयोगी पुरुष कर्मे करीत असतांना त्यांनी लिप्त होत नाही.
८-९) कर्मयोगी तत्त्ववेत्त्यानें पाहतांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, चालतांना, झोपतांना, श्र्वासोच्छ्वास  करतांना, तसेंच बोलतांना, त्याग करतांना, ग्रहण करतांना, डोळ्यांच्या पापण्या उघडतांना किंवा मिटतांना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायीं आपोआप प्रवृत्त आहेत असें ओळखून मी कांहींच करीत नाही असें समजावें. 
१०) जो कर्मयोगी फलासक्ति सोडून सर्व कर्में ब्रह्माच्या म्हणजे परमेश्र्वराच्या ठिकाणीं अर्पण करतो, तो पाण्यांतील कमलपत्राप्रमाणें पापापासून अलिप्त असतो.
११) कर्मयोगी शरीरानें, मनानें, बुद्धीनें आणि केवळ इंद्रियांनीही आसक्ति सोडून आत्मशुद्धीकरितां कर्मे करीत असतात.
१२) कर्मयोगी पुरुष कर्मफल भगवंताला अर्पण करुन भगवत्प्राप्तिरुप परम शांति मिळवितो आणि योगरहित पुरुष कामनेच्या योगानें फळाच्या ठायीं आसक्त झाल्यामुळे (पापपुण्यानें) बद्ध होतो. 
१३) जितेंद्रिय असा मनुष्य सर्व कर्मांचा मनानें त्याग करुन, कोणतेंही कर्म करणारा किंवा करविणारा न होतां, नवद्वारें असलेल्या आपल्या देहरुपी नगरांत आत्मानंदांत असतो. 
१४) लोकांची कर्तृत्वशक्ती, त्यांनीं करावयाचीं कर्में, आणि कर्माशीं होणारी फळाची जोड, ह्या गोष्टी परमात्मा स्वतः करीत नाही. तर स्वभाव म्हणजे प्रकृतीच हा सगळा खेळ करीत असते. 
१५) सर्वव्यापी जीवात्मा पाप किंवा पुण्य स्वतःकडेमुळींच कधी घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळें सर्व जीव मोह पावतात. 
१६) परंतु ज्यांचें हें असलें अज्ञान आत्मज्ञानानें नाहींसें झालें, त्यांच्या अंतःकरणांत उदित झालेलें तें ज्ञान, सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणें, परमार्थतत्त्व प्रकाशित करतें.
१७) ज्यांचें मन व बुद्धि तद्रुप झालीं, जे परमात्मस्वरुपीं निरंतर स्थिर झाले, व जे केवळ ईश्र्वरपरायण झाले, त्यांचे पाप आत्मज्ञानानें निःशेष धुऊन जाऊन ते पुनः जन्मास येत नाहीत. 
१८) ज्ञानी लोक विद्या व विनय यांनीं संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, श्र्वान व चांडाळ या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात.
१९) ज्याच्या मनामध्यें स्वभाव स्थिर झाला, त्यांनीं इहलोकींच पुनर्जन्म जिंकला. कारण ब्रह्म हें निर्दोष व सर्वत्र सम आहे, म्हणून ते ब्रह्माच्या ठायीं स्थिर असतात.
२०) प्रिय वस्तु मिळाल्याबद्दल हर्ष किंवा अप्रिय वस्तु प्राप्त झाल्यामुळे विषाद न मानितां ब्रह्मज्ञानी मनुष्य स्थरबुद्धि व सद्सद्विवेकाविषयीं जागृत असून ब्रह्माचे ठिकाणीं स्थिर राहतो.
२१) बाह्य सुखाविषयींची ज्याची आसक्ति नष्ट झाली आहे, असा पुरुष आत्मस्वरुपांत जो आनंद अनुभवूं लागतो, त्या ब्रह्मानंदाचा उपभोग तो ब्रह्मैक्ययुक्त होऊन निरंतर घेतो. 
२२) विषय व इंद्रियें यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारण असून त्यांना उत्पत्ति व नाश असल्यामुळें हे अर्जुना, ज्ञानी त्यांत रमत नाहीत. 
२३) जो या लोकीं देहत्याग करीपर्यंत कामक्रोधांचा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच खरा योगी व तोच खरा सुखी होय.
२४) आत्मसंतोष हेंच ज्याचें सुख, आत्मानंद हेंच ज्याचें विश्रामस्थान, आणि आत्मस्वरुपज्ञान हाच ज्याचा प्रकाश, असा ब्रह्मस्वरुप योगी ब्रह्मनिर्वाणरुप मोक्ष प्राप्त करुन घेतो. 
२५) सर्व पापें नाहींशी झालेल्या, सर्व संशय फिटलेल्या, अशा आत्मसंयमी व सर्व भूतांच्या हितामध्यें रत झालेल्या ऋषींना ब्रह्मनिर्वाणरुप मोक्ष लाभतो.
२६) कामक्रोधानें रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झालें आहे, व ज्यांनीं आत्मज्ञान संपादन केलें आहे अशा संन्यासी पुरुषांना मोक्षप्राप्ती केव्हांही सन्निधच असते. 
२७-२८) मोक्षाची उत्कट इच्छा करणारा जो मुनि बाह्यविषय बाहेरच ठेवून; दृष्टी भुवयांच्या मध्यबिंदूवर स्थिर करुन, नाकांतून वाहाणार्‍या प्राण व अपान वायूची गति सम ठेवून, इंद्रियें, मन व बुद्धि स्वाधीन राखून वासना, भय व क्रोध यांपासून अलिप्त असतो, तो सदोदित मुक्तच असतो. 
२९) मी सर्व यज्ञांचा व तपांचा भोक्ता, तसेंच स्वर्गादि सर्व लोकांचा, मोठा धनी आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असें जो जाणतो, त्याला (अक्षय्य) शांति लाभते.        
याप्रमाणें श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' कर्मसन्यास प्रकरण ' या नांवाचा पांचवा अध्याय संपूर्ण झाला.     
Meaning in English
Arjuna said
1) O Krishna, You teach renunciation of actions and again action; tell me decisively that one of the two which is good for me.
Bhagwan said
2) Renunciation and the performance of (selfless) action both lead to Liberation; but of the two performance of (selfless) action is superior to the renunciation of action.
3) He who neither dislikes nor desires should be known as a perpetual renouncer of action; for O mighty-armed one, one who is free from the dual throng is easily freed from bondage.
4) The ignorant say that knowledge and (selfless)action are different , (but) not the wise; practicing thoroughly even one, a person attains to the fruit of both.
5) That status which is attained by men of knowledge is also attained by men of (selfless) action; he sees (truly) who sees the way of knowledge and that of (selfless) action as one.
6) But renunciation of action, O mighty-armed one, is difficult to attain without performance of (selfless) action; the sage devoted to (selfless) action attains Brahman quickly.
7) He who is devoted to (selfless) action (yoga) and pure in mind, whose body and senses are under control, and whose Self has become the Self of all, is not touched even though he may be performing work. 
8-9) The man of selfless action, who knows the Truth, thinks,' I am not doing anything,' even while seeing, hearing, touching, smelling, eating, going, sleeping, breathing, speaking, excreting, grasping, and opening and closing of the eyelids, believing that the senses rest in the sense-objects.
10) He who performs actions dedicating them to the Lord and giving up attachment, is not touched by sin, as a lotus leaf by water.
11) Men of selfless action, giving up attachment, perform action through the body, mind, intellect as also the mere senses, for the purification of the mind.
12) The hormonized one, giving up the fruit of action, attains the highest peace; the non-harmonized one, working under the sway of desire, is attached to the fruit and gets bound.
13) The self-controlled embodied being, renouncing all actions through his mind, rest at ease in the city of nine gates (the body) , neither acting nor causing to act.
14) The Lord creates for this world neither agency nor actions nor the union with the fruit of actions; but nature acts.
15) The omnipresent Lord does not accept the sin or virtue of anybody. Knowledge is enveloped by ignorance; because of this beings get deluded.
16) But those whose ignorance has been destroyed by the knowledge of the Self-their knowledge, like the sun, manifests that highest Being.
17) Those who are decided on That, whose mind is set in That, who are devoted to That,and whose last resort is That, attain to non-return, with their sins winnowed off by knowledge. 
18) The wise look with equal eye on a Brahmana endowed with learning and humility, a cow, an elephant, a dog and an outcast.
19) Even here is the relative existence conquered by them whose mind rests in equality; for Brahman is even and faultless, therefore are they established in Brahman. 
20) The knower of Brahman who is established in Brahman, poised in mind and un-deluded, is not elated on getting what is pleasant nor feels worried on getting what is unpleasant.
21) He whose mind is unattached to the external objects of the senses attains to the bliss that is in the self; he with his mind identified with Brahman through absorption in It, enjoys un-decaying bliss.
22) Enjoyment born of sense-objects are indeed the sources of misery; they have, O son of Kunti, a beginning and an end; the wise man does not joice in them.
23) He who is able to withstand the urge arising from passion and anger in this very life, before the fall of the body, is a poised and happy man.
24) He whose happiness is within, whose rejoicing is within and whose light is within, that Yogi, established in Brahman, attains merg in Brahman.
25) Sages whose sins have waned away, whose doubts have been dispelled, who have controlled their mind, and who are devoted to the welfare of all beings, attain absorption in Brahman.
26) Sages who are free from passion and anger, who have controlled their mind, and who have realized the Self, attain absorption in Brahman here and hereafter.
27-28) Shutting out external sense-objects, fixing the gaze between the eyebrows, controlling the outgoing and incoming breaths that move through the nostrils, with the senses, mind and intellect restrained, and free from desire, fear and anger, the sage who has Liberation as his highest goal is indeed ever free.
29) Knowing Me, the enjoyer of all sacrifices and asceticism, the great Lord of all the worlds and the well wisher of all beings, one attains peace. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 5 कर्मसंन्यासयोग अध्याय ५  


Custom Search

No comments:

Post a Comment