Thursday, August 25, 2016

YognidropaDishtam ShriKrishna Kavacham योगनिद्रयोपदिष्टं श्रीकृष्णकवचम्


YognidropaDishtam ShriKrishna Kavacham 
YognidropaDishtam ShriKrishna Kavacham is in Sanskrit. It is from Brahmavaivarta Purana. This Kavacham was very long back given to Yogamaya while there was a war between her and demon Shumba. Because of the power of this Kavacham Shumbha fell down on the earth and killed by Goddess. Now Yoganidra is giving this kavacham to god Brahma who was very afraid when Demon Madhu and Kaitabha were frightening him. After receiving this kavacham God Brahma became fearless. This Kavacham is to be kept in a gold box and either wears it around the neck or around right arm. There will be no fear from enemy, serpent, fire or poison. God Shrikrishna protects the devotee even in sleep.
योगनिद्रयोपदिष्टं श्रीकृष्णकवचम्
योगनिद्रोवाच
दूरीभूतं कुरु भयं भयं किं ते हरौ स्थिते ।
स्थितायां मयि च ब्रह्मन् सुखं तिष्ठ जगत्पते ॥ १ ॥
श्रीहरिः पातु ते वक्त्रं मस्तकं मधुसूदनः ।
श्रीकृष्णश्र्चक्षुषी पातु नासिकां राधिकापतिः ॥ २ ॥
कर्णयुगं च कण्ठं च कपालं पातु माधवः ।
कपोलं पातु गोविन्दः केशांश्र्च केशवः स्वयम् ॥ ३ ॥
अधरौष्ठं हृषीकेशो दन्तपंक्तिं गदाग्रजः ।
रासेश्र्वरश्र्च रसनां तालुकं वामनो विभुः ॥ ४ ॥
वक्षः पातु मुकुन्दस्ते जठरं पातु दैत्यहा ।
जनार्दनः पातु नाभिं पातु विष्णुश्र्च ते हनुम् ॥ ५ ॥
नितम्बयुग्मं गुह्यं च पातु ते पुरुषोत्तमः ।
जानुयुग्मं जानकीशः पातु ते सर्वदा विभुः ॥ ६ ॥
हस्तयुग्मं नृसिंहश्र्च पातु सर्वत्र सङ्कटे ।
पादयुग्मं वराहश्र्च पातु ते कमलोद्भवः ॥ ७ ॥
ऊर्ध्वं नारायणः पातु ह्यधस्तात् कमलापतिः ।
पूर्वस्यां पातु गोपालः पातु वह्नौ दशास्यहा ॥ ८ ॥
वनमाली पातु याम्यां वैकुण्ठः पातु नैर्ऋतौ ।
वारुण्यां वासुदेवश्र्च सतो रक्षाकरः स्वयम् ॥ ९ ॥
पातु ते संततमजो वायव्यां विष्टरश्रवाः ।
उत्तरे च सदा पातु तेजसा जलजासनः ॥ १० ॥
ऐशान्यामीश्र्वरः पातु सर्वत्र पातु शत्रुजित् ।
जले स्थले चान्तरिक्षे निद्रायां पातु राघवः ॥ ११ ॥
इत्येवं कथितं ब्रह्मन् कवचं परमाद्भुतम् ।
कृष्णेन कृपया दत्तं स्मृतेनैव पुरा मया ॥ १२ ॥
शुम्भेन सह संग्रामे निर्लक्ष्ये घोरदारुणे ।
गगने स्थितया सद्यः प्राप्तिमात्रेण सो जितः ॥ १३ ॥
कवचस्य प्रभावेण धरण्यां पतितो मृतः ।
पूर्वं वर्षशतं खे च कृत्वा युद्धं भयावहम् ॥ १४ ॥
मृते शुम्भे च गोविन्दः कृपालुर्गगनस्थितः ।
माल्यं च कवचं दत्त्वा गोलोकं स जगाम ह ॥ १५ ॥
कल्पान्तरस्य वृत्तान्तं कृपया कथितं मुने ।
अभ्यन्तरभयं नास्ति कवचस्य प्रभावतः ॥ १६ ॥
कोटिशः कोटिशो नष्टा मया दृष्टाश्र्च वेधसः । 
अहं च हरिणा सार्धं कल्पे कल्पे स्थिरा सदा ॥१७ ॥
इत्युक्त्वा कवचं दत्त्वा सान्तर्धानं चकार ह ।
निःशङ्को नाभिकमले तस्थौ स कमलोद्भवः ॥ १८ ॥
सुवर्णगुटिकायां तु कृत्वेदं कवचं परम् ।
कण्ठे वा दक्षिणे बाहौ बध्नीयाद् यः सुधीः सदा ॥ १९ ॥
विषाग्निसर्पशत्रुभ्यो भयं तस्य न विद्यते ।
जले स्थले चान्तरिक्षे निद्रायां रक्षतीश्र्वरः ॥ २० ॥
॥ इति ब्रह्मवैवर्ते योगनिद्रयोपदिष्टं श्रीकृष्णकवचं सम्पूर्णम् ॥
(श्रीकृष्णजन्मखण्ड अध्याय १२/१७-३६)      
मराठी अर्थ
योगनिद्रा म्हणाली
ब्रह्मन् तुम्ही भिवु नका. हे जगत्पते ! ज्याठिकाणी मी आणि  श्रीहरि विराजमान आहेत, तेथे भय कसले? तुम्ही सुखाने रहा. 
आता कवच सुरु होते.
श्रीहरि तुमच्या मुखाचे रक्षण करो. मधुसूदन डोक्याचे, श्रीकृष्ण दोन्ही डोळ्यांचे, तसेच राधिकापति नाकाचे रक्षण करो. माधव दोन्ही कानांची, कण्ठाची आणि कपाळाची रक्षा करो. कपोलाची गोविन्दआणि केसांची स्वतः केशव रक्षा करो. हृषीकेश अधरोष्ठांची गदाग्रज दन्तपंक्तिची, रासेश्र्वर जीभेची आणि भगवान वामन ताळुचे रक्षण करो. मुकुन्द तुमच्या वक्षःस्थळाचे रक्षण करो. दैत्यसूदन तुमच्या पोटाचे रक्षण करो. जनार्दन नाभीचे व विष्णु ठोढीचे रक्षण करो. पुरुषोत्तम दोन्ही नितम्बांचे आणि गुप्तांगाचे रक्षण करो. भगवान जानकीश्र्वर तुमच्या गुडघ्यांचे नेहमी रक्षण करो. नृसिंह सर्वत्र संकटांत दोन्ही हातांचे आणि कमलोद्भव वराह दोन्ही पायांचे रक्षण करो. वरच्या उर्ध्वेला नारायण आणि खाली अधरेला कमलापति तुमचे रक्षण करो. पूर्वेला गोपाल तुमचे रक्षण करोत. आग्नेयेला रावणास मारणारा श्रीराम तुमची रक्षा करो. दक्षिणेला वनमाळी, नैऋत्येला वैकुण्ठ तसेच पश्र्चिमेला सत्पुरुषांचे रक्षण करणारे स्वतः वासुदेव तुमचे रक्षण करोत. वायव्येला अजन्मा विष्टरश्रवा श्रीहरि नेहमी तुमचे रक्षण करोत. उत्तरेला कमलासन ब्रह्मा आपल्या तेजाने नेहमी तुमचे रक्षण करोत. ईशान्येला ईश्र्वर रक्षण करोत. शत्रुजीत सर्वत्र रक्षण करोत. जल, थल आणि आकाश व निद्रेमध्ये श्रीरघुनाथ रक्षण करोत.
हे ब्रह्मन् ! अशाप्रकारे या कवचाचे वर्णन केले गेले आहे. फार पूर्वी मी स्मरण केल्यावर भगवान श्रीकृष्णांनी माझ्यावर कृपाकरुन हे मला दिले होते. शुम्भाबरोबर जेव्हां घोर युद्ध चालू होते तेव्हां हे कवच प्राप्त होताच तत्काल मी शुम्भाला पराजीत केले. या कवचाच्या प्रभावाने शुम्भ जमिनीवर पडला आणि मेला. शेकडो वर्षे भयंकर युद्ध करुन शुम्भ जेव्हां मेला तेव्हा भगवान गोविन्द कवच व माला देऊन गोलाकांत निघून गेले. 

हे मुने ! अशा प्रकारे कल्पातरांचा वृत्तांत सांगितला गेला आहे. या कवचाच्या प्रभावाने मनांत कधीही भय निर्माण होत नाही. मी प्रत्येक कल्पांत श्रीहरिंच्या बरोबर राहून करोडो ब्रह्मांडे नष्ट होतांना बघितली आहेत. असे सांगून व कवच देऊन देवी योगनिद्रा अंतर्धान पावली. आणि कमलोद्भव ब्रह्मा भगवान् विष्णुंच्या नाभिकमळामध्ये निःशंक होऊन विराजमान  झाले. जो हे कवच सोन्याच्या (लहान) पेटींत ठेवून गळ्यांत किंवा उजव्या दंडावर धारण करतो त्याची बुद्धि नेहमी शुद्ध रहाते. तसेच विष, अग्नि, सर्प आणि शत्रु यांपासून कधिही भिती वाटत नाही. जमीन, पाणि व आकाशामध्ये तसेच निद्रावस्थेमध्ये भगवान् स्वतः त्याचे रक्षण करतात.  
YognidropaDishtam ShriKrishna Kavacham
योगनिद्रयोपदिष्टं श्रीकृष्णकवचम्



Custom Search

No comments:

Post a Comment