Sunday, June 5, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 8 अक्षरब्रह्मयोग अध्याय ८


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 8 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 8 is in Sanskrit. Name of this Adhyay is Akshara-Brahma Yoga. Here in this Adhyay 8 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, about Brahman and Adhyatma and Action. Bhagwan told that the highest imperishable principle is Brahman. Its existence as the embodied soul is called as Adhyatma. The offering (into the sacrificial fire) which causes the origin and development of beings is called action.
अक्षरब्रह्मयोग अध्याय ८
अर्जुन उवाच
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥
श्रीभगवानुवाच
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्जितः ॥ ३ ॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्र्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४ ॥
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५ ॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८ ॥
कविं पुराणमनुशासितार-
मणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरुप-
मादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥
प्रयाणकाले मनसाचलेन 
भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्-
स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥
यदक्षरं वेदविदो वदन्ति 
विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति 
तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११ ॥
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२ ॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४ ॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्र्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥       
सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७ ॥
अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसञ्ज्ञके ॥ १८ ॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २० ॥
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१ ॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चै व योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४ ॥
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । 
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५ ॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६ ॥
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन  ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव
दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा 
योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम  अष्टमोध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणतात. अधिदैवत कशाला म्हटले जाते?
२) हे मधुसूदना, अधियज्ञ तो कोणता व तो ह्या देहांत कसा आहे? त्याचप्रमाणे मनोनिग्रही पुरुषांनी अंतकाळी तुला कसें जाणावें?
श्रीभगवान म्हणाले
३) अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी असें जे आदितत्त्व तें ब्रह्म होय, प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ भाव तें अध्यात्म होय. आणि सचेतन व अचेतन अक्षरब्रह्मापासून भूतांची उत्पत्ती करणारा जो व्यापार त्याला कर्म अशी संज्ञा आहे.  
४) हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नाशवंत कार्यरुप पदार्थ, या पदार्थांत जो पुरुष म्हणजे सचेतन अधिष्ठाता तो अधिदैवत, अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचा अधिपति म्हणतात तो मीच. ह्या देहाच्या ठायीं (अधिदेह) देहधार्‍यांत श्रेष्ठ आहे.
५) आणि जो पुरुष मरणसमयीं माझेंच स्मरण करीत हा देह सोडतो, तो माझ्या स्वरुपास प्राप्त होतो ह्यांत संशय नाही.
६) अथवा अर्जुना, अंतकाळीं मनुष्य ज्या ज्या स्वरुपाचे स्मरण करीत देह सोडतो, त्याला तो जाऊन मिळतो कारण तो त्या स्वरुपाच्या चिंतनांत नित्य मग्न होता.
७) म्हणून तूं सर्वकाळीं माझे स्मरण कर आणि युद्ध कर. मन व बुद्धि माझ्याच ठायीं तूं अर्पण केलींस म्हणजे लढाई करुनही तूं निःसंशय मलाच येऊन मिळशील. 
८) हे पार्था, चित्त दुसरीकडे जाऊं न देतां तें अभ्यासाच्या साहाय्यानें स्थिर करुन दिव्य पुरुषाचें निरंतर चिंतन करीत राहिलें म्हणजे तो त्यालाच जाऊन मिळतो.
९-१०) सर्वज्ञ, पुरातन, नियामक,सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचा धार, अतर्क्य स्वरुप, सूर्याप्रमाणें तेजस्वी व अंधकाराहून पलीकडचा अशा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचें जो मनुष्य अंतकाळीं एकाग्र चित्तानें, भक्तिपूर्वक, योगसामर्थ्यानें आपला प्राण दोन भुवयांमध्ये उत्तम रीतीनें स्थापून सारखें ध्यान करतो, तो भक्तियुक्त पुरुष सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो.     
११) वेदवेत्ते ज्याला अक्षरब्रह्म म्हणतात, विरक्त होऊन यति ज्यांत प्रवेश करतात व ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्यव्रताचे आचरण करितात, ते पद तुला थोडक्यांत सांगतों.
१२-१३) इंद्रियरुपी देहाची सर्व दारें बंद करुन मनाचा हृदयांत निरोध करुन व आपला प्राण मस्तकांत स्थापन करुन समाधियोगांत स्थिर होऊन, ॐ या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझें स्मरण करीत जो देह सोडून जातो, त्याला उत्तम गति मिळते.
१४) हे अर्जुना, जो सतत एकाग्र चित्त करुन माझें स्मरण करतो, त्या माझ्याशी एकनिष्ठ झालेल्या (कर्म) योग्याला मी सहज प्राप्त होतो.
१५) मला येऊन मिळाल्यावर परम सिद्धि पावलेल्या या महात्म्यांना दुःखाचे आगर व अशाश्र्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही.
१६) हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतच्या स्थानापासून हे जीव मागें फिरुन परत जन्माला येतात ; परंतु मला पोंचल्यानंतर मात्र पुन्हां जन्माला येत नाहीत.
१७) एक हजार युगांचा कालावधि हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तसाच एक हजार युगांचा काल ही त्याची रात्र असें दिवस-रात्र जाणणारे मानतात.
१८) हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरु होतांच अव्यक्तापासून सर्व चराचर दृश पदार्थ उत्पन्न होतात, आणि रात्र सुरु झाली म्हणजे त्याच अव्यक्तांत ते लय पावतात.
१९) हे अर्जुना, हा प्रकृतिपरवश पदार्थसमुदाय ब्रह्मदेवाचा दिवस उजाडताच उत्पन्न होऊं लागतो आणि अशा रीतीनें वारंवार जन्माला येणारा तो पदार्थसमुदाय ब्रह्मदेवाची रात्र सुरु होतांच लय पावतो.
२०) ह्या अव्यक्ताहून श्रेष्ठ असें दुसरें एक सनातन अव्यक्त तत्त्व आहे. तें सर्व भूतमात्रांचा नाश झाला असतांही, स्वतः विनाश पावत नाही.
२१) ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणतात, असें जें परम अव्यक्त स्वरुप,  तीच प्राणिमात्रांची शेवटची परमश्रेष्ठ गति होय. ज्या स्थानाला पावलें असतां प्राणी पुनः जन्माला येत नाहीत, तेंच माझें श्रेष्ठतम स्थान होय. 
२२) हे अर्जुना, सर्व प्राणीमात्र ज्यांच्या पोटांत आहेत आणि ज्यानें हें सर्व जग विस्तारले आहे किंवा व्यापलें आहे, तो परमश्रेष्ठ पुरुषोत्तम केवळ अनन्य भक्तीनेच प्राप्त होऊं शकतो. 
२३) हे भरतश्रेष्ठा, कोणत्या कालीं देह टाकिला असतां योगी पुन्हां जन्मास येत नाहीत. आणि कोणत्या कालीं देहत्याग केला असतां ते पुन्हां जन्माला येतात, तो काळ मी तुला सांगतो. 
२४) अग्नि, ज्योति म्हणजे ज्वाला, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे सहा महिने, अशा काळीं मृत्यु पावलेले ब्रह्मवेत्ते ब्रह्मपदाला जातात.            
२५) धुमसणारा अग्नि, रात्र, तसेंच कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे सहा महिने, अशा काळीं मरण पावलेले योगी चंद्रलोकांत जाऊन तेथून (पुण्यांश संपल्यावर) परत मृत्युलोकांत जन्माला येतात.
२६) हे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय व अंधकारमय असे प्राणीमात्रांचे परलोकाचे दोन मार्ग कायमचे मानले गेले आहेत. यांतील एका मार्गानें मनुष्यप्राणी पुनर्जन्म रहित स्थितीला जातो व दुसर्‍या मार्गानें गेलेला पुनः जन्ममरणाच्या भोवर्‍यांत सांपडतो. 
२७) हे पार्था, ह्या दोन मार्गांना तत्त्वतः जाणणारा कर्मयोगी मोह पावत नाही.; म्हणून हे अर्जुना, तूं सदासर्वदा योगयुक्त असा हो. 
२८) कर्मयोगी हें सर्व ज्ञान-विज्ञान प्राप्त झाल्यामुळें वेदांत, यज्ञांत, तपश्र्चर्येंत व दानांत जें पुण्यरुप फळ सांगितलें आहे, त्या सर्वांच्या पलीकडे जातो आणि श्रेष्ठ अशा परमपदाला जाऊन पोंहोचतो. 
अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' अक्षरब्रह्म योग ' ह्या नांवाचा आठवा अध्याय संपूर्ण झाला. 
Meaning in English
Arjun said
1) What is that Brahman, what is that Adhyatma, and what is action, O best of men? What is called the Adhibhuta and what is said to be Adhidaivaiva?
2) Who and how is the Adhiyajna in this body , O slayer of Madhu (Sri Krishna)? and how are You known at the time of death by the self-restrained?
Bhagwan said
3) The highest imperishable principle is Brahman, Its existence as the embodied soul is called Adhyatma, and the offering (into the sacrificial fire) which causes the origin and development of beings is called action.   
4) Perishable entities are called Adhibhuta, the cosmic Being is called Adhidava, and I Myself am called the Adhiyajna in this body, O best of embodied beings.
5) He who at the time of death remembers Me alone and passes out, leaving the body, attains My being-there is no doubt about this.
6) Thinking of whatever object at the time of death a person leaves the body, he attains, O son of Kunti, that very object, being constantly absorbed in its thought.
7) Therfore remember Me at all times and fight; with your mind and intellect devoted to Me, shall attain Me alone--there is no doubt about this.
8) With a mind that has taken to the way of constant practice and does not stray to anything else, one who thinks of the supreme divine Being, attains Him, O Partha.
9-10) He who, endowed with devotion, meditates at the time of death with a steady mind, having by the power of Yoga properly fixed the life-breath in between the eye-brows, on the Being who is wise, ancient, the ruler, smaller than the smallest, the sustainer of all, inconceivable form, resplendent like the sun and beyond ignorance-he attains the shining supreme Being.
11) That imperishable Principle which the knowers of the Vedas describe, into which aspirants bereft of all desires enter, desiring which one lives the abstinent life of a student-that goal I shall tell you in brief.
12-13) Controlling all the inlets (organs), confining the mind to the heart, fixing the life-breath in the head, betaking himself to absorption in Yoga, repeating the monosyllable Om, which is Brahman, and thinking of Me, he who departs leaving the body, attains the highest Goal.
14) To the ever-restrained Yogi who constantly remembers Me every day with his mind on nothing else, O Partha, I am easily accessible.
15) The great-souled ones, having attained Me, have no more birth, which is the abode of misery and non-eternal for they have attained the highest perfection.
16) All the worlds, O Arjuna, including the world of Brahma are subject to recurrence, but after attaining Me there is no rebirth, O son of Kunti.
17) Those who know Brahma's day that lasts for a thousand Yugas, are knowers of day and night.
18) From the Unmanifest all manifested beings are born at the advent of (Brahma's) day, and at the approach of (his) night they get merged that very thing called the Unmanifest.
19) That very multitude of beings, being born again and again, is absorbed at the approach of night, O Partha, and at the approach of the day is born again in spite of itself.
20) Beyond the Unmanifest there is another unmanifest eternal Being that does not perish when all creatures perish.
21) The Unmanifest which is called the Imperishable is said to be the supreme Goal, attaining which they return not; t and by whomhat is My supreme abode.
22) That supreme Being, O Partha, in whom are all beings and by whom all this attainable by one-point devotion.
23) The time at which departing (from here) the Yogies attain non-ruturn or return--that time, O best of Bharatas, I shall tell you.  
24) Fire, the flame, the day, the bright half of the month and the six months of the Sun's northern course- departing by this path the knower of the Brahman attains Brahman.
25) Smoke, the night, the dark half of the month, andhe six months of the sun's southern passage-departing by this path the Yogi attains the lunar sphere and returns (thence).
26) These two paths of the world, the bright and the dark, are considered to be eternal; by one, one returns not,and by the other, one returns.
27) Knowing these paths, O Partha no Yogi is deluded; therefore at all times, O Arjuna be endowed with Yoga.

28) Whatever good result is declared regarding the Vedas, sacrifices, asceticosm and gifts-all that the Yogi who knows the above transcends and attains the primeval supreme Abode.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 8 अक्षरब्रह्मयोग अध्याय ८




Custom Search

No comments:

Post a Comment